Ajit Pawar Gets Clean Chit Saam TV
महाराष्ट्र

Ajit Pawar : आचारसंहिता भंग झाला नाही! त्या वक्तव्यावर अजित पवारांना मोठा दिलासा

Ajit Pawar Gets Clean Chit : आचारसंहिता भंगप्रकरणी अजित पवारांना क्लीनचिट मिळाली आहे. आचारसंहिता भंग झाली नाही, असा निर्वाळा देखील निवडणूक अधिकाऱ्यांनी यावेळी दिला आहे.

Ruchika Jadhav

राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर आली आहे. आचारसंहिता भंगप्रकरणी उपमुख्यमंत्री अजित पवारांना क्लीनचिट मिळाली आहे. आचारसंहिता भंग झाली नाही, असा निर्वाळा देखील निवडणूक अधिकाऱ्यांनी यावेळी दिला आहे. अजित पवारांनी केलेल्या वक्तव्यात उमेदवाराचं नाव नव्हतं, असंही क्लीनचिटमध्ये म्हटलं आहे.

बारामती लोकसभा मतदारसंघाच्या निवडणूक अधिकरी कविता द्विवेदी यांनी या बाबतचा अहवाल पुण्याचे जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांना सादर केला आहे. १७ एप्रिल रोजी अजित पवारांनी बारामती लोकसभा मतदारसंघात एक भाषण केलं होतं.

त्यवेळी त्यांनी उपस्थितांना संबोधित केलेल्या वक्तव्यावरून विरोधकांनी टीका केली होती. तसेच आचारसंहितेचा भंग केल्याचा आरोप केला होता. या वक्तव्याला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून आक्षेप घेण्यात आला आणि निवडणूक आयोगाकडे त्याची तक्रार करण्यात आली होती.

नेमकं काय म्हणाले होते अजित पवार?

'तुम्हाला पाहिजे तेवढा निधी आम्ही देऊ, पण आमच्यासाठी मशीनमध्ये कचाकच बटण दाबा.', असं विधान अजित पवार यांनी केलं होतं. त्यांच्या वक्तव्याचा व्हिडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.

निवडणूक आयोगाने या तक्रारीनंतर चौकशी केली तेव्हा प्राथमिक तपासात अजित पवारांनी केलेल्या वक्तव्यात कोणत्याही उमेदवाराचे नाव किंवा पक्षाचे नाव अजित पवारांकडून घेण्यात आले नाही. त्यामुळे हा आचारसंहितेचा भंग ठरत नाही, असं निवडणूक आयोगाने क्लीनचिट अहवालात नमूद केलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ind W Vs Aus W : टीम इंडियाचा दारूण पराभव, भारताने सामना ८ विकेट्सने गमावला

Parbhani: पान टपरी बैलगाडीतून नेताना भयंकर घडलं, विजेचा धक्का लागून तिघांचा जागीच मृत्यू

पिंपरी चिंचवडची ऐतिहासिक शान – जगातील सर्वात उंच संभाजी महाराज स्मारक|VIDEO

India vs Pakistan : भारतीय गोलंदाजांनी फिरकीचा फास आवळला, पाकिस्तान संघाचा किल्ला कोसळला, टीम इंडियाला किती धावांचे आव्हान?

नवी मुंबई विमानतळाला दि बा पाटील यांचे नाव द्या – आगरी समाजाची ठाम मागणी|VIDEO

SCROLL FOR NEXT