Ajit Pawar Answer on Devendra Fadnavis letter, nawab malik SAAM TV
महाराष्ट्र

Ajit Pawar On Nawab Malik : त्या पत्राबद्दल काय करायचं ते माझं मी करेन; फडणवीसांच्या 'लेटर'वरील प्रश्नावर अजित पवार रोखठोक बोलले

Ajit Pawar Answer on Devendra Fadnavis letter : नवाब मलिकांसंदर्भात देवेंद्र फडणवीस यांनी पाठवलेल्या पत्रावर अजित पवार यांनी पहिल्यांदाच थेट प्रतिक्रिया दिली आहे.

Nandkumar Joshi

Ajit Pawar Answer on Devendra Fadnavis letter on Nawab Malik :

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार नवाब मलिक (Nawab Malik) यांना महायुतीत सहभागी करून घेणे योग्य होणार नाही, अशा आशयाचं पत्र भाजप नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवार यांना उद्देशून पाठवलं आहे. या पत्राबद्दल अजित पवारांनी आज, शुक्रवारी आपली स्पष्ट भूमिका मांडली. फडणवीसांच्या पत्राला उत्तर देणार का, असा प्रश्न प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी पवार यांना विचारल्यानंतर, त्या पत्राबद्दल काय करायचं ते माझं मी करेन, तुम्हाला सांगण्याचं काही कारण नाही, असं रोखठोक उत्तर त्यांनी दिलं.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार नवाब मलिक हे काल, गुरुवारी पहिल्यांदाच विधीमंडळ अधिवेशनात आले होते. ते कामकाजात सहभागी झाले होते. मलिक सभागृहात सत्ताधारी बाकावर बसल्यानंतर विरोधकांनी प्रश्न उपस्थित केला. त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवार यांना पत्र पाठवलं. मलिकांना महायुतीत घेणं योग्य ठरणार नाही, असं फडणवीस म्हणाले.

देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या पत्राबद्दल आज, शुक्रवारी अजित पवार यांना प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी प्रश्न विचारले. त्यावर मलिक यांच्यासदर्भातील पत्र मिळालं. ते मी वाचलं. मलिक काल पहिल्यांदाच सभागृहात आले होते. ते कुठे बसले, ते मीडियानं दाखवलं आहे. मलिकांचे मत ऐकल्यानंतर मी त्यावर माझं मत व्यक्त करेन, असं पवार म्हणाले.

प्रत्येकाला आपली भूमिका मांडण्याचा अधिकार

राष्ट्रवादी काँग्रेसने म्हणजे आम्ही २ जुलै रोजी महायुतीसोबत जाण्याचा निर्णय घेतला. आम्ही सरकारसोबत गेलो. या सर्व राजकीय घटनांनंतर मलिक पहिल्यांदाच सभागृहात आले. प्रत्येकाला आपली भूमिका मांडण्याचा अधिकार आहे. त्यांचे मत ऐकल्यानंतर मी त्याच्यावर बोलेन, असे अजित पवार म्हणाले.

फडणवीस यांनी पाठवलेल्या पत्राला रिप्लाय देणार का, असा प्रश्न माध्यमांच्या प्रतिनिधींनी विचारला. त्यावर पत्राबद्दल काय करायचं ते माझं मी करेल. सगळ्या मीडियाला सांगण्याचं काही कारण नाही, असे पवार म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: पश्चिम बंगालच्या मुर्शिराबादमध्ये मतदानादरम्यान दगडफेक

Ashok Saraf: अशोकमामा आणि संकर्षण कऱ्हाडे येणार एकत्र; अभिनेत्याने फोटो शेअर करत म्हणाला, 'आम्हाला दोघांना एकत्रं...'

नांदेडमध्ये भीषण अपघात; भरधाव कारची दुचाकीला धडक, ४ जण जागीच ठार

हॉस्टेलमधील मुलींना नेत्यांकडे पाठवलं जातं, खासदाराच्या दाव्याने राजकारणात खळबळ

How To Store Rava : रव्याच्या डब्यात ठेवा 'हा' एक मसाला; कीड आणि अळ्या लागणार नाही, रवा राहील एकदम फ्रेश!

SCROLL FOR NEXT