Ramdas Kadam raises questions over Ajit Pawar plane crash 
महाराष्ट्र

Ajit Pawar Plane Crash: अजितदादांच्या घातपातात तटकरेंचा हात? महायुतीतील नेत्यांचाच खळबळजनक दावा

Ajit Pawar Death Case: अजितदादांच्या विमान अपघाताचं गूढ अद्याप कायम आहे. मात्र, त्यांच्या मृत्यूवरून राजकारणात आरोप-प्रत्यारोप होतायत. आता महायुतीच्या नेत्यानं दादांच्या घातपाताचा खळबळजनक दावा केलाय. महायुतीचा तो नेता कोण आहे? दादांच्या अपघाती निधनाबाबत काय दावा केलाय? कुणावर घातपाताचा आरोप केलाय?. पाहूयात या रिपोर्टमधून.

Rohit Kadam

  • अजित पवार यांच्या विमान अपघातावरून महाराष्ट्रात पुन्हा राजकीय चर्चा

  • शिवसेना नेते रामदास कदम यांनी सुनील तटकरे यांच्या भूमिकेबाबत संशय

  • अजित पवार यांच्या अपघातात घातपात होता का, याची चौकशी करण्याची मागणी

अजितदादांच्या अपघाती मृत्यूला आता 10 महिने उलटले पण याच दुर्देवी घटनेवरुन सुरु झालेलं राजकारण काही केल्या थांबत नाही. अजित दादांच्या अपघाताच्या तपासावर पवार कुटुंबियांनी देखिल आक्षेप घेतला होता मात्र आता अजित पवारांच्या मृत्यू मागे राष्ट्रवादीचेच प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे आहेत असा आरोप दुसरा तिसरं कोणी नाही तर महायुतीतील मित्रपक्षाचे जेष्ठ नेते रामदास कदमांनी करुन खळबळ उडवून दिलीय त्यांनी नेमंक काय म्हटलंय. पाहा.

रामदास कदमांनी फक्त आरोपच केले नाहीत तर सुनिल तटकरेंची चौकशी करा अशीही मागणी केलीये. आता तटकरेंनीच दादांचा घातपात केला का असा प्रश्न उपस्थित झालेला असतांना शिंदेंसेनेच्या आणखीन एका आमदारांने दादांच्या मृत्यूनंतर तटकरेंनी उपमुख्यमंत्रीपदासाठी फिल्डींग लावल्याचा आरोप करत त्यांना घेरलं होतं.

तटकरे-थोरवे-कदम हे कोकणातील सेना राष्ट्रवादीचे नेते. त्यामुळे हे नेते जिल्ह्यातील राजकीय वर्चस्वासाठी एकमेंकावर आरोप करत असतील तर त्यात वावगं वाटण्यसारखं काहीही नाही. पण आपण नेमके काय आरोप करतो आहोत त्याचं भान राखणही तितकंच गरजेचं. कारण अजित पवार हे काही कोण्या एका जिल्ह्याचे नेते नव्हते तर ते राज्याचे उपमुख्यमंत्री होते.

त्यामुळे त्यांच्या अपघाती मृत्यूचं राजकारणं करणं सुसंस्कृत महाराष्ट्राला नक्कीच शोभणारं नाही. तर काँग्रेसच्या विजय वडेट्टीवारांनी कदमांनी केलेल्या या आरोपांवरुन त्यांना पोलिसात जाऊन तक्रार करण्याचं आवाहन केलंय. महायुतीत रामदास कदमांनी केलेल्या आरोपांनी नक्कीच ठिणगी पेटलीये. यावर आता एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार काय भूमिका घेतात हे पाहणं महत्वाचे आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

टेक कंपनीचा सीईओ हनीट्रॅपचा शिकार; AIच्या स्पर्धेत चीनकडून अमेरिकेचा गेम?

Diwali Padwa Horoscope: दिवाळी पाडव्याला ५ राशींचे नशीब चमकणार! कोणाला मिळणार आनंदाची बातमी?

इस्रायलमध्ये नेतान्याहूंची गच्छंती अटळ? ट्रम्पनंतर नेतान्याहूंना मोठा धक्का

Kolhapur Gokul Election: गोकुळमध्ये राजकीय घडामोडींना वेग; अध्यक्षपदासाठी 'या' नेत्याच्या नावाची जोरदार चर्चा

Car Tyre Numbers: कारच्या टायरवर लिहिलेल्या नंबरचा नेमका अर्थ काय असतो?

SCROLL FOR NEXT