उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातामध्ये मृत्यू
बारामतीत अजित पवारांच्या विमानाला अपघात
लँडिंगदरम्यान विमान कोसळलं
अपघातानंतर विमानाचे तुकडे होऊन आग लागली
बारामतीमध्ये विमान अपघातामध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा मृत्यू झाला. बारामतीमध्ये अजित पवार यांच्या सभा होणार होत्या. या सभेसाठी अजित पवार आज सकाळी मुंबईवरून विमानाने बारामतीच्या दिशेने रवाना झाले. ९ वाजता ते बारामतीत पोहचणार होते. पण पावणे नऊच्या सुमारास विमान लँडिंग होत असताना त्यांच्या विमानाला मोठा अपघात झाला. अपघातानंतर विमानाने पेट घेतला आणि त्याचे तुकडे झाले. हा अपघात बारामती एअरपोर्टजवळ झाला. शेतामध्ये विमान कोसळलं. हा अपघात नेमका कसा झाला याची माहिती प्रत्यक्षदर्शीने दिली आहे.
अजित पवार यांचे विमान कोसळताना काही गावकऱ्यांनी पाहिले. एका गावकऱ्याने सांगितले की, 'अजित पवारांचे विमान अचानक कोसळले. ते कोसळेल असे वाटले नव्हते. विमान एअर ट्रॅपवर व्यवस्थित उतरेल असे वाटले होते पण ते कोसळले. त्यानंतर मोठा स्फोट झाला. स्फोटानंतर आम्ही पाहण्यासाठी घटनास्थळावर आलो. संपर्ण विमानाला मोठी आग लागली होती. त्यानंतर एकापाठोपाठ चार ते पाच स्फोट झाले. त्यानंतर खूप जण घटनास्थळावर आले. अनेकांनी जखमींना बाहेर काढण्याचा प्रयत्न केला पण आग जास्त असल्यामुळे कुणालाच मदत करता आली नाही.'
प्रत्यक्षदर्शीने पुढे सांगितले की,'या विमान अपघातात अजित पवार यांचा मृत्यू झाला याचे आम्हाला खूप दु:ख झाले आहे. आम्ही सांगू शकत नाही की किती दु:ख झाले आहे. पायलटने लँडिंग करण्याचा व्यवस्थित प्रयत्न केला पण लँडिंग झाले नाही. आम्ही पाहिले की विमान ट्रॅपजवळ येत होते. पण ते १०० फूटावरून खाली कोसळले.'
दरम्यान, अजित पवार यांचा मृत्यू झाल्यामुळे बारामतीमधील नागरिकांना प्रचंड दु:ख झाले आहे. बारामतीमधील शासकीय रुग्णालयाबाहेर नागरिकांनी मोठी गर्दी केली आहे. अजित पवार यांचे कार्यकर्ते मोठमोठ्याने रडताना दिसत आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.