Amit Shah Saam Tv
महाराष्ट्र

Maharashtra Politics: अजित पवार गटाला 40 जागा, शिंदे - भाजप किती जागांवर लढवणार निवडणूक? काय आहे अमित शहांचा फॉर्म्युला? वाचा...

Mahayuti Seat Sharing Latest News: महायुतीचा जागावाटपाचा तिढा लवकर सुटावा यासाठी आता स्वतः अमित शहा यांनी पुढाकार घेतला आहे. अमित शहा यांनी थेट जागा वाटपाचा फॉर्म्युला सांगितला आहे.

Saam Tv

भरत मोहोळकर, साम टीव्ही, प्रतिनिधी

विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर महायुती आणि महाविकास आघाडीचं जागा वाटपासाठी बैठकांचं सत्र सुरूय. त्यातच अमित शाहांनी मुंबई दौऱ्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांपुढे 70-40 चा नवा प्रस्ताव ठेवल्याची माहिती समोर आलीय. या दीड तास झालेल्या बैठकीत नेमकं काय घडलं? जाणून घेऊ...

महायुतीच्या बैठकीत काय घडलं?

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्यातील परिस्थितीचा विचार करून अमित शहा यांनी महायुतीतील मित्र पक्ष आणि भाजपसाठी जागावाटपाचा फॉर्म्युला ठरवला आहे. यात भाजपला 160 जागा, शिंदे गटाला 70 जागा आणि अजित पवार गटाला 40 जागा देण्याचा प्रस्ताव देण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

भाजप अजित पवार गट आणि शिंदेंसोबतच्या आमदारांना सामावून घेणार आहे. जिंकण्यासाठी लढायचं असल्याने जास्त जागांचा आग्रह न धरण्याचा सल्ला अमित शहा यांनी दिल्याचं सूत्रांनी सांगितलं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मात्र जागावाटपाचा निर्णय लवकर घेण्याची मागणी केलीय. तर शिंदे गट इतक्याच जागा आम्हाला द्या, अशी मागणी अजित पवार गटाने अमित शहा याना केल्याची माहिती सूत्रांनी दिली. अमित शहांनी नवा प्रस्ताव ठेवला असला तरी अजित पवारांनी 65-68 जागांची मागणी केलीय. त्यामागे अजित पवारांच्या पक्षाकडून सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेलांनी मांडलंय.

दादांना हव्यात जास्त जागा?

मिळालेल्या माहितीनुसार, 2019 मध्ये राष्ट्रवादीने 54 जागा जिंकल्या होत्या. अजित पवार यांच्यासोबत अपक्ष आणि काँग्रेसचे मिळून 4 ते 5 आमदार आहेत. निवडून येण्याची क्षमता असलेल्या जागा देण्याची मागणी अजित पवार गटाने केली आहे. राष्ट्रवादीला किमान 65 जागा देण्याची मागणी अजित पवार गटाची असल्याचं सांगण्यात येत आहे.

महायुतीच्या जागा वाटपात भाजपने 160 जागांवरच्या दाव्याचं चंद्रकांत पाटलांनी समर्थन केलंय. तर महायुतीत जागा वाटप व्यवस्थित सुरू असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी म्हटलंय..

महाविकास आघाडीच्या अडीचशे जागांवर एकमत झाल्याची माहिती समोर आलीय. दुसरीकडे महायुतीत अमित शाहांकडून 40 जागांवर बोळवण करण्यात येत असल्याने हा फॉर्म्युला दादा मान्य करणार की पुन्हा चर्चेच्या गुऱ्हाळातून नव्या फॉर्म्युला जन्माला येणार? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Red Chilli Benefits : लाल मिरचीचे गुप्त आरोग्यदायी गुण; जाणून घ्या निरोगी आरोग्याचं गुपित

Maharashtra Live News Update: नोएडा, उत्तर प्रदेशातील अनेक भागांत पावसाने लावली हजेरी

Anant Chaturdashi 2025 live updates : लालबागचा राजा मंडपातून बाहेर; फुलांचा वर्षाव करत मानवंदना; VIDEO

IPS Anjana Krushna: IPS अंजना कृष्णा याचं काय चुकलं? ठाकरेंच्या नेत्याचा अजित पवारांना सवाल

Red Fort History: ऐतिहासिक लाल किल्ल्याचे बांधकाम किती दिवसांमध्ये पूर्ण झाले?

SCROLL FOR NEXT