Ajit Pawar distributing Kunbi certificates to Maratha families in Beed, while Chhagan Bhujbal raises questions on the process. Saam Tv
महाराष्ट्र

Ajit Pawar Distributes Kunbi Certificates: मराठवाड्यात कुणबी दाखल्यांचं वाटप सुरू, भुजबळांचा सवाल – दाखले आधीच शोधून ठेवले होते का?

Kunbi Certificate Distribution Gains Momentum: मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनाच्या मुहूर्तावर हैदराबाद गॅजेटियरनुसार मराठा बांधवांना कुणबी दाखल्यांचं उपमुख्यमंत्री अजितदादांच्या हस्ते वाटप करण्यात आलंय. मात्र यावर त्यांच्याच पक्षाचे मंत्री छगन भुजबळांनी शंका घेतली आहे. काय आहे या दाखल्यांबाबतचा वाद ?

Girish Nikam

मराठा आरक्षणासाठी रान पेटवणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला अखेर यश आले आहे. सरकारने मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनाच्या मुहूर्तावर मराठा बांधवांना कुणबी दाखल्यांचं वाटप करण्यास सुरूवात केलीय. हैद्राबाद गॅझेटीयरच्या नोंदीनुसार उपमुख्यमंत्री तथा बीडचे पालकमंत्री अजित पवार यांच्या हस्ते पाच मराठा बांधवांना हे प्रमाणपत्र दिले गेले. तर लातूरमध्ये पालकमंत्री तथा सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या हस्ते प्रमाणपत्रचे वाटप करण्यात आलंय. यावेळी मराठा बांधवांनी आनंद व्यक्त करुन प्रमाणपत्रासाठी संघर्ष करणाऱ्यांना न्याय मिळाल्याची भावना व्यक्त केली आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवारांनी वाटप केलेल्या या कुणबी दाखल्यांवर त्यांच्याच पक्षाचे मंत्री छगन भुजबळ यांनी शंका उपस्थित केलीय. देण्यात आलेली प्रमाणपत्रं आधीच शोधून ठेवली होती का? असा सवालच त्यांनी उपस्थित केलाय.

दरम्यान कुणबी प्रमाणपत्रासाठी एक दोन नव्हे 16 कागदपत्रे तपासली जातात.

अर्जदाराचा रहिवासी दाखला

शाळा सोडल्याचा दाखला

वडील, आजोबांचा शाळा सोडल्याचा दाखला

1967 पूर्वीचा जातीचा पुरावा

प्रतिज्ञापत्र

वंशावळ

वंशावळ जुळवणी समिती अहवाल

गावपातळीवरील स्थानिक समिती अहवाल

मनोज जरांगे यांच्या गेल्या वर्षीच्या आंदोलनानंतर मराठवाड्यात तब्बल २ लाख ३९ हजार कुणबी दाखले देण्यात आले. मात्र मध्येच ही प्रक्रिया मंदावली होती.मात्र आता या मोहिमेला पुन्हा वेग आलाय. मात्र हैद्राबाद गॅझेटेरीयरच्या जीआरविरोधात कोर्टात आव्हान देण्यात आलंय. त्यामुळे या जीआरचं आणि त्याच्या आधारावर देण्यात आलेल्य़ा दाखल्यांचं भवितव्य टांगणीला लागलंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : गुंड निलेश घायवळचा भाऊ सचिन घायवळ फरार

Rain Alert : पावसाचा तडाखा बसणार; ५ राज्यात होणार मुसळधार पाऊस, महाराष्ट्रात कुठे बरसणार?

Face Care: या सोप्या स्किनकेअर टिप्स फॉलो करुन व्हा फेस्टिव्हलसाठी तयार, दिवाळीत चेहरा दिसेल ग्लोईंग आणि सोफ्ट

दिवाळीपूर्वी यमराजांसाठी दिवा कधी आणि कसा लावावा?

Metro Line 7A च्या बोगद्याचे काम पूर्ण, थेट विमानतळावर पोहोचता येणार; २ तासांचा प्रवास ४० मिनिटात

SCROLL FOR NEXT