गुहागरमधील जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या, आणि शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या नेत्रा ठाकूर शिवसेना शिंदे गटात प्रवेश करणार आहेत.
यवतमाळच्या गोधणी मार्गावरील स्वास्तिक प्लाझा या इमारतीतील तिसऱ्या मळ्यावर आग लागली. ए प्लस फिजिक्स ट्यूटोरियल मध्ये लागलेल्या या आगी नंतर एकच धावपळ उडाली.शॉर्टसर्किटमुळे ही आग लागली होती. आगीत क्लासेस मधील साहित्य जळून खाक झाले.आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाने प्रयत्न करून ही आग आटोक्यात आणली.
माढा तालुक्यातील वाकाव परिसरात घटना घडली.
रेल्वे रुळावरून चालत जाणाऱ्या दोघांना रेल्वेने धडक दिली.
पंढरपूर म्हैसूर या गोलगुंबाझ एक्सप्रेसची धडक बसल्याची प्राथमिक माहिती आहे.
सोलापूर येथील विजय कैय्यावाले व राहुल अशोक बेंजरपे अशी मृतांची नावे आहेत.
महाराष्ट्र राज्य कुस्तीगिर परिषदेच्या अध्यक्षपदी कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार यांची बिनविरोध निवड झाली आहे. विधानसभेचे सलग दुसऱ्यांदा राजकीय मैदान मारल्यानंतर कुस्तीच्या मैदानातही त्यांनी विजयश्री मिळवली आहे.
पुणे भिडे पुल पाण्याखाली
नदीपात्रातले रस्ते वाहतूकीसाठी बंद
काही गाड्या पाण्यात अडकल्या
पुणे जिल्ह्यात घाटमाथ्यावर जोरदार पाऊस
खडकवासला धरणातून विसर्ग वाढवला
नदिकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
6 वाजल्यापासून 18 हजार क्युसेक ने खडकवासला धरणातून विसर्ग सुरू आहे
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पूर्णकृती पुतळा सोहळ्याच अजित पवारांच्या हस्ते उदघाट्न होणार.
पुण्यातील रेव्ह पार्टी प्रकरणात सर्व आरोपींना पुणे सत्र न्यायालयाने २९ जुलै पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
१) प्रांजल खेवलकर
२) निखिल पोपटाणी
३) समीर सय्यद
४) सचिन भोंबे
५) श्रीपाद यादव
६) ईशा सिंग
७) प्राची शर्मा
खराडी येथील पार्टी वर केलेली कारवाई ही राजकीय दृष्टिकोनातून तर करण्यात आली नाही ना असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे युवा नेते आमदार रोहित पवार यांनी उपस्थित केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे हे मागील काही दिवसापासून हनी ट्रॅप प्रकरणावरून भाजप नते गिरीश महाजन वर टीका करत असताना अचानक एकनाथ खडसे यांचे जावई डॉक्टर प्राजल खेवडकर यांच्या प्रायव्हेट पार्टी पोलिसांनी रेव पार्टी म्हणून कारवाई केली आहे. या प्रकरणाचा निपक्षपातीपणे तपास व्हायला हवं. पोलिसांनी आरोपीं आणि पंचनामाचे व्हिडिओ पुरावे न्यायालयासमोर सादर करण्यात अगोदरच. पोलिसांनी ते व्हिडिओ मीडियाला कसे दिले . या प्रकरणाचा मीडिया ट्रायल चालवण्यासाठी पोलिसांनी हे व्हिडिओ मीडियाला दिले का असा सवाल देखील रोहित पवार यांनी उपस्थित केला आहे.
लातूरच्या निलंगा येथे आदिवासी महादेव कोळी आणि मल्हार होळी समाज संघटनेच्या वतीने उपजिल्हाधिकारी कार्यालयासमोर गेल्या 7 दिवसांपासून 4 उपोषण करते अन्नत्याग उपोषण करत आहेत, दरम्यान त्यातील दोघांची प्रकृती चिंताजनक आहे. त्यांच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरु आहे. तर महादेव कोळी समाजाच्या जात वैधता प्रमाणपत्र तसेच इतर मागण्यांसाठी समाजातील नागरिक उपजिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठेवून बसले आहेत.जातीचे प्रमाणपत्र दिल्याशिवाय उठणार नाही असा पवित्रा घेण्यात आला आहे.
नाशिक जिल्ह्यातील पश्चिम भागातील धरणातून पाणी विसर्ग सुरू असल्याने निफाडच्या नांदूर-मध्यमेश्वर धरणातून काल संध्याकाळ पासून 1775 क्यूसेस पाणी गोदारवरी नदी पत्रात सोडण्यात आले होते आज दुपारी 3 वाजता धरणातून पाण्याचा विसर्ग पुन्हा वाढवण्यात आला असून धरणातून 19717 इतका विसर्ग सुरू करण्यात आला आहे.त्यामुळे प्रशासनाने नदीकाठ च्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.
नाशिक जिल्ह्यातील पश्चिम भागातील धरणातून पाणी विसर्ग सुरू असल्याने निफाडच्या नांदूर-मध्यमेश्वर धरणातून काल संध्याकाळ पासून 1775 क्यूसेस पाणी गोदारवरी नदी पत्रात सोडण्यात आले होते आज दुपारी 3 वाजता धरणातून पाण्याचा विसर्ग पुन्हा वाढवण्यात आला असून धरणातून 19717 इतका विसर्ग सुरू करण्यात आला आहे.त्यामुळे प्रशासनाने नदीकाठ च्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.
महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेच्या अध्यक्षपदी रोहित पवार यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. पुणे शहरातील वारजे येथे झालेल्या सह्याद्री नॅशनल स्कूल या ठिकाणी आज महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेची निवडणूक पार पडली या निवडणुकीत रोहित पवार यांची महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेच्या अध्यक्षपदी बिन विरोध निवड करण्यात आली आहे. देशाचे कृषिमंत्री तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार हे यापूर्वी महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेचे अध्यक्ष होते. मात्र आता त्यांच्या जागी रोहित पवार यांची झालेल्या निवडणुकीत बिनविरोध निवड करण्यात आली आहे.
नवी मुंबईतील कोपरखैरणे येथे सेक्टर ०८ सीव्हरेज लाईन काम नवी मुंबई महानगरपालिकेच्या ठेकेदारांकडून घेण्यात आलं होतं मात्र साईबाबा कंट्रक्शन कंपनीला देण्यात आले होते मात्र सीव्हरेज लाईन काम अर्धवट काम असून सुद्धा नवी मुंबई महानगरपालिकेच्या ठेकेदारांनी पूर्ण काम झालं असं दाखवून महापालिकेला दाखवून 23 लाख रुपये बिल अदा करण्यात आला आहे त्यामुळे सीव्हरेज लाईन काम केवळ 30 तेच 40% काम झालेला आहे त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करावी ठाकरे गटाचे माजी नगरसेवक रवींद्र म्हात्रे यांनी मागणी आयुक्तांकडे केली आहे
भारतातील पारंपरिक हँडमेड सोनं घडवणाऱ्या सुवर्णकारांच्या न्यायहक्कांसाठी राज्य सरकार आणि केंद्र सरकार सकारात्मक आहेत, अशी ग्वाही विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांनी दिली आहे. ते अखिल भारतीय जेम्स अँड ज्वेलरी असोसिएशनच्या 20 व्या प्रदर्शनाच्या उद्घाटनप्रसंगी बोलत होते.
डोंगरकड्यांवरून खळखळ वाहणारे धबधबे, हिरव्यागार सृष्टीत पसरलेली धुक्याची चादर, आणि मनाला प्रसन्न करणाऱ्या वातावरणात भिमा नदीचं उगमस्थान अगदी मंत्रमुग्ध करणारं दृश्य साकारतंय. भोरगिरीच्या डोंगररांगेत असलेल्या भिमानदीच्या उगमस्थानी सध्या निसर्गाचं वैभव डोळ्याचं पारणं फेडणारं ठरतंय.
"भ्रष्टाचाऱ्यांसाठी जेल म्हणजे भाजप कार्यालय," माजी आमदार अनिल गोटेंचा सरकारवर घणाघात तर स्वपक्षातील आमदारांना देखील दिला घरचा आहेर.
माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्या मंत्रिमंडळात पुनर्वापसीची चर्चा सुरू झाल्यानंतर राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार प्रकाश सोळंके
यांनी पक्षश्रेष्ठीवर उघड नाराजी व्यक्त करत खदखद व्यक्त केला.. मंत्री पदासाठी माझी जात आडवी येते मी ओबीसी मध्ये जन्माला आलो असतो तर संधी मिळाली असती. अस मत सोळंके यांनी व्यक्त केल..धनंजय मुंडेंना संधी मिळत असेल तर माझ्या शुभेच्छा.. त्यांना बीडच पालकमंत्री करावा किंवा राज्य पातळीवरील मोठ पद द्याव त्यांना शुभेच्छाच आहेत..
मिरकरवाडा बंदरातील अतिक्रमण हटवताना मत्स्य विभाग आला होता चर्चेत
अतिक्रमण हटवलेल्या मिरकरवाडा बंदराची मंत्री नितेश राणे यांच्याकडून पाहणी
ज्या ठिकाणी विकासकामे होणार त्या ठिकाणची नितेश राणे यांच्याकडून पाहणी
मिरकरवाडा बंदरासाठी ११३ कोटी रुपयांची सरकारकडून तरतुद
दुसऱ्या टप्यातील कामांसाठी २२ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध
लाट विरोधत संरक्षक भिंत बांधणे, गाळ काढणे, लिलाव गृह, अंतर्गत रस्ते अशा विविध कामांचा समावेश
मंत्री नितेश राणे आणि मंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत झालं भूमिपूजन
सोलापुरातील रुग्ण मोठ्या संख्येने घेतायत या महाआरोग्य शिबिराचा लाभ
या महाआरोग्य शिबिरात एक्स रे,रक्त - लघवी तपासणी,क्षय रोग तपासणी,महिलांसाठी गर्भाशायाच्या कर्करोगाची तपासणी करण्यात येत आहे.
दरम्यान,या महाआरोग्य शिबिराचा लाभ साधारण एक ते दोन हजार जणांनी घेतलाय.
हे शिबीर यशस्वी करण्यासाठी सोलापूर महापालिका आरोग्य विभाग,सोलापूर जिल्हा शासकीय रुग्णालय आणि डॉ.वैषपायन मेडिकल कॉलेजच्या कर्मचाऱ्यांनी मेहनत घेतली.
खेड येथे कार्यक्रमा निमित्ताने जाणाऱ्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच रायगडच्या माणगावमध्ये जंगी स्वागत करण्यात आल. माणगाव ST स्टँड बाहेर यावेळी मोठ्या संख्येत शिवसैनिक जमा झाले होते. शिवसेना जिल्हा प्रमुख प्रमोद घोसाळकर यांनी पुष्पगुच्छ दिल तर शिवसैनिकांनी जोरदार घोषणाबाजी करीत शिंदे यांच स्वागत केल.
नागपूर -संभाजीनगर राष्ट्रीय महामार्गांवर रास्तारोको आंदोलन
फासेपारधी समाजाचे नेते मतीन भोसले यांच्या नेतृत्वात फासेपारधी समाज रस्त्यावर येत आक्रमक...
आमदार शरद सोनवणे यांना अटक करण्याची मागणी....
आमदार शरद सोनवणे यांनी आदिवासी मंत्री अशोक उईके यांच्या बद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्याचा आरोप
आमदार शरद सोनवणे यांनी आदिवासी समाजाचा अवमान केल्याने त्यांच्यावर अनुसूचित जमाती कायद्या अंतर्गत गुन्हे दाखल करून त्यांना अटक करण्याची मागणी
- नाशिकमध्ये आज भाजपकडून जम्बो प्रवेश सोहळ्याचे आयोजन...
- विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी कार्यकर्ते करणार भाजपात प्रवेश...
- मंत्री गिरीश महाजनांच्या उपस्थितीत पार पडणार पक्षप्रवेश सोहळा...
- स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपमध्ये जोरदार इन्कमिंग...
- नाशिकच्या रावसाहेब थोरात सभागृहात होणार पक्षप्रवेश सोहळा
पुण्यातील रेव्ह पार्टी ची टाईमलाईन "साम" च्या हाती
पुण्यातील खराडी परिसरातील रेव्ह पार्टीपूर्वी २ ठिकाणी झाली होती पार्टी
काय आहे ही टाईम लाईन जाणून घ्या
खराडी येथे जाण्यापूर्वी काही जणांनी केली होती कल्याणीनगर मधील पब मध्ये पार्टी
कल्याणी नगर मधील पब १.३० वाजता झाला बंद
दुसरी पार्टी मुंढवा भागात असलेल्या पंचतारांकित हॉटेल मध्ये झाली
शरद पवार गटाचे माजी आमदार प्राजक्त तनपूरे आणि माजी खासदार प्रसाद तनपूरे यांच्या भेटीला...
राहुरी येथे तनपूरे वाड्यावर प्राजक्त तनपूरे यांनी केले स्वागत...
प्राजक्त तनपूरे जयंत पाटलांचे भाचे...
शेतकरी मेळाव्यानंतर तनपूरेंच्या घरी अजित दादांचे स्नेहभोजन...
अजित पवार तनपूरेंच्या घरी पोहचल्याने चर्चेला उधाण...
चुलते अरूण तनपूरे यांच्या पाठोपाठ प्राजक्त तनपूरेही अजित पवारांसोबत जाणार असल्याची चर्चा...
मागील चार दिवसांपासून परभणी जिल्ह्यात पडत असलेल्या पावसामुळे मराठवाडीची जीवन वहिनी असलेल्या गोदावरी नदीला पूर आला आहे.
त्यामुळे गोदावरी दुथडी भरून वाहत आहेत. गंगाखेड येथील अनेक पुरातन मंदिर पाण्याखाली गेली आहेत.
तर पाणी पातळीत वाढत असल्याने प्रशासन सतर्क झाले आहे.
वाढत्या पाणी पातळीवर नजर ठेवली जात आहे अशी माहिती गंगाखेडचे उपविभागीय अधिकारी जीवराज डापकर यांनी दिली आहे
तर कोणीही नदी पात्रामध्ये उतरूनये असे आवाहन करण्यात आले आहे.
नीरा खोऱ्यातील प्रमुख धरणांमध्ये पाणीसाठ्यात मोठ्या प्रमाणात वाढ होत असून भाटघर, निरा देवघर, गुंजवणी पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे
त्यामुळे वीर धरणाच्या पाणीसाठ्यात मोठी वाढ होत आहे.
पूर परिस्थिती नियंत्रण ठेवण्यासाठी वीर धरणा मधून नीरा नदीच्या पात्रात 14,577 क्युसेकने विसर्ग सुरू करण्यात वाल्यांना प्रशासनांना नीरा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिलाय.
निरा खोऱ्यातील धरण साखळीतील भाटघर धरणमधुन 3461 क्युसेक, निरा देवघर धरणामधून 3484 क्युसेक तर गुंजवणी धरणा मधून 250 क्युसेकने वीर धरणात पाणी येत आहे
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये कार्यकर्त्यांची इच्छा स्वबळावर लढण्याची आहे. आम्ही त्यांना पक्ष बांधणीसाठी काम सांगतो. मजबूत करण्यासाठी सांगतो.
मग पक्षाची हिच ताकद निवडणुकीमध्ये देखील दिसली पाहिजे. अशी कार्यकर्त्यांची भावना असल्याचे नितेश राणे यांनी म्हटलं.
शिवाय आमच्या या भावना वरिष्ठ नेत्यांपर्यंत पोहोचवा असे देखील कार्यकर्त्यांचा म्हणणं आहे असं देखील राणे म्हणाले.
त्यामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका युती म्हणून लढणार असल्याचे शिवसेनेने जाहीर केला असला तरी भाजपमध्ये मात्र वेगळा सूर आहे.
त्यामुळे आगामी काळात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका भाजप स्वबळावर लढणार असल्याचे सुतोवाच नितेश राणे यांनी केले आहे.
जालना जिल्ह्यामध्ये मागील चार दिवसांपासून मुसळधार पाऊस पडतोय.
या पावसामुळे एकीकडे बळीराजा सुखावला असला तरी शेतात पाणी साचल्याने अनेक शेतकरी संकटात सापडले आहे.
जालन्यातील बदनापूर तालुक्यातील मात्रेवाडी शिवारात काल मुसळधार पाऊस झाला. या पावसामुळे शेताला अक्षरशः तलावाचं स्वरूप आलय.
खरिपातील पिके पावसामुळे पाण्याखाली गेल्याने शेतकरी संकटात सापडला आहे.
मात्रेवाडी शिवारातील शेतात गुडघ्याइतकं पाणी साचल असून यामुळे कपाशीसह सोयाबीनचे पीक देखील धोक्यात आले आहे
भिमाशंकर-आहुपे खोऱ्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे धरणात तब्बल 95 टक्क्यांहून अधिक पाणीसाठा झाला आहे. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून डिंभे धरणाचे दोन दरवाजे उघडून 5 हजार क्यूसेक्स वेगाने पाणी घोड नदी पात्रात सोडण्यात येत आहे. पावसाचा जोर कायम राहिल्यास विसर्ग वाढविण्यात येणार असल्याने नदीकाठच्या गावांतील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय.
- काल नाशिक रोड भागात राहणाऱ्या एका सॉफ्टवेअर अभियंता च्या घरी gst विभागाच्या गुप्तचर खात्याकडून झाली होती छापेमारी
- याच छापेमारीत या तरुणांकडून मोठ्या प्रमाणात रोकड अधिकाऱ्यांनी केले जप्त
- श्रीकांत परे या संशयित युवकाच्या घरी झाली होती छापेमारी
- जीएसटी विभागाचा कर चुकवल्याचा अधिकाऱ्यांना होतात संशय
- याच संशय प्रकरणी छापेमारी केला असता करोडो रुपयांचे रोकड या संशयीताकडे सापडल्याची माहिती
- 2 पेट्या भरून रोकड या युवकाकडे सापडल्याची माहिती
मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरून गुजरात हुन मुंबईकडे वाहतूक केला जाणारा कोट्यावधी रुपयांचा गुटखा तलासरी पोलिसांकडून जप्त.
तब्बल एक कोटी 78 लाख 65 हजार 248 रुपयांचा मुद्देमाल तलासरी पोलिसांकडून जप्त.
कारवाईत दोन आरोपी पोलिसांच्या ताब्यात .
गुजरातहून दोन ट्रक मधून महाराष्ट्रात अवैधरीत्या विक्रीसाठी आणला जात होता गुटखा .
शहापूर तालुक्यातील अल्याणी येथील शेतकरी पांडुरंग दुंदा निमसे यांचे बेडेघर अतिवृष्टीमुळे कोसळून घरामध्ये झोपलेले त्यांचे वडील दुंदा मल्हारी निमसे (वय 70) यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.
27 जुलै रोजी पहाटे मुसळधार पाऊस व सोसाट्याचा वारा सुरू असल्याने आपल्या बेडेघरात गाढ झोपी गेलेले आल्याणी येथील शेतकरी दुंदा निमसे वय 70 यांच्या अंगावर बेडेघर कोसळुन त्यांच जागीच मृत्यू झाला असुन सदर आपत्कालीन घटनेची दखल शहापूरचे तहसीलदार परमेश्वर कासुळे यांनी घेतली असून घटनास्थळाचे तात्काळ पंचनामा करण्याचे आदेश महसूल विभाग आणि पोलीस प्रशासनाला दिले आहेत.
पंढरपूर शहरातील मनिषा नगर चौकात भीषण अपघात झाला.
यामध्ये बोलेरो जीपने दुचाकीस्वाराला उडवले.
हा अपघात इतका भीषण होता की दुचाकीस्वार हवेत उडून खाली पडला.
यामध्ये श्रीकांत शिंदे हा तरूण गंभीर जखमी झाला असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या अपघाताचा थरार सीसीटीव्ही कॅमेरे कैद झाला आहे.
या चौकात गतीरोधक बसविण्याची मागणी स्थानिकांनी केली आहे.
अजित पवारांचे राहुरी शहरात आगमन...
स्वर्गीय बापुजी तनपुरे यांच्या पुतळ्याला केले अजितदादांनी अभिवादन...
राहुरी शहरातील बाजार समिती आवारात कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन...
माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांचे काका अरुण तनपुरे यांनी अजित पवार गटात प्रवेश केल्यानंतर मेळाव्याचे आयोजन...
काही दिवसापूर्वी राहुरी साखर कारखाना निवडणूक जिंकल्यानंतर अरुण तनपुरे यांनी राष्ट्रवादी अजित पवार गटात केलाय प्रवेश...
सोलापूरच्या काँग्रेस खासदार प्रणिती शिंदे यांच्यावर बिहार निवडणुकीची काँग्रेस पक्षाकडून मोठी जबाबदारी देण्यात आली आहे.
काँग्रेस खासदार प्रणिती शिंदे यांची आता बिहार विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवार छाननी समितीमध्ये नियुक्ती करत पक्षाने एक महत्त्वाची जबाबदारी दिली आहे.
बिहार निवडणुकीत उमेदवार छाननी समितीत सदस्य म्हणून खासदार प्रणिती शिंदे या काम करणार आहेत.
अकोला जिल्ह्यातील बाळापूर तालुक्यातील पारस परिसरात नुकत्याच झालेल्या ढगफुटीसदृश पावसामुळ खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
अनेक शेतकऱ्यांचे पेरणी केलेले पीक वाहून गेले असून, काही घरांमध्ये पावसाचे पाणी शिरले, घरगुती साहित्यांचेही मोठे नुकसान झाले.
या नुकसानाची भाजप खासदार अनुप धोत्रे यांनी नुकतीच पाहणी केली.
यावेळी त्यांनी महसूल प्रशासनाला तातडीने सर्वेक्षण करून एकाही पात्र शेतकऱ्याला मदतीपासून वंचित ठेवू नये, अशा स्पष्ट सूचना दिल्या.
शेतीबरोबरच घरांचेही पंचनामे करण्यात यावे, असे त्यांनी सूचना बजावल्या.
वाशिम जिल्ह्यात गेल्या तीन दिवसापासून सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे वाशिमच्या मालेगाव तालुक्यातील खंडाळा येथील आडोळ मध्यम सिंचन प्रकल्प तुडुंब भरल्याने प्रकल्प ओव्हरफ्लो झालाय,त्यामुळे रिसोड शहरासह शिरपूर, आणि रिठद सह परिसरातील अनेक गावांच्या पिण्याच्या पाण्यासह शेतीसाठी सिंचनाच्या पाण्याची सोय झाल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधान व्यक्त होतयं.
रासबिहारी रस्त्यावर गुटखा वाहतूक करणारा ट्रक पलटी झाल्याने वाहतूक कोंडी झाली. कंटेनरमध्ये गुटखा असल्याच्या संशयातून शिवसैनिकांनी वाहनातील पोते फाडून पाहणी केली असता त्यात सुगंधी पान मसाला गुटखा मिळून अाला. गुटख्याची अवैध वाहतूक होत असल्याने जागेवर गुटखा जाळून टाकण्याची मागणी केल्याने तणाव निर्माण झाला. अाडगाव पोलिसांनी सौम्य लाठीमार करत जमावाला पांगवले.कल रात्री अाडगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलं
अमरावती जिल्ह्यात 10 ते 12 दिवस विश्रांती घेतलेल्या पावसाने पुन्हा जोरदार बॅटींग सुरु केली आहे.
अमरावती शहरात दिवसभर रिमझीम तर जिल्ह्यातील विविध भागात शुक्रवार आणि शनिवारला जिल्ह्यात संततधार पाऊस सुरू आहे.
त्यामुळे मेळघाट मधील सिपना,गडगा,तापी नदीला पूर आला असून नाले ओसंडून वाहत आहे.
जिल्ह्यात २४ तासांत चिखलदरा, सेमाडोह, हरीसाल या महसूल मंडळांत अतिवृष्टी झाली.
दोन तालुक्यांना पावसाने चांगलेच झोडपले. वरुडतालुक्यात मात्र सर्वात कमी पावसाची नोंद झाली आहे.
पावसाच्या पुर्नरागमनामुळे पिकांना संजीवनी मिळाली आहे.
शुक्रवारपासून जिल्ह्यात पावसाचा जोर वाढला असून जिल्ह्यात सर्वत्र संततधार पाऊस सुरू आहे.२४ तासांत ३२ मिमी पावसाची नोंद घेण्यात आली.
पुण्यातील उच्चभ्रू खराडी भागात सुरू होती रेव्ह पार्टी
पार्टी मध्ये मोठ्या प्रमाणावर अमली पदार्थ, दारू, हुक्का चे सेवन
खराडी भागातील एका फ्लॅट मध्ये हाउस पार्टीच्या नावाखाली सुरू होती रेव्ह पार्टी
रेव्ह पार्टी करणाऱ्यांमध्ये ३ महिला आणि २ पुरुषांचा समावेश
पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेची छापेमारी मध्ये अमली पदार्थ, हुक्का, दारू जप्त
अजित पवारांच्या उपस्थितीत माजी आमदार रमेश थोरात करणार अजित पवार राष्ट्रवादी मध्ये प्रवेश
एक ऑगस्ट रोजी वरवंड या ठिकाणी कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत प्रवेश सोहळा
त्याचबरोबर अनेक पदाधिकारी ही रमेश थोरातंबरोबर करणार राष्ट्रवादीत प्रवेश..
दौंडचे माजी आमदार तथा पुणे जिल्हा बँकेचे ज्येष्ठ संचालक रमेश थोरात अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये करणार प्रवेश
अजित पवारांच्या उपस्थितीत एक ऑगस्ट रोजी वरवंड या ठिकाणी प्रवेश
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडून लोकनेते शरद पवार यांचा गट, तर दुसरा उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा गट असे दोन गट पडले होते.
भविष्यातील जिल्हा परिषद, पंचायत समित्या, नगर परिषदांच्या निवडणुका लक्षात घेता रमेश थोरात यांचा प्रवेश राष्ट्रवादीसाठी महत्त्वाचा ठरणार आहे..
दौंड तालुक्यात कुल आणि थोरात ही ताकद नाकारून चालणार नाही.
हिंगोली शहरात मुख्य रस्त्यावर खड्ड्यांचा साम्राज्य निर्माण झाल आहे
हिंगोली शहरातील रीसाला बाजार परिसरात डांबरीकरण करण्यात आलेल्या या रस्त्यावर खड्डे पडले आहेत
त्यामुळे दुचाकी चालकांचे अपघात वाढले आहेत तर चार चाकी वाहन चालकांना गाडी चालवताना मोठी कसरत करावी लागत आहे
दरम्यान हिंगोली शहरातील हा प्रमुख मार्ग असल्याने या रस्त्यावर वाहतुकीची मोठी रहदारी सुरू असते
त्यामुळे तात्पुरत्या स्वरूपात या रस्त्याची दुरुस्ती करण्याची मागणी वाहन चालक करत आहेत.
कोल्हापूर जिल्ह्यातील घाटमाथ्यावर पावसाचा जोर काहिसा कमी झाला असल्याने राधानगरी धरणाचे 2 स्वयंचलित दरवाजे बंद झाले आहेत. सध्या राधानगरी धरणाचे दोन स्वयंचलित दरवाजे सुरू आहेत. त्यामधून 2856 क्यूसेक्स पाण्याचा विसर्ग होत आहे. तर पॉवर हाऊस मधून 1500 क्यूसेक्स पाण्याचा असा एकूण 4356 क्यूसेक्स पाण्याचा विसर्ग भोगावती नदी पात्रात होत आहे. राधानगरी धरणाची भुरळ सर्वांनाच पडत असते.
वाशिम जिल्ह्यातून अकोला-नांदेड राष्ट्रीय महामार्गावर जाण्यासाठी सुरू असलेक्या चार पदरी रस्त्याचं काम गेल्या ४ ते ५ महिन्यांपासून पूर्णपणे ठप्प आहे.
या महामार्गावर एका बाजूला ठेकेदाराने खोदलेला रस्ता, तर दुसऱ्या बाजूला मोठमोठे खड्डे — अशा गंभीर परिस्थितीत वाहनचालकांना अक्षरशः जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे.
अर्धवट आणि धोकादायक रस्त्यामुळे अपघाताच्या घटनांमध्ये झपाट्याने वाढ होत असून, स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.
प्रशासन आणि ठेकेदाराकडे वारंवार तक्रारी करूनही कोणतीही ठोस कारवाई झाली नसल्याचा नागरिकांचा आरोप आहे. त्यामुळे प्रशासनाने तातडीने लक्ष घालून कामाला गती द्यावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे.
राज्यसभेचे सदस्य म्हणून शपथ घेतल्यानंतर जळगावतून काढण्यात आली मिरवणूक...
जेसीबीच्या साह्याने फुलांची उधळण करत निकम यांचे स्वागत...
ढोल ताशांचा गजर फटाक्यांचे आत शिवाजी निकम समर्थकांची मोठी गर्दी...
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला निकम यांच्याकडून अभिवादन
जुन्नरचे आमदार शरद सोनवणे यांनी आदिवासी विकास मंत्री प्राचार्य डॉक्टर अशोक उईके यांचेबाबत अश्लाघ्य भाषा वापरल्याने यवतमाळमध्ये विविध आदिवासी संघटना आक्रमक झाल्या आहेत.
जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांना निवेदन देऊन आदिवासी संघटनांनी आमदार शरद सोनवणे यांचे विरुद्ध ॲट्रॉसिटी कायद्यानुसार कारवाई करण्याची व त्यांची आमदारकी रद्द करण्याची मागणी केली आहे.
सोनवणे यांनी आदिवासी समाजाचे नेते व राज्याचे आदिवासी विकास मंत्री यांचे बाबत शिवराळ भाषा वापरल्याने तमाम आदिवासी बांधवांचा व शासनाचाही अपमान झाला आहे.
रत्नागिरीत आज मंत्र्यांचे दौरे असणार आहेत.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे खेडमध्ये असणार आहे.खेडमधील स्व.मिनाताई ठाकरे सांस्कृतिक केंद्राचं लोकार्पण उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार आहे
त्यांच्या सोबत गृहराज्यमंत्री योगेश कदम देखील असणार आहेत
तर रत्नागिरीतील मिरकडवाडा बंदराच्या कामाचं भूमीपूजन बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांच्या हस्ते होणार आहे यावेळी उद्योगमंत्री उदय सामंत देखील उपस्थित असणार आहेत.
महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मातेच्या भाविकांना तिरूपती बालाजी व शिर्डीच्या धर्तीवर लाडु प्रसाद योजनेचा शुभारंभ जिल्हाधिकारी यांच्या हस्ते नुकताच करण्यात आलाय माञ भाविकांना प्रसाद म्हणून मिळणाऱ्या एका ५० ग्रॅम लाडुसाठी ३० रुपये शुल्क आकारण्यात आले आहे.त्यामुळे याबाबत मंदीर संस्थानने विचार करून लाडु प्रसाद भाविकांना फ्री द्यावा किंवा दोन लाडु ५० रुपयात द्यावेत अशी मागणी भोपे पुजारी मंडळाच्या वतीने केली आहे.
हवामान विभागाने आज गडचिरोली जिल्ह्याला पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी केला आहे.
काल दिवसभर हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसानं हजेरी लावल्यानंतर मध्यरात्रीही अनेक भागात पावसानं उसंत घेतली.
सकाळपर्यंत उसंत घेतलेल्या पावसानं आता अनेक भागांमध्ये रीप रीप पाऊस चालू आहे.
भामरागड तालुक्याच्या संत गतीने चालू असलेल्या पुलाच्या कामामुळे पुन्हा एकदा पर्ल कोटा नदीला पूर आल्यामुळे शंभर गावांचा महाराष्ट्राशी संपर्क तुटला आहे .
रायगडच्या इंदापूर तळा मार्गावर रात्री बर्निंग कारचा थरार पहायला मिळाला.
मुठवली गावाजवळ धावत्या कारने अचानक पेट घेतला.
कार जळून खाक झाली असून सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवीत हानी झालेली नाही. कारचालकाच्या लक्षात येताच तो बाहेर पडला.
वन्यजीव रक्षणार्थ सामजिक संघटना आणि अग्निशमन दलाने आग विझवली
यवतमाळ जिल्ह्यात गत दिवसांपासून पावसाची रिपरिप सुरू आहे.
कमी अधिक स्वरूपात बरसणाऱ्या पावसाने काही भागात पूरपरिस्थिती निर्माण केली झाली, तर काही भागात पावसाची रिपरिप पाहायला मिळाली.
गत 24 तासात जिल्ह्यातील सात महसुली मंडळात अतिवृष्टीची नोंद करण्यात आली असून या पावसाने वाघाडी प्रकल्प ओव्हर फ्लो झाला आहे जिल्ह्यात आत्तापर्यंत 128 मिमी पावसाची नोंद करण्यात आलीये. हवामान विभागाने जिल्ह्याला आज येलो अलर्ट जारी केला आहे.
बीड शहरातील मुख्य असलेला नगर रोड रस्ता याचे काम 159 कोटी रुपये खर्चूनही वर्षभरापासून काम सुरू असून ते आता अंतिम टप्प्यात आले आहे
मात्र काम पूर्ण होण्यापूर्वीच रस्त्यावरती खड्डे पडले आहेत तर या खड्ड्यांमध्ये पावसाच्या पाण्याने जलमय वातावरण झाले आहे
खड्ड्यांमध्ये पाणी साचल्यामुळे नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात असून त्यांना त्या पाण्यातून प्रवास करावा लागत आहे
चार महिन्यापूर्वी करण्यात आलेल्या रस्त्याची दयनीय अवस्था झाली असून छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरामध्ये खड्डे दिसून येत आहेत
हे खड्डे तात्काळ दुरुस्त करण्यात यावी अशी मागणी आता नागरिकांमधून होत आहे.
पुणे नगर महामार्गावरील वाहतूक कोंडी करण्यासाठी प्रायोगिक तत्वावर उपाययोजना
आव्हाळवाडी चौकातून डावीकडे तर केसनंद चौकात उजवीकडे वळण्यास बंदी
वाहनचालकांनी चौकात लावलेल्या फलकाकडे लक्ष देऊन नियम पाळावेत, पुणे वाहतूक विभागाचे आवाहन
पुणे अहिल्यानगर रस्त्यावर असलेल्या वाघोली भागात होणारी वाहतूक कोंडी कमी करण्याच्या दृष्टीने पुणे शहर वाहतूक विभागाने काही उपाययोजना आखल्या आहेत
या उपाययोजनांची अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे
वाशिम जिल्ह्यात सुरू असलेल्या दमदार पावसामुळे वाशिम जिल्ह्यातील सर्वात मोठ प्रकल्प असलेल्या अडाण धरणाच्या पाणीसाठ्यात वाढ होत आहे.
सध्या धरण 64 टक्के भरलं असून,पाणीसाठा नियंत्रणात ठेवण्यासाठी धरणाचे 3 दरवाजे दहा सेंटीमीटरने उघडण्यात आले असून, यातून 29.91 क्युमेक्स पाण्याचा विसर्ग सुरू आहे.
परवा धरणाचे दोन दरवाजे उघडण्यात आले होते.
आता तिसरा दरवाजा उघडण्यात आल्यानं अडाण नदीकाठावरील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
सकाळी ९ वाजता ४०२६ क्युसेक्स ने विसर्ग सुरू राहणार
खडकवासला धरणातून मुठा नदीत पाण्याच्या विसर्गात केली जाणार वाढ
१७१० क्युसेक्स ने सुरू असलेला पाण्याचा विसर्ग आता ४०२६ वर केला जाणार
रात्री झालेल्या पावसामुळे पाटबंधारे विभागाचा निर्णय
महादेव मुंडे यांना न्याय द्यावा यासाठी काल कन्हेरवाडी आणि भोपळा ग्रामस्थांकडून रास्ता रोको करण्यात आला होता.
रास्ता रोको दरम्यान सुमारे चार तास परळी - अंबाजोगाई महामार्गावरील वाहतूक ठप्प होती.
मात्र आता हेच आंदोलन करणे ग्रामस्थांना महागात पडलेले दिसून येत आहे.
आता या आंदोलनानंतर ज्ञानेश्वरी मुंडे यांचे भाऊ सतीश फड आणि कन्हेरवाडीचे सरपंच राजेभाऊ फड यांच्यासह रास्ता रोको करणाऱ्या 70 जणांविरोधात परळी ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जालना जिल्ह्यामध्ये सर्वदूर पाऊस पडतोय.जालन्यातील परतुर, मंठा आणि घनसांवगी तालुक्यांमध्ये मागील तीन दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत आहे.
या पावसामुळे नद्यांना आणि ओढ्यांना पूर आला आहे. घनसांवगी तालुक्यातील बोडखा गावातील नारोळा नदीला पूर आला आहे.
तर परतुर तालुक्यातील सावरगाव येथील सरस्वती नदीला देखील पूर आला आहे.
जालना जिल्ह्यामध्ये मागील तीन दिवसापासून मुसळधार पाऊस पडतोय.
या पावसामुळे एकीकडे बळीराजा सुखावला आहे तर दुसरीकडे शेतात पाणी साचल्यामुळे बळीराजाच्या खरीप पिकाचे देखील नुकसान होत आहे..
नवी मुंबईतील कोपरखैरणे येथे सेक्टर ०८ सीव्हरेज लाईन काम नवी मुंबई महानगरपालिकेच्या ठेकेदारांकडून घेण्यात आलं होतं
मात्र साईबाबा कंट्रक्शन कंपनीला देण्यात आले होते
मात्र सीव्हरेज लाईन काम अर्धवट काम असून सुद्धा नवी मुंबई महानगरपालिकेच्या ठेकेदारांनी पूर्ण काम झालं असं दाखवून महापालिकेला दाखवून 23 लाख रुपये बिल अदा करण्यात आला आहे
त्यामुळे सीव्हरेज लाईन काम केवळ 30 तेच 40% काम झालेला आहे त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करावी ठाकरे गटाचे माजी नगरसेवक रवींद्र म्हात्रे यांनी मागणी आयुक्तांकडे केली आहे
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.