Red alert  Saam TV News
महाराष्ट्र

Maharashtra Rain Live News: मुंबईसाठी उद्या पावसाचा ऑरेंज अलर्ट, शाळां-महाविद्यालयांच्या सुट्टीबाबत अद्याप निर्णय नाही: BMC

Marathi Breaking Live Marathi Headlines Updates : आज मंगळवार, दिनांक १९ ऑगस्ट २०२५, मुंबईसह राज्यात मुसळधार पावसाचा इशारा, निवडणूक आयोग, राहुल गांधी, राज-उद्धव मनपा युती, राज्यातील राजकीय घडामोडी, मुंबई-पुण्यासह राज्यातील महत्त्वाचे अपडेट्स वाचा एका क्लिकवर...

Namdeo Kumbhar

मुंबईसाठी उद्या पावसाचा ऑरेंज अलर्ट, शाळां-महाविद्यालयांच्या सुट्टीबाबत अद्याप निर्णय नाही: BMC

मुंबईसाठी आयएमडीने ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. तर सध्या शाळांना अधिकृत सुट्टी जाहीर करण्यात आले नसल्याची माहिती मुंबई महापालिकेने दिलीय.

पुण्याहून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या सर्व रेल्वे गाड्या बंद

सिंहगड एक्सप्रेस सह डेक्कन क्वीन उद्या रद्द

पुण्याहून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईला जाणाऱ्या सर्व रेल्वे उद्या रद्द

रायगड जिल्‍ह्यात आज सलग सहाव्‍या दिवशी पावसाची संततधार

रायगड जिल्‍ह्यात आज सलग सहाव्‍या दिवशी पावसाची संततधार सुरू होती. महाड तालुक्‍याच्‍या अनेक भागात दिवसभर मुसळधार पाऊस सुरू होता. तालुक्यातील शिवथर परीसरात जोरदार पाऊस झाला. या पावसामुळे येथील ओढा पात्र सोडून दुथडी भरून वाहत होता. ओढ्याच्या या पाण्यासोबत कुंभेशिवथर गावातील स्‍मशानभूमी वाहून गेल्याची घटना घडली आहे. दरम्यान रस्ते आणि पुलांवरून ओढ्याचे पाणी वाहत असल्याने रस्‍त्‍यांना नदीचे स्‍वरूप आले होते. यामुळे आंबेशिवथर, आंबेनळी, सह्याद्रीवाडी या गावांचा संपर्क काही काळ तुटला होता.

सांगली जिल्ह्यातील नद्यांची पाणी पातळी वाढली, शाळांना 2 दिवस सुट्टी जाहीर

नाशिकच्या मालेगावातील अवैध गर्भपात केंद्रावर धाड

- सोयगाव भागातील एका बोगस डॉक्टर कडून सुरू होता अवैध गर्भपात..

- मालेगावातील सोयगाव भागातील एका बंगल्यात सुरू होते अवैध गर्भपात..

- मालेगावातील स्थानिक गुन्हे शाखा व जिल्हा आरोग्य विभागाने एकत्रित केली कारवाई

CSMT वरून लांबपल्याच्या निघणाऱ्या रेल्वे 3 ते 4 तास उशिराने धावणार

8.20 ची महालक्ष्मी एक्सप्रेस धावणार रात्री पवना एक वाजता

अनेक गाड्यांचे वेळापत्रक कोलमडले आहे.

पालघर जिल्ह्यातील सर्व शाळा-महाविद्यालयांना उद्या सुट्टी 

पालघर जिल्ह्यात उद्या देखील मुसळधार पावसाची शक्यता. खबरदारी म्हणून सलग दुसऱ्या दिवशी शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर. उद्या देखील पालघर जिल्ह्यात पावसाचा जोर कायम राहणार असल्याने जिल्हा प्रशासनाचा निर्णय.

इगतपुरी ते कसारादरम्यानच्या समृद्धी महामार्गावर दरड कोसळली

समृद्धी महामार्गावर दरड कोसळली आहे. इगतपुरी आणि कसारा दरम्यानच्या महामार्गावर दरड कोसळल्याची घटना घडलीय. कसाराकडून इगतपुरीकडे जाणाऱ्या मार्गावर पहिल्या बोगद्याजवळ दरड पडल्याने तीन लेनपैकी एक लेनचा मार्ग बंद झाला होता.

पुण्यातील मध्यवर्ती भागात वाहतूक कोंडी

पुणे शहरात सुरू असलेल्या पावसाचा फटका वाहतुकीला बसला आहे. पुण्यातील मध्यवर्ती भागात असलेल्या डेक्कन परिसरातील जंगली महाराज रस्त्यावर प्रचंड वाहतूक कोंडी झालीय. नदीपात्रातील रस्ते बंद केल्याने पुणेकरांना वाहतूक कोंडी झालीय.

मालेगाव तालुक्यात मुसळधार पाऊस, शेतातील उभे पीक झाले जमीनदोस्त

शिकच्या मालेगाव तालुक्यातील कळवाडी, देवघट, साकुर, चिंचगव्हाण, दापुरे परिसरात 2-3 दिवसांपूर्वी झालेल्या मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांच्या शेतीपिकांचे मोठे नुकसान झाले.मका, बाजरीसह शेतातील उभे पिके या पावसामुळे जमीनदोस्त झाले.तर काही शेतकऱ्यांच्या शेतात पाणी साचल्याने पिकांचे नुकसान झाले.

या पार्श्वभूमीवर आमदार सुहास कांदे यांच्या सुचनेनुसार तहसीलदार, कृषी अधिकारी आदींच्या पथकाने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची भेट घेत थेट बांधावर जाऊन शेती पिकांची पाहणी केली व तातडीने पंचनामा करण्याच्या सूचना दिल्या.

तानसा धरणाचे 21 स्वयंचलित दरवाचे उघडले, 23210.46 क्यूसेक ने पाण्याचा विसर्ग

रात्री पासून शहापूर तालुक्यात मुसळधार पाऊस बरसत असून नदी नाले ओसंडून वाहू लागले आहेत. तर दुसरीकडे धरण क्षेत्रात देखील सततधार सुरू असल्याने धरणांच्या पाण्याच्या पातळीत कमालीची वाढ झाल्याने धरणाचे दरवाजे उघडले गेले आहेत. मुंबई ला पाणी पुरवठा करणारा तानसा धरणाचे स्वयंचलित 21 दरवाजे उघडल्याने धरणातून 23210.46 क्यूसेकने पाण्याचा विसर्ग तानसा नदीत होत असल्याने नदीला पुराचे स्वरूप आले आहे. या मुळे तनसा नदी काठी असलेल्या पालघर जिल्ह्यातील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

मोनो रेल्वे चेंबूर ते भक्ती पार्कदरम्यान बंद पडली

मोनो रेल्वे सायंकाळी ६.१५ वाजेदरम्यान चेंबूर ते भक्ती पार्क दरम्यान बंद पडली. प्रवाश्यांनी आपत्कालीन परिस्थितीत तत्काळ मदतीसाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या १९१६ या क्रमांकावर संपर्क साधला. त्याची तातडीने दखल घेत मुंबई अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेत तीन स्नोर्केल वाहनांच्या साहाय्याने मदत कार्य सुरु केले आहे.

लोणावळ्यात मुसळधार पाऊस सुरू; सर्व शाळांना दोन दिवस सुट्टी जाहीर

लोणावळा परिसरात मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत केले आहे. या पार्श्वभूमीवर, लोकांच्या सुरक्षिततेचा विचार करून लोणावळा नगर परिषदेचे मुख्याधिकारी अशोक साबळे यांनी शहरातील सर्व शाळांना दोन दिवसांची सुट्टी जाहीर केली आहे.

कांदिवलीत 45 वर्षीय व्यक्ती पाण्यात बुडाला

कांदिवलीतील गौतम नगर परिसरात 45 वर्षीय व्यक्ती पाण्यात बुडाल्याची घटना घडली आहे. या घटनेनंतर अग्निशमन दलाचे जवान आणि समता नगर पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून शोधमोहीम सुरू आहे. पोलीस आणि फायर रेस्क्यू पथक त्या व्यक्तीचा शोध घेत आहेत.

सातारा जिल्ह्यातील सहा तालुक्यामधील प्राथमिक शाळांना दोन दिवस सुट्टी

पाटण,जावळी,वाई,महाबळेश्वर, कराड,सातारा तालुक्यातील सर्व शाळांना सुट्टी देण्यात आलीय. जिल्ह्यातील इतर तालुक्यात पर्जन्य परिस्थिती बघून निर्णय घेण्याच्या गटविकास अधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्या आहेत.

रायगमधील वाकण-खोपोली मार्गावरील वाहतूक ठप्प, पावसाचा रस्ते वाहतुकीला फटका

वाकण खोपोली मार्गावरील वाहतूक ठप्प झालीय. अंबा नदीने ओलांडली धोक्याची पातळी ओलंडलीय. पाली येथील पुलाच्या दोन्ही बाजूने पाणी वाहतेय. पुलाच्या दोन्ही बाजूला वाहनांच्या रांगा लागल्या आहेत.

तलाठी पतीची पॅरारालीसीस झालेल्या पत्नीला जबर मारहाण

तलाठी पतीने पॅरालिसिस झालेल्या पत्नीला जबर मारहाण केल्याची धक्कादायक घटना आंबेगाव बुद्रुक येथे घडली आहे . तोंड दाबुन झटापट झाली त्यावेळी पीडित महिला गळ्याला नख लागुन ओरखडे येवुन जखमी झाली आहे .तर आलेल्या मेव्हण्या ला देखील मारहाण करण्यात आली आहे. याप्रकरणी पत्नीने दिलेल्या फिर्यादीवरून तलाठी पतीवर आंबेगाव पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Kolhapur: कोल्हापुरात विविध भागांमध्ये मुसळधार पाऊस, नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना

कोल्हापूर -

कोल्हापूर जिल्ह्यात विविध भागांमध्ये मुसळधार पाऊस सुरू

जयंतीला परिसरातील सुतार वाड्यात राहणाऱ्या नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना

कोल्हापूर महानगरपालिकेच्या वतीने सुतारवाड्यात राहणाऱ्या नागरिकांना सतर्क राहण्याच्या दिल्या सूचना

पावसाचा जोर वाढल्यास सुरक्षित ठिकाणी जाण्याच्या केल्या सूचना

Ratnagiri: रत्नागिरी जिल्ह्यातल्या राजापूर शहरातील जवाहर चौकापर्यंत आलं पुराचे पाणी

रत्नागिरी - रत्नागिरी जिल्ह्यातल्या राजापूर शहरातील जवाहर चौकात पुराचे पाणी आले.

त्यानंतर या पाण्यामध्ये पाणमांजर मुक्तपणे वावरताना दिसले.

पावसाचा जोर वाढल्यानंतर कोदवली आणि अर्जुना नदीला पूर आला.

त्यानंतर या पुराचे पाणी जवाहर चौकापर्यंत शिरले.

Nashik: नाशिकमध्ये गणेशोत्सवाच्या नियोजन बैठकीत गोंधळ

नाशिक -

- गणेशोत्सवाच्या नियोजन बैठकीत झाला गोंधळ

- हिंदू जनजागृती समितीच्या महिला बोलत असताना गोंधळ

- गणेश मंडळ मंडपात पत्ते खेळतात, दारू पितात असा हिंदू जनजागृती समितीच्या महिलेने केला होता दावा

- महिला बोलत असतानाच गणेश मंडळांच्या पदाधिकाऱ्यांनी रोखलं

- गणेश मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी हा मुद्दा काढला खोडून

- आमच्या गणेशोत्सवात पत्ते, दारू पिणारे दाखवल्यास आम्ही राजीनामा देऊ

- गणेश मंडळाचे अध्यक्ष समीर शेटे यांच्याकडून खुलासा

Pune: भिमाशंकर परिसरात मुसळधार पाऊस, चास कमान धरण ओव्हर फ्लो

पुणे -

सह्याद्रीच्या कुशीतलं सर्वात मोठा असलेला चास कमान जलाशय ओव्हर फ्लो

भिमाशंकर परिसरात मुसळधार पाऊस सुरु असल्याने चास कमान धरणात पाणी साठ्यात झपाट्याने वाढ

चास कमान धरणात १०० टक्के पाणीसाठा

चास कमान धरणाच्या तीन दरवाजातुन १० हजार क्युसेक्सने भिमा नदीपात्रात पाण्याचा विसर्ग

नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

Pune: हडपसर गाडीतळ पुलाखालील मार्गात मोठ्याप्रमाणात साचले पाणी

पुणे -

हडपसर गाडीतळ पुलाखालील मार्गात मोठ्याप्रमाणात साचले पाणी

वाहनचालकांना कसरत करावी लागत आहे

पुण्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे ठिकठिकाणी साठले पाणी

Kolhapur: गगनबावडा मार्गावर पाणी, वाहतूक ठप्प

कोल्हापूर -

गगनबावडा मार्गावर पाणी आल्याने या मार्गावरील वाहतूक ठप्प

रस्त्यावर नदीचे पाणी आल्याने रुग्णाला उपचारासाठी पोलिसांनी, ग्रामस्थांनी खांद्यावर नेलं उचलून

गगनबावडा तालुक्यातील किरवे आणि लोंघे रस्ता जलमय, वाहतूक ठप्प!

रुग्णवाहिकेला रस्ता नाही

Ratnagiri: चिपळूणमध्ये वाशिष्ठी नदीला पूर, एसटी डेपोला फटका; बस वाहतूक बंद 

रत्नागिरी - चिपळूणमध्ये वाशिष्ठी नदीला पूर

चिपळूणच्या पुराचा फटका एसटी डेपोला

पुराचं पाणी थेट शिरलं चिपळूण डेपोत

डेपोतून एसटी बस वाहतूक बंद

चिपळूण बाजारपेठेत देखील शिरलं पाणी

Nashik: नाशिकमध्ये सार्वजनिक गणेश मंडळांचे पदाधिकारी आणि महापालिका अधिकाऱ्यांची बैठक

नाशिक -

- नाशिकमध्ये सार्वजनिक गणेश मंडळांचे पदाधिकारी आणि महापालिका अधिकाऱ्यांच्या बैठकीला सुरुवात

- शहरातील प्रमुख गणेश मंडळांसह अन्य गणेश मंडळांचे पदाधिकारी बैठकीला उपस्थित

- गणेशोत्सवात सार्वजनिक गणेश मंडळांना येणाऱ्या अडचणी आणि मंडळांच्या मागण्यांबाबत बैठकीत चर्चा

- महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्तांसह सर्व विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित

Nashik: नाशिकमध्ये गणेशोत्सवातील शेवटचे ५ दिवस विशेष मुभा, रात्री १२ वाजेपर्यंत देखावे सुरू ठेवता येणार

नाशिक -

- नाशिकमध्ये गणेशोत्सवातील शेवटचे पाच दिवस विशेष मुभा

- नाशिकमध्ये शेवटचे पास दिवस रात्री १२ वाजेपर्यंत देखावे सुरू ठेवता येणार

- रात्री १० वाजताच देखावे बंद करण्याचा आजवर होता नियम

- या पूर्वी शेवटचे २ किंवा ३ दिवस मिळत होती १२ वाजे पर्यंत परवानगी

- नाशिक जिल्हाधिकारी यांनी अधिकाराचा वापर करत दिलीय मुभा

- १५ दिवस रात्री १२ पर्यंत सण उत्सव साजरे करण्यासाठीच्या परवानगीचे आहेत जिल्हाधिकाऱ्यांना अधिकार

Amravati: राज्यातील आरोग्य कंत्राटी कर्मचारी आजपासून बेमुदत संपावर

अमरावती-

राज्यातील आरोग्य कंत्राटी कर्मचारी आजपासून बेमुदत संपावर..

अमरावतीत आरोग्य कंत्राटी कर्मचाऱ्यांचे जिल्हा परिषद समोर निदर्शने..

आरोग्य कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे आरोग्य व्यवस्थेवर परिणाम पडण्याची शक्यता..

कंत्राटी कर्मचाऱ्यांना नियमित करण्याचा निर्णय सरकारने घेतला..

त्यावर दिरंगाई करण्यात येत असल्याने कर्मचारी संपावर..

Pune: भिमाशंकरच्या माळीण परिसरात मुसळधार पाऊस सुरु

पुणे -

भिमाशंकर माळीण परिसरात मुसळधार पाऊस सुरु..

डिभे धरण १०० टक्के भरले असुन धरणातुन ३ हजार क्युसेक्सने पाण्याचा विसर्ग घोडनदी पात्रात सुरु

नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

पाऊसाचा जोर वाढल्यास पाण्याचा विसर्ग वाढविण्यात येणार असल्याची प्रशासनाची माहिती

Maval:  लोणावळ्यात तुफान पाऊस, भूशी डॅम ओव्हर फ्लो; धरणाकडे जाण्यास बंदी 

लोणावळ्यात कालपासून मुसळधार पाऊस सुरू

या मुसळधार पावसामुळे भुशी डॅम ओसंडून वाहत असल्याचे चित्र सध्या दिसत आहे

लायन्स पॉईंटकडे जाणाऱ्या रस्त्यावर पाणीच पाणी

पोलीस प्रशासनाकडून नागरिकांना आवाहन करण्यात आलं आहे

कोणत्याही पर्यटकांनी भुशी डॅममध्ये वर्षाविहारासाठी जाऊ नये.

Pune: पुण्याहून मुंबईला जाणारी डेक्कन एक्स्प्रेस आज रद्द

पुणे -

पुण्याहून मुंबईला जाणारी डेक्कन एक्सप्रेस आज रद्द

छत्रपती शिवाजी महाराज टर्मनिसला जाणारी डेक्कन एक्सप्रेस आज रद्द

पुणे ते सी एस एम टी ११००८ डेक्कन एक्सप्रेस ट्रेन पावसामुळे रद्द

मध्य रेल्वे प्रशासनाची माहिती

पुणे मार्गे जाणाऱ्या अनेक ट्रेन आज पुणे किंवा पनवेल पर्यंत धावणार

Raigad: खोपोली येथील झेनिथ धबधब्याच्या प्रवाहात आडकलेल्या पर्यटकांची सुखरूप सुटका

रायगड -

- खोपोली येथील झेनिथ धबधब्याच्या प्रवाहात आडकलेल्या पर्यटकांची सुखरूप सुटका

- तमिळनाडू येथील 15 पर्यटक खोपोली येथील झेनिथ धबधबा पहाण्यासाठी आले होते

- पावसामुळे अचानक वाढलेल्या धबधब्याच्या पाण्याच्या प्रवाहाचा अंदाज न आल्याने हे 15 पर्यटक प्रवाहात आडकले होते

Pune: मुसळधार पावसामुळे कोरेगाव पार्कमध्ये झाड पडलं, सुदैवाने जीवितहानी नाही

पुणे -

कोरेगाव पार्क परिसरात गल्ली नंबर ७ मध्ये झाड उन्मळून पडले आहे.

कालपासून सुरू असलेल्या पावसाने झाड पडले

सुदैवाने कुठलीही जीवितहानी झाली नाही.

हतनुर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात झालेल्या पावसामुळे धरण क्षेत्रामध्ये पाण्याची आवक वाढली

हतनुर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात झालेल्या पावसामुळे धरण क्षेत्रामध्ये पाण्याची आवक वाढली आहे. त्यामुळे तापी व पूर्णा नदीच्या दोन्ही तीरावरील नागरिकांना कळवण्यात येते की हतनूर धरणाचे ४१ पैकी ६ दरवाजे पुर्ण क्षमतेने व 24 दरवाजे १.० मी. क्षमतेने उघडलेले असून तापी नदीपात्रामध्ये सद्यस्थितीत ७२,००७ cusecs इतका विसर्ग सुरू असून पुढील काही तासांत ७५,००० ते १,००,००० cusecs पर्यंत विसर्ग हतनुर धरणातून जाण्याची शक्यता आहे.

तरी नदी काठच्या नागरिकांनी आवश्यक खबरदारी घ्यावी असे आवाहन कार्यकारी अभियंता जळगाव पाटबंधारे विभाग व जिल्हा प्रशासन जळगाव यांच्या वतीने करण्यात येत आहे.

Raigad: रायगड जिल्ह्यात घरावर दरड कोसळून महिलेचा मृत्यू

० मुरूड तालुक्यातील मिठेखार गावातील घटना

० पहाटेच्या सुमारास घरावर कोसळली दरड

० विठाबाई गायकर वय वर्ष 75 असे मृत महिलेचे नाव

० मुरूड तहसीलदार यांच्यासह महसूल यंत्रणा घटनास्थळी

Kurla Rain Update: कुर्ला डेपो परिसरात आणि एलबीएस रस्त्यावर पाणी साचले

मिठी नदीला आलेल्या पुरामुळे कुर्ला डेपो परिसरात आणि एलबीएस रस्त्यावर पाणी साचले आहे,पाणी साचल्यामुळे वाहने अडकून चेंबूरला परतत आहेत,कृपया चेंबूर ते सांताक्रूझ दरम्यान एससीएलआर टाळण्यासाठी BKC कनेक्टर घाटकोपर अंधेरी लिंक रोड , पवई JVLR पर्यायी मार्ग वापरावा .

Pune Rain Update: मुसळधार पावसामुळे पुण्यातील टपाल कार्यालय पाण्याच्या विळख्यात

पुण्यातील हडपसर परिसरातील टपाल कार्यालयाचा परिसरात मोठ्या प्रमाणावर साठले पाणी

पावसाच्या पाण्याचा निचरा होत नसल्यामुळे हडपसर येती गाडीतळ बंटर शाळेच्या आवारातील टपाल कार्यालय पाण्याच्या विळख्यात

मुसळधार पावसामुळे टपाल कार्यालय भोवती पाणी साठण्याची ही या वर्षीची तिसरी वेळ

Kokan Rain Update:  तळ कोकण व गोव्याला जाण्यासाठी केवळ आंबोली मार्गे वाहतूक सुरू

तळकोकण आणि गोवा या ठिकाणी जाण्यासाठी असलेल्या तीन मार्गांपैकी सध्या केवळ आंबोली घाटमार्गे वाहतूक सुरू आहे. ओरोस अर्थात सिंधुदुर्गात जाण्यासाठी सर्वात जवळचा मार्ग म्हणजे भुईबावडा तसेच करूळ घाट आहे. गेल्या तीन ते चार दिवसांपासून सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे या ठिकाणी दरड कोसळल्याच्या घटना घडल्या आहेत. त्याच बरोबर दुसरा मार्ग म्हणजे राधानगरी तालुक्यातील फोंडा घाट. या मार्गावरील देवगड - निपाणी रोडवरील फेजिवडे इथ पुराचे पाणी आल्याने तो ही मार्ग आणि घाट बंद करण्यात आला आहे. त्यामुळे केवळ आंबोली मार्गेच तळकोकण आणि गोव्याकडे जाता येत आहे. या मार्गावरून प्रवास करणाऱ्या नागरिकांनी खबरदारी घ्यावी अशी सूचना जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आली आहे.

कल्याण-कर्जत राज्य महामार्ग पाण्याखाली

मुसळधार पावसामुळे बदलापुरात कल्याण-कर्जत राज्य महामार्गावर पाणी साचलय. जुवेली गावाजवळ पाणी तुंबल्यानं वाहतुकीवर परिणाम झालाय. या ठिकाणी रस्त्याच्या एका बाजूला मोठमोठे गृहनिर्माण प्रकल्प आहेत. सखल भागात रस्ता असल्यामुळे पावसाच्या पाण्याचा निचरा होण्याचा कुठलाही मार्ग नाही. सार्वजनिक बांधकाम विभागाने रस्त्याच्या दुतर्फा गटारही काढलेलं नाही. त्यामुळे या ठिकाणी पाणी तुंबलं असून वाहन चालकांना मोठी कसरत करावी लागतीय.

संततधार पावसानं नाशिक जिल्ह्यातील १४ धरणं ओव्हर फ्लो

- तर जिल्ह्यातील २४ लहान मोठ्या धरणांमधील पाणीसाठा ८५ टक्क्यांवर

- नाशिकला पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणात ८४.२५ टक्के पाणीसाठा

- गंगापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर वाढल्यास कधीही धरणातून पाणी सोडण्याचा इशारा

- तर जिल्ह्यातील अन्य ११ धरणांमधून कमी अधिक प्रमाणात पाण्याचा विसर्ग

- नाशिकला आज देखील पावसाचा रेड अलर्ट

उजनीतून भीमा नदीत 11हजार 600 क्युसेक विसर्ग

उजनी धरण पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे धरणा पाण्याची आवक वाढली आहे. सध्या धरण 104 टक्के इतके भरले आहे. धरणातील पाणी पातळी नियंत्रीत ठेवण्यासाठी आज दुपार पासून 11 हजार 600 क्युसेक विसर्ग सुरू करण्यात आला आहे.तर काल पासून वीर धरणातून नीरा नदीत 33 हजार 500 क्युसेक इतका विसर्ग सुरू करण्यात आला आहे.

वीर आणि उजनी धरणातून पाणी सोडण्यात आल्याने भीमा नदीकाठी पूरस्थिती निर्माण झाली आहे. प्रशासनाने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.

ठाण्यातील संतोष पाटील नगर येथील घरावर दरड कोसळली

ठाण्यातील लोकमान्य नगर परिसरातील संतोष पाटील नगर येथे असलेल्या घरावर दरड कोसळली

एक जण जखमी कळव्यातील छत्रपती शिवाजी रुग्णालयात उपचारासाठी दाखल...

यामध्ये घराचं प्रचंड मोठ नुकसान झाले आहे

घरमालक जय मातेरे आहेत

दरड कोसळल्यामुळे आजूबाजूची चार घरे देखील खाली करण्यात आली आहे

उर्वरित रहिवासी हे त्यांच्या राहण्याची सोय त्यांच्या नातेवाईकांकडे केली आहे

पनवेल ते मानखुर्द पर्यंतच लोकल सुरू

पनवेल ते मानखुर्द पर्यंतच लोकल सुरू असल्याने मानखुर्द स्टेशनबाहेर प्रचंड गर्दी

रिक्षा चालकांकडून चाकरमान्यांची लूट

रिक्षा भाड्यात दुपटीने वाढ

Nashik: नाग्या-साक्या धरण ओव्हर फ्लो

नाशिकच्या नांदगाव तालुक्यातील पांझण नदीवरील मध्यम प्रकल्प असलेल्या नाग्या-साक्या धरण १०० टक्के भरला असून धरणाच्या सांडव्यातून पाणी पांझण नदी पात्रात वाहू लागले आहे.मनमाड व नांदगाव तालूक्यात झालेल्या पावसामुळे नांदगाव तालूक्यातील जलसाठ्यात वाढ झाल्याने धरणे ओव्हर फ्लो होऊन ओसंडून वाहत आहे.नाग्या-साक्या धरण पुर्ण क्षमतेने भरल्यामुळे परिसरातील शेतक-यांचा सिंचनाचा तसेच त्यावर अवलंबून असलेल्या ग्रामिण भागातील पाणी योजनांचा प्रश्न सुटण्यास मदत झाली आहे.

Railway: मुसळधार पावसाने मुंबईची जीवनवाहिनी ठप्प, मध्य आणि हार्बर मार्गावरील लोकल वाहतूक बंद

मुंबई शहर, उपनगरासह ठाणे, कल्याण डोंबिवली, बदलापूर, वसई विरार, नवी मुंबईतील वाशी, पनवेल भागात सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे मुंबईची जीवनवाहिनी ठप्प झाली आहे. मध्य आणि हार्बर रेल्वेमार्गावरील वाहतूक बंद झालेली आहे.

मध्य रेल्वेवरील सीएसएमटी ते ठाणे या दरम्यान लोकल वाहतूक बंद करण्यात आली आहे.अशी माहिती मध्य रेल्वेच्या मुंबई विभागीय कार्यालयाच्या अधिकृत 'एक्स' हँडलवरुन देण्यात आली आहे.

पुण्यात आज गणेश मंडळ आणि प्रशासन यांच्यात महत्त्वाची बैठक

पुण्यातील बालगंधर्व रंग मंदिर याठिकाणी बैठकीला सुरुवात

बैठकीला शहरातील सर्व गणेश मंडळांचे अध्यक्ष, जिल्हाधिकारी, वरिष्ठ पोलिस अधिकारी, महापालिका आयुक्त उपस्थितीत

पुण्यातील विसर्जन मिरवणुकीबाबतचा वाद आज सुटणार का याकडे सर्वांचे लक्ष

गणेश मंडळांच्या समस्या आणि सूचना यावर बैठकीत चर्चा होणार

पंचगंगेच्या पुराच्या पाण्याचा जलसंपदा विभागाकडून बोटीतून सर्व्हे

गेल्या तीन दिवसापासून पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे पंचगंगा नदीची वाटचाल इशारा पातळीकडे सुरू आहे. सध्या राज्य सरकारच्या जलसंपदा विभागाकडून पंचगंगेच्या पाण्याचा प्रवाह, पाण्याची खोली आणि पडणारा पाऊस याचा सर्वे केला जातोय. पंचगंगा नदीवरील राजाराम बंधारा परिसरात जलसंपदा विभागाच्या चार अधिकाऱ्यांनी अत्याधुनिक यंत्रसामुग्रीसह बोटीतून हा सर्वे केल्याचे पाहायला मिळते. या सर्वेतून पुढे पूर नियंत्रणासाठी आणि अलमट्टीतून किती विसर्ग केला पाहिजे यासाठी देखील मदत होणार आहे.

मुंबईच्या सांताक्रूझ वाकोला भागात पाणीच पाणी

मुसळधार पावसामुळे वाकोला शिवाजीनगर परिसर जलमय

रस्त्यांना आले नद्यांचे स्वरूप

अनेक घरांमध्ये शिरले पाणी

Vasai-Virar: वसई- विरारमध्ये पावसाचा कहर, रस्ते पाण्याखाली

वसई-विरार शहरात सकाळपासूनच पावसाचा धुमाकूळ सुरू आहे. यामुळे शहरातील मुख्य रस्ते पाण्याखाली गेले आहेत. अनेक वाहने रस्त्यावर बंद पडली आहेत. वाहनचालक एकमेकांना वाहने दुरुस्त करण्यासाठी प्रयत्न करत असल्याचे दिसून येत आहे. तर श

वसई विरार शहरात सकाळपासूनच पावसाचा धुमाकूळ

वसई विरार शहरात सकाळपासूनच पावसाचा धुमाकूळ सुरू आहे. यामुळे शहरातील मुख्य रस्ते पाण्याखाली गेले आहेत, अनेक वाहने रस्त्यावर बंद पडली आहे. वाहन चालक एक दुसऱ्याची मदतीने वाहने दुरुस्त करण्याचा प्रयत्न करत असल्याचे दिसून येत आहे. तर वसई विरार शहरात झालेल्या अतिवृष्टीचा फटका आता वाहन चालकांना देखील बसला आहे. तर काही वाहने नादुरुस्त झाली आहेत.

मुसळधार पावसामुळे पुण्यात पाणी साचायला सुरुवात

पुण्यातील सय्यद नगर परिसरातील रस्त्यावर साठले पाणी

रस्त्यावर साठलेल्या पाण्यामुळे वाहनचालकांना मोठा मनस्ताप

रस्त्यावर आलेल्या पाण्यामुळे अनेक वाहनं पडली बंद

पुढील २४ तासांत मुंबई पुण्यासह कोकणात अती मुसळधार पावसाची शक्यता

येत्या 24 तासात मुंबई, पुण्यासह, कोकण किनारपट्टीवर असलेल्या जिल्ह्यात अती मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता पुणे वेधशाळेने वर्तवली आहे. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा आणखी तीव्र झाल्यामुळे पश्चिमेकडे त्याचा जोर अधिक आहे परिणामी महाराष्ट्रातील बहुतांश सर्व जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडतोय. मुंबईत गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेला पाऊस आणखी 24 तास राहण्याची शक्यता पुणे वेधशाळेकडून वर्तवण्यात आली आहे. सतत होणाऱ्या मुसळधार पावसामुळे घाटमाथ्यावर असणाऱ्या पर्यटन क्षेत्रावर जाणं टाळावं असं आवाहन सुद्धा हवामान शास्त्रज्ञांनी केलं आहे.

NDRFची टीम मिठी नदी इथे दाखल

मिठी नदी , एन डी आर एफ मिठी नदी येथे दाखल

सर्वांना आवाहन करण्यात येत आहे की घर खाली करा आणि सुरक्षित स्थळी पोहोचा

मुंबई गोवा महामार्गावरील घोड नदीवरील कळमजे पुल अवजड वाहनांकरता बंद

दक्षिण रायगडमध्ये कोसळणाऱ्या मुसळधार पावसाचा फटका मुंबई गोवा महामार्गावरील वाहतुकीला बसतो आहे. माणगाव नजीक घोड नदीवरील कळमजे पुल धोकादायक बनला असून पुराच्या पाण्यामुळे पुलाला धोका निर्माण होत असताना कोणतीही दुर्घटना घडू नये यासाठी राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या अहवालानुसार महामार्ग अवजड वाहनांसाठी बंद करण्यात आला आहे. काल रात्री सुमारे पाच तास हा महामार्ग पूर्णपणे बंद करण्यात आला होता. पुर परिस्थितीचा विचार करता प्रवाशी आणि नागरिकांनी कामा शिवाय घराबाहेर पडून नये त्याच बरोबर सुरक्षित पर्यायी रस्त्यांचा वापर करावा असे अवाहन माणगावचे पोलिस उप विभागीय अधिकारी पुष्कराज सूर्यवंशी यांनी केले आहे.

Rain Live News: ठाणे-सीएसएमटी लोकल बंद

ठाण्याहून सीएसएमटीकडे जाणारी रेल्वे वाहतूक बंद झाली आहे. ठाण्यावरुन सीएसएमटीकडे जाणाऱ्या स्थानकांवर पाणी साचले आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्वच शाळांना सुट्टी जाहीर

सिंधुदुर्ग जिल्ह्यात सर्वच शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. गेले दोन दिवस सिंधुदुर्ग जिल्ह्यात मुसळधार पाऊस कोसळत आहे. या पावसामुळे अनेक नदी आणि ओढे इशारा पातळीवर वाहत आहेत. त्या पाश्र्वभूमीवर प्रशासनाने जिल्ह्यातील सर्वच प्राथमिक, माध्यमिक व खासगी शाळांना सुट्टी जाहीर केली आहे. दरम्यान सध्या जिल्ह्यात पावसाने काहीशी उसंत घेतली आहे. मात्र ढगाळ वातावरण कायम आहे. गेल्या 24 तासात सिंधुदुर्ग जिल्ह्यात सरासरी 107 मिमी पाऊस कोसळला आहे यात वैभववाडी तालुक्यात उच्चांकी 230 मिमी पावसाची नोंद झाली आहे.

Pune: पुण्याच्या भोर तालुक्यातील ब्रिटिशकालीन भाटघर धरण ओव्हर फ्लो

गेल्या 3-4 दिवसांपासून धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या संततधार पावसामुळं, पाणी साठ्यात वाढ होऊन धरणं 100 टक्के भरलं

धरणाच्या 45 स्वयंचलीत दरवाजापैकी 16 दरवाजे पूर्ण क्षमतेने उघडले, या दरवाजांमधून 13 हजार क्युसेकने पाण्याचा विसर्ग नीरा नदीपात्रामध्ये सुरू

पावसाच्या तीव्रतेनुसार विसर्गामध्ये आवश्यक कमी अधिक बदल करण्यात येणार

नदीकाठच्या गावातील नागरिकांनी खबरदारी घेण्याचं आणि नदी पात्रात न उतरण्याचं, पाठबंधारे विभागाचं आवाहन

24 टीएमसी या धरणाची पाणी साठवण क्षमता

Rain Update: पुणे मुंबईसह रायगडमध्ये पुढील तीन तास महत्वाचे

पुढील तीन तासांत पुणे, मुंबई, रायगड, पालघर जिल्ह्यात अती मुसळधार पावसाची शक्यता

हवामान विभागाकडून मुंबई, पुणे शहराला रेड अलर्ट

पुढील ३ तासांत मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, पुण्यातील घाट परिसरात ४०-५० किमी प्रतितास वेगाने आणि ६० किमी प्रतितास वेगाने वारे वाहण्यासह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता

नागरिकांनी सतर्क राहण्याचे प्रशासनाचे आवाहन

बीडमधील माजलगाव धरणातील पाणीपातळीत वाढ

गेल्या पाच ते सहा दिवसांपासून झालेल्या पावसामुळे माजलगाव धरणातील पाणीपातळीत लक्षणीय वाढ झाली आहे.सकाळी 11 वाजेपर्यंत धरण 56 टक्क्यांवर पोहोचले असून, सध्या १० हजार क्यूसेकने पाण्याची आवक सुरू आहे.

धरण यंदा मृत साठ्याच्या आत गेले होते. मात्र मे महिन्यातील पावसाने थोडी वाढ झाली. ९ ऑगस्ट रोजी धरण फक्त २५ टक्के भरले असताना मागील 5 दिवसांच्या जोरदार पावसामुळे पाणीपातळीत 40

टक्क्यांची भर पडली आहे. धरण अभियंता गणेश झापगुडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, रात्रीतून पाण्याची आवक कायम राहिल्यास रविवारपर्यंत धरणाची पातळी ८० टक्क्यांवर जाईल असा अंदाज आहे. सध्या तरी माजलगाव शहर व तालुक्यातील पिण्याच्या पाण्याचा तसेच जनावरांच्या पाण्याचा प्रश्न सुटला आहे. तसेच शेतीसाठी पाणी उपलब्ध झाल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.

Pune News: पुण्यात पावसाचा जोर आणखी वाढला

पुणे शहरात गेल्या २ तासांपासून मुसळधार पाऊस

शहरातील मध्यवर्ती भागासह उपनगरात जोरदार पावसाच्या सरी

पुणे शहराला आज रेड अलर्ट

नागरिकांनी बाहेर पडताना काळजी घ्यावी, हवामान विभागाचे आवाहन

पुण्यातील सिंहगड रस्त्यावर वाहतूक कोंडी

सिंहगड रस्त्यावर असलेल्या विठ्ठलवाडी परिसरात मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी

सिंहगड रस्त्यावर वाहनांच्या लांबच लांब रांगा

वाहतूक कोंडीमुळे पुणेकर अक्षरशः वैतागले

मुसळधार पाऊस आणि वाहतूक कोंडी मध्ये पुणेकरांना सहन करावा लागतोय मोठा मनस्ताप

सिंहगड रोडवरील नव्याने उभारण्यात आलेल्या उड्डाणपूलाचे लोकार्पण न झाल्यामुळे इतर रस्त्यांवर आला वाहतुकीचा ताण

मुखेड तालुक्यात बचावकार्य पूर्ण, पुराच्या पाण्यात अडकले होते 293 लोक

नांदेडच्या मुखेड तालुक्यात बचावकार्य पूर्ण.

चार गावात पुराच्या पाण्यात अडकले होते 293 लोक.

हसनाळ येथून 8 जणांना बाहेर काढले.

पाच जण वाहून गेले त्यापैकी चार मृतदेह सापडले.

आर्मीच्या जवानांकडून मदत कार्य सुरू.

गडचिरोली जिल्ह्यातील 100 गावाचा संपर्क तुटला

महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल यांनी दत्तक घेतलेल्या भामरागड तालुक्याचा अजूनही विकास झालेला नाही भामरागड हेमलकसा महामार्गावरील पुलाचे काम चालू आहे मात्र अजूनही ते पूर्ण झाले नाही म्हणून आज पुन्हा भामरागड तालुक्याचा गडचिरोली जिल्ह्यासह महाराष्ट्राचा संपर्क तुटलेला आहे

1) हेमलकसा भामरागड राष्ट्रीय महामार्ग- पर्लकोटा नदी तालुका भामरागड

2) अहेरी वटरा रस्ता राज्यमार्ग 370 (वटरा नाला)ता. अहेरी

3) तळोधी आमगाव महाल विसापूर राज्यमार्ग-पोहार नदी तालुका चामोर्शी

3) चौडमपल्ली चपराळा रस्ता तालुका चामोर्शी

4) काढोली ते उराडी रस्ता तालुका कुरखेडा

5) शंकरपूर ते डोंगरगाव रस्ता तालुका देसाईगंज

6) कोकडी ते तुलशी रस्ता तालूका देसाईगंज

7) कोपेला झिंगानूर रस्ता स्थानिक नाला तालुका सिरोंचा

8) कोंढाळा कुरुड वडसा रस्ता तालुका देसाईगंज

Dahisar: दहिसर टोलनाका परिसरात पाण्याचा त्रास

दहिसर पूर्व वेस्टर्न एक्सप्रेस हायवे टोलनाका जवळील पुलाखाली मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे. वाहनचालकांना या ठिकाणी ये-जा करताना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. तसेच केतकीपाडा आणि धरखाडी परिसरातून पायी ये-जा करणाऱ्या नागरिकांनाही पाण्यामुळे मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे.

Chandrapur: चंद्रपूर जिल्ह्यात पावसाची संततधार

चंद्रपूर शहर आणि जिल्ह्यात काल दुपारपासून पावसाची संततधार सुरू आहे. एकीकडे वर्धा नदीला पूर आला असताना जोरदार पावसाने चंद्रपूरकरांच्या चिंता वाढविल्या आहेत. विशेष म्हणजे अमरावती आणि यवतमाळ जिल्ह्यात गेले 3 दिवस पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे इसापूर धरणातुन मोठ्या प्रमाणात पैनगंगा नदीत पाण्याचा विसर्ग सुरू आहे. या धरणाचे पाणी पैनगंगा नदीतून वर्धा नदीत आल्याने वर्धा, इरई आणि झरपट नदीच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली आहे. मात्र या सर्व परिस्थितीत दिलासादायक बाब म्हणजे सध्या इरई धरणातून पाण्याचा विसर्ग बंद आहे. इरई धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू केल्यास इरई नदीमुळे चंद्रपूर शहरात पूर परिस्थिती उद्भवू शकते. त्यामुळे चंद्रपूर जिल्हा प्रशासन परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे.

रत्नागिरीत कोसळधारा; पावसाचा जोर वाढला

रत्नागिरीतील बहुतांश नद्या इशारा पातळीवर

जगबुडी ‌, शास्री , वाशिष्ठी , काजळी , कोदवली आणि बावनदी इशारा पातळीवर

मुसळधार पावसामुळे रत्नागिरीतील शाळा महाविद्यालयांना सुट्टी

चिपळूण , राजापूर, खेडमध्ये सखल भागात पाणी

सातारा जिल्ह्यात पावसाची रिपरिप सुरूच

सातारा जिल्ह्यात पावसाची रिपरिप सुरूच

कोयनानगर -नवजा महामार्गावरील पाबळ येथे नाला खचला

अनेक ठिकाणी दरडी कोसळल्या, झाड उनमळून पडली

नवजाहा कोयनानगर एसटी वाहतूक ठप्प

रस्ता बंद असल्याने कामरगाव, मिरगाव नवजा. डीचोली मानाईनगर या पाच गावांचा संपर्क तुटला.

Chakan: चाकण औद्योगिक क्षेत्रात वाहतुककोंडीने प्रवाशांसह कामगारांचे हाल

पुणे नाशिक,तळेगाव शिक्रापुर मार्गावर वाहतुककोंडी

भरपाऊसात वाहतुककोंडीत प्रवाशांसह कामगारांचे हाल

पाऊसात वाहतुककोंडी सोडविण्यासाठी पोलीसांची कसरत सुरु

अवघड वाहनांची बेसिस्त वाहतुकीमुळे वाहतूककोंडी

Pune Rain: सकाळपासून पुणे शहरात काही ठिकाणी तुरळक तर काही ठिकाणी मुसळधार पाऊस

पुणे जिल्ह्याला प्रशासनाकडून आज ऑरेंज अलर्ट

पुणे शहरातील काही भागात आज सकाळपासून मुसळधार पाऊस

पुणे शहरासह गाठ माथ्यावर देखील कालपासून जोरदार पाऊस

पावसामुळे रस्त्यावर पाणी साचायला सुरुवात

शहरात आज दिवसभर मुसळधार पावसाची शक्यता

Patan: पाटण तालुक्यातील जुना संगमनगर धक्का आणि मूळगावचा पूल पाण्याखाली

सातारा जिल्ह्यातील पश्चिम घाट परिसरात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे कोयना धरण 100% भरण्याच्या उंबरठ्यावर आले आहे. त्यामुळे 53 हजार क्युसेस पाण्याचा विसर्ग नदीपात्रात सोडला जात आहे तसेच सुरू असलेल्या पावसामुळे कोयना नदीवरील जुना संगमनगर धक्का पूल आणि मुळगावचा पूल पाण्याखाली गेला आहे. तसेच मिस्त्री आणि तांबवे येथील बंधारे सुद्धा पाण्याखाली गेले आहेत. या परिसरात पाऊस वाढल्याने प्रशासनाकडून सूचना दिल्या जात आहेत.

Pune News: पुण्यातील सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाजवळ उड्डाणपूल अखेर खुला होणार

उद्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह उपमुख्यमंत्री करणार उड्डाणपुलाचे लोकार्पण

छत्रपती शिवाजीनगर येथील सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ ते आरबीआय या उड्डाणपुलाचे लोकार्पण मुख्यमंत्री देवेंद्रजी फ़डणवीस यांच्या हस्ते उद्या संपन्न होणार

या उड्डाणपुलामुळे नागरिकांच्या दैनंदिन प्रवासात सुलभता येणार असून वाहतुक सुरळीत होण्यास मदत होणार

पिंपरी चिंचवड शहरात आज सकाळपासून दमदार पावसाला सुरुवात

हवामान विभागाने पिंपरी चिंचवड शहराला ऑरेंज ॲलर्ट जाहीर केल्यानंतर आज पिंपरी चिंचवड सकाळपासून दमदार पावसाला सुरुवात झाली आहे. वातावरण ढगाळ नसला तरी शहरात सकाळपासून रिमझिम पावसाची सतत धार सुरू आहे. सतत पडणाऱ्या पावसामुळे शहरातील काही भागातील रस्त्यांवर पाणी साचलं आहे. तसेच शहरातून वाहणाऱ्या पवना, इंद्रायणी आणि मुळा नद्यांच्या पाणी पात्रात झपाट्याने वाढ झाली आहे.

Pune News: पुणे जिल्ह्यातील धरण पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस

सलग २ दिवस सुरू असलेल्या पावसामुळे जिल्ह्यातील अनेक धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू

खडकवासला धरणातून मुठा नदीत होणारा विसर्ग वाढवला

सध्या कुठल्या धरणातून किती विसर्ग

कासारसाई: ५६० क्युसेक्स

वरसगाव धरण: ३९०९ क्युसेक्स

खडकवासला धरण: ४१७० क्युसेक्स

भाटघर धरण: १२,११४ क्युसेक्स

पानशेत: ३९९६ क्युसेक्स

पवना: २८६० क्युसेक्स

कासारसाई धरण 97 टक्के भरले, 560 क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुरू..

मावळ आणि मुळशी तालुक्याला पाणीपुरवठा करणाऱ कासार साई धरण 97 टक्के भरलेले असून धरणाच्या सांडव्यावरून 560 क्लासेस पाण्याचा विसर्ग सुरू आहे. धरण पाणलोट क्षेत्रात कालपासून मुसळधार पाऊस सुरू असल्याने. पाण्यात मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे. जर असाच पाऊस सुरू राहिला तर पाण्याचा विसर्ग वाढवण्यात येईल अस पाटबंधारे विभागाच्या वतीने कळविण्यात आलेले आहे. दरम्यान नदीकाठी असलेल्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे.

Kolhapur: कोल्हापूर जिल्ह्यात मुसळधार पाऊस

कोल्हापूर आणि कोकणाला जोडणाऱ्या गगनबावडा तालुक्यात मुसळधार पाऊस

गगनबावडा मार्गावरील मांडूकली इथं आलं राष्ट्रीय मार्गावर पाणी

राष्ट्रीय मार्गावर पाणी आल्यामुळे वाहतूक रोखली

Mumbai Rain: मध्य रेल्वे उशिराने

ठाण्याहून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या रेल्वे गाड्या 25 मिनिटे उशिराने धावत आहेत ठाण्याहून मुंबई आणि कल्याण चा दिशेने जाणारी सेवा उशिराने धावत आहे. तसेच रेल्वे ट्रॅक मध्ये पाणी साचल्यामुळे काही गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत.

पवना धरणा परिसरात पावसाचा जोर वाढला, पवना धरणात 98% भरले

मावळ आणि पिंपरी चिंचवड शहराला पाणीपुरवठा करणारे पवना धरण 98 टक्के भरले आहे. पवना धरण पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर वाढल्याने तसेच मुसळधार पाऊस सुरू असल्याने पवना धरणाच्या पाणीसाठ्यात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. पवना धरण 98 टक्के भरल्यामुळे मावळ आणि पिंपरी चिंचवड करांच्या वर्षभराच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटला आहे. पवना धरण 98 टक्के भरले असून 1400 क्लूसेस पाण्याचा सांडव्यावरून विसर्ग सुरू आहे. धरण परिसरात 35 मिलिमीटर पावसाची नोंद झाली असून परिसरात आतापर्यंत 1921 मिलिमीटर पाऊस झाला आहे. पावसाचे प्रमाण लक्षात घेता विसर्ग कमी जास्त करण्यात येईल अशी माहिती प्रशासनाच्या वतीने देण्यात आलेली आहे..

मेहेकर तालुक्यातील सर्व शाळा, महाविद्यालयांना सुट्टी

मेहकर तालूक्यातील पेनटाकळी प्रकल्प, कोराडी प्रकल्प व परतापूर व देऊळगाव सकार्शा येथील धरणामधून मोठ्याप्रमाणात पाण्याचा विसर्ग होत असल्यामुळे रस्ते बंद होण्याची संभाव्यता आहे. त्यामुळे मेहेकर तहसिलदार निलेश मडके यांनी पत्रक काढून आज 19/08/2025 रोजी मेहकर तालूक्यातील सर्व शाळा, कॉलेज व महाविदयालय यांना सुटटी जाहीर केली आहे.. व पूढील 3 दिवस अतीवृष्टीचा इशारा असल्यामूळे कोणीही कामाशीवाय बाहेर पडू नये. असे आवाहन सुद्धा केले आहे..

Nashik: नाशिक जिल्ह्याला आज पावसाचा रेड अलर्ट

- जलसंपदा विभागाचा नदीकाठच्या नागरिकांना अलर्ट जारी

- धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर वाढल्यास धरणांमधून करण्यात येणार पाण्याचा विसर्ग

- तर गंगापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस सुरू झाल्यास धरणातून केव्हाही पाणी सोडलं जाणार

- गंगापूर धरणातून पाणी सोडल्यास गोदावरीच्या पाणी पातळीत अचानक वाढ होण्याची शक्यता

- नदीकाठच्या सर्व गावांना सतर्कतेचा इशारा

बुलढाण्यात पाण्याची आवक वाढल्याने मन प्रकल्पाचे पाच दरवाजे उघडले...

गेल्या तीन दिवसापासून जिल्ह्यात सततधार पाऊस सुरु आहे काही ठिकाणी अतिवृष्टी झाली आहे.. जिल्ह्यातील जेमतेम प्रकल्प ओहरफ्लो झाले आहेत, माध्यम प्रकल्प मन हा प्रकल्प सुद्धा ओहर फ्लो झाला असून प्रकल्पचे पाचही दरवाजे 50 सेमी ने उघडले असून प्रकालपटून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग केला जात आहे... मन नदीला पूर आला असून नदीकाठच्या गावाना जिल्हा प्रशासनाच्या वाटीनं सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत..

Kolhapur Rain Update: कोल्हापूर जिल्ह्यात पावसाचा जोर कायम

कोल्हापूरच्या पंचगंगेची इशारा पातळीकडे संथ गतीने वाटचाल

पंचगंगेची पाणी पातळी 34 फुट 9 इंचावर पोहचली

राजाराम सह 57 बंधारे पाण्याखाली; बंधारे पाण्याखाली गेल्यामुळे वाहतूक विस्कळीत

राधानगरी धरणाचे सातही स्वयंचलित दरवाजे उघडेच

जिल्ह्यातील सर्वच धरण क्षेत्रात पावसाचा तुफानी पाऊस

राधानगरी धरणाच्या सातही स्वयंचलित दरवाज्यातून 10 हजार क्युसेक आणि पायथा विद्युतगृहातून 1500 क्युसेक असा एकूण 11500 क्युसेक पाण्याचा विसर्ग भोगावती नदीपात्रात

नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

Ratnagiri: रत्नागिरी जिल्ह्यात रात्रीपासून पावसाची संततधार

काजळी नदीने ओलांडली इशारा पातळी

नदीने पातळी ओलांडल्याने चांदेराई लांजा रस्त्यावर पाणी

रसत्यावर जवळपास तीन फुट पाणी,चांदेराई लांजा अशी वाहतुक ठप्प

हरचेरी बाजारपेठेत पाणी भरण्याची शक्यता

भितीने व्यापाऱ्यांची सामानाची हलवाहलव

Mira-Bhayander: मीरा-भाईंदरसह वसई विरार शहरात पावसाचा धुमाकूळ सुरूच

तब्बल चार दिवसापासून पावसाचा जोर वाढल्यामुळे शहरातील सकल भागासह अनेक इमारती चा ताजमजला पाण्याखाली गेला आहे.

आज पालघर जिल्ह्याला हवामान विभागाने अतिवृष्टीचा इशारा दिलेला आहे. त्यानुसारच सकाळपासून पावसाने संततधार पडण्यास सुरुवात केली आहे.

Mumbai Rain: मुंबई उपनगरात पावसाचा जोर कायम

मध्यरात्रीपासूनच अनेक भागात जोरदार पाऊस

अंधेरी विलेपार्ले जोगेश्वरी गोरेगाव मालाड बोरिवली कांदिवली परिसरात पावसाची जोरदार बॅटिंग

जोरदार पावसामुळे सखल भागात पाणी साचण्यासोबतच मुख्य रस्त्यांवर देखील साचले पाणी

अंधेरीतील चार बंगला, अपना बाजार, नवरंग सिनेमा परिसरातील रस्ते जलमय

yavatmal Rain : यवतमाळ जिल्ह्यातील पळशी,संगम-चिंचोली गावाला पुराच्या पाण्याचा वेढा

इसापूर प्रकल्पातील विसर्ग वाढवण्यात आला असून सध्या 13 दरवाजे उघडून पैनगंगा नदी पात्रात पाण्याचा विसर्ग सुरू आहे. पैनगंगा नदीला आलेल्या पुरामुळे यवतमाळच्या उमरखेड तालुक्यातील पळशी, संगम चिंचोली या गावात पाणी शिरल्याने गावाचा संपर्क तुटला आहे. गावात पाणी शिरल्यामुळे नागरिकांचे अतोनात नुकसान झालाय.

navi Mumbai Rain News Live : पावसाने नवी मुंबई शहराला अक्षरशः झोडपून काढलं

मागील तीन ते चार दिवसांपासून नवी मुंबईत मुसळधार पाऊस सुरुये या मुसळधार पावसाने नवी मुंबई शहराला अक्षरशः झोडपून काढलय.... नवी मुंबईत रात्रीपासून पावसाची सततधार सुरु आहे. तर सकाळपासून पावसामुळे ढगाळ वातावरणासह पावसाची रिमझिम सुरूच आहे. तसेच खारघर येथील रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात पाणी साचला आहे त्यामुळे वाहन चालकांना पाण्यातून मार्ग काढत प्रवास करावा लागत आहे याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी विकास निर्णय

Maharashtra Rain Live News: मुसळधार पावसामुळे जालन्यातील बदनापूर तालुक्यातील सोमठाणा धरणात पाण्याची मोठी आवक...

मुसळधार पावसामुळे जालन्याच्या बदनापूर तालुक्यातील सोमठाणा धरणात पाण्याची मोठ्या प्रमाणात आवक झाली आहे. सध्या धरण 72.66 टक्के भरले असून, ओव्हरफ्लो होण्यासाठी केवळ दोन फूट बाकी आहे. बदनापूर तालुक्यासह संपूर्ण जालना जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून जोरदार पावसाची नोंद होत आहे. त्यामुळे जिल्ह्यातील अनेक भागातील नदी, नाले, ओढे आणि साठवण तलावांमध्ये पाण्याचा मोठा साठा झाला आहे. सोमठाणा धरणातून तालुक्यातील जवळपास अर्ध्या गावांना पाणीपुरवठा केला जातो. तसेच शेतकरी आपल्या फळबागा आणि शेतीसाठी याच पाण्याचा वापर करतात. बदनापूर तालुक्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे सोमठाणा धरणात मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक झाली.

Maharashtra Rain Live News:  अहमदपूर ,उदगीर आणि चाकूर महसूल मंडळात अतिवृष्टी

लातूर जिल्ह्याला पावसाने झोडपले आहे. उउदगीर तालुक्यातल्या धडकनाळ बोरगाव परिसरात, ढगफुटी सदृश्य पाऊस झाला. 3बैल35 शेळ्या. ह्या पुराच्या पाण्यात वाहून गेल्या आहेत.दरम्यान या पावसामुळे गावात जनजीवन पूर्णतः विस्कळीत झाल आहे. तर जिल्ह्यातील 13 लघु मध्यम प्रकल्पांमध्ये शंभर टक्के पाणीसाठा झाला आहे. प्रतिवृष्टीने नुकसान झालेल्या ग्रामस्थांच्या मदतीसाठी प्रशासन गावात तळ ठोकून आहे.

Maharashtra Rain Live News:  पुरातून जाताना उत्साही तरुण थोडक्यात बचावला, मात्र तरुणाची दुचाकी गेली वाहून

बुलढाणा जिल्ह्यात मागील दोन दिवसांपासून सतत पाऊस पडत असल्याने सर्वात पूर परिस्थिती निर्माण झाली होती .. चिखली तालुक्यात सुद्धा जोरदार पाऊस झाल्याने अनेक नदी नाल्यांना पूर आला आहे .. चिखली ते बुलढाणा रस्त्यावरील हातणी गावाजवळील असलेल्या राम नदीला महापूर आल्याने हा रस्ताच बंद झाला .. मात्र एका उत्साही तरुणाने धाडस करण्याचा प्रयत्न केला त्याने दुचाकी पुराच्या पाण्यात टाकून पूल पार करण्याचा प्रयत्न केला त्याची दुचाकी घसरून तो वाहायला लागला असल्याने नागरिकाणी ताटडीने धावं घेतली व त्या तरुणाला पाण्याबाहेर खेचले मात्र त्याची दुचाकी वाहून गेली...

Mumbai Rain  : मुंबई उपनगरात पावसाचा जोर कायम

मध्यरात्रीपासूनच अनेक भागात जोरदार पाऊस

अंधेरी विलेपार्ले जोगेश्वरी गोरेगाव मालाड बोरिवली कांदिवली परिसरात पावसाची जोरदार बॅटिंग

जोरदार पावसामुळे सखल भागात पाणी साचण्यासोबतच मुख्य रस्त्यांवर देखील साचले पाणी

अंधेरीतील चार बंगला, अपना बाजार, नवरंग सिनेमा परिसरातील रस्ते जलमय

yavatmal Rain Live News:  यवतमाळ जिल्ह्यात पूरस्थितीचा धोका वाढला, पैनगंगा नदीने ओलांडली धोक्याची पातळी

यवतमाळ जिल्ह्यात गेल्या चार दिवसांपासून धो-धो पाऊस कोसळत आहे.जिल्ह्यातील 16 ही तालुक्यात संततधार पाऊस कोसळत असल्याने पूरस्थिती निर्माण झाली असून जिल्ह्यात आज पर्यंत सरासरी 567.9 पाऊस अपेक्षित होता. प्रत्यक्षात 603.2 मिमी पाऊस कोसळला आहे.या पावसाची टक्केवारी ही 106.2 इतकी आहे. जिल्ह्यात पूर परिस्थितीमुळे लाखो हेक्टर वरील पीक वाहून गेल्याने शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालाय. अशात ईसापुर धरणाचे 13 दरवाजे उघडल्याने पैनगंगा नदीने धोक्याची पातळी ओलांडली असून उमरखेड,महागांव,आर्णी,घाटंजी तालुक्यातील शेकडो हेक्टर शेतजमीन पाण्याखाली गेली आहे.पुरामुळे जिल्ह्यातील सहा मार्गावरील वाहतुकीस बंद करण्यात आली आहे.

Maharashtra Rain Live News:  मुंबई-गोवा महामार्गावर पावशी पुलाला पडले भगदाड

मुंबई-गोवा महामार्गावर कुडाळ येथील पावशी पुलाला भगदाड पडल्याची घटना घडली आहे. या भगदाड पडलेल्या ठिकाणी झाडांच्या फांद्या उभ्या करण्यात आल्या आहेत. मात्र यामुळे वाहनचालकांना या पुलावरून जाताना सावकाश वेग कमी करून जावे लागत आहे. महामार्गावर पावशी येथील या पुलावर नेहमीच मार्ग खचतो. या पुलावर महामार्ग ठेकेदाराकडून तात्पुरती मलमपट्टी केली जाते. मात्र, त्यानंतर जैसे थे परिस्थिती होते. भगदाड पडल्याची घटना समजताच रात्री ठेकेदार कंपनीकडून तात्पुरती डागडुजी करण्यात आली.

Palghar Rain Live News:  पालघर जिल्ह्याला आज रेड अलर्ट

पालघर जिल्ह्याला आज रेड अलर्ट. कित्येक दिवस पडणाऱ्या पावसाची रात्रीपासून रीपरिप कायम.आज दिवसभर मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाचा अंदाज.जिल्ह्यातील शाळा ,अंगणवाडी आणि महाविद्यालयाला जिल्हा प्रशासनाकडून सुट्टी जाहीर. जिल्ह्यातील सर्वात मोठ्या असलेल्या सूर्य नदीला मोठ्या प्रमाणात पूर.आवश्यकता असेल तरच घराबाहेर पडा अन्यथा घराबाहेर पडू नका जिल्हा प्रशासनाचा नागरिकांना आवाहन.

Raigad Rain Live News:  रायगडमधील शाळा, महाविद्यालय बंद रहाणार

जोरदार पाऊस आणि पुर सदृष्य परिस्थितीच्या पार्श्वभुमीवर आज रायगडमधील शाळा, महाविद्यालय बंद रहाणार

० गेल्या तीन दिवसां पासून कोसळणाऱ्या संतत धार पावसानंतर रायगड जिल्ह्यातील माणगाव, महाड, नागोठणे येथे पुर सदृष्य परिस्थिती

० काल सावित्री, आंबा आणि कुंडलिका नद्यांनी धोका पातळी ओलांडली होती

० आज सर्वच नद्या नियंत्रण रेषेवरून वाहत असल्या तरी परिस्थिती नियंत्रणात

० जिल्ह्यात पावसामुळे जनजीवन विस्कळीत

० माणगावमध्ये काळ नदी, घोड नदीसह सर्वच स्थानिक नद्या दुथडी भरून वाहत असल्याने माणगावमध्ये पुर परिस्थिती

Maharashtra washim Rain Live News:  कवरदरी येथील तलाव फुटला...तलावाचे पाणी शेत शिवारात घुसले

वाशिमच्या मालेगाव तालुक्यातील कवरदरी येथील पाझर तलाव फुटल्याची घटना घडलीये. अचानक झालेल्या या प्रकारामुळे गावकऱ्यांमध्ये काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र सुदैवाने या घटनेत कुठलीही जीवितहानी झाली नाही. तलावातील पाणी शेतशिवारात पसरले असून, शेतकऱ्यांचे काही प्रमाणात नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती आहे. प्रशासनाकडून परिस्थितीवर लक्ष ठेवण्यात येत आहे.

Maharashtra Rain Live News:  सिंधुदुर्ग जिल्ह्याला आज ऑरेंज अलर्ट, सकाळपासून संततधार पाऊस

सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज सकाळपासूनच संततधार पाऊस सुरू झाला आहे. कालही जिल्ह्यात मुसळधार पाऊस झाला. रात्री काही प्रमाणात उसंत घेतलेल्या पावसाची सकाळपासून संततधार सुरू आहे त्यामुळे नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. गडनदी, भंगसाळ, तेरेखोल या मुख्यनद्या दुथडी भरून वाहत आहेत. त्यामुळे नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे तसेच मच्छीमारांनाही समुद्रात मासेमारीसाठी न जाण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत. मुसळधार पावसाच्या पाश्र्वभूमीवर हवामान विभागाने आज सिंधुदुर्ग जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट जारी केला आहे.

Thane Rain Live News:  ठाण्यात पावसामुळे वाहतूककोंडी

आज सकाळी पासून ठाणेकरांना पावसाचा फटका पडण्यास सुरुवात झाली आहे. ठाण्यातून घोडबंदर रोड चा दिशेने जाणाऱ्या अवजड वाहनांमुळे तसेच सतत कोसळणाऱ्या पावसामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे.

jalana Rain Live News:  जालन्यातील परतुर तालुक्यातील निम्न दुधना प्रकल्पाचा पाणीसाठा 70 टक्क्यांवर, धरणाचे आठ दरवाजे उघडले

सलग दोन दिवसापासून जालन्यातील परतुर तालुक्यामध्ये मुसळधार पाऊस पडत आहे.या पावसामुळे परतूर तालुक्यातील निम्न दुधना प्रकल्पाच्या पाणीसाठा झपाट्याने वाढ होत असून या प्रकल्पाचा पाणीसाठा आता 70 टक्क्यांवर पोहोचला आहे. सध्या धरणाची आठ दरवाजे उघडले असून 3 हजार 958 क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरू आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावांना प्रशासनाने सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे..मागील दोन दिवसापासून जालना जिल्ह्यात सर्व दूर मुसळधार पाऊस पडत आहे या पावसामुळे जिल्ह्यातील अनेक प्रकल्पाच्या पाणीसाठ्यामध्ये झपाट्याने वाढ होत आहे तर अनेक प्रकल्प ओव्हरफ्लो होण्याच्या मार्गावर आहे..

Maharashtra Rain Live News:  जांबुवंती नदीला 18 वर्षानंतर प्रथमच महापूर ..

बुलढाणा जिल्हयातील चिखली तालुक्यात रात्रीपासून झालेल्या जोरदार पावसाने चिखली शहराजवळील जांबुवंती नदीला महापूर आलाय.. त्यामुळे नदी काठावरील हजारो हेक्टर वरील शेती पाण्याखाली आली असून शेतात पाच फुटांपेक्षा जास्त पाणी आहे . . अनेकांची शेती खरडून गेलीय, सोयाबीन उडीद मूग तूर पिकांसह इतर पिके वाहून गेलीय . शेतात पाणी असल्याने या पिकांचे मोठे नुकसान झाले असून शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे ..

Maharashtra Rain Live News:  रत्नागिरी - जिल्ह्यात पावसाची संततधार सुरूच

सकाळपासून पावसाचा जोर पुन्हा वाढला

रत्नागिरी जिल्ह्यासाठी ऑरेंज अलर्ट

आजही मुसळधार पावसाची शक्यता असल्याने जिल्ह्यातील शाळांना आज सुट्टी

चिपळूणची वाशिष्ठी नदी इशारा पातळीजवळ

चिपळूणच्या बाजारपूल परिसरातील सखल भागात शिरलं पाणी

खेडमधील जगबुडी नदीची धोकापातळी पहाटे 4 वाजता झाली कमी

मात्र सध्या जगबुडी नदी इशारा पातळीवरून वाहत आहे

Maharashtra Hingoli Rain Live News:  महापुरामुळे हिंगोलीत आतापर्यंत दोघांचा मृत्यू  

हिंगोलीत आलेल्या महापुरामुळे आतापर्यंत दोघांचा बळी गेला आहे यामध्ये एका शेतकऱ्यासह धबधब्यावर पोहण्यासाठी आलेल्या एका पर्यटकांचा समावेश आहे दरम्यान धोंडीराम घोगरे असे शेतकऱ्याचे नाव आहे तर गोविंद लोंढे असे धबधब्यावर सेल्फी काढताना वाहून गेलेल्या तरुणाचे नाव आहे या दोन्ही घटनांनंतर मृतांच्या गावावर शोककळा पसरली होती दरम्यान हिंगोली चे जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी नागरिकांना धोकादायक स्थितीत प्रवास टाळावा व पर्यटकांनी काळजी घ्यावी असे आवाहन केले आहे

Maharashtra Raigad Rain Live News:  जोरदार पावसाचा रायगडच्या माणगावला फटका

रायगडमध्ये कोसळणाऱ्या जोरदार पावसाचा फटका संपूर्ण माणगाव तालुक्याला बसला आहे. सर्वात महत्वाचे म्हणजे माणगावमध्ये मुंबई गोवा महामार्गावर कळमजे येथे नदीला आलेल्या पुराचे पाणी रस्त्यावर आल्याने रात्री पाच तास मुंबई गोवा महामार्गावरील वाहतुक बंद ठेवण्यात आली होती. महामार्गवर लांबच लांब वाहनांच्या रांगा लागल्या असून अनेक प्रवाशांना रात्री चालत रस्ता पार करण्याची वेळ आली. येथील बामणोली, भादाव गावचे रस्ते रात्री पासून पाण्यात खाली असल्याने संपर्क तुटला आहे तर माणगाव रेल्वे स्टेशन परिसरात देखील मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. पावसाचा जोर अद्याप ओसरलेला नसला परिस्थिती नियंत्रणात आहे.

Maharashtra Rain Live News:  मुंबई-गोवा महामार्गावर पावशी पुलाला पडले भगदाड

मुंबई-गोवा महामार्गावर कुडाळ येथील पावशी पुलाला भगदाड पडल्याची घटना घडली आहे. या भगदाड पडलेल्या ठिकाणी झाडांच्या फांद्या उभ्या करण्यात आल्या आहेत. मात्र यामुळे वाहनचालकांना या पुलावरून जाताना सावकाश वेग कमी करून जावे लागत आहे. महामार्गावर पावशी येथील या पुलावर नेहमीच मार्ग खचतो. या पुलावर महामार्ग ठेकेदाराकडून तात्पुरती मलमपट्टी केली जाते. मात्र, त्यानंतर जैसे थे परिस्थिती होते. भगदाड पडल्याची घटना समजताच रात्री ठेकेदार कंपनीकडून तात्पुरती डागडुजी करण्यात आली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : अजित पवारांचं पाप देवेंद्र फडणवीसांनी लपवलं - विजय पांढरे

Whatsapp News : सलग दुसऱ्या दिवशी Whatsapp गंडलं, स्क्रोलिंग झालं बंद, युजर्स हैराण

मुंबईत हायअलर्ट; नेव्ही अधिकाऱ्याच्या गणवेशात आला अन् रायफल घेऊन पसार, नेमकं काय घडलं?

Beetroot Paratha : मुलांना नकळत हेल्दी फूड खायला घालायचंय? मग बीटापासून बनलेला हा पिंक पराठा नक्की ट्राय करा

पुण्यात क्रीडा संकुलमध्ये डोपिंग सदृश इंजेक्शन आढळले; क्रीडा विश्वात खळबळ|VIDEO

SCROLL FOR NEXT