Ajit Pawar  saam tv
महाराष्ट्र

Ajit Pawar Tweet: कर्नाटकात काँग्रेसच्या विजयानं भाजपची दक्षिणेत पुरती नाकाबंदी! अजित पवारांचं त्यांच्याच शैलीत ट्वीट

Ajit Pawar Tweet On Karnataka Election Result: कर्नाटक विधानसभा निवडणुकीत 135 जागांवर विजय मिळवत काँग्रेसने स्पष्ट बहुमत मिळवले आहे.

Chandrakant Jagtap

Ajit Pawar Tweet On Karnataka Assembly Election Result 2023: कर्नाटक विधानसभा निवडणुकीत 135 जागांवर विजय मिळवत काँग्रेसने स्पष्ट बहुमत मिळवले आहे. कानडी जनतेने भाजपला नाकारले आहे. या निवडणुकीत (Karnataka Election Result 2023) भाजपला केवळ 65 जागांवरच समाधान मानावे लागले आहे. या निकालानंतर राज्यातील विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी दक्षिनेत भाजपची नाकाबंदी झाली अशी प्रतिक्रिया दिली आहे.

अजित पवार ट्वीट (Ajit Pawar Tweet) करून म्हणाले की, 'कर्नाटक विधानसभा निवडणुकीत मतदारांनी काँग्रेसला दिलेला कौल हा कर्नाटक आणि देशाच्या राजकारणाची वाटचाल पुन्हा एकदा विकास आणि लोकशाही मजबूत करण्याच्या दिशेनं सुरु झाल्याची नांदी आहे. कर्नाटकातील काँग्रेसच्या विजयानं भाजपची दक्षिणेकडील पुरती नाकाबंदी केली आहे'.

'राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, शिवसेना, मित्रपक्षांची महाविकास आघाडी महाराष्ट्रातही याची पुनरावृत्ती करेल. महाराष्ट्रातील जनतेनं तसा निर्धार आधीच केला आहे. कर्नाटकातील मतदार, काँग्रेस नेते व कार्यकर्त्यांचं मनःपूर्वक अभिनंदन!', असं ट्वीट अजित पवार यांनी केले आहे.

बोम्मई सरकारच्या 14 मंत्र्यांचा पराभव

या निकालात सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे बसवराज बोम्मई मंत्रिमंडळातील एक दोन नाही तर तब्बल 14 मंत्र्यांना पराभवाचा (14 cabinet ministers defeated) सामना करावा लागला. यामुळे भाजपची नामुष्की झाली आहे. गोविंदा करजोल (मुधोळ), जेसी मधुस्वामी (चिकनईकानाहल्ली), बीसी पाटील (हिरेकरूर), शंकर पाटील मुनेना कोप्पा (नवलगुंड), हलप्पा आचार (येलबुर्गा), बी श्रीरामुलू (बेल्लारी), के सुधाकर (चिक्कबल्लापुरा), बीसी नागेश (तिप्तूर), मुरुगेश निरानी (बिलगी), बीसी पाटील (हिरेकरूर) आणि एमटी बी नागराज (होस्कोटे) या मंत्र्यांचा पराभव झाला. (Latest Breaking News)

एवढंच नाही तर भाजप नेते आणि विधानसभा अध्यक्ष विश्वेश्वर हेगडे कागेरी यांनाही सिरसी मतदारसंघातून पराभवाचा सामना करावा लागला. याशिवाय मंत्री व्ही सोमन्ना वरुणा आणि चामराजनगर या दोन मतदारसंघातून निवडणूक हरले. या दोन्ही जागांवर त्यांनी निवडणूक लढवली होती. मंत्री आर अशोक यांनीही दोन मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. पद्मनाभनगरमधून ते पुन्हा निवडून आले, पण कनकपुरा मतदारसंघातून त्यांना पराभवाचा सामना करावा लागला.

कर्नाटकचा संपूर्ण निकाल

कर्नाटक विधानसभा निवडणुकांचे निकाल शनिवारी जाहीर झाले. यात काँग्रेसने भाजपचा सुपडा साफ केला आहे. काँग्रेसला स्पष्ट बहुमत मिळाले आहे. 224 जागांच्या कर्नाटक विधानसभा निवडणुकीत 113 हा बहुमताचा आकडा आहे. त्याच्या खूप पुढे जात 135 जागांवर विजय मिळवत काँग्रेस सर्वात मोठा पक्ष बनला आहे, तर विजयाचा दावा करणाऱ्या भाजपला कर्नाटकच्या जनतेने नाकारलं आहे. (Latest Political News)

भाजपची 65 जागांवर घसरगुंडी झाली आहे. याशिवाय सुरुवातीला जनता दल सेक्यूलर या निवडणुकीत किंगमेकर ठरेल असे वाटत होते. मात्र नंतर त्यांच्याही जागा कमी झाल्या. जेडीएसला या निवडणूकीत कर्नाटकच्या जनतेने फक्त 19 जागांवर विजय मिळवून दिला. यामुळे भाजप आणि जेडीएसची पिछेहाट झाली आहे. इतर पक्षांना या निवडणुकीत 4 ठिकाणी विजय मिळाला आहे. एका जागेचा निकाल अद्याप बाकी आहे. तिथे भाजप आघाडीवर आहे. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ajaz Khan : सोशल मीडियावर हवा; मात्र राजकारणात डब्बागुल,'बिग बॉस' फेम अभिनेत्याचा दारूण पराभव

Tourist Spots: भारतातील सर्वाधिक भेट दिलेले 'ही' ५ पर्यटन स्थळ

Devendra Fadanvis : महाराष्ट्राने पुन्हा एकदा पंतप्रधान मोदींवर विश्वास दाखवलाय; अभूतपूर्व विजयानंतर फडणवीसांची प्रतिक्रिया

Priyanka Gandhi : वायनाड पोटनिवडणुकीत प्रियंका गांधींचा दणदणीत विजय; मोकेरी यांना 4 लाखांच्या फरकाने हरवलं

Uddhav Thackeray : लाटेपेक्षा त्सुनामी आली; महायुतीच्या विजयावर उद्धव ठाकरेंची प्रतिक्रिया

SCROLL FOR NEXT