AJIT PAWAR PLANE CRASH: SUPRIYA SULE QUESTIONS FIR DELAY, TARGETS GOVERNMENT saam tv
महाराष्ट्र

Ajit Pawar Plane Crash: 'माझा भाऊ गेला, 40 आमदार सत्ता भोगतायत'; अजितदादांच्या अपघातप्रकरणी FIRचं काय झालं?

Supriya Sule Targets Ajit Pawar’s 40 MLAs: अजित पवारांच्या अपघाताच्या चौकशीवरुन सुप्रिया सुळे आक्रमक झाल्या यावेळी त्यांनी सरकारला तर धारेवर धरलंच पण राष्ट्रवादीच्या 40 आमदारांनाही कसं फैलावर घेतलं आणि त्यानंतर कसं राजकीय वातावरण तापलं पाहा.

Snehil Shivaji

अजित पवारांच्या विमान अपघातातील FIRच्या विलंबावर सुप्रिया सुळे यांनी सरकारला घेरलं

सुळे यांनी अजित पवारांच्या गटातील 40 आमदार आणि 8-9 मंत्र्यांवरही प्रश्न उपस्थित

विमान अपघाताच्या कारणांची अधिकृत चौकशी AAIBकडून सुरू आहे

अजितदादांच्या विमान दुर्घटनेत झालेल्या मृत्यूला आता ७ महिने उलटले. संपूर्ण महाराष्ट्र हादरवून सोडणाऱ्या या अपघाताचं गूढ अजूनही उकललेलं नाही. पवार कुटुंबाने या संशयास्पद अपघाताची सखोल चौकशी व्हावी आणि तातडीने FIR दाखल व्हावा म्हणून आवाज उठवला, मात्र सरकारी पातळीवर कुठलीही चक्रं हललीच नाहीत.

दुसरीकडे केवळ मोदींचा फोटो हटवला म्हणून अमित ठाकरेंवर २४ तासांत एफआयआर दाखल झाल्यानं संतापलेल्या सुप्रिया सुळेंनी प्रशासनाच्या दुटप्पीपणाचा समाचार घेत सरकारसह अजितदादांच्या त्या ४० आमदारांवर आसूड ओढलाय.

सुप्रिया सुळेंनी अजितदादांच्या अपघाताची चौकशी दडपल्याचा थेट आरोप करत सरकारला तर पिंजऱ्यात उभं केलंच. पण दादांमुळे सत्ता भोगणाऱ्या राष्ट्रवादीच्या ४० आमदारांच्या भूमिकेवरही संशय घेतलाय. सुप्रिया सुळेंने सत्ताधाऱ्यांसह राष्ट्रवादीच्या आमदारांवर टिका केल्यानं आता दादाच्या अपघात प्रकरणाच्या चौकशीवरुन सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये वाद पेटल्याचं दिसलंय.

सुप्रिया सुळेंच्या या घणाघाती आरोपांमुळे राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या भूमिकेवर पुन्हा सवाल उपस्थित झालेत. कारण अजित पवारांच्या अकाली मृत्यूनंतर चौथ्याच दिवशी सुनेत्रा पवारांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली.. पार्थ पवार राज्यसभा खासदार झाले... आमदारकीची टर्म संपलेले अमोल मिटकरी शांत झाले. तर जय पवारांची मागणी फक्त सोशल मीडियाच्या स्टेटसपुरतीच मर्यादित राहिली. मात्र या प्रकरणात राजकारण नको, असं म्हणत सुनेत्रा पवारांनी विरोधकांना चांगलाच टोला लगावलाय.

दादांच्या जीवावर आमदार-खासदार झालेले नेते सत्तेत मग्न राहिले, मात्र आपल्या नेत्याच्या संशयास्पद अपघाताच्या एफआयआरसाठी एकानेही अवाक्षर काढलं नाही. त्यामुळे आता आपल्या भावाला न्याय मिळवून देण्यासाठी सुप्रिया सुळेच रणशिंग फुंकणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

बिहारमध्ये मोठी दुर्घटना! गंगा नदीत २० जणांना घेऊन जाणारी बोट उलटली; ११ जणांचा मृत्यू

महायुतीत समन्वयाचा 'दुष्काळ', उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुन्हा नाराज?

Fact Check: ऑनलाईन शॉपिंग महागणार? ऑनलाईन शॉपिंगवर 5% GST?

नवी मुंबई महापालिकेत मतदार राहतात, वॉर्ड ऑफिसच्या पत्त्यावर 27 मतदारांची नोंद

IMD Alert: महाराष्ट्रासह 17 राज्यात धो-धो बरसणार वरूणराजा; 60 ताशी वेगाने वाहणार सोसाट्याचा वारा

SCROLL FOR NEXT