parbhani politics  Saam tv
महाराष्ट्र

Maharashtra Politics : शरद पवारांना मोठा धक्का; मराठवाड्यातील बडा नेता अजित पवारांना साथ देणार

parbhani politics : अजित पवारांनी शरद पवारांना मोठा धक्का दिलाय. परभणीतील खंदा नेता अजित पवारांना साथ देणार आहे.

Vishal Gangurde

परभणी : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. राज्यातील विविध जिल्ह्यात राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणी करण्यास सुरुवात केली आहे. राजकीय नेत्यांनी आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बैठकांचा सपाटा सुरु केला आहे. याच आगामी निवडणुकीआधी अजित पवारांनी शरद पवारांना मोठा धक्का दिलाय. शरद पवारांचा जुना खंदा नेता आता अजित पवारांच्या पक्षात काम करणार आहे.

परभणी विधान परिषदेचे माजी आमदार बाबाजानी दुर्रानी आता पुन्हा एकदा अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत. बाबाजानी दुर्रानी यांनी फेसबुक पोस्ट करत अजित पवार गटात प्रवेश करणार असल्याचे जाहीर केले. बाबाजानी दुर्रानी हे पाथरीत येत्या ८ जून रोजी अजित पवारांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत.

राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर शरद पवारांना सोडणार नसल्याचे जाहीर केले होते. मात्र, त्यानंतरही ते अजित पवारांच्या बरोबर गेले. पुढे लोकसभेच्या निकालानंतर संभाजीनगरात जाऊन शरद पवारांच्या राष्ट्रवादी प्रवेश केला होता. मात्र विधानसभा निवडणुकीत अपक्ष लढले. आता ते परत अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत. त्यामुळे परभणीत अजितदादांच्या राष्ट्रवादीची ताकद वाढणार आहे.

बाबाजानी दुर्रानी यांनी फेसबुक पोस्टमध्ये काय म्हटलं?

बाबाजानी दुर्रानी म्हणाले,'मतदारसंघातील आणि जिल्ह्यातील शेकडो प्रमुख कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत काल बैठक पार पडली. या बैठकीत सर्वांनी आपापली मते मांडली. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आणि राजकीय वाटचाली संदर्भात चर्चा झाली. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करण्याचे ठरले. येत्या 8 जून रोजी जिल्हा परिषद मैदान पाथरीत भव्य मेळावा आयोजित करण्यात आला आहे. त्याठिकाणी अजित पवारांच्या प्रमुख उपस्थितीत माझ्यासह शेकडो पदाधिकारी पक्षप्रवेश करतील'.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Local Train Update : नालासोपारा-वसईत ट्रॅकवर पाणी साचण्याची कटकट संपणार, रेल्वेने घेतला 'हा' मोठा निर्णय

Maharashtra News Live Update: दोषी अधिकारी आणि कंत्राटदारावर सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करा : अमोल कोल्हे

Filmmaker Death: प्रसिद्ध चित्रपट निर्मात्यांचे ५७ व्या वर्षी निधन, सिनेसृष्टीवर शोककळा

Relationship Tips: पार्टनर फक्त 'टाईम पास' करतो? 'या' 7 संकेतांवरून ओळखा मनातील खोट

Indian Railways : रेल्वे प्रवाशांसाठी महत्त्वाची सूचना! WhatsApp वरचं तिकीट दाखवून प्रवास करता येणार नाही, हे कागदपत्रेसोबत असणे अनिवार्य

SCROLL FOR NEXT