Political controversy intensifies as leaders raise questions over the cause of Ajit Pawar’s aircraft crash. Saam Tv
महाराष्ट्र

अजितदादांच्या विमानात बॉम्ब? खासदारालाच शंका, देशाच्या राजकारणात खळबळ

Ajit Pawar Plane Crash: अजित पवारांच्या विमानात बॉम्ब होता का? असा सवाल शरद पवारांच्या खासदारांनी उपस्थित केलाय..त्यामुळे अजितदादांच्या विमानाचा अपघात झाला की घातपात? राजकीय नेत्यांकडून काय संशय व्यक्त करण्यात आलाय?

Suprim Maskar

अजित पवारांच्या विमान अपघाताप्रकरणी रोज नवनवे दावे केले जातायत...अशातच शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे खासदार बजरंग सोनवणेंनी याप्रकरणी संशय व्यक्त केलाय.. अजित पवारांच्या विमानात बॉम्ब होता का असा खळबळजनक सवालच सोनवणेंनी उपस्थित केलाय...

अजित पवारांच्या विमान अपघाताला आता 10 दिवस झालेत... तरीही तपास यंत्रणा कुठल्याच ठोस निष्कर्षापर्यंत पोहचलेली नाहीय. त्यामुळे गेल्या दहा दिवसात या अपघातासंदर्भात राजकीय नेत्यांकडून वेगवेगळ्याप्रकारे शंका व्यक्त केल्या जात आहेत...

अमोल मिटकरी, आमदार, राष्ट्रवादी (AP)

DGCA च्या माहितीनुसार विमानात 6 लोक होते, पण प्रत्यक्षात 5 मृतदेह कसे सापडले?

स्फोट होऊन विमान जळून खाक होतं, मग कागदपत्रे कशी जळत नाहीत?

विजय वडेट्टीवार, नेते, काँग्रेस

उपमुख्यमंत्र्यांच्या प्रवासासाठी बंदी असलेल्या कंपनीचे विमान कसे?

रूपाली ठोंबरे

कॅप्टन मदन आणि कॅप्टन यश ट्राफिकमध्ये अडकल्याचा दावा त्यामुळे दोघांचा एकाच वेळी उशीर का?

दुसरीकडे अजित पवारांच्या राष्ट्रवादीनं सोनावणेंच्या विधानावर नेमकं काय भाष्य केलयं... अजित पवारांच्या विमान अपघाताचा तपास सध्या सीआयडी करतेय... मात्र नेत्यांचे आरोप-प्रत्यारोप आणि खळबळजनक दावे यामुळे दादांच्या विमान अपघाताचा सस्पेन्स दिवसेंदिवस वाढत चाललाय... अपघातानंतर विमानातील ब्लॅकबॉक्स ही यंत्रणाच्या हाती लागला होता... मग ब्लॅकबॉक्समधील माहितीचं विश्लेषण करण्यास इतका वेळ का लागतोय? प्राथमिक चौकशी अहवाल समोर आला असला तरी अंतिम निष्कर्षांपर्यंत तपास यंत्रणा कधी पोहचणार... हा खरा प्रश्न आहे...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai Bhondu: महाराष्ट्राला भोंदूबाबाचा विळखा, भूत उतरवण्याच्या नावाखाली मुंबईकरांना गंडा; पाहा VIDEO

संत महाराजाचा आशीर्वाद घ्यायल्या गेलेल्या भाजप आमदाराला मारहाण, व्हिडिओ व्हायरल

Sambhajinagar: 'संभाजीनगर महापालिकेत भुतांचा वावर', मंत्र्यांकडूनच अंधश्रद्धेला खतपाणी

Maharashtra Weather: महाराष्ट्र रेड झोनमध्ये! राज्यात उष्माघाताचे 3 बळी? ९ जिल्ह्यांना उष्णतेचा जास्त धोका

Fact Check : आधार कार्ड दाखवा, 3 लाख मिळवा? सरकारची नवी 'पीएम लोन स्कीम'? Video

SCROLL FOR NEXT