Ajit Pawar Record saam Tv
महाराष्ट्र

Ajit Pawar : छगन भुजबळ आणि दिलीप वळसे पाटील यांना मंत्रिमंडळात स्थान का नाही? अजित पवारांनी दिलं स्पष्टीकरण

Ajit pawar News : फडणवीस सरकारमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे छगन भुजबळ आणि दिलीप वळसे पाटील यांना मंत्रिमंडळात स्थान मिळणार नसल्याची चर्चा आहे. याचदरम्यान अजित पवार यांनी मोठं विधान केलं आहे.

Vishal Gangurde

मुंबई : महायुती सरकारचा आज रविवारी शपथविधी होणार आहे. या शपथविधीसाठी अजित पवार गटातील काही नावे निश्चित झाली आहेत. अजित पवार गटाच्या यादीत दिग्गज नेत्यांना डच्चू मिळाला आहे. मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्याने छगन भुजबळ नाराज झाल्याचीही चर्चा आहे. या सर्व नाराजीदरम्यान उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. ते नागपुरातील मेळाव्यात बोलत होते.

अजित पवार यांनी छगन भुजबळ आणि दिलीप वळसे पाटील यांना मंत्रिमंडळात स्थान का मिळाले नाही, याबद्दल स्पष्टीकरण दिलं आहे. 'मंत्रिमंडळ विस्तार पार पडल्यानंतर सुनील तटकरे, चंद्रशेखर बावनकुळे आणि एकनाथ शिंदे यांचा एक व्यक्ती एकत्र बसणार आहे. २ महिन्यात महामंडळाची निवड पार पडणार आहेत. मंत्रिमंडळात सगळ्यांना संधी देत नाही. काही जणांना मागच्या वेळी दीड वर्ष टर्म मिळाली. आम्ही आता ठरवलं आहे. आता ५ वर्षात मंत्र्यांना अडीच अडीच वर्ष टर्म देण्यात येणार आहे. आमचं त्यावर एकमत झालं आहे'.

अजित पवार म्हणाले, 'मुंबईला काल शपथविधी होणार होता, त्यामुळे आज मेळावा घेतला. आज शपथविधी आहे तरी मेळावा होत आहे. विदर्भात ७ जागा लढलो. मोर्शी जागा मैत्रीपूर्ण लढत झाली. जर तसं झालं नसतं तर देवेंद्र भुयार निवडून आले असते. बुलढाणा जिल्हाध्यक्ष काजी यांचं अभिनंदन करतो. बुलढाणा बँक अडचणीतून बाहेर काढण्यासाठी ३०० कोटी रुपये देण्याची व्यवस्था केली.आम्ही काजी यांना विचारलं, त्यांनी मनोज कायंदे यांचं नाव सांगितल. त्यांनी सांगितल होतं, जर ते निवडून आले नाही तर आम्ही तोंड दाखवणार नाही. आम्ही काजी साहेब यांच्या पाठीशी उभे राहिलो आणि कायंदे यांना संधी दिली आणि ते निवडून आले'.

'लोकसभेला मी सुनील तटकरे यांना म्हणायचो, तटकरे साहेब तुम्ही तरी तुमची लोकसभेची जागा काढा. जर आली नसती तर भोपळा मिळाला असता. तटकरे, मला म्हणू शकत नव्हते, तुमची जागा काढा. त्यांनी त्यांची जागा काढली. आम्ही मात्र त्यानंतर खूप बदल केले. मी माझा स्वभाव बदलला. जबाबदारी आली की माणूस बदलतो. मी ठरवला आता कुणावर चिडायचं नाही. मी स्वभाव बदलला त्याचा परिणाम दिसला, असे अजित पवार म्हणाले.

'फेब्रुवारी २०२२ मधे जिल्हा परिषद निवडणुका होण गरजेचं होतं. मात्र ३ वर्ष निवडणुका झाल्या नाहीत. आता अनेक निवडणुका होणार आहेत. मंत्रिमंडळ विस्तार पार पडल्यानंतर सुनील तटकरे, चंद्रशेखर बावनकुळे आणि एकनाथ शिंदे यांचा एक व्यक्ती एकत्र बसणार आहेत. २ महिन्यात महामंडळ निवडी पार पडणार आहेत. मंत्रिमंडळात सगळ्यांना संधी देता येत नाही, असे ते पुढे म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

Maharashtra Politics : मुंबईत होणार मराठीची एकजूट; ठाकरेंची युती, महायुतीला धडकी? Video

SCROLL FOR NEXT