अजित पवार यांचे पार्थिव थेट विद्या प्रतिष्ठानच्या मैदानात जाईल. ११ वाजता अजित पवारांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
अंत्ययात्रा न काढता अजित पवारांचे पार्थिव थेट मैदानावर नेले जाणार
अंत्यसंस्काराचे सगळे विधी मैदानात संपन्न होणार, पोलिसांकडून मानवंदना देण्यात येईल
त्यानंतर अजित दादा यांच्या पार्थिवाला अग्नी देण्यात येईल
अतिशय दुःखद घटना आहे. वेदना देणारी घटना आहे. मला पुढच्या आठवड्यात येऊन मला भेट, असे म्हटले होते. खेळासाठी आपल्याला काही तर करायचं आहे. अजित पवार यांच्या जाण्याने राज्याची मोठी हानी झाली आहे. कोणी याचे राजकारण करू नये.रक्षा खडसे
काटेवाडीसह बारामतीमधील अनेक गावातील नागरिक दर्शन घेण्यासाठी पोहचले आहेत.
अजित पवार यांचे पार्थिव काल संध्याकाळी अंत्यदर्शनासाठी विद्या प्रतिष्ठानच्या प्रांगणात ठेवण्यात आले होते. आपल्या लाडक्या नेत्याचे शेवटचे दर्शन घेण्यासाठी जनसागराचा महापूर लोटला होता. "अजितदादा परत या..." अशा आर्त हाकांनी बारामतीचे आकाश फाटून गेले होते. सामान्य नागरिक, शेतकरी आणि कार्यकर्त्यांना यावेळी आपला शोक अनावर झाला. रात्री उशिरा पार्थिव पुन्हा वैद्यकीय महाविद्यालयात नेण्यात आले असून, आज सकाळी ते त्यांच्या काटेवाडी येथील निवासस्थानी आणले .
Ajit Pawar Death in Plane Crash Baramati : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर राज्यभरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे, आज अजितदादांवर बारामतीत अंतिम संस्कार पार पाडण्यात येणार आहेत. दरम्यान देशातील आठवे ज्योतिर्लिंग असलेल्या औंढा नागनाथ मध्ये अजित पवारांना श्रद्धांजली वाहण्यासाठी व्यापाऱ्यांनी संपूर्ण शहर कडकडीत बंद ठेवले आहे सकाळपासून टपरी चालकांनी देखील या बंदमध्ये सहभागी होत महाराष्ट्राच्या लाडक्या दादांना आदरांजली वाहिली आहे.
सुप्रिया सुळे, श्रीनिवास पवार काठेवाडीत पोहचले आहेत. सुनेत्रा पवारही थोड्यावेळापूर्वी दाखल झाल्या आहेत.
पहाटे सुरू होणारी बारामती आज पूर्ण शांत झाली पाहायला मिळत आहे. रस्त्यावरील सफाई कर्मचारी यांनी झाडू बाजूला ठेवून दादांना श्रद्धांजली वाहण्यासाठी जमले आहेत.
अजित पवार यांच्या पार्थिवाची अंत्ययात्रा रद्द करण्यात आली आहे.. साधारण साडेसात वाजता पार्थिव काटेवाडीता अंत्यदर्शनासाठी नेण्यात येणार असल्याची माहिती आहे.. त्या ठिकाणी अंत्यदर्शन झाल्यानंतर लगेचच पार्थिव विद्या प्रतिष्ठानच्या मैदानावरती आणण्यात येणार आहे..
शरद पवार काटेवाडी मध्ये पोहचले
शरद पवार काटेवाडी येथील अजित पवारांच्या निवासस्थानी पोहचले
सुप्रिया सुळे या काटेवाडी मधील अजित पवारांच्या निवासस्थानी पोहचल्या
उपमुख्यमंत्री अजित पवारांची आज अत्यंयात्रा निघणार
काटेवाडी येथील ग्रामस्थ अजित पवारांच्या निवासस्थानी जमायला सुरुवात
अजित पवार यांचे पार्थिव अंत्यदर्शनाला त्यांच्या निवासस्थानी ठेवण्यात येणार
सकाळी ९ पर्यंत पार्थिव याठिकाणी ठेवण्यात येईल
काटेवाडी मधील नागरिक भावनाविवश
महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे बुधवारी विमान अपघातात दुर्दैवी निधन झाले. बारामती येथे त्यांचे विमान कोसळून झालेल्या या भीषण अपघातात विमानातील सर्व प्रवाशांचा मृत्यू झाला. या दुःखद घटनेनंतर, शिवसेना (UBT) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी आज बारामती येथील अजित पवार यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांच्या कुटुंबाची भेट घेतली. ठाकरे पिता-पुत्रांनी पवार कुटुंबियांचे सांत्वन करत आपल्या शोकसंवेदना व्यक्त केल्या.
ही अत्यंत दुर्दैवी घटना आहे. आज प्रत्येकजण दुःखात आहे आणि अजितदादांच्या आठवणीत रमला आहे. दादा अत्यंत शिस्तप्रिय व्यक्ती होते, त्यांच्या दिवसाची सुरुवात पहाटे व्हायची. प्रशासनावर त्यांची जबरदस्त पकड होती... ते मनातून खूप चांगले होते, म्हणूनच त्यांचे सर्वांवर प्रेम होते आणि सर्वांचे त्यांच्यावर प्रेम होते. आज संपूर्ण महाराष्ट्र खोल दुःखात आहे. अशा वेळी कोणतेही राजकारण केले जाऊ नये.
बारामती : काल विमान अपघातामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे दुःखद निधन झाले. आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर बारामती येथील विद्या प्रतिष्ठानच्या मैदानावर शासकीय इतमामध्ये अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यापूर्वी अजित पवार यांचा पार्थिव अजित पवार यांचे गाव असलेल्या काटेवाडी येथील निवासस्थानी नेण्यात येणार आहे. त्यानंतर गदिमा सभागृहापासून उपमुख्यमंत्री अजित पवार यांची अंत्ययात्रा निघणार आहे अकरा वाजता शासकीय इतमात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत
या अंत्यसंस्कारासाठी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्यासह महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह अनेक बडे राजकीय नेते उपस्थित राहणार आहेत.
काटेवाडी येथील ग्रामस्थ अजित पवारांच्या निवासस्थानी जमायला सुरुवात
अजित पवार यांचे पार्थिव अंत्यदर्शनाला त्यांच्या निवासस्थानी ठेवण्यात येणार
सकाळी ९ पर्यंत पार्थिव याठिकाणी ठेवण्यात येईल
काटेवाडी मधील नागरिक भावनाविवश
अजित पवार यांचे पार्थिव बारामतीमध्ये असलेल्या काटेवाडी येथील त्यांच्या निवासस्थानी ठेवण्यात येईल. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सकाळी ९ वाजेपर्यंत पार्थिव काटेवाडीमध्ये ठेवण्यात येईल. त्यानंतर अँब्युलन्स ने पार्थिव ग. दि. मा. संभागृपर्यंत नेण्यात येईल. सकाळी ९ पासून येथून अंत्ययात्रेला सुरुवात होईल आणि तिथून विद्या प्रतिष्ठानच्या मैदानावर अंत्ययात्रा समाप्त होईल. सकाळी ११ वाजता अजित पवारांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले जातील.
अजित पवार यांच्यासह पाच जणांच्या अपघाती मृत्यू प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अकस्मात मृत्यूची नोंद करत गुन्हा दाखल करण्यात आला. कुठल्या ही उच्च पदस्थ व्यक्ती यांच्या अकस्मात मृत्यूचा तपास सीआयडी ही तपास यंत्रणा करते. त्यामुळे या अपघाताचा तपास सुद्धा गुन्हे अन्वेषण विभागाकडे जाण्याची शक्यता आहे. बुधवारी बारामतीमध्ये खासगी विमानाचा अपघात होऊन अजित पवारांसह ५ जणांचा अपघाती मृत्यू झाला.
राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांचे विमान अपघातात बुधवारी निधन झाले. मुंबईहून बारामतीकडे जाताना हा अपघात झाला. त्यानंतर महाराष्ट्रावर शोककळा पसरली. देशभरातून नेते, मंत्री, कार्यकर्ते बारामतीत दाखल झाले. अजित पवारांवर आज अंत्यसंस्कार होणार आहेत. सकाळी 11 वाजता अत्यसंस्कार होणार आहे. त्या आधी अत्यदर्शनासाठी अजित पवारांचे पार्थिव विद्या प्रतिष्ठानमध्ये ठेवण्यात येणार आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.