Ajit Pawar Plane Crash Saam Tv
महाराष्ट्र

Ajit Pawar Death: विमान फिरलं अन् खाली पडलं, जागेवरच स्फोट झाला; महिलेने सांगितला अपघाताचा थरार, पाहा VIDEO

Ajit Pawar Plane Crash: बारामतीमध्ये आज मोठी दुर्घटना घडली. अजित पवार यांना घेऊन जाणारे विमान कोसळले. या अपघातामध्ये अजित पवार यांच्यासह ६ जणांचा मृत्यू झाला. हा अपघात नेमका कसा झाला हे प्रत्यक्षदर्शीने सांगितले.

Priya More

राज्याला हादरवणारी घटना आज बारामतीमध्ये घडली. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमानाला अपघात झाला. या अपघातामध्ये अजित पवार यांच्यासह ६ जणांचा मृत्यू झाला. अजित पवार यांच्या निधनानंतर राज्याला मोठा धक्का बसला. या घटनेची माहिती कळताच पवार कुटुंबीयांसह अनेक राजकीय नेते बारामतीला रवाना झाले आहे. अजित पवार यांच्या निधनानंतर राज्यात ३ दिवसांचा राजकीय दुखवटा जाहीर करण्यात आला आहे. हा अपघात नेमका कसा झाला याचा थरार प्रत्यक्षदर्शी महिलेने सांगितला आहे.

विमान अपघात पाहिलेल्या एका महिलेने सांगितले की, 'विमान आले. ते आमच्या घराच्या वरून गेले तेव्हा ते चांगले होते. आवाज ऐकून आम्ही बाहेर आलो. आम्ही गुरांना खायला घातलं आणि घराच्या दिशेने आलो. विमान आल्यानंतर त्याला विमानतळावरती जायचे होते पण ते खाली गेले. ८. ४५ च्या सुमारास मोठा स्फोट झाला. आमच्या घरापर्यंत त्यांचा आवाज आला. विमान फिरलं आणि खालीच क्रॅश झालं. ते वरती धावपट्टीवर गेलेच नाही. जागेवरच विमानाचा स्फोट झाला. आम्ही प्रचंड घाबरलो.'

या महिलेने पुढे असेही सांगितले की, 'त्यानंतर घटनास्थळावर लोकांची मोठी गर्दी झाली. पोलिस देखील आले. आम्ही देखील तिथे गेलो. आम्ही घरातून बादलीने पाणी आणले आणि आग विझवण्याचा प्रयत्न केला. एकाचा मृतदेह त्याठिकाणी पडला होता. मृतदेहाचे तुकडे झाले होते. शीर आणि धड वेगळे होते. त्यानंतर आम्हाला कापड मागवण्यात आले. तर आम्ही ब्लँकेट आणून दिले. त्यामध्ये मृतदेह गुंडाळून रुग्णालयात पाठवण्यात आला.'

विमान अपघातामध्ये मृत्यू झालेल्यांची नावं -

१) अजित पवार, उपमुख्यमंत्री

२) विदीप जाधव, स्वीय सहाय्यक

३) पिंकी माळी, फ्लाइट अटेंडंट

४) कॅप्टन सुमित कपूर

५) कॅप्टन शांभवी पाठक

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Good News: आणखी एक वंदे भारत स्लीपर धावणार! २ महत्त्वाच्या शहरांना जोडणार; जाणून घ्या 'A टू Z' माहिती

Maharashtra News Live Update: खासदार ओमराजे निंबाळकर यांनी घेतली मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट

5 Best Kurti Sets for Women: महिलांसाठी स्टायलिश आणि ट्रेंडी कुर्ती सेट्स, लेटेस्ट 5 डिझाईन्स

October 2026 Bank Holidays : ऑक्टोबरमध्ये 12 दिवस बँका बंद; तुमच्या राज्यात किती दिवस बँका असणार बंद

Sachin Waze: मोठी बातमी! तब्बल साडेपाच वर्षांनी सचिन वाझे येणार तुरुंगाबाहेर; अँटिलिया स्फोटक प्रकरणी जामीन मंजूर

SCROLL FOR NEXT