Ajit Pawar Plane Crash saamtv
महाराष्ट्र

Ajit Pawar Death: अजितदादांच्या विमानात बॉम्ब होता का?, शरद पवारांच्या खासदाराला संशय

MP Bajarang Sonawane On Ajit Pawar Plane Crash: अजित पवार यांच्या विमान अपघाताबाबत अनेक शंका व्यक्त केल्या जात आहेत. हा अपघात नसून घातपात असल्याचा आरोप अनेकांनी केला. आता राष्ट्रवादीचे खासदार बजरंग सोनवणे यांनी अजितदादांच्या विमानात बॉम्ब होता का?, अशी शंका उपस्थित केली.

Priya More

Summary -

  • अजित पवारांच्या विमान अपघातावरून घातपाताचा संशय व्यक्त करण्यात येत आहे

  • शरद पवार गटाचे खासदार बजरंग सोनवणे यांनी बॉम्बचा संशय व्यक्त केला

  • सीसीटीव्ही फुटेज आणि ब्लॅक बॉक्स डेटा सार्वजनिक करण्याची मागणी केली

अजित पवार यांचा विमान अपघातामध्ये मृत्यू झाला. २८ जानेवारीला बारामतीमध्ये अजित पवारांचे विमान कोसळले. या घटनेला १० दिवस झाले. या अपघाताबाबत अनेक प्रश्न आणि शंका उपस्थित केल्या जात आहेत. हा अपघात की घातपात अशा शंका व्यक्त केली जात आहे. अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या नेत्यांनी देखील या अपघाताबाबत अनेक प्रश्न उपस्थित केले. त्यानंतर आता बीडचे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे खासदार बजरंग सोनवणे यांनी खळबळजनक दावा केला.

'अजित पवारांच्या विमानाचे दोन व्हिडिओ समोर आले असून विमानाचा दोन वेळा स्फोट झाला. मग विमानामध्ये बॉम्ब होता का? बॉम्बने विमान उडवले गेले का?', असा प्रश्न बजरंग सोनवणे यांनी उपस्थित केला आहे. 'त्यावेळी नेमकं काय घडलं आहे? याची चौकशी झाली पाहिजे. घात की अपघात याची देखील चौकशी झाली पाहिजे आणि सर्व सीसीटीव्ही फुटेज सर्वसामान्य नागरिकांपर्यंत आले पाहिजेत. ब्लॅक बॉक्स सार्वजनिक केला पाहिजे.', अशी मागणी त्यांनी केली.

'अजितदादा देवगिरीवरून किती वाजता निघाले त्याचे सीसीटीव्ही फुटेज. एअरपोर्टवरून निघाल्याचे सीसीटीव्ही फुटेज आणि विमानात कधी बसले यांचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले पाहिजे. सुरुवातीला सहा लोकांचा आकडा सांगितला गेला. मग एक कुठे गेला? ', असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केला आहे. खासदार बजरंग सोनवणे यांनी केलेल्या दाव्यामुळे चर्चा होऊ लागली आहे.

दरम्यान, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातामध्ये मृत्यू झाला. जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचारासाठी बारामतीमध्ये त्यांच्या चार सभा होणार होत्या. या सभेसाठी ते मुंबईवरून बारामतीला विमानाने जात होते. सकाळी पावणे नऊच्या सुमारास बारामती एअरपोर्टजवळ त्यांचे विमान कोसळले. विमानात स्फोट झाला आणि ते खाली कोसळून त्यांचे अनेक तुकडे झाले. या अपघातामध्ये अजित पवार यांच्यासह ५ जणांचा मृत्यू झाला. या विमान अपघाताचा तपास केला जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Beed Crime: बीड हादरले! तरूणावर चाकूने सपासप वार, हॉटेलबाहेर जागीच संपवलं

Maharashtra Monsoon Session: विरोधकांनी बहिष्कार सोडून चर्चेला यावे : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Maharashtra News Live Update: ओमराजांच्या निवासस्थानाबाहेर शिवसेना शिंदे गटाचे कार्यकर्ते जमले

Kalyan Crime: कल्याणमधील उच्चभ्रू सोसायटीत ड्रग्जची विक्री, फ्लॅटवर छापा टाकत २० किलो गांजा जप्त; महिलेसह दोघांना अटक

Operation Tiger: आम्ही ऑपरेशन अर्धवट ठेवत नाही, लवकरच ब्रेकिंग न्यूज मिळेल; एकनाथ शिंदेंचे सूचक विधान

SCROLL FOR NEXT