Deputy CM Ajit Pawar Saam Tv
महाराष्ट्र

Ajit Pawar: ...तर खपवून घेतलं जाणार नाही, बीडमध्ये अजित पवार अ‍ॅक्शन मोडमध्ये

Ajit Pawar Beed Visit: राज्याचे मुख्यमंत्री अजित पवार हे बीड दौऱ्यावर असून त्यांनी यावेळी पदाधिकाऱ्यांशी संवाद साधताना त्यांना सज्जड दम दिला. 'चुकीचं वागला तर कारवाई केली जाईल.', असे त्यांनी स्पष्टपणे सांगितले.

Priya More

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. बीडचे पालकमंत्री झाल्यानंतर अजित पवार यांचा हा पहिलाच दौरा आहे. त्यांनी आज पालकमंत्रिपदाची सूत्रे हाती घेतली यावेळी पदाधिकाऱ्यांनी अजित पवार यांचे स्वागत केले. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणावर अजित पवार काय बोलतात याकडे सर्वांचे लक्ष लगले आहे.

अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली डीपीडीसीची बैठक होणार आहे. या बैठकीपूर्वी अजित पवार यांनी पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला. याठिकाणी मंत्री धनंजय मुंडे देखील उपस्थित होते. यावेळी अजित पवार यांनी पदाधिकाऱ्यांना सज्जड दम दिला. 'चुकीचं वागला तर कारवाई केली जाईल. नियमाप्रमाणे कलमे लावली जातील. मकोका लावायला मागेपुढे पाहणार नाही.' , असा दम त्यांनी पदाधिकाऱ्यांना दिला. अजित पवारांनी हा इशारा नेमका कोणाला दिला अशी चर्चा आता सुरू झाली आहे.

अजित पवारांनी पदाधिकाऱ्यांशी संवाद साधताना सांगितले की, 'माझी कामाची पद्धत थोडीशी वेगळी आहे. कुठली कामं मंजूर झाली तर ती कामं दर्जेदार असली पाहिजे यावर माझा भर असतो. या कामांमध्ये जर वेडेवाकडे काम केले तर मी सहन करणार नाही. तो राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता जवळचा आहे की लांबचा हे मी पाहणार नाही. विकासाची काम करत असताना कुणी कुणाला खंडणी मागण्याचा प्रयत्न करू नका. माझ्या ते कानावर आल्यानंतर मकोका लावायला मागेपुढे पाहणार नाही.' असा थेट इशारा अजित पवारांनी दिला.

'बंदूक दाखवली तर परवाना रद्द करू. काम करताना दृष्ट प्रवृत्तीच्या लोकांना दूर ठेवा. चारित्र्य स्वच्छ ठेवा. जवळचा असला तरी चुकीचं वागू नका.', असं सूचक वक्तव्य अजित पवार यांनी यावेळी केले. तसंच, 'सरड्यासारखे रंग बदलणारे लोक सगळीकडेच असतात. तथ्य असेल तिथे संबंधितांवर कारवाई करणार. अफवांवर विश्वास ठेवू नका. जर कोणी कुठल्या गोष्टीमध्ये जबाबदार असेल त्यावर कारवाई होणार.', असे अजित पवार यांनी स्पष्टपणे सांगितले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Raju Shetti : पंढरपुरात शक्तीपीठ महामार्ग विरोधी दिंडी; राजू शेट्टी यांचे आंदोलन, पांडुरंगाला घातले साकडे

Maharashtra Live News Update: बोरिवली पूर्वेतील एसआरए प्रकल्पात भीषण आग

Dhiraj Deshmukh: माजी मुख्यमंत्र्यांच्या धाकट्या मुलाचं शिक्षण किती?

Badlapur : बदलापुरातील भोज धरणातील बंधाऱ्यावर तरुणाचा जीवाशी खेळ | VIDEO

Nagpur Crime: नागरपूरच्या लक्झरी हॉटेलमध्ये देहविक्रीचा नंगानाच, परदेशी तरूणीकडून 'नको ते कृत्य' पोलिसांची रेड अन्..

SCROLL FOR NEXT