Ajit Pawar Saam tv
महाराष्ट्र

Ajit Pawar : पुढच्या आषाढीला अजित पवारांनी मुख्यमंत्री म्हणून महापूजा करावी; पक्षातील नेत्यांचं विठ्ठलाला साकडं, वाचा स्पेशल रिपोर्ट

ajit pawar News : उपमुख्यमंत्रिपदाचा षटकार मारलेल्या अजित पवारांच्या मुख्यमंत्रिपदासाठी नेत्यांनी विठ्ठलाला साकडं घातलंय.. पाहूयात यावरचा हा स्पेशल रिपोर्ट....

Bharat Mohalkar

देवेंद्र फडणवीसांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेऊन सहा महिनेही झाले नाहीत... तोच आता अजित पवारांना मुख्यमंत्रिपद मिळावं, यासाठी नेत्यांनी विठ्ठलाला साकडं घातलंय....

तर पुढच्या आषाढी एकादशीला विठ्ठलाच्या मनात असेल तर महापुजेचा मान मिळेल, अशी आशा अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवारांनी व्यक्त केलीय..

एवढंच नाही तर पांडुरंगाची अजित पवारांवर कृपा असल्याचं मंत्री हसन मुश्रीफांनी म्हटलंय...

खरंतर अजित पवारांनी सहकारी साखर कारखान्याचे संचालकपद ते राज्याचे उपमुख्यमंत्रिपद अशी मोठी झेप घेतलीय.. एवढंच नाही तर त्यांनी उपमुख्यमंत्रिपदाचा षटकार मारलाय... मात्र अजित पवारांची कारकीर्द कशी आहे? पाहूयात...

1982

इंदापूरच्या छत्रपती कारखान्याचे संचालकपदी निवड

1991

बारामती लोकसभेतून विजय

1991 ते 1993

कृषी, उर्जा, नियोजन राज्यमंत्री म्हणून काम

1999-2004

जलसिंचन मंत्रिपदी वर्णी

2003

ग्रामविकास मंत्रिपदाची संधी

2010

पृथ्वीराज चव्हाण यांच्या मंत्रिमंडळात उपमुख्यमंत्रिपद

2019

देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत 79 तासांसाठी उपमुख्यमंत्री

2019

ठाकरेंच्या सरकारमध्ये उपमुख्यमंत्रिपदी वर्णी

2023

एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वातील सरकारमध्ये उपमुख्यमंत्रिपद

2024

देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वात उपमुख्यमंत्री म्हणून सहाव्यांदा वर्णी

अजित पवारांची मुख्यमंत्री इच्छा वारंवार बोलून दाखवलीय.. मात्र सातत्याने त्यांना उपमुख्यमंत्रिपदावरच समाधान मानावं लागलंय... आता अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या नेत्यांनी विठ्ठलाला साकडं घातल्याने पुढच्या आषाढी एकादशीआधी फडणवीसांना हटवून अजित पवारांना महापुजेचा मान मिळणार का? याचीच उत्सुकता आहे...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Retail Inflation: आनंदाची बातमी! महागाईने गाठला 6 वर्षातील नीचांकी स्तर, काय झालं स्वस्त?

MNS News: मद्यधुंद मनसे जिल्हाध्यक्षाची गुंडगिरी; रुग्णालयात ज्युनिअर डॉक्टरवर जीवघेणा हल्ला|VIDEO

Budha Grah: या ४ राशींचे उजळणार भाग्य; बुध ग्रह कर्क राशीत असताना होणार चमत्कार

Anti-Conversion Law: मोठी बातमी! महाराष्ट्रात धर्मांतरविरोधी कायदा येणार? गृहराज्यमंत्री काय म्हणाले? VIDEO

Ind Vs Eng : लॉर्ड्सवर रनचेज करणं इतकं कठीण का आहे? भारताच्या लागोपाठ विकेट्स पडण्याचं कारण समोर

SCROLL FOR NEXT