हा बॅनर नीट पाहा.. अजित पवारांच्या बॅनरवर चक्कं शरद पवारांचा फोटो झळकलाय.... आणि त्यामुळेच निवडणुकीसाठी एकत्र आलेल्या राष्ट्रवादी निवडणुकीनंतरही कायम राहणार का? असा प्रश्न निर्माण झाला... हाच प्रश्न अजित पवारांना विचारला असता अजित पवारांनी निवडणुकीनंतर दोन्ही राष्ट्रवादी कायम एकत्र येण्याचे संकेत दिलेत... तर पवारांच्या राष्ट्रवादीच्या नेत्यांनीही अजित पवारांची इच्छा पूर्ण व्हावी, असं वक्तव्य केलंय..
एकमेकांच्या विरोधात लोकसभा आणि विधानसभा निवडणूक लढवल्यानंतर पुणे, पिंपरी चिंचवड आणि परभणी महापालिकेत भाजपविरोधात दोन्ही राष्ट्रवादीने एकीची वज्रमूठ आवळलीय... त्यातच पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या प्रचाराचा नारळ फोडतानाच अजित पवारांनी भाजपच्या कारभाराची पोलखोल केलीय.. आता अजित पवारांपाठोपाठ सुनील तटकरेंनीही शरद पवार हेच आपले दैवत असल्याचं वक्तव्य केलंय...
खरंतर लोकसभा निवडणुकीनंतर अनेकदा दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या अनेकदा चर्चा रंगल्या होत्या.... तर अजित पवारांनी अनेकदा शरद पवार हेच आपले दैवत असल्याचंही म्हटलं होतं.. आता शरद पवारांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने दिल्लीत झालेल्या बैठकीनंतर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या चर्चांना वेग आला.. आणि नगरपालिका निवडणुकेत एकीच्या फॉर्म्युल्याला यश मिळाल्यानंतर आता महापालिकेसाठी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्या आहेत..
आता आगामी काळात दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याबाबत नेते सकारात्मक असल्यानं ठाकरेंपाठोपाठ एकत्र आलेले पवार काका पुतण्या निवडणुकीनंतरही कायम एकत्र राहणार की पुन्हा आपली वेगवेगळी राजकीय चूल कायम ठेवणार... याचीच उत्सुकता आहे...
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.