Ajit Pawar News Saam TV
महाराष्ट्र

Ajit Pawar On Raj Thackeray : राज ठाकरे यांच्या 'त्या' टीकेवर अजित पवारांचं प्रत्युत्तर, नेमकं प्रकरण काय?

Ajit Pawar : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या वक्तव्याचा अजित पवार यांनी समाचार घेतला आहे. विधानसभा खोक्यानी भरलेली आहे, असे वक्तव्य राज ठाकरे यांनी केले होते. त्यावर अजित पवार यांनी समाचार घेतला.

Namdeo Kumbhar

Ajit Pawar on raj thackeray statement : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी निशाणा साधला आहे. राज ठाकरे कधी निवडून आले आहेत का? असा मिश्लिक टोला अजित पवार यांनी लगावला. एक खोक्याभाईचे काय घेऊन बसलात, अख्खी विधानसभा खोक्याभाईंची आहे, असा टोला राज ठाकरे यांनी सत्ताधारी आणि विरोधकांना लगावला होता. त्यावर अजित पवार यांनी टीकास्त्र केले. उपमुख्यमंत्री अजित पवार छत्रपती संभाजीनगरमध्ये बोलत होते.

राज ठाकरेंच्या टीकेवर संजय राऊत काय म्हणाले ?

अख्खं सभागृह खोक्याने भरलं आहे की नाही, त्यांच्या मताशी मी असहमत आहे. पण राज ठाकरे जे बोलत आहेत हे विधान गांभीर्याने घेतले पाहिजे. त्यांनी सध्याच्या राजकारणावरती बोट ठेवले आहे. असे खोके भाई असल्यामुळे ते निवडणुकीत सहज जिंकून येतात. सगळे खोके भाई एकत्र झाले आणि राज्यात सरकार बनवलं आहे, असे संजय राऊत म्हणाले.

पुढील अर्थसंकल्प कधी?

अर्थसंकल्पीय अधिवेशन अखेरच्या टप्यात आले आहे. आम्ही संविधानावर चर्चा करणार आहोत. पुढचे आदिवेशन कधी घ्यायचे हे अखेरच्या दिवशी ठरवले जाईल. आर्थिक शिस्त आणण्याचा प्रयत्न केलाय, काहींनी कौतुक केले काहींनी टीका केली, राज्याची आर्थिक घडी चांगली पुढे न्यायची आहे, असे अजित पवार म्हणाले.

रोजगारावर बोला -

मला एक कळत नाही, महाराज १६८० ला गेले, आता इतक्या वर्षानंतर जुने मुद्दे काढले जातात, ही समाधी आज आहे का? चव्हाण साहेबांनी संयुत महाराष्ट्र कलश तिथे नेलेला, पंतप्रधान राष्ट्रपती तिथं येऊन गेले. मुद्दा मांडायचा अधिकार सगळ्यांना आहे .पण यापेक्षाही महत्त्वाचे मुद्दे आपल्यासमोर आहेत. AI एक मोठं आव्हान आहे, शेतीचे प्रश्न आहेत, या गोष्टीला आपण महत्व देतोय.. शेतकऱ्यांना आत्महत्या करण्यापासून परावृत्त करने हे पण आहे, काळानुरूप बदलावे लागतात, पण आपण मधूनमधून कुणी नवे वक्तव्य करतात आणि तेवढ्यापुरती चर्चा सुरू होते, या पेक्षा रोजगार उद्योगांवर बोला, असे अजित पवार म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Washim Accident: वाशिममध्ये भीषण अपघात! १३ चिमुकल्यांना घेऊन जाणारी व्हॅन खड्ड्यात पलटली अन् पुढे...

katrina kaif: कतरिना कैफपूर्वी ‘या’ अभिनेत्रींनी चाळीशीत घेतलेला आई होण्याचा निर्णय

Maharashtra Live News Update: नाशिकमध्ये आदिवासींची महापंचायत

Virat Kohli: ऑस्ट्रेलियाविरुद्ध सीरीज खेळण्यास किंग कोहलीचा नकार, वनडे क्रिकेटमधून विराट घेणार निवृत्ती?

Breaking : मोठी बातमी! लडाख हिंसाचारात ४ जणांचा मृत्यू; अखेर सोनम वांगचुक यांना अटक, इंटरनेट सेवाही बंद

SCROLL FOR NEXT