पोलिसांनी आरोपीला दौंड न्यायालयात हजर केले होते.
दौंडमधील प्रथम वर्ग न्यायालयाने मंगळवारपर्यंत सुनावली पोलीस कोठडी
सकल हिंदू समाजाच्या वतीने लक्ष्मीनारायण चौकात रास्ता रोको आंदोलन सुरू
मुकुंद नगर परिसरातील दमदम शाह दर्ग्याच अतिक्रमण काढावयासाठी अनेक कार्यकर्ते आक्रमक
लक्ष्मी नारायण चौकात हिंदू समाजातील कार्यकर्ते एकत्र
आमदार योगेश टिळेकर आणि कार्यकर्ते यांची घोषणाबाजी
अतिक्रमण म्हटलं नाही तर बजरंग बली चे मंदिर उभा करून आमदार योगेश टिळेकर
यवतमधील आक्षेपार्ह पोस्ट टाकणाऱ्या तरुणाला 5 ऑगस्ट पर्यंत पोलिस कोठडी
पोलिसांनी आरोपीला दौंड न्यायालयात केले होते हजर
दौंड मधील प्रथम वर्ग न्यायालयाने मंगळवार पर्यंत सुनावली पोलिस कोठडी
- शिवसेनेला चेकमेट देणारा तयार झालेला नाही - भरत गोगावले यांची प्रतिक्रिया
- राष्ट्रवादीच्या पक्षप्रवेश सोहळ्यानंतर मंत्री भरतशेठ गोगावले यांनी सुनील तटकरे यांचे नाव न घेता दिले आव्हान
- येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकांमध्ये दूध का दूध आणि पाणी का पाणी होऊन जाईल
सकल हिंदू समाजाच्या वतीने लक्ष्मीनारायण चौकात रास्ता रोको आंदोलन सुरू
मुकुंद नगर परिसरातील दमदम शाह दर्ग्याच अतिक्रमण काढावयासाठी अनेक कार्यकर्ते आक्रमक
- कामायनी एक्सप्रेसच्या इंजिनला लागली आग
- इगतपुरीजवळ कामायनी एक्सप्रेसच्या इंजिनला अचानक लागली आग
- इंजिनला आग लागल्यानं कामायनी एक्सप्रेस इगतपुरीजवळ थांबवली
- सुदैवाने वेळीच आगीवर नियंत्रण मिळवल्याने मोठी दुर्घटना टळली
- इंजिनची तपासणी सुरू असल्यानं कामायनी एक्सप्रेस जागेवरच उभी
- मागील अर्धा ते पाऊण तासांपासून कामायनी एक्सप्रेस जागेवरच उभी असल्यानं प्रवाशांचा मात्र खोळंबा
अमरावती जिल्ह्यातील ब्राह्मणवाडा थडी ग्रामपंचायत मध्ये महिला सरपंच व ग्रामपंचायत सदस्यांमध्ये फ्री स्टाईल हाणामारी
मारहाणीची घटना सीसीटीव्ही कॅमेरात कैद...
ग्रामपंचायत कार्यालयातच सरपंच व सदस्यांमध्ये हाणामारी
ग्रामपंचायत सरपंच पद्मा मेसकर आणी विरोधी गटाचे ग्रामपंचायत सदस्य राजू उल्ले यांच्यामध्ये ग्रामपंचायत कार्यालयातच फ्रीस्टाइल हाणामारी झाली.
एकमेकांना मारहाण करत असल्याचे दृश्य सीसीटीव्ही कॅमेरा मध्ये कैद झाले आहे.
नांदेड जिल्ह्यातील आरोग्य सेवा व्हेंटिलेटरवर असल्याची पहावयास मिळत आहे.नांदेड,कंधार आणि आता भोकर येथील ग्रामीण रुग्णालयांमध्येही असाच गलथान कारभार सुरू असल्याचे उघड झाले आहे.भोकरच्या उपजिल्हा रुग्णालयात तर रुग्णांना पिण्यासाठी पाणीही मिळत नाहीये.सर्वत्र प्रचंड घाणीचे साम्राज्य पसरले आहे.
सुरेश वरपुडकर जरी भाजप मध्ये गेले असले तरी परभणीतलं कॉग्रेस ही जागेवरच आहे. कॉग्रेस चा एक ही नेता कार्यकर्ता कॉग्रेस सोडून गेलेला नाही. तर येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत परभणीत काँग्रेसचाच झेंडा फडकणार असा मला ठाम विश्वास असा असा विश्वास काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे यांनी व्यक्त केला.
चव्हाण यांनी सनातन धर्माला चुकून आतंकवाद म्हटले नाही जाणूनबुजून म्हंटले आहे. पालघर मध्ये साधूंची हत्या झाली तेव्हा उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते तेव्हा ना उद्धव ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली ना राहुल गांधी पृथ्वीराज चव्हाण यांनी प्रतिक्रिया दिली. इस्लामी आतंकवाद का म्हणत नाही भीती वाटते का? अल्पसंख्यांक मत मिळणार नाही म्हणून मध्यंतरीच्या काळात निवडणुकीच्या आधी विजय वडेट्टीवार हेमंत करकरे यांना rss च्या संबंधित अधिकाऱ्याने मारले असं विधान केलं होतं. सरकारी वकील उज्वल निकम यांच्यावर सुद्धा नको त्या पद्धतीने आरोप केले होते अशा विधानावर उद्धव ठाकरे पृथ्वीराज चव्हाण राहुल गांधी एक शब्द सुद्धा व्यक्त झाले नाहीत.नरेश म्हस्के खासदार
अज्ञात व्यक्तीनं विरोधात नवा मोंढा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर अज्ञात व्यक्तीं विरोधात करण्यात आला खुनाचा गुन्हा दाखल
या प्रकरणाचा तपास ही आता सीआयडी करणार
सर्वाधिक डान्सबार हे रायगड जिल्ह्यामध्ये.. ते बंद झाले होते. तेही अमराठी लोकांचे आहेत. ते कसे काय सुरू आहे. रायगड जिल्हा आहे ना.. छत्रपतींची राजधानी आहे, इथे मग इथे हे काय सुरू आहे. छत्रपतींची राजधानी असलेल्या रायगडमध्ये डान्सबार सुरू आहेत. तुम्हाला भरकटून टाकायचे आणि मूळ विषयावरून लक्ष विचलीत करायचे धंदे सुरू आहेत, असे राज ठाकरे म्हणाले.
मंदिरात तलवार नसल्याचे खुद्द तुळजाभवानी मंदिर संस्थानाने केले मान्य
वाकोजीबुवा यांच्या मठात तलवार ठेवली असल्याची मंदिर संस्थांनची माहिती
दैनंदिन पूजेसाठी महंतांच्या मठात तलवार ठेवली असल्याचे मंदिर संस्थांनची माहिती
माध्यमांवरील बातम्या निरर्थक तलवार सुरक्षित असल्याचे मंदिर संस्थानचे म्हणणे
मंदिर संस्थानकडून अधिकृत प्रसिद्धीपत्रक प्रसिद्ध करून देण्यात आली माहिती
आई तुळजाभवानी देवीच्या गर्भगृह आणि अष्ट आयुधांमधील शक्ती
काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी भगवा आतंकवाद न म्हणता हिंदू आतंकवाद असा शब्द वापरावा असे बोलले होते. यामुळे आज छत्रपती संभाजीनगरमध्ये शिंदेच्या युवासेनेकडून पृथ्वीराज चव्हाण यांचा पुतळा जाळून निषेध व्यक्त करण्यात आला. त्यांनी जाहीर माफी मागावी अशी देखील मागणी आंदोलकांच्या वतीने करण्यात आली.
गुजरातमध्ये दोन वेळा बिहारी लोकांना हाकलून दिले. पहिल्यांदा २० हजार लोकांना हाकलले. बिहारी लोकांना हाकलून दिले, त्या अल्पेश ठाकूर याची बातमी नाही. राज ठाकरे जेव्हा मराठीसाठी बोलते तेव्हा संकुचित कसा असू शकतो?
मराठी आणि गुजराती लोकांची भांडणे व्हावीत, त्यातून मते कशी काढू शकतो? त्यासाठी सर्व सुरू आहे. पण आम्ही त्यावर लगेच रिअॅक्ट होणार नाही. तुम्हाला हवं ते आम्ही करणार नाही. तुमच्या कृतीमधून महाराष्ट्राला नख लागतेय, ते समजल्यावर अंगावर आल्याशिवाय राहाणार नाही.
मराठीसाठी तडजोड नाही, भुसेंनाही ठणकावून सांगितले.
अनेक प्रकल्प गुदरातला गेले.
मोदी-शाह यांना गुजराती प्रेम आहे, मग आपण का संकुचित राहणार आहे.
तुम्ही महाराष्ट्रातून गुजरातला गेलात तर शेतजमीन विकात घेता येत नाही, असा कायदा केला आहे.
देशाचे पंतप्रधान अन् गृहमंत्री गुजरातचे आहेत, त्या गुजरातमध्ये जाऊन जमीन विकत घेता येत नाही. प्रत्येकजण आपल्या राज्याचा विचार करत असतो, आपण का करायचा नाही- राज ठाकरे
नंदुरबार जिल्ह्यात आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूका महायूती म्हणून लढण्यावरुन भाजपामध्येच मतभेद दिसून आले आहे. भाजपाचे आमदार माजी मंत्री डॉ विजयकुमार गावितांनी स्वबळावर लढण्याचा नारा दिला असतांनाच दुसरीकडे भाजपा आमदार राजेश पाडवी मात्र महायूतीच्या आदेशाप्रमाणे महायूती म्हणूनच स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणूका लढवण्याचे भाष्य करत आहे. लोकसभा आणि विधानसभेत शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादीने थेट विरोधाची भुमिका घेत भाजपा विरोधात काम केले. वरिष्ठांनी कान उघडणी करुनही या दोन्ही पक्षाच्या स्थानिक नेत्यांनी विरोधात काम केल्याने त्यांच्यावर विश्वास कसा ठेवायचा आणि पुढील निवडणूका खेळीमेळीच्या वातावरणात कशा निवडणूका होणार असा प्रश्न उपस्थित करत आमदार विजयकुमार गावितांनी यापेक्षा स्वबळावर लढण्यासाठी पक्षश्रेष्ठींना साकड घालणार असल्याचे त्यांनी सांगितले.
० स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत रायगडमध्ये महायुती नाही ० खा. सुनिल तटकरे यांचे स्पष्ट संकेत ० निवडणुकीत स्थानिक कार्यकर्त्यांवर अन्याय होऊ देणार नाही ० तटकरे यांनी दिला कार्यकर्त्यांना शब्द
अकोला वरून सर्व आरोपीना राजापेठ पोलिसांनी अटक केली
ऑनलाईन गेम आयडी वरून निलेश भेंडे सोबत भांडण मध्ये हा हल्ला करण्यात आला असल्याची माहिती
निलेश भेंडे रेडियन्त रुग्णालय मध्ये दाखल असून प्रकृती गंभीर असल्याची प्राथमिक माहिती
काल सायंकाळी अमरावतीच्या शंकर नगर परिसरात झाला होता निलेश भेंडेवर हल्ला..
मागच्या तीन आठवड्यात 29 जनावर दगावल्याने जिल्ह्यात बैलगाडा शर्यतीवर बंदी...
जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त उमेश पाटील यांनी दिली माहिती...
जिल्ह्यात एकूण 668 केसेस असून 343 जनावर घेतायत उपचार...
तर आतापर्यंत 9 लाख 51 हजार 400 म्हणजेच 94% करण्यात आलेले लसीकरण...
तर जिल्ह्यातील राहुरी, राहता, कोपरगाव आणि शेवगाव या चार तालुक्यात लंपीचा प्रादुर्भाव वाढल्याचे आले निदर्शनास
विधानभवनात पत्ते खेळणाऱ्या माणिकराव कोकाटे तसेच मारहाण करणारे आमदार संजय गायकवाड यांनी केलेल्या कृत्याचा निषेध नोंदवत छावा संघटनेकडून रमी आणि कुस्तीच्या प्रतिकात्मक स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पत्त्याचा डाव मांडून त्यात विजयी झालेल्या तसेच बॉक्सिंग मध्ये विजय झालेल्याना 200 चाबकाचे फटके बक्षीस म्हणून देण्यात येणार असल्याचे आंदोलकांच्या वतीने सांगण्यात आले.
खून, मोका आणि बलात्कारासारख्या गंभीर गुन्ह्यांमध्ये दोन वर्षांपासून फरार असलेल्या आरोपीला अखेर बंडगार्डन पोलिसांनी अटक केली आहे. विशाल लक्ष्मण भोले (वय 32, रा. दुष्काळ झोपडपट्टी, ताडीवाला रोड, पुणे) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.फिर्यादी तरुणीच्या तक्रारीनुसार, विशाल भोले याने तिला लग्नाचे आमिष दाखवून खोटे प्रेमसंबंध निर्माण केले. त्याने लग्न न झाल्याचे खोटे सांगून तिच्यासोबत शारीरिक संबंध ठेवले. या काळात पीडित तरुणी दोन वेळा गर्भवती राहिली. मात्र, विशालने तिची कोणतीही संमती न घेता तिचे दोन वेळा गर्भपात घडवून आणले.
- सुरेश भट सभागृहात हा सत्कार सोहळा होत आहेय..
- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार सत्कार सोहळा...
- महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुके, माणिकराव कोकाटे, राज्यमंत्री आशिष जयस्वाल असणारा उपस्थित...
- ग्रँडमास्टर झाल्यानंतर पहिला नागपुरात होत आहे सत्कार सोहळा..
- पंकजा मुंडे यांच्याकडून त्र्यंबकेश्वराचं दर्शन आणि अभिषेक पूजा
- पार्श्वभूमीवर श्रावण मास सुरू असल्याने पंकजा मुंडे बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या त्र्यंबकेश्वराच्या दर्शनाला
- त्र्यंबकेश्वराच्या दर्शनानंतर पंकजा मुंडे कुशावर्ताची देखील करणार पाहणी
- आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर पंकजा मुंडे कुशावरताची करणार पाहणी
आशा सेविकांना आमिष दाखवून शासकीय रुग्णालयातील रुग्ण खासगी रुग्णालयात नेल्याचा गोरखधंदा काही दिवसापूर्वी झाला होता उघड
हा प्रकार उघड झाल्यानंतर महापालिकेने श्रेयस नर्सिंग होम यांना आपला खुलासा सादर करण्यासाठी दिली होती नोटीस
नोटीस मिळाल्यानंतर देखील कोणताही प्रतिसाद दिला जातं नसल्याने आरोग्य विभागाने हॉस्पिटल तात्पुरत्या स्वरूपात केले सील
- बार्शीतील राष्ट्रवादी शरद पवार शांताराम जाधव यांच्या गाडी प्रकरणात विनाकारण रणवीर राऊत यांचे नाव घेतलं जाते.
- रोहित पवार हे त्यांच्या आजोबांच्या पावलावर पाऊल ठेवून राज्यात राजकारण असल्याचे भासवत आहेत
- त्यांच्या आजोबांनी देशाचं राज्याचे राजकारण केलं. ते कशा पद्धतीने माहिती घेत होते त्यांनी घरातून मार्गदर्शन घ्यावं. अर्ध्या हळकुंडातून रोहित पवारांनी शहाण होऊ नये.
- रोहित पवारांनी चुकीच्या माहितीच्या आधारावर कोणावर असे बेचुट आरोप करू नये.
चंद्रकांत भांबाडे यांच्या मालकीची संपूर्ण काजू फॅक्टरी आगीच्या भक्षस्थानी
800 किलो काजू जळून खाक , काजू सोलन्याचे मशीन देखील आगीच्या भक्षस्थानी
शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज
देवरुख नगरपंचायतीचा बंब घटनास्थळी दाखल
ग्रामस्थांच्या मदतीने आग विझवण्याचे काम सुरू
काजू फॅक्टरी ला लागून सहा ते सात दुकाने
आगीवर नियंत्रण मिळवण्याचे काम सुरू
एसबीआयच्या एटीएम वर चोरट्यांचा धाडसी डल्ला . पालघरच्या माहीम येथील एटीएम वर चोरट्यांचा डल्ला . लाखो रुपये घेऊन चोरटे पसार . मध्यरात्री दोन वाजताच्या सुमारास एटीएम तोडून चोरट्यांकडून डल्ला . एटीएम मधील रोकड काढून एटीएमला लावली आग . चोरीचे पुरावे नष्ट करण्यासाठी एटीएमला आग लावल्याची माहिती . पालघरच्या अनेक भागात आजही एटीएम बाहेर सुरक्षा रक्षक नसल्याने एटीएम मधील चोरीचे प्रकार वाढले
श्रीरामपूर शहरात भाजपचे माजी नगरसेवक दिपक चव्हाण यांच्यावर अज्ञात हल्लेखोरांनी हल्ला केल्याची घटना काल रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास घडली आहे.. दुचाकीवरून आलेल्या पाच ते सहा हल्लेखोरांनी चव्हाण यांना शिवीगाळ करत रस्त्यावर पाडून लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली आहे.. पोलिसांनी अज्ञात आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला असून घटनेचा तपास सुरू केला आहे..
सफरचंद, डाळिंब, नासपती दोनशे रुपये किलोवर ,तर केळी चाळीस-पन्नास रुपये डझन वर...
सण उत्सवाच्या काळात ग्राहकांना फटका मागणीनुसार पुरवठा होत नसल्याने किमतीत झाली वाढ....
पुढील काही दिवस अशाच पद्धतीने फळांच्या किमतीत वाढ होण्याची असल्याची शक्यता..
नाशिकच्या मालेगावात गिरणा नदीतून मोठया प्रमाणात पाणी वाहत आहे यातच मालेगाव येथील काही अतिउत्साही तरुण गिरणा नदीच्या केटीवेअर बंधाऱ्याच्या पुलावरून स्टंटबाजी करताना दिसत आहे,वारंवार समज देऊनही उत्साही तरुण मात्र त्याकडे दुर्लक्ष करत नदी पत्रात स्टंटबाजी करत असतात तर स्टंटबाजना प्रोत्साहित करण्यासाठी अन्य तरुण त्यांच्या सोबत पुलावर गर्दी करत असतात.एखादी दुर्घटना घडण्यापूर्वी पोलिसांनी व महानगर पालिकेने गस्त घालून स्टंटबाज करणाऱ्यांनवर कारवाईची मागणी होत आहे.
शेतकरी कामगार पक्षाच्या वर्धापन दिनाला मनसे अध्यक्ष राज ठाकरे खासदार संजय राऊत शशिकांत शिंदे विजय वड्डेटीवार असे दिगज नेते उपस्थित राहणारे शेतकरी कामगार पक्षाच्या वर्धापन दिनाला दिग्गज नेते उपस्थित राहत असल्यामुळे कार्यकर्त्या नेत्यांमध्ये चैतन्याचा वातावरण निर्माण झालंय
रोहिणी खडसे यांच्या पति वर पुणे पोलिसांनी रेव पार्टी प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे
त्यानंतर रोहिणी खडसे पुण्यात शरद पवार यांची भेट घेण्यासाठी मोदी बागेत दाखल
काळेपडळ हद्दीत २७ वर्षीय तरुणाचा खून..
उत्तमनगर हद्दीत ६ जणांच्या टोळक्याचा एकावर प्राणघातक हल्ला; कोयत्याने वार..
नांदेड सिटी हद्दीत चौघांचा एकावर कोयत्याने हल्ला..
कोथरूडमध्ये वाहनांची तोडफोड..
पुणे मुंबई महामार्गावर गुन्हे शाखेच्या पोलिसांवर चौघांचा हल्ला..
पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांना गुंडांना आवरण्यात अपयश
छत्रपती संभाजीनगरमध्ये लिफ्टचे महागडे पार्ट्स चोरणारी टोळी अखेर पोलिसांच्या जाळ्यात अडकली आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये गुन्हे करून हे आरोपी पुणे परिसरात लपून बसले होते. पोलिसांनी केलेल्या कारवाईत तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे. मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. तब्बल ३ लाख ६० हजार किंमतीचे लिफ्ट EMERGENCY RESCUE DEVICE चोरी करून राज्यभरात फेरी मारणारी टोळी अखेर अडकली आहे.पुणे सारख्या ठिकाणी लिफ्ट कंपन्यांचे उपकरणे चोरी करणाऱ्या टोळीचा जवाहर नगर पोलिसांनी पर्दाफाश केला आहे.तर हे उपक्रम जेव्हा लिफ्टचा विद्युत पुरवठा खंडित होतो तेव्हा लिफ्ट ला कुठल्याही पावर शिवया तळ मजल्यावर घेऊन जाण्यासाठी केला जातो.
विदर्भाच नंदनवन असलेल्या जाणाऱ्या चिखलदऱ्यामध्ये सध्या पर्यटकांची चांगलीच रेलचेल सुरू आहे, पंच बोल पॉईंटवर पर्यटकांमध्ये गाणे गाण्यावरून बाचाबाची झाली,
या वादात जिप्सी चालक ही पडले व त्यांनी पर्यटकांना चांगलीच मारहाण केली, मारहाण करतानाचा व्हिडिओ सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे
त्यानंतर हे जिप्सी चालक एकत्र येऊन या पर्यटकांना मारहाण करण्यासाठी वाट पाहत होते, पर्यटक कसेबसे लपून बसले होते,
मात्र ही बाब चिखलदरा पोलिसांना माहिती मिळताच समक सुचकता दाखवत चिखलदरा पोलीस ठाण्याचे एपीआय प्रवीण पाटील आपल्या ताफ्यासह पंचबोल पॉईंट वर पोहोचले व त्यांनी या पर्यटकांची सुटका केली,
बीडच्या परळीतील व्यापारी महादेव मुंडे यांच्या हत्या प्रकरणातील संशयित आरोपींना बीडच्या स्थानिक गुन्हे शाखेतील विशेष पथकाने चौकशीसाठी ताब्यात घेतले होते
स्थानिक गुन्हे शाखेने पाच लोकांना गुरुवारी रात्री सात वाजता परळीतील चौघांना ताब्यात घेऊन पोलीस अधीक्षक कार्यालयात आणली पहाटे दोन वाजेपर्यंत त्यांची चौकशी केली
त्यानंतर नोटीस देऊन त्यांना नातेवाईकांच्या स्वाधीन केले शुक्रवारी दुपारी चार वाजेपर्यंत या प्रकरणात कोणालाही अटक झाली नव्हती
कुख्यात गुंड आणि गुन्हेगार गोट्या गीते याला आजपर्यंत अटक झाली नाही त्याच्या शोधासाठी दोन पदक वेगवेगळ्या भागात रवाना करण्यात आले आहेत.
शांतताप्रिय म्हणून ओळख असलेल्या बुलढाणा शहर आता गुन्हेगारी प्रवृत्तीकडे वळत चालले आहे,
काल दोन युवक हातात कोयते घेऊन मोटारसायकल वर शहरात फिरवून दहशत माजवीत असल्याचा व्हिडीओ सोशल माध्यमावर वायरल करण्यात आला..
त्या व्हिडीओची पडताळणी करण्यात आली व पोलीस पथकाने त्या दोघांना अटक केली आहे.. अमित बेंडवाल व आदित्य देशमुख असे आरोपींची नावे असून त्यांच्याकडील धारदार कोयता जप्त करण्यात आला व विविध कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले...
सकाळी 9 पासून ते मोदीबागेत असतील
त्यानंतर बालगंधर्वला स्वर्गीय अरूण सरनाईक यांच्या जिवनावरील माहितीपट प्रीमियम ला ही हजेरी लावतील
तर दुपारी साखर संकुलला आढावा बैठक घेतील
राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अजित पवार आज रायगडच्या दौऱ्यावर आहेत.
शिवसेनेचे मंत्री भरत गोगावले यांच्या मतदार संघात माणगाव येथे सकाळी अजितदादांची सभा होणार आहे.
यावेळी मंत्री गोगावले यांचे कट्टर समर्थक आणि शिवसेनेचे प्रवक्ते राजीव साबळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत
तर दुपारी अलिबाग येथे होणाऱ्या सभेत काँग्रेसचे प्रदेश सचिव प्रवीण ठाकूर हे देखील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत.
खा. सुनिल तटकरे हे एकाच दिवशी शिवसेना आणि काँग्रेसला मोठा धक्का देत आहेत.
यामुळे अजितदादांच्या या दौऱ्याचे राजकिय महत्व अधिक आहे.
मंदिर संस्थांच्या खजाना खोलीतील तलवार गायब झाली असून ती तलवार मंदिराच्या बाहेर असल्याचा पुजाऱ्यांचा दावा
तुळजाभवानीच्या आठ आयुधातील शास्त्राची तत्व आणि शक्ती तलवारीमध्ये काढून तलवार गायब केल्याचा पुजारांचा आरोप
पद्मश्री गणेश द्रविड शास्त्री यांच्यामार्फत पूजा करून शस्त्रातील तत्त्व आणि शक्ती तलवारीमध्ये टाकल्यांचा पुजाऱ्यांचा दावा
संघर्ष योद्धा म्हणून जरांगे यांच्या कालवाढदिवस होता आणि याच वाढदिवसाच्या निमित्त परभणीतील लिमला ग्रामस्थांनी मनोज जारंगे यांना दीर्घायुष्य लागावे त्यांची तब्यत व्यवस्थित राहावी यासाठी परभणीतील देवस्थान असलेले श्री नर्सिंह पोखर्णी येते लिमला ते नर्सिंह पोखर्णी अशी पदयात्रा काढण्यात आली या पदयात्रेत गावातील महिला व पुरुष यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला होता.
पुण्याला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला धरणक्षेत्रात २५.६४ टीएमसी पाणीसाठा म्हणजे ८७.९७ टक्के पाणीसाठा उपलब्ध
गेल्या यावर्षी याचवेळी धरणात २६.४६ टीएमसी पाणीसाठा म्हणजे ९०.७६ टक्के पाणीसाठा उपलब्ध होता
गेल्यावर्षी याचवेळी पेक्षा १ टीएमसी पाणीसाठा कमी आहे.
खडकवासला धरणक्षेत्रात खडकवासला, पानशेत,वरसगाव,टेमघर हे धरण येतात.
पुणे महापालिकेच्या प्रारूप प्रभाग रचनेचे काम अंतिम टप्प्यात आले असून, सोमवारी प्रशासनाकडून ही प्रभाग रचना राज्य सरकारकडे सादर केली जाणार आहे.
महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी सावरकर भवन येथील निवडणूक शाखेच्या कार्यालयाला भेट देऊन आढावा घेतला.
पुणे महापालिकेच्या निवडणुकीसाठी २०१७ प्रमाणे २०२५ मध्येही चार सदस्यांचा प्रभाग असणार आहे.
पण महापालिकेत ३२ गावे समाविष्ट झाल्याने या गावांचाही प्रभाग रचनेत अंतर्भाव करावा लागणार आहे.त्यामुळे उपनगरांमधील प्रभाग रचनेत मोठे फेरबदल होणार आहेत.
शहरात दररोज सरासरी तीन ते चार सायबर फसवणुकीचे गुन्हे नोंदवले जात आहेत.
सायबर चोरट्यांनी दोन घटनांमध्ये नागरिकांची ४५ लाख रुपयांची फसवणूक केल्याचे उघड झाले आहे.
या प्रकरणी शहरातील खडक आणि आंबेगाव पोलिस ठाण्यांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शेअर बाजारात गुंतवणूक केल्यास मोठा परतावा मिळेल,अशा आमिषाने शुक्रवार पेठेतील एका ६९ वर्षीय व्यापाऱ्याची २३ लाख ४३ हजार रुपयांची फसवणूक करण्यात आली.
चोरट्यांनी त्यांच्या मोबाईलवर फसवणूक करणारे गुंतवणुकीचे संदेश पाठवून त्यांच्याकडून हप्त्यांमध्ये रक्कम उकळली. याबाबत खडक पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
लातूरच्या उदगीर मध्ये अवैध धंद्यांना ऊत आलाय, शहरातील देगलूर चांदगाव रोड परिसरात मैत्री कार्ड रूमच्या नावाखाली तिरट जुगार, असे अवैध धंदे चालू झाले आहेत.
विशेष म्हणजे परराज्यातील महिला आणि पुरुषांकडून हा जुगाराचा व्यवसाय खेळवला जात आहे, दरम्यान अवैध धंद्यामुळे परिसरात रहिवासी नागरिकांना प्रचंड मोठा मनस्ताप सहन करावा लागतो आहे .
तक्रार करूनही पोलीस कारवाई , होत नसल्याचं इथले नागरिक सांगत आहेत.
जिल्ह्यात सिंदखेडराजा व लोणार परिसरात होत असलेल्या पावसाचे पाणी समृद्धी महामार्गांवर साचत आहे त्या पाण्याला जाण्यासाठी कुठल्याही नाल्या बांधल्या गेल्या नाहीत..
ते पाणी सरळ आजूबाजूच्या शेतात जाऊन साचले आहे त्यामुळे समृद्धी महामार्गाला लागून असलेल्या सर्व शेतामध्ये पाणी साचून तलावाचे स्वरून आले आहे
या पाण्यामुळे शेतातील उभे सोयाबीन पिक पाण्याखाली गेल्याने पिके सडायला लागले आहेत, यामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे,
तातडीने पंचनामे करून आर्थिक मदत करावी तसेच समृद्धी महामार्गवील पाण्याचा निचरा योग्य पद्धतीने करावा जेणे करून शेतात पाणी येणार नाही... अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे
जनावरांची वाहतूक करत असताना हिंदुत्ववादी संघटनेकडून गोवंश हत्याबंदी कायद्याच्या नावाखाली मारहाण केली जात आहे,
या घटनेचा निषेध करत अशा समाजकंटकावर बंदी घालण्यात यावी, कठोर कारवाई करण्यात यावी,
यासाठी गेल्या काही दिवसांपासून कुरेशी समाजाने जनावरांच्या खरेदी विक्रीवर बहिष्कार टाकला आहे,
यामुळे कोट्यवधी रुपयांची उलाढाल थांबली असून, पशुपालक शेतकरी देखील अडचणीत आले आहेत,
लातूरच्या उदगीर शहरात दिवसेंदिवस गुन्हेगारी प्रवृत्तींना बळ मिळत आहे, सात ते आठ जणांच्या टोळक्याकडून दोन तरुणांना बेदम मारहाण करण्यात आली आहे.
उदगीर शहरातल्या युनियन बँकेच्या परिसरात ही घटना घडली आहे, दरम्यान या मारहाणीत एका तरुणांच्या अंगावरील सोन्याचे दागिने काढून घेण्यात आले आहेत,
याप्रकरणी उदगीर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे, पोलिसांकडून दखल घेतली जात नसल्याचा आरोप देखील तरुणांनी केला आहे
तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीतून चोरीस गेलेल्या मोटरसायकलींच्या प्रकरणात पोलिसांनी तिघांना अटक करून त्यांच्याकडून सव्वा लाखाचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.
कोणताही पुरावा नसताना मोठ्या शिताफीने तळेगाव एमआयडीसी पोलिसांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक रणजीत जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली चाकणच्या म्हाळुंगे येथून या तिघांना ताब्यात घेतले आहे.
सोहेल नवाज खान वय 20, संतोष अशोक अहिरवळे वय 19, आणि सुमित संतोष शिंगारे वय 19 अशी अल्पवयीन आरोपींची नावे आहे...
आरोपींना पॉलिसी खाक्या दाखवताच तीन मोटरसायकली चोरी केल्याची कबरी दिली आहे.
एकूण एक लाख पंधरा हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. मानसिक तपास तळेगाव एमआयडीसी पोलीस करीत आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.