Ajit Pawar Group Beed Sabha Saam Tv
महाराष्ट्र

Beed News: नेत्यांची भाषणं, लोकांना पटेनात! ठोस घोषणा जाहीर न केल्यानं लोकांमध्ये निराशा

विनोद जिरे

Ajit Pawar Group Beed Sabha: नेत्यांची भाषणं लोकांना पटेनात असंच चित्र बीडमध्ये पाहायला मिळालंय. ठोस घोषणा जाहीर न केल्यानं लोकांची भर सभेत निराशा झाल्यानं लोकांनी सभास्थळावरून काढता पाय घेतला. तर यामुळे संतप्त झालेल्या शेतकऱ्याने, तुमचं सगळं शेतकऱ्यांच्या जीवावरचं सुरूय, जर शेतकऱ्यांनी ठरवलं तर काय होईल ? हे माहितंय का ? असा इशारा दिलाय.

आतापर्यंत आपण दूरवरून आलेल्या कार्यकर्त्यांकडून नेत्यांची भाषण अगदी मन लावून ऐकलेली पाहिली असतील. मात्र आता जसं नेत्यांमध्ये बदल होत आहे, एका रात्रीत कोण कुठे जातंय? तर कोण कुठे जातंय? हे कळत नाही. यामुळेचं की काय आता जर आपल्या फायद्याचे असेल तरच त्या नेत्याच्या सभेला ऐकावं? असंच काहीसं सर्वसामान्य कार्यकर्ता, लोकांनी आणि शेतकऱ्यांनी ठरवलंय का? असं बीडमध्ये अजित पवारांच्या झालेल्या सभेवरून समोर आलंय.

रविवारी अजित पवार गटाची राज्यातील पहिली सभा बीडमध्ये पार पडली. या सभेसाठी मोठा डामडौल करण्यात आला. 40 फुटी होर्डिंग्स.. बॅनर्स..फ्लेक्स.. मोठमोठ्या कमानी.. परराज्यातून मागवलेले बँड पथक, यासह आकर्षण निर्माण होईल, अशी सर्व तयारी करण्यात आली. यासाठी कोट्यवधी रुपये खर्च करण्यात आले.  (Latest Marathi News)

मात्र जशी सभेची जय्यत तयारी केली, तशाच घोषणा या सभेतून होतील, यासाठी बीड जिल्ह्यातील कार्यकर्ते, शेतकरी, तरुण वर्ग या सर्वांनी या सभेसाठी मोठी गर्दी केली होती. अगदी रेकॉर्ड ब्रेक गर्दी या ठिकाणी पाहायला मिळाली. या सभेच्या सुरुवातीपासूनच योगेश क्षीरसागर, आमदार बाळासाहेब आजबे, आमदार प्रकाश सोळुंके यांनी बीड जिल्ह्यातील समस्येचा पाढा मांडला.

मात्र यानंतर धनंजय मुंडे, प्रफुल्ल पटेल आणि छगन भुजबळांची भाषण झाली. या दरम्यान लोकांना ही भाषण काहीशी ऐकावी न वाटल्याने आलेल्या कार्यकर्त्यांसह लोकांनी सभास्थळ सोडायला सुरुवात केली. अक्षरशा एकीकडे भाषण सुरू असताना दुसरीकडे मात्र लोकांची लोंढेच्या लोंढे सभास्थळावरून बाहेर पडत होते. एवढेच नाही तर छगन भुजबळांचे लांबत चाललेलं भाषण पाहून लोकांनी काहीसा गोंधळ देखील निर्माण केला.

मात्र त्यानंतर बीड जिल्ह्यातील विकासावर, दुष्काळावर शेतकऱ्यांना दिलासा देण्यावर अजित पवार ठोस घोषणा जाहीर करतील? असं आलेल्या लोकांना वाटलं. मात्र अजित पवारांनी हे करू ते करू असं म्हणत भाषण केलं. मात्र या सर्व भाषणांमध्ये ठोस अशी घोषणा न केल्याने आलेल्या लोकांची निराशा झाली आणि या दरम्यान देखील लोक सभास्थळ सोडू लागले.

दरम्यान, ही सभा केवळ आणि केवळ राजकीय पोळी भाजण्यासाठी होती. शेतकऱ्यांसाठी ठोस अशी कोणतीच घोषणा त्या ठिकाणी केली नाही. आज शेतकरी पाऊस नसल्याने हवालदिल झालाय. उभी पीक करपत आहेत. जनावरांना चारा नाही. पिण्याचा पाण्याचा प्रश्न गंभीर बनलाय. पिक विमा मिळाला नाही. हे सर्व असताना अजित दादांनी यावर ठोस कोणतीच घोषणा केली नाही, अशी प्रतिक्रिया बीडच्या जवळवाडी येथील शेतकरी रंगनाथ मस्के यांनी दिली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

EPFO: UAN नंबर विसरलात? टेन्शन सोडा, या सोप्य स्टेप्स फॉलो करुन जाणून घ्या

Jalna Accident: जालन्यात बस- ट्रकचा भीषण अपघात! ५ ते ६ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती

iPhone 16 चा सेल सुरू, 67500 रुपयांपर्यंतची ऑफर; किंमत, ऑफर आणि खरेदीचे ठिकाण वाचा सर्वकाही

Maharashtra News Live Updates: मनोज जरांगेंची प्रकृती खालावली, उपचार घेण्यास नकार

Sambhajinagar Corporation : पाणी पुरवठ्यासाठी करणार सौरऊर्जेचा वापर; शंभर एकर जागेवर संभाजीनगर महापालिका उभारणार प्रकल्प

SCROLL FOR NEXT