Ajit Pawar Dhananjay Munde Saam Tv
महाराष्ट्र

Maharashtra Politics : पालकमंत्रिपद कापलं, मंत्रिपद वाचलं? मुंडेंचं मंत्रिपद वाचवण्यासाठी दादांची खेळी? पाहा स्पेशल रिपोर्ट

Ajit Pawar Dhananjay Munde : धनंजय मुंडेंचा पालकमंत्रिपदाचा पत्ता कापला गेला असला तरी यामागे अजितदादांची मुंडेंना वाचवण्याची स्मार्ट खेळी असल्याची चर्चा रंगलीय. नेमकी काय आहे ही स्मार्ट खेळी आणि अजितदादांनीच का घेतली बीडची जबाबदारी त्यावरचा हा विशेष रिपोर्ट...

Vinod Patil

Maharashtra Politics : मंत्रिपदाची शपथ घेऊन तब्बल महिनाभरानंतर पालकमंत्रिपदाचं वाटप करण्यात आलं. मात्र साऱ्या राज्याचं लक्ष लागलं होतं ते बीडच्या पालकमंत्रिपदाकडं. कारण सरपंच संतोष देशमुखांच्या हत्येचं कनेक्शन धनंजय मुंडेंच्या निकटवर्तीयांपर्यंत पोहचल्यानं त्यांच्या मंत्रिपदाचा राजीनामा मागण्यात येतोय. त्यामुळे अजितदादांनी त्यांना बीडच्या पालकमंत्रिपदापासून दूर ठेवलं. मात्र सध्याची बीडची परिस्थिती पाहता आपणच अजितदादांना पालकमंत्रिपद न देण्याची विनंती केली होती असा दावा धनंजय मुंडेंनी केलाय.

धनंजय मुंडेंना पालकमंत्री न करून अजितदादांनी स्मार्ट खेळी खेळलीय. पालकमंत्री न करून दादांनी धनंजय मुंडेंचं एकप्रकारे मंत्रिपदच वाचवल्याची चर्चा रंगलीय. धनंजय मुंडेंच्या मंत्रिपदाच्या राजीनाम्याची जोरदार मागणी सुरू आहे. त्यांना पालकमंत्री केलं असतं तर आगीत आणखीनच तेल ओतलं गेलं असतं. त्यामुळे त्यांना बीडच नव्हे तर दुसऱ्या कोणत्याही जिल्ह्याचं पालकमंत्री न करून कारवाई केल्यासारखा संदेश देण्याचा प्रयत्न केला. यामुळे मंत्रिपदाच्या राजीनाम्याची मागणी मागे पडू शकते.

तर दुसरीकडे दादांनी बीडचं पालकमंत्रिपद स्वत:कडे ठेवल्यामुळे त्यांच्याकडून विरोधकांनी बीडमधली गुन्हेगारी कमी करण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे. मात्र दादांच्या आडून दुसऱ्या कुणी कारभार चालवू नये असा टोला रोहित पवारांनी लगावलाय. तर सुषमा अंधारेंनी रक्तरंजित बीडमध्ये बारामती पॅटर्न राबवा असे म्हटले आहे.

पालकमंत्रिपदाचा पत्ता कापला गेल्यामुळे मुंडेंच्या मंत्रिपदाच्या राजीनाम्याची मागणी मागे पडणार की आणखी जोर धरणार हा खरा प्रश्न आहे. तर दुसरीकडे बीडमध्ये कायदा सुव्यवस्था राखण्याचं मोठं आव्हान अजितदादांसमोरही असणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Rave Party : खडसेंच्या जावयाला रेव्ह पार्टीत अटक, कट्टर विरोधक गिरिश महाजनांची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाले...

Maharashtra Live News Update: यवतमाळमध्ये आमदार सोनवणे विरोधात आदिवासी संघटना आक्रमक

महिलांचा रस्त्यावर राडा! शेजारच्या वादातून सुरू झाली हाणामारी;VIDEO

Hyundai Kia SUV: ग्राहकांसाठी खुशखबर! ह्युंदाई आणि किआ लाँच करणार 3 नव्या कॉम्पॅक्ट मॉडेल्स

Pune Rave Party: भाजप म्हणजेच 'रेव्ह पार्टी', रोहिणी खडसेंच्या नवऱ्याला अटकेनंतर संजय राऊत संतापले

SCROLL FOR NEXT