shivendraraje bhosale, ajit pawar, udayanraje bhosale, satara, satara nagarpalika election, satara political news saam tv
महाराष्ट्र

Satara News : शिवेंद्रसिंहराजेंच्या आक्रमक पवित्र्यामुळे अजित पवार दुखावले ?

ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यासमवेत एक मेळावा घेण्याचे देखील प्लॅनिंग करण्यात आले.

ओंकार कदम, Siddharth Latkar

Satara News : भारतीय जनता पक्षात प्रवेश केलेल्यानंतरही आत्तापर्यंत आमदार शिवेंद्रसिंहराजे भाेसले (shivendraraje bhosale latest marathi news) यांनी जाहीर सभेत अथवा मेळाव्यात त्यांच्या पुर्वाश्रमीच्या राष्ट्रवादी काॅंग्रेस पक्षावर आक्रमकपणे टीका, टिप्पणी करण्याचे टाळले हाेते. काही दिवसांपुर्वी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत साता-यात झालेल्या मेळाव्यात शिवेंद्रसिंहराजेंनी राष्ट्रवादीचा बालेकिल्ला नेस्तानाबूत करण्याचा निर्धार व्यक्त केला.

त्यावेळी राजेंनी (shivendraraje bhosale) राष्ट्रवादी स्थानिक स्वराज्य संस्थांतून हद्दपार करण्याचा विडा उचलला. दरम्यान राजेंच्या आक्रमक पवित्र्यानंतर विराेधी पक्ष नेते अजित पवारांनी सातारा पालिका निवडणुकीत मविआच्या माध्यमातून लढण्याचे जाहीर केले आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका त्या त्या पातळीवर लढविल्या जातात असं नेहमी म्हणणारे अजित पवार शिवेंद्रराजेंच्या पवित्र्याने दुखावले गेले की काय अशी चर्चा आहे.

साता-याताली (satara) राष्ट्रवादीचे नेते दीपक पवार आणि विराेधी पक्ष नेते अजित पवार यांच्यात नुकतीच पुणे येथील बारामती होस्टेल येथे बैठक झाली. या बैठकीत सातारा पालिका, जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीविषयी चर्चा झाली.

यावेळी सातारा पालिका निवडणुकीसाठी शहरात मविआ नेत्यांची एकत्रित बैठक घेण्याविषयी देखील वेळ निश्चित करण्यात आली. त्यानंतर ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यासमवेत एक मेळावा घेण्याचे देखील प्लॅनिंग करण्यात आले. अजित पवार आणि दीपक पवार यांच्या बैठकीनंतर साता-यातील पालिकेचे राजकारण पुन्हा ढवळून निघाले आहे. (Maharashtra News)

या चर्चेबाबत दीपक पवार म्हणाले सातारा पालिकेमध्ये स्वच्छ चारित्र्याचे व सामान्य कुटुंबातील जनतेची नाळ असलेले उमेदवार उभे करणार आहाेत. लवकरच शरद पवार यांच्या उपस्थित सातारा शहरामध्ये मेळावा घेणार आहाेत. मविआच्या माध्यमातून निवडणुक लढली जावी असा आग्रह अजित पवार यांच्यापुढे व्यक्त करण्यात आला आहे. त्यास त्यांनी संमती दिली आहे. (Tajya Batmya)

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

MHADA News : मुंबईत गाळ्यांच्या भाड्यात तब्बल १२१ कोटींची फसवणूक; म्हाडाने १० जणांविरोधात केली कारवाई

Sangli Politics: सांगलीमध्ये भाजपचा करेक्ट कार्यक्रम, काँग्रेसने मारली बाजी; ३ पंचायत समित्यांवर वर्चस्व

Navale Bridge Accident: पुण्यातील नवले ब्रिजवर अपघाताचं सत्र सुरुच, भरधाव कार महामार्गावर उलटली | VIDEO

Maharashtra Live News Update : घरगुती गॅसचा अवैध वापर केल्या प्रकरणी पहिला गुन्हा दाखल

Monalisa Love Story : "६ महिने ६० वर्षांसारखे जगलो..."; मोनालिसाच्या नवऱ्याने सांगितली प्रेम कहाणी, वाचा काय म्हणाला

SCROLL FOR NEXT