Ganeshotsav rush Konkan people traveling from Mumbai now at the center of a debate over being called Chakarmani or Konkanvasi Saam Tv
महाराष्ट्र

कोकणी माणसाला चाकरमानी म्हणायचं की कोकणवासीय?, कोकणी लोकांच्या भावना जाणून घ्या

From Chakarmani to Konkanvasi: कोकणी माणसाला चाकरमानी म्हणायचं की कोकणवासीय? यावरुन नवी चर्चा रंगलीय. मात्र त्याचं कारण काय? अजित पवारांनी प्रशासनाला नेमके काय आदेश दिलेत आणि कोकणातील लोकांनी काय प्रतिक्रिया दिल्या आहेत?

Bharat Mohalkar

गणेशोत्सवानिमित्त मुंबईतील कोकणी माणूस गावाकडं निघालाय.. आता त्याला कोकणवासीय म्हणायचं... की चाकरमानी....? मुंबईत कामधंद्यासाठी आलेल्या कोकणपट्ट्यातील कोकणी माणसाला चाकरमानी न म्हणता कोकणवासीय म्हणण्याचे आदेशच सामान्य प्रशासन विभागाला दिलेत... त्यावरुन उलटसुलट प्रतिक्रिया उमटायला सुरुवात झालीय..

कोकणपट्ट्यातून कामधंद्यासाठी मुंबई-पुण्यासारख्या शहरात गेलेल्या कोकणी माणसाला संबोधण्यासाठी चाकरमानी हा शब्द प्रचलित झाला . मात्र हा शब्द गुलामीचं प्रतिक असल्याचा आक्षेप काही संघटनांनी घेतलाय.. त्याचं कारण असं की चाकर म्हणजे सेवक आणि मानी म्हणजे मानणारा... या शब्दामुळे कष्टकऱ्यांचा अपमान होत असल्याची भावना व्यक्त केली जातेय...

आता अजित पवारांनी चाकरमानी शब्द न वापरता थेट कोकणवासी म्हणायला हवं, असे आदेशच सामान्य प्रशासन विभागाला दिलेत.. एवढंच नाही तर त्याचं परिपत्रकही काढलं जाणार आहे... पण चाकरमानी वरून कोकणवासीय एवढा शब्दांचा खेळ न करता कोकणी माणसांच्या आणि कोकणच्या परिस्थिती बदल घडणार आहे का? असाच सवाल उपस्थित केला जातोय..

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Crime News: प्रियकर इम्रानसोबत प्लॅन आखला, नवऱ्याचे तुकडे करत समीरचा मृतदेह स्वयंपाक घरात पुरला; असा उलगडला हत्याकांड

Solapur : पूरग्रस्त दौऱ्याचा रात्रीस खेळ चाले; केंद्रीय पथक आलं, टॉर्चमध्ये काय पाहिलं? VIDEO

Pune Crime : पुण्यातल्या भोंदूबाबानं 14 कोटींना लुबाडलं; इंजिनीअरला आणलं रस्त्यावर, नेमकं काय घडलं? VIDEO

Kalyan : कल्याणमधील नियोजन शून्य कारभार चव्हाट्यावर; शहरातील वाहतूक व्यवस्था पूर्णपणे ठप्प, कारण काय?

India Women Cricket Team : अभिमानास्पद क्षण! विश्वविजेत्या लेकींनी घेतली PM मोदींची भेट, पहिली झलक समोर

SCROLL FOR NEXT