NCP Split News, Sanjay Raut Statement 
महाराष्ट्र

NCP Split : आता दादांची राष्ट्रवादी फुटणार? 20-22 आमदार बाहेर पडणार, खासदाराचा मोठा दावा

दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाची चर्चा सुरू असतानाच पक्षात फुटीची शक्यता वर्तवली जात आहे. संजय राऊत यांनी सुनेत्रा पवार यांच्या राष्ट्रवादीतील २० ते २२ आमदार पक्ष सोडण्याच्या तयारीत असल्याचा दावा केला आहे.

Suprim Maskar

NCP Split News, Sanjay Raut Statement : दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाची चर्चा सुरु असतानाच आता दादांच्या राष्ट्रवादीच्या फुटीची चर्चा रंगलीय... संजय राऊतांनी दादांच्या राष्ट्रवादीतील फुटीबद्दल नेमकं काय विधान केलयं? दादांच्या राष्ट्रवादीत खरचं फुट होणार आहे का? पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून.

दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणावर उलट-सुलट चर्चा सुरू असतानाच खासदार संजय राऊत यांनी एक मोठा राजकीय बॉम्ब फोडलाय... सुनेत्रा पवार यांच्या राष्ट्रवादीचे तब्बल 20 ते 22 आमदार बाहेर पडण्याच्या मानसिकतेत असून ते स्वगृही परतणार असल्याचा दावा राऊतांनी केलाय..मात्र आमच्या पक्षाबद्दल केलेली भविष्यवाणी खोटी ठरेल, असं प्रतियुत्तर दादांच्या राष्ट्रवादीनं दिलंय... तर दुसरीकडे ठाकरेसेनेचेच आमदार महायुतीच्या संपर्कात असल्याचा दावा भाजपनं केलाय़....

दरम्यान दादांच्या राष्ट्रवादीतील फुटीबद्दल फक्त विरोधकांनीच नव्हे तर मिक्षपक्षांतील एका मंत्र्यानेही गंभीर दावा केलाय...शिंदेसेनेचे मंत्री संजय शिरसाट यांनी "राष्ट्रवादीत तिसरा गट निर्माण होऊ शकतो," असा खळबळजनक दावा केलाय. त्यामुळे फुटीच्या चर्चेला आणखीनच उधाण आलंय.

दरम्यान अजित पवारांच्या राष्ट्रवादीत फूट पडणार असे दावे याआधीही विरोधकांकडून वेळोवेळी केले गेलेत..

जून 2024

लोकसभेत दादांच्या राष्ट्रवादीला 1 जागा मिळाल्यानं 10 ते 15 आमदार शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या संपर्कात असल्याचा दावा जयंत पाटील यांनी केला होता.

जुलै 2024

विधानसभेत तिकीट कापले जाण्याच्या भीतीपोटी दादांच्या राष्ट्रवादीतील आमदारांचा एक गट शरद पवार गटाच्या वाटेवर असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या.

नोव्हेंबर 2024

विधानसभा मतदानानंतर सत्तेची गणिते बदलल्यास दादांच्या राष्ट्रवादीत मोठी फूट पडेल, असा दावा महाविकास आघाडीच्या नेत्यांनी केला होता.

लोकसभा निवडणुकीत शरद पवारांच्या राष्ट्रवादीला मिळालेली सहानुभूती आणि मतदार संघातील बदललेली राजकीय गणितं यामुळे आमदारांमध्ये निर्माण झालेली अस्वस्थता आजही काय़म आहे...त्यात अपात्रतेच्या टांगत्या तलवारीमुळे आमदारांमध्ये असलेली अनिश्चितताही फुटीला जबाबदार ठरू शकते...मात्र आता दादांच्या निधनानंतर पक्षात होत असलेले नवे हस्तक्षेप आणि येत्या काळातील राजकीय भविष्याची चिंता यामुळे आमदारांमध्ये वेगळा विचार करण्याची मानसिकता तयार होत असल्याचे दावे केले जात आहेत. मात्र विलिनीकरणाच्या चर्चेत राऊतांनी केलेला हा दावा राजकीय दबावतंत्राचा भाग आहे की पडद्यामागे खरोखरच नव्या फुटीची पटकथा लिहिली जातेय.. याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागलयं...

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ajit Pawar Death Controversy: अजितदादांचा अपघात नव्हे घातपात', दादांच्या राष्ट्रवादीच्या उमेश पाटलांचाही दावा

Car Accident : भाजप आमदार पुत्राच्या कारचा भीषण अपघात, एकाचा जागीच मृत्यू, ५ गंभीर; काँग्रेसनं केला खळबळजनक आरोप

Terrorist Attack : दहशतवादी हल्ल्यानं खैबर पख्तुनख्वा हादरलं; DSP, पोलीस उपनिरीक्षकासह ११ जणांचा मृत्यू

Kavya Maran Marriage : काव्या मारननं केलं डेस्टिनेशन वेडिंग, कोण आहे तिचा आयुष्यभराचा जोडीदार?

Amul Milk : महागाईचा आणखी एक झटका! अमूल दूध उद्यापासून महागणार; प्रतिलिटर ६ रुपयांची वाढ

SCROLL FOR NEXT