Ajit Pawar x
महाराष्ट्र

Ajit Pawar : '...नाहीतर खुर्ची खाली करा' अजित पवारांचा रोख नेमका कुणाकडे? Video

Ajit Pawar Statement : नागपूरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटातर्फे भव्य चिंतन शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरामध्ये अजित पवार यांनी पक्षातील सर्वांना महत्त्वाच्या सूचना केल्या.

Yash Shirke

पराग ढोबळे, साम टीव्ही, प्रतिनिधी

Ajit Pawar Video : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या भव्य चिंतन शिबिराचे आयोजन उपराजधानी नागपूरमध्ये करण्यात आले आहे. या चिंतन शिबिरात ५०० हून अधिक प्रतिनिधींचा सहभाग घेतल्याचे म्हटले जात आहे. पक्षाचे दृष्टिकोन व भविष्यातील योजना यावर विचारमंथनासाठी राष्ट्रवादीने १० समित्या स्थापन केल्या आहेत. अजित पवारांसह पक्षांतील अनेक प्रमुख नेते या शिबिरात हजर आहेत.

चिंतन शिबिरात अजित पवारांनी पक्षातील सदस्य, पदाधिकारी, नेते यांना संबोधन केले. ते म्हणाले, 'नव्या आशेने पुढे जाण्याची ताकद मिळणार आहे. राष्ट्रवादी पक्षाने पुढे कसे जावे यासाठी शिबीर आहे, जेष्ठ नेते आहे. आज अनेकजण आपल्या पक्षात असले तरी अनेकांनी वेगवेगळ्या पक्षात काम केलेले आहे. समविचारी आणि सर्वधर्म समभाव पक्षाची ओळख आहे. फुले शाहू आंबेडकर यांची विचारधारा आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे शिबीर बघितले आहे. शिबिर कसे चालायचे ते बघितले आहे. शिर्डीला शिबिर पार पडले, चिंतन पुढील स्थानिक स्वराज संस्थांचा निवाडीसाठी नाही तर पुढील पिढीसाठी आहे. भाषण करून वेळ घालवायचा नाही आहे, आपण ग्रुप केले त्यात प्रामाणिकपणे चर्चा करा. अनुभव व्हिजन धाडसी कल्पना, ठोस निर्णय घ्यायचे आहे, वेगवेगळ्या विभागातील वेगळे प्रश्न आहे.'

'पक्षापेक्षा काम जास्त मोठे असेल, तर ते पद रिकामी करुया. आज आपण महत्त्वाच्या विषयावर निर्णय घेत आहोत. सोशल मीडियावर ट्रोल होण्यापेक्षा काही लोक खरोखर काम करत आहेत, हे लक्षात घ्या. पालकमंत्री जिल्ह्यात आलेच पाहिजेत आणि इतर जिल्ह्यांमध्ये गेल्यावर जिल्हाध्यक्ष व प्रमुख पदाधिकाऱ्यांसोबत फिरले पाहिजे. जिल्हाध्यक्षांना दुर्लक्षित करू नका. माझ्यासोबत सर्वांनी चुका दुरुस्त करा, नाहीतर खुर्ची खाली करा. सर्वांनी नोंद घ्या. हसण्यावर घेऊ नका', असे वक्तव्य अजित पवारांनी केले.

आजचा नागरिक प्रामाणिक पण आणि जबाबदारीची अपेक्षा करतो, आपण लोकांचं ऐकले पाहिजे, ठोस कामाबद्दल उत्तर दिले पाहिजे, हेलपाटे मारायला लावू नये अशी सर्वाना विनंती आहे.. वेग वेगळ्या वर्गातून विश्वास निर्माण होऊ शकतो, पक्ष आणि सरकार यातील सबंध घट्ट करू यात. काम करताना मुद्दे नीट नोंदवा आणि जमिनीवर राहा. योजना लोकांपर्यंत पोहोचवणे महत्त्वाचे आहे आणि त्यांना सतत त्याची आठवण करून द्यावी लागते. इतिहास फक्त पुस्तकात लिहिला जात नाही, तो बैठकीत घेतलेल्या निर्णयांमधून तयार होतो. उद्या नवी पिढी विचारेल की २०२५ मध्ये कोणते निर्णय घेतले, आणि त्यावरूनच भविष्य घडेल, असे म्हणत उपमुख्यमंत्र्यांनी पक्षातील सर्वांना सूचना दिल्या.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ashish Shelar: मंत्री आशिष शेलारांच्या जनता दरबारात मोठा गोंधळ, नेमकं काय घडलं, पाहा व्हिडिओ

Samruddhi Kelkar: वेस्टर्न आउटफिटमध्ये समृद्धीचा ग्लॅमरस अंदाज

Sunday Horoscope: ‘या’ राशी चारचौघात कमावणार कौतुक, तर कोणाला लाभेल प्रेमळ सहवास; जाणून घ्या रविवारचे खास राशीभविष्य

Mahayuti : ...तर आम्ही आम्ही स्वतंत्र लढू, स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांपूर्वी मुख्यमंत्र्यांचं युतीबाबत मोठं विधान

Horoscope: घरच्या जबाबदारीचा भार; काहींच्या आयुष्यात येणार नवीन व्यक्ती, जाणून घ्या तुमच्यात भविष्यात घडणार काय?

SCROLL FOR NEXT