बीड शहरातील धानोरा रोडची मागील पंधरा वर्षांपासून दुरावस्था आहे. पावसाळ्यात ही परिस्थिती अधिक बिकट होते. त्यामुळे या रस्त्याच्या प्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी वंचित बहुजन आघाडीसह स्थानिक नागरिकांनी खड्ड्यात साचलेल्या पाण्यात होडी चलाव आंदोलन करून लक्ष वेधले आहे.
पंढरपूर येथील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिराच्या छताला गळती लागल्याचे समोर आल्यानंतर आता या संपूर्ण कामाचे ऑडिट करावे असा प्रस्ताव मंदिर समितीने जिल्हाधिकाऱ्यांना पाठवला आहे. पंढरपूर परिसरात मागील दोन दिवसांपासून जोरदार पाऊस सुरू आहे.
भिमाशंकर-आहुपे खोऱ्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे धरणात तब्बल ९० टक्क्यांहून अधिक पाणीसाठा झाला आहे. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून डिंभे धरणाचे दोन दरवाजे उघडून २ हजार क्यूसेक्स वेगाने पाणी घोड नदी पात्रात सोडण्यात येत आहे.
पावसाचा जोर कायम राहिल्यास विसर्ग वाढविण्यात येणार असल्याने नदीकाठच्या गावांतील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय. प्रशासनाने परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवलं आहे.
नागपूर जिल्ह्याचा कामठीतील पाच मित्र हिंगणा तालुक्यातील सालईमेंढा तलावाकडे फिरायला गेले. मात्र पाण्यात पोहण्याचा मोह जीवावर बेतला. 20 वर्षीय तरुणाचा तलावाच्या पाण्यात बुडून मृत्यू झालाय.
परभणी जिल्ह्यात आज सर्वत्र पावसाचे धुमशान पाहायला मिळत आहे सर्वत्र जोरदार पाऊस बरसत आहे यामुळे मोठ्या नद्यांना तर पाणी आलंच आहे शिवाय छोट्या ओढ्या नाल्यांनाही पाणी आला आहे परभणीच्या पूर्णा तालुक्यातील लिमला येथील ओढ्याला पूर आल्यामुळे पिंगळी लिमला रस्त्यावरची वाहतूक पूर्णतः बंद झालीये.
दोन्ही बाजूने नागरिक मागच्या दोन तासांपासून अडकून पडले आहेत मात्र पुराचे पाणी वाढल्यामुळे हा मार्ग पूर्णतः बंद झालाय देऊळगाव दुधाटे ला येणारी बस ही पिंगळीच्या बाजूने अडकून पडली आहे ज्यामध्ये प्रवासी आहेत.रस्ता बंद असल्यामुळे या दोन्हीकडच्या प्रवाशांना मात्र मोठा वळसा मारून जावं लागणार आहे
विरार पूर्वेतील गडगापाडा परिसरात उड्डाणपुलाचे कामकाज सुरू असल्याने रस्ता अतिशय अरुंद व खराब अवस्थेत झाला आहे. याच रस्त्यावर एक दुचाकीस्वार डंपरच्या खाली आल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला.
खोपोली मध्ये झालेल्या अपघातात जखमींना उपचारासाठी एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले.
आगामी महानगर पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय काँग्रेस एक्शन मोडवर आलेली आहे. कोल्हापुरातील काँग्रेस कमिटी इथं कोल्हापूर महानगर पालिकेच्या सर्व माजी नगरसेवक, काँग्रेस पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा भव्य निर्धार मेळावा आयोजित करण्यात आलेला आहे. काँग्रेसचे खासदार शाहू महाराज छत्रपती, काँग्रेस आमदार सतेज पाटील, माजी आमदार ऋतुराज पाटील, काँग्रेसचे आमदार जयंत आसगावकर यांनी या मेळाव्याला संबोधित केले. आगामी महानगरपालिका निवडणुकीत कोल्हापूर महानगरपालिकेवर काँग्रेस सह महाविकास आघाडीचा झेंडा फडकावा यासाठी हा निर्धार मेळावा आयोजित करण्यात आला होता.
धाराशिवच्या परंडा तालुक्यातील भांडगाव येथील विश्वरुपा नदिवरील पुल ढासळला
भूम - जवळा - भांडगाव कडून बार्शीकडे जाणारी वाहतूक झाली बंद,जनजीवन विस्कळीत
राञी पासुन सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे नदीला पुर आल्याने वाहतुक झाली बंद
धाराशिव जिल्ह्यात काल पासुन पावसाची संततधार सुरूच
रत्नागिरी - लोटे midc मध्ये विनती ऑरगॅनिक कंपनीत भीषण स्फोट
स्फोटात एका कामगाराचा मृत्यू, एक गंभीर जखमी
समीर खेडेकर राहणार घाणेखुंट असं मृत झालेल्या कामगाराचं नाव
बॉयलर ओव्हर हिट झाल्यामुळे स्फोट झाल्याची प्राथमिक माहिती
- सुरेश भट सभागृहात आयोजित खेळावर आधारित करिअर या विषयावर व्याख्यानावर नितीन गडकरी बोलत होते...
- यावेळी त्यांनी नागपूर सारख्या शहरात किमान ३०० स्टेडियम उभारायची, जेणेकरून तरुणांना खेळासाठी योग्य संधी मिळेल असे गडकरी म्हणालेत...
आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची महत्वाची बैठक आज पुण्यात पार पडली.. या बैठकीत सुप्रिया सुळे यांनी पुणे शहरातील प्रमुख पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला.. या बैठकीत शहरातील सर्व प्रभागाचा आढावा घेण्यात आला..पुणे शहरातील सर्व पदाधिकारी, सर्व कार्यकर्ते निवडणुकीसाठी सज्ज असून महानगरपालिका निवडणुकीत पक्ष संपूर्ण ताकदीने लढणार हा विश्वास यावेळी सर्वांनी व्यक्त केला..
धुळे : तालुक्यातील कुवे येथील शेतकरी रवींद्र धोंडू पाटील हे काल शिरपूर येथील श्री कृषी सेवा केंद्रात युरिया खत मागण्यासाठी गेले होते मात्र, युरिया उपलब्ध नसल्याचे सांगण्यात आल्यानंतर त्यांनी तेथेच गळफास घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला, या वेळी खुद्द तालुका कृषी अधिकारी उपस्थित होते, घटनेचे गांभीर्य लक्षात घेता सामाजिक कार्यकर्त्यांनी धाव घेत रवींद्र पाटील यांना समजावले आणि शेतकरी संतापाला वाट न जाऊ देता शांततेत मार्ग काढण्याचा प्रयत्न केला
परभणी जिल्ह्यामध्ये मागच्या तीन दिवसांपासून सूर्यदर्शन नाही दोन दिवस पावसाच्या हलक्या सरी कोसळल्यानंतर आज तिसऱ्या दिवशी शहरासह जिल्हाभरामध्ये जोरदार पाऊस बरसतोय मागच्या दोन तासांपासून पावसाचा जोर मोठ्या प्रमाणावर वाढला यामुळे परभणी शहरातील रस्त्यांवर जागोजागी पाणी साचायला सुरुवात झालेली आहे ज्यामुळे परभणीकरांना या पाण्याचा मोठा त्रास सहन करावा लागतो तर दुसरीकडे जिल्ह्यातील पिकांनाही मोठा दिलासा मिळालाय
बुलढाणा जिल्ह्यात जोरदार पाऊस झाल्यानंतर वाशिमच्या रिसोड तालुक्यातील पिंपरी सरहद गावाजवळून वाहणाऱ्या काच नदीला पुन्हा एकदा पूर आलाय, त्यामुळं अवघ्या महिन्या भरात या परिसरातील शेती तिसऱ्यांदा पाण्याखाली जाऊन शेतीचं मोठं नुकसान झालंय. या भागातून जाणाऱ्या समृद्धी समृद्धी महामार्गावरचं किमान १० किलो मीटर भागातील पाणी एकाचं ठिकाणावरून बाहेर पडत असल्यानं थोडा पाऊस झाला तरी वारंवार काच आणि उतावळी नदीला पूर येत असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला असून, या संदर्भात लवकर उपाययोजना करण्याची मागणी केलीये.
कारगिलच्या विजय दिवसाच्या निमित्ताने या युद्धात सहभाग नोंदवणाऱ्या सैनिकांचा मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्याहस्ते सन्मान करण्यात आला कारगिल युद्धात आपल्या जीवाची बाजी लावून युद्ध लढणाऱ्या निवृत्ती सैनिकांचा सन्मान महाराष्ट्राचे कौशल्य रोजगार उद्योजकता मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी लोणावळ्याच्या आयटीआय मध्ये केला.
आरोपी वाल्मीक कराडचे बीड जिल्ह्यात बॅनर,
बॅनर लावणारे अजित पवारांच्या जवळचे
अजित पवारांनी कार्यवाही केली पाहिजे, अशी धनंजय देशमुख यांची मागणी.
बीड जिल्हा कारागृहातून आरोपी वाल्मीक कराडचा एका व्यक्तीला फोन अंबादास दानवे यांचा खळबळजनक दावा
किनारपट्टी भागात आज पुन्हा एकदा साडेचार मीटर उंचीच्या लाटा
रत्नागिरी गणपतीपुळे मालगुंड गुहागर दापोली राजापूर या किनारपट्टी भागात अजस्त्र लाटा
पंधरामाड आणि आलावा समुद्र किनारपट्टी भागात लाटांचं तांडव
धूप प्रतिबंधक बंधाऱ्यावरून लाटा पलीकडे मानवी वास्ती पर्यंत
समुद्रात 4.30 मीटर लाटा, किनारपट्टी भागातल्या लोकांना सतर्कतेचा इशारा
धाराशिव जिल्ह्यातील भुम तालुक्यातील वंजारवाडी येथील आरसोली लघु प्रकल्प ओव्हरफ्लो झाला आहे.गेली दोन दिवसापासून सुरू असलेल्या पावसामुळे प्रकल्प ओव्हरफ्लो झाला आहे राञी पासुन पावसाचा जोर वाढल्याने हा प्रकल्प 100 टक्के भरला आहे.या प्रकल्पातुन भुम शहराला पाणी पुरवठा केला जातो त्यामुळे भुम करांची पाण्याची चिंता देखील मिटली असुन प्रकल्प ओव्हरफ्लो झाल्याने शेतकऱ्यांमध्ये देखील आनंदाचे वातावरण निर्माण झाल आहे.
कर्नाळा बँक घोटाळ्याबाबत महत्वाची घडामोड समोर आली आहे.या घोटाळ्यातील ठेवीदार व गॅरेंटर यांचे पैसे परत करण्यासाठी बँकेचे अध्यक्ष माजी आ. विवेक पाटील यांच्या मालमत्तांचा लिलाव करण्याचे आदेश ईडीच्या विशेष न्यायालयाने दिले आहेत. पनवेलची प्रसिध्द कर्नांळा स्पोर्ट्स अकँडमी आणि पोसरी येथील 102 एकर जमिनीच्या लिलाव केलेल्या रक्कमेतून गैरव्यवहारातील रक्कम वसुल केली जाणार आहे.
गोकुळ शिरगाव इथल्या कलश मंदिर परिसरात आज दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास एक अपघात झाला आहे. कर्नाटकहून येणारा एक ट्रक चालकाचे नियंत्रण सुटल्याने ट्रक पलटी झालाय. हा ट्रक वेगाने येत असताना अचानक रस्त्यावरून घसरला आणि रस्त्याच्या मधोमध उलटला. या दुर्घटनेत कोणतीही जीवित हानी झालेली नाही. मात्र, ट्रक पलटीमुळे रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली.
पुणे नगर महामार्गावरील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी पुणे वाहतूक विभागाने वाघोलीत प्रायोगिक तत्वावर उपाययोजना सुरू केल्या आहेत. यामुळे वाहन चालक गोंधळात पडत असून वाहतूक कोंडी होत आहे. वाहनचालकांनी चौकात लावलेल्या फलकाकडे लक्ष देऊन त्या प्रमाणे नियम पाळावेत. असे आवाहन पुणे वाहतूक विभागाने केले आहे.वाघोलीतील कोंडी कमी झाली असली तरी ती पूर्णपणे फुटलेली नाही.
रामोशी समाजाबद्दल आढावा बैठकीत अपशब्द वापरल्याच्या आरोपावरून जुन्नर तालुक्यातील आळेफाटा चौकात रामोशी समाजातील नागरिकांनी जोरदार आंदोलन केलं. संतप्त नागरिकांनी आमदार शरद सोनवणे यांचा जाहीर निषेध नोंदवला. दरम्यान, खुद्द आमदार सोनवणे यांनी आंदोलनस्थळी येत समाजाची जाहीर माफी मागितल्याने आंदोलन शांततेत मागे घेण्यात आलं. मात्र या प्रकारामुळे राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे.
उतवाली ते धारणी दरम्यानच्या नदीला पूर..
नदीवरून वाहू लागले पुराचे पाणी. पुलावरून पाणी वाहत असताना वाहन चालक जीव धोक्यात टाकून काढत आहे वाहने
कालपासून भंडाऱ्यात सुरू असलेल्या पावसामुळं नदीनाले ओसंडून वाहू लागले आहेत. अशात जिल्हा अंतर्गत मार्गावरील गावांना जोडणाऱ्या आठ गावांच्या मार्गावर पाणी असल्यानं हे मार्ग वाहतुकीसाठी जिल्हा प्रशासनानं बंद केले आहे. भंडारा शहराजवळील वैनगंगा नदीवरून कारधा गावाकडं जाणाऱ्या लहान पुलावरून वाहतूक बंद करण्यात आली असून खमारी नाल्यावरून पाणी असल्यानं तो मार्गही बंद झाला आहे.
नव्यानेच बांधकाम केलेल्या अंगणवाडीच्या इमारतीला या पावसाळ्यात गळती लागली आहे. नांदेडच्या अर्धापूर तालुक्यातील आंबेगाव येथील हा प्रकार आहे. इमारतीच्या स्लॅप चे प्लास्टर देखील हाताने निघत असल्याने चिमुकल्या विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात आला आहे. या प्रकारामुळे नव्याने बांधण्यात आलेल्या या इमारतीच्या बांधकामाचा दर्जा मात्र उघड झाला आहे. मराठीला गळती आणि प्लास्टर हाताने निघत असल्याने पालक आपल्या विद्यार्थ्यांना या अंगणवाडीत शिक्षणासाठी पाठवत नाहीत.
शिवसेनेचे आमदार राजेश क्षीरसागर यांनी राजू शेट्टी यांच्यावर केलेल्या आरोप सिद्ध करा, अन्यथा माफी मागा
राजेश क्षीरसागर यांनी माजी संपत्ती जाहीर करावी, माझ्या संपत्तीचे पुरावे दिल्यास हीच संपत्ती त्यांना बक्षीस पत्राने देऊ राजू शेट्टी यांचे खुलं आव्हान
- पुरामुळे अल्लीपूर अलमडोह, वर्धा कानगाव मार्ग बंद
- रस्ता बंद झाल्याने गावाचा संपर्क तुटला
- अलमडोह गावाच्या वेशीवर पोहचल पुराचं पाणी
- अलमडोह येथील बसस्थानक जवळ पोहचले पुराचे पाणी
- जिल्ह्यात आज पावसाचा येल्लो अलर्ट
- रात्रीपासूनच जिल्ह्यात पावसाच्या सरी
आज त्यांच्या अमरावती दौऱ्याचा शेवटचा दिवस आहे..
आज सकाळीच न्यायमूर्ती गवई जिल्हा न्यायालयात पोहोचले..
न्यायालयातील ई लायब्ररीचे उद्घाटन न्यायमूर्ती भूषण गवई यांच्या हस्ते करण्यात आले..
त्यानंतर त्यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंग रूमची देखील पाहणी करत इ लायब्ररीची देखील पाहणी केली
गेल्या काही दिवसांपासून उष्णतेने त्रस्त असलेल्या यवतमाळ जिल्ह्यात अखेर पावसाने हजेरी लावली असून, शनिवारी सकाळपासूनच यवतमाळ जिल्ह्यात ठिकठिकाणी पावसाची रिपरिप सुरू आहे. या पावसामुळे बळीराजाच्या चेहऱ्यावर आनंद फुलला आहे.जिल्ह्यातील अनेक तालुक्यांमध्ये समाधानकारक पर्जन्यवृष्टी होत असून, खरीप हंगामाच्या कामाला वेग येणार आहे.
नांदेड जिल्ह्यातील लोहा तालुक्यातील हाडोळी ते बेरळी पांदण रस्ता प्रस्तावित आहे. मात्र हा रस्ता एका शेतकऱ्याने अडवल्याने तीन गावातील शेतकरी,विद्यार्थ्यांना पाण्यातून वाट काढावी लागत आहे. हाडोळ वस्ती, सलगरवाडी आणि रामवाडी या विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी चक्क जीव धोक्यात घालून ज्ञानार्जनसाठी जावं लागत आहे. याप्रकरणी गावकऱ्यांनी वेळोवेळी प्रशासनाकडे दाद मागितले आहे. मात्र अद्याप पर्यंत यावर तोडगा निघाला नाही. विद्यार्थी पालकांनी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन याबाबत निवेदन दिले आहे.
आयटी पार्क हिंजवडीच्या नागरी प्रश्नावरून उपमुख्यमंत्री अजित पवार हिंजवडी ग्रामपंचायतच्या एका पदाधिकाऱ्यांवर चांगले संतापले आहेत शेवटी धरण करताना मंदिरे जातात की नाही, तुम्हाला जे सांगायचे ते सांगा मी ऐकून घेतो, आपलं वाटोळं झालंय हिजवडीचं आयटी पार्क महाराष्ट्र बाहेर चालल आहे. मात्र तुम्हाला काही पडलेलं नाही. मी सकाळी सहा वाजता इथे येऊन का बघतो, माझी सुद्धा लोक आहेत मात्र केल्याशिवाय गत्यंतर नाही असं म्हणत अजित पवार यांनी रस्ता रुंदीकरणा वरून ग्रामपंचायतीच्या एका पदाधिकाऱ्याला खडे बोल सुनावले आहेत.
बीड तालुक्यातील वांगी येथे शेतकऱ्यांच्या 15 ते 20 शेळ्यांवरती बिबट्याने हल्ला केला असून यामध्ये सर्व शेळ्या मृत पावल्या आहेत शेतकऱ्याच्या मध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झाला असून नुकसान भरपाईची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे वनविभागाला अनेक वेळा गावकऱ्यांनी आणि शेतकऱ्यांनी या संदर्भात माहिती दिली होती मात्र वनविभागाने माहिती देऊनही याचा बंदोबस्त न केल्यामुळे शेतकऱ्यांच्या पंधरा शेळ्यांचा बिबट्याने पडदा फास केला असून लाखो रुपयाचे नुकसान झालं आहे वन विभागाकडून पंचनामा करण्यात आला असून नुकसान भरपाई आदिवासी हमी वनविभागाने दिली आहे हा सर्व प्रकार बीडच्या वांगी येथे घडला आहे.
शहरा अभियान त्यापासून शिपायापर्यंत पैसे दिल्याशिवाय टक्केवारी दिल्याशिवाय बिल मंजूर होत नसल्याचा ठेकेदाराचा आरोप
कोणकोणत्या अधिकाऱ्याला किती रुपये टक्केवारी म्हणून पैसे दिलेत ठेकेदारांनी सांगितली नावे
ठेकेदारांना कॅफे मध्ये बोलावून त्यांच्याकडून घेतले जातात पैसे
कोल्हापूर महानगरपालिकेत बाबूगिरीचा कळस
धुळे शहरात घरगुती गॅस सिलेंडरमधून वाहनांमध्ये बेकायदेशीरपणे गॅस भरणाऱ्या मिनी पंपांवर पोलिसांनी जोरदार कारवाई केली आहे, पोलीस अधीक्षक श्रीकांत धीवरे यांच्या मार्गदर्शनाखाली व परिविक्षाधीन उपविभागीय अधिकारी सागर देशमुख यांच्या नेतृत्वाखाली शहरातील नटराज टॉकीज, मछली बाजार, साक्री रोड आणि हटकरवाडी परिसरात छापे टाकण्यात आले.
ठाणे पुर्व स्थानक परिसरातील वाहतूक कोंडीची समस्या सोडविण्यासाठी ‘स्थानक परिसर वाहतूक सुधारणा प्रकल्प’ (सॅटीस ) प्रकल्प राबविण्यात येत असून या प्रकल्पात रेल्वे मार्गिकेच्या दोन्ही बाजूला उभारण्यात आलेल्या खांबांवर गर्डर बसविण्याचे काम प्रलंबित होते. या कामासाठी रेल्वे विभागाने हिरवा कंदील दाखविला असून या कामामुळे सॅटिस प्रकल्पातील मोठा अडथळा दूर झाला आहे. २६ जुलै ते ३ ऑगस्ट या कालावधीत हे काम करण्यात येणार आहे.
पुणे महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी प्रभाग रचनेचे काम अंतिम टप्प्यात आले आहे
येत्या दोन-तीन दिवसात प्रारूप प्रभाग रचनेचे काम संपणार असून त्याच्यानंतर महापालिका प्रारूप प्रभाग रचनेचा आराखडा 4 ऑगस्ट रोजी नगर विकास विभागाला सादर केला जाणार आहे
पुणे महापालिकेमध्ये चार सदस्य प्रभाग रचनेनुसार निवडणूक होणार आहेत 2011 च्या जनगणनेनुसार शहरात 165 नगरसेवक असतील त्यानुसार सध्या निवडणूक कार्यालयाकडून गुगल मॅपिंग चा वापर करून प्रारूप प्रभाग रचना तयार करण्याचे काम सुरू झाले आहे
- नाशिकच्या देवळाली परिसरातील इमारतीत संशयित आकडे चौकशी सुरू
- संशयताकडून एक पिस्तूल आणि सहा राऊंड जप्त केल्याची माहिती
- बनावट सॉफ्टवेअरद्वारे शासनाची फसवणूक करत असल्याची सूत्रांची माहिती
- पुण्याच्या जीएसटी विभागाकडून चौकशी सुरू असल्याची माहिती
आई तुळजाभवानी देवीच्या मंदिराचे मुख्य शिखर जैसे थे रहावे यासाठी भोपे पुजारी मंडळ उच्च न्यायालयाचे दार ठोठावणार
श्री तुळजाभवानीचे मुख्य शिखर काढण्यासंदर्भात प्रशासनाची मुंबईमध्ये लवकरच होणार आहे बैठक
मंदिर म्हणजे देवतांचे शरीर, ही काही इमारत नाही की पाडून नव्याने बांधली, ज्या ठिकाणी इजा पोचली त्या ठिकाणी दुरुस्त करा - भोपे पुजारी मंडळाचे अध्यक्ष अमरराजे कदम यांची मागणी
मंदीर संस्थानकडुन,पुरातत्व विभागाकडून पुरातत्व वास्तु जतन केली पाहीजे,भाविकांनी श्रध्दा सुध्दा जपली गेली पाहिजे
- शालेय विद्यार्थ्यांनी काढली वृक्ष दिंडी, नागपूरच्या मिनी माता नगर येथील राजीव उच्च प्राथमिक शाळेचा उपक्रम
- वृक्ष दिंडी काढत विद्यार्थ्यांनी केले वृक्षारोपण, दिंडीत सहभागी झाले शाळेतील बाराशेवर विद्यार्थी
- पारंपरिक वेशभूषेत सहभागी झाल्या चिमुकले विद्यार्थिनी
- तसेच विविध आकर्षक वेशभूषेत विद्यार्थी सहभागी झाले
- पालखी काढून वृक्षारोपण करण्यात आले
अकोला जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये, विशेषतः ग्रामीण भागात, शेतात जाणाऱ्या शेत रस्त्यांची अवस्था अत्यंत बिकट झाली आहे.. शेत रस्त्याची बिकट अवस्था दाखवणारा व्हिडिओ समोर आला आहे.. पावसामुळे रस्त्यांवर मोठा चिखल झालाय.. त्यामुळे शेतकऱ्यांना शेतात ये-जा करणे तसेच ट्रॅक्टर वाहन बाहेर काढणे खूप कठीण झाले आहे... अकोला जिल्ह्यातील तामसी बटवाडी शेत रस्त्यावरील हा व्हिडीओ आहे.. अनेक शेतकऱ्यांचे या रस्त्यावर ट्रॅक्टर चिखलामूळ फसत आहे.. तर काही ट्रॅक्टर अजूनही तिथेच उभे आहे.. त्यामुळे शेतकऱ्यांना आता पावसात शेती करणे कठीण झाले.. या समस्याकडे जिल्हा प्रशासनाने दखल द्यावी, अशी मागणी आता शेतकरी करतायेत.
माणिकराव कोकाटे यांनी तंबी दिल्यानंतर समर्थकांनी स्वतःहून बोललेला मेळावा रद्द
शक्ती प्रदर्शन करायची गरज नाही, अजित पवारांवर माझा विश्वास
माणिकराव कोकाटे यांच्याकडून समर्थकांची समजूत
माझ्या खात्यात एक रुपयाचा ही भ्रष्टाचार नाही शिवाय राज्यात तिसऱ्या क्रमांकाचा खाते म्हणून माझ्या विभागाचं काम
कोकाटे यांच्याकडून समजूत काढल्यानंतर कोकाटे समर्थकांनी बोलवलेल्या मेळावा रद्द
- कोकाटे यांच्या समर्थनार्थ आज सिन्नर बस स्थानकावर एकवटण्याचं कोकाटे समर्थकांकडून करण्यात आलं होतं आवाहन
- काँग्रेसच्या ओबीसी सेलची दिल्लीत राष्ट्रीय बैठक शुक्रवारी पार पडली
- काँग्रेस नेते आणि राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष बबनराव तायवाडे यांना कुठलेही निमंत्रण नव्हतं
- बैठकीत काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, राहुल गांधी यांच्यासह देशभरातील ओबीसी नेते उपस्थित होते
- ओबीसी समाजाला वास्तविक न्याय मिळण्यासाठी देशपातळीवर एक सशक्त चळवळ उभारण्याचा निर्धार, काँग्रेसने या बैठकीत केला
- काँग्रेसच्या संमेलनात ज्या मुद्यांचा अजेंडा ठेवला होता, त्याच मुद्यावर राष्ट्रीय ओबीसी महासंघ लढा देत आहे.
- काँग्रेस नेते डॉ. बबनराव तायवाडे हे राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष असून, ते याच मागण्यांसाठी राष्ट्रीय पातळीवर लढा देत आहेत.
- कुठे जोरदार तर कुठे मध्यम स्वरूपाचा बरसतोय पाऊस
- वर्धा जिल्ह्याला आज हवामान विभागाचा येल्लो अलर्ट
- पावसामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण
- शेतीपिकांना उपयुक्त असा पडतोय पाऊस
- सकाळपासुन पावसाच्या सरी बरसत असल्याने खोळंबली कामे
- रात्रीपासुनच्या पावसामुळे नदी व नाल्यांच्या पाणी पातळीत वाढ़
- पावसामुळे वातावरणात गारवा
- आज दिवसभर पाऊस बरसणार असल्याचा हवामान विभागाचा अंदाज
पुणे जिल्ह्यासाठी रेड अलर्ट दिलेला असून पुढील 3 तासात पुणे जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी मुसळधार स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. तरी नागरिकांनी सतर्क राहावे. मंत्रालय, मुंबई. वरील माहिती सचेत अँप वरून घेतलेली आहे.
कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांच्या सोयीसाठी कोकण रेल्वेने कार रोरो सेवा सुरू केली आहे. कार ट्रेनवर लोड करून कोकणात पोचविल्या जाणार आहेत. कार बरोबर परिवारातील ३ व्यक्तींना त्याच ट्रेन मधून गावाकडे जाता येणार आहे. कोकण रेल्वेने पहिल्यांदाच कार रोरो सेवा सुरू केली आहे. यामुळे गणेशोत्सवात कोकणात जाताना होणाऱ्या वाहतूक कोंडीतून आणि खराब रस्त्यापासून गणेशभक्तांची सुटका होणार आहे. २३ ॲागस्ट ते ११ सप्टेंबरपर्यंत ही कार रोरो सेवा सुरू असेल. रोहा येथील कोल्हाड रेल्वे स्थानकात कार ट्रेन वर चढविल्या जातील. यानंतर त्या गोवा येथील वेरणा रेल्वे स्थानकावर खाली उतरल्या जातील. सायंकाळी ५ वाजता सुटणारी ट्रेन पहाटे ५ वाजता पोचणार आहे. एका कारसाठी ७ हजार ८०० रूपये खर्च येणार आहे.
पुणे महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी प्रभाग रचनेचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. येत्या दोन-तीन दिवसात प्रारूप प्रभाग रचनेचे काम संपणार असून त्याच्यानंतर महापालिका प्रारूप प्रभाग रचनेचा आराखडा 4 ऑगस्ट रोजी नगर विकास विभागाला सादर केला जाणार आहे.
पुणे महापालिकेमध्ये चार सदस्य प्रभाग रचनेनुसार निवडणूक होणार आहेत 2011 च्या जनगणनेनुसार शहरात 165 नगरसेवक असतील त्यानुसार सध्या निवडणूक कार्यालयाकडून गुगल मॅपिंग चा वापर करून प्रारूप प्रभाग रचना तयार करण्याचे काम सुरू झाले आहे.
राज्य सरकारचा महत्वकांक्षी प्रकल्प असलेल्या शक्तिपीठ महामार्गाला पुन्हा एकदा हिंगोली जिल्ह्यातून कडाडून विरोध करण्यात आला आहे, हिंगोलीच्या गिरगाव मध्ये आज शेकडो महिला शेतकरी व पुरुष राज्य सरकारच्या विरोधात रस्त्यावर उतरले होते दरम्यान यावेळी सरकारच्या विरोधात महिलांनी जोरदार घोषणाबाजी करत सरकारने शक्तिपीठ महामार्ग सुरू केल्यास आम्ही शेतातच आत्महत्या करू असा निर्वाणीचा इशारा दिला होता दरम्यान शेतकऱ्यांच्या या आत्महत्यांना सरकार सर्वस्वी जबाबदार असेल असे म्हणत आमच्या काळजाचा तुकडा असलेल्या जमिनी सरकारने जबरदस्ती बळकाऊ नयेत अशी विनंती देखील या शेतकऱ्यांनी सरकारकडे केली होती.
- बीड जिल्ह्यात एकाच दिवशी सहा चोरीच्या गुन्ह्यांची नोंद.
- दुचाकी, रोकड आणि घरफोडीचा समावेश.
- चोरट्यांचा बंदोबस्त करण्याची नागरिकांकडून होत आहे मागणी.
- बिअरबार आणि बिअरशॉप फोडीच्या घटनांमध्ये देखील वाढ.
बदलापूरचं बारवी धरण कधीही ओव्हरफ्लो होण्याची शक्यता आहे. त्यामुळं एमआयडीसीनं बारवी नदीलगतच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला असून कल्याण, अंबरनाथ, उल्हासनगर, मुरबाडच्या तहसीलदारांना तातडीची सूचना जारी केली आहे. बारवी धरणाची ओव्हरफ्लो होण्याची पातळी 72.60 मीटर असून शुक्रवारी दुपारी पाणी 70.60 मीटर इतकी होती. पाणीपातळी 72.60 मीटरपर्यंत जाताच धरणाचे स्वयंचलित दरवाजे पाण्याच्या दाबाने आपोआप उघडले जातात आणि पाण्याचा विसर्ग सुरू होतो. सध्या धरणक्षेत्रात जोरदार पाऊस सुरू असून त्यामुळे शनिवार किंवा रविवारी धरण भरण्याची शक्यता आहे. याच पार्श्वभूमीवर एमआयडीसीचे कार्यकारी अभियंता दुशांत उईके यांनी एक तातडीची सूचना जारी केलीये, यात बारवी नदीलगत असलेल्या असलेली चांदप, चांदपपाडा, पिंपळोली, सागाव, पाटीलपाडा, पादीरपाडा, कारंद, चोण मोऱ्याचा पाडा, रहाटोली या गावांना विशेष खबरदारी घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तर बारवी आणि उल्हास नदी लगतच्या इतर गावं आणि शहरांनाही सतर्कतेच्या सूचना एमआयडीसीकडून देण्यात आल्या आहेत.
महाबळेश्वरला पावसाने जोरदार झोडपल्याने सवित्री नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली. यामुळे पोलादपूर शहरातील सावित्री नदी किनाऱ्याची लोकवस्ती प्रभावीत झाली. पोलादपुर शहरातील सखल भागात रात्री सावित्री नदीला आलेल्या पुराचे पाणी शिरले होते. पावसाचा जोर कमी झाल्यानंतर आता हे पाणी ओसरले असून परिस्थिती सामान्य झाली आहे.
- श्रावण महिन्यातील प्रत्येक सोमवारी आणि शनिवारी रामकुंड परिसरात वाहनांना प्रवेश बंद
- प्रत्येक सोमवारी आणि शनिवारी सकाळी ६ ते रात्री १० वाजेपर्यंत वाहनांना प्रवेश बंदी
- रामकुंड परिसरातच कपालेश्वर महादेव मंदिर असल्यानं भाविकांची होणारी गर्दी लक्षात घेता निर्णय
- भाविकांच्या गर्दीमुळे कोणताही अनुचित प्रकार अथवा घटना घडू नये, यासाठी प्रशासनाकडून खबरदारी
- अतिमहत्त्वाच्या व्यक्तींशिवाय कपालेश्वर मंदिरात व्हीआयपी दर्शन देखील बंद ठेवण्याचा निर्णय
भंडारा जिल्ह्यातील वैनगंगा नदी वरील गोसेखुर्द धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पडत असलेला पाऊस यासोबत संजय सरोवर आणि धापेवाडा बॅरेज मधून सोडण्यात येतं असलेल्या पाण्यामुळं गोसेखुर्द धरणाच्या पाणीपात्रात वाढ झाली आहे. धरणाचा जलसाठा नियंत्रित ठेवण्यासाठी धरण प्रशासनानं धरणाचे 33 पैकी 33 दरवाजे अर्धा मीटरनं उघडले आहेत. त्यातून 1 लाख 30 हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. त्यामुळे प्रशासनाच्या वतीने नदी काठा वरील गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.
महिलेला हिप्नॉटाइज करून तीच्या गळ्यातील अडीच तोळ्याचे गंठण, हातातील अंगठी असा एकूण तीन लाखांचा ऐवज लंपास केला.
महिला मंदिरात दर्शनासाठीच गेली असताना घडली घटना
महिला मंदिरातून बाहेर पडताच एक अज्ञात मास्कधारी व्यक्ती त्यांच्या जवळ आली,त्यानंतर बनेश्वर रोडवरील काळूबाई मंदिराकडे घेऊन जात, महिलेला हिप्नॉटाइज केले.. आणि सोनं घेऊन झाला पसार
65 वर्षीय कमल शिवाजी रेणुसे यांच्या सोबत हा प्रकार घडला
संबंधित अज्ञात व्यक्ती आणि महिला दुचाकीवरून जाताना सीसीटीव्ही कॅमेरात कैद झालेत.
सीसीटीव्ही आधारे भोरच्या राजगड पोलिसांनी आरोपीचा शोध सुरू केला आहे.
अमरावती जिल्ह्यातील मोर्शी तालुक्यात मुसळधार पावसामुळे नदी, नाले ओसंडून वाहत आहेत.
त्यातच धरण क्षेत्रातही जोरदार पावसाने हजेरी लावल्याने ऊर्ध्व वर्धा धरणाच्या पातळीत वाढ होऊन पाणीसाठा ५१.७टक्यावर पोहोचला आहे.
३१ जुलै अखेरीस ३४०.७८ मिटरपर्यत पातळी वाढल्यास धरणाची वक्रद्वार केव्हाही उघडून पाण्याचा विसर्ग नदीपात्रात करण्यात येणार आहे.
दरम्यान १९ जुलै रोजी धरण केवळ ४८.६२ टक्केच भरले होते. परंतु तालुक्यात मुसळधार पावसाने हजेरी लावल्यामुळे जलाशयाच्या पातळीत वाढ होऊन पाणीसाठा ५१.७ टक्यावर पोहोचला आहे.
लातूर जिल्ह्यात मागच्या दीड महिन्यापासून पावसाने दडी मारली होती, मात्र काल सायंकाळपासून जिल्ह्यात सर्व दूर पावसाने रिमझिम हजेरी लावली आहे., तर खरिपाची पेरणी झाल्यापासून जिल्ह्यात पावसाने अक्षरशः दडी मारली होती, त्यामुळे कवळी पिक माना टाकू लागल्याने शेतकऱ्यांमध्ये निराशा आणि चिंता निर्माण झाली होती. मात्र काल सायंकाळपासून जिल्ह्यात सर्वदूर पावसाने हजेरी लावल्याने पिकांना नवसंजीवनी मिळाली आहे. तसेच शेतकऱ्यांमध्ये देखील समाधानाच वातावरण दिसत आहे. दरम्यान पावसाअभावी ज्या शेतकऱ्यांच्या पेरण्या खोळंबल्या होत्या, त्या देखील आता पूर्ण होणार असल्याचे चित्र दिसत आहे.
हिंगोली जिल्ह्यात गेल्या अकरा दिवसापासून शेकडो आदिवासी विद्यार्थ्यांचे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या पुढे साखळी उपोषण व आंदोलन सुरू आहे, राज्य सरकार या आंदोलनाची दखल घेत नसल्याने काल जिल्हाभर आदिवासी समाजाने रास्ता रोको आंदोलन करत संताप व्यक्त केला होता त्यानंतर आता आदिवासी युवक कल्याण संघाने राज्य सरकारच्या विरोधात महाराष्ट्रभर आंदोलन करण्याची तयारी सुरू केली असून येत्या दोन दिवसात सरकारने आदिवासी विद्यार्थ्यांसाठी 12520 पदांची विशेष करण्याचा निर्णय न घेतल्यास या आंदोलनाची ठिणगी राज्यभर पेटणार असल्याचा इशारा आदिवासी नेते सतीश पाचपुते यांनी दिला आहे तर आदिवासी विकास मंत्री विद्यार्थ्यांच्या या आंदोलनाकडे पाठ फिरवत असल्याने त्यांच्या निवासस्थानाबाहेर आंदोलन करू असा इशारा हिंगोलीतील आदिवासी विद्यार्थ्यांनी दिला आहे.
- नाशिक शहरासह जिल्ह्यात पावसाचं पुनरागमन
- नाशिकला आज पावसाचा यलो अलर्ट, तर घाटमाथ्यावर पावसाचा ऑरेंज अलर्ट
- जिल्ह्यातील धरणांच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार पावसाला सुरुवात
- दारणा धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू, दारणा धरणातून ५,१९८ क्यूसेक वेगानं पाण्याचा विसर्ग
- दारणासह, नांदुरमध्येश्वर, वालदेवी, भावली, भाम, कडवा अशा एकूण ९ धरणांमधून पाण्याचा विसर्ग
- पावसाचा जोर वाढल्यास धरणातून केला जाणारा पाण्याचा विसर्ग आणखी वाढवणार
- प्रशासनाकडून नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा
वेगवेगळ्या नावावर समाजमाध्यमांवर ग्रुप तयार करून दहशत पसरणाऱ्या 13 सराईत गुन्हेगारांवर जिल्हा पोलीस अधीक्षक कुमार चिंता यांच्या आदेशानंतर सायबर सेलने कारवाईचा बडगा उगारला आहे.यवतमाळ शहरातील विविध भागात गुन्हेगारी टोळ्या सक्रिय असून त्यांच्यात अंतर्गत धुसफूस सुरू असते वर्चस्वासाठी दहशत पसरविण्याचे काम केले जाते यासाठी टोळक्यांनी इंस्टाग्रामवर कंपनी ग्रुप अशा विविध नावाने अकाउंट उघडले असून यावरून धमकावणार व दहशत पसरणाऱ्या रिल्स सातत्याने वहायरल केल्या जात होत्या त्यामुळे जिल्हा पोलीस अधीक्षक कुमार चिंता यांच्या आदेशानंतर स्थानिक गुन्हे शाखेने सोशल मीडियातून दहशत पसरविणाऱ्या यवतमाळतील टोळक्यांवर कारवाई केली या दरम्यान तेरा सराईत आरोपींना ताब्यात घेतले आहे.आठ सोशल मीडिया ग्रुपच्या अॅडमिनवर प्रतिबंधक कारवाई करण्यात आली आहे.
हिंजवडी परिसरात मोठ्या प्रमाणावर ती अनधिकृत बांधकामे केल्यामुळेच हिंजवडी परिसरामध्ये मोठ्या प्रमाणावरती पाणी साचले होते.बसला देखील याच पाण्यातून वाट काढावी लागत होती. हिंजवडीतील नाल्यांवरती बांधकाम केल्यामुळेच मोठ्या प्रमाणावरती पाणी साचत असल्यामुळे थेट विकासकालाच तुमच्यामुळे बस पाण्यात गेला तुम्ही पैसा कमवणार आणि बदनामी आमच्या राज्याची वय असं थेट अजित पवारांनी या विकासाला सुनावलं आहे.
बुलढाणा जिल्ह्याला येलो अलर्ट दिलेला आहे त्या हवामान अंदाजानुसार बुलढाणा जिल्ह्यात सर्वत्र पावसाने हजेरी लावली.. रात्रभर साधारण पाऊस झालाय.. मेहेकर व लोणार तालुक्यात दमदार पाऊस झाला.. आता सर्वत्र ढगाळ वातावरण असून पावसाची शक्यता वर्तविली जात आहे..
नवी मुंबईची वाढती लोकसंख्या आणि आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या अनुषंगाने नवी मुंबई पोलिसांनी पोलीस आयुक्तालय हद्दीत तिसऱ्या झोनची आणि नव्या पोलीस ठाण्यांची परवानगी राज्य शासनाने दिली आहे. यामुळे नवी मुंबई पोलिसांची ताकद आता वाढलीय.
राधानगरी धरणाचे स्वयंचलित दरवाजा क्रमांक 3, 4, 5 व 6 उघडले
स्वयंचलित दरवाजा क्रमांक 3, 4 5 व 6 मधून 5712 क्युसेक व BOT पॉवर हाऊस मधून 1500 क्युसेक असा एकूण 7212 cusec इतका विसर्ग नदी पात्रात सुरु
धरण क्षेत्रात पावसाचा जोर कायम
भोगावती आणि पंचगंगा नदी काठच्या नागरिकांनी दक्षता घेण्याचा आवाहन
स्वयंचलित दरवाजे कधी उघडले
1.दरवाजा क्रमांक 3 - वेळ रात्री १० वाजून १ मिनिट
2.दरवाजा क्रमांक 6 - वेळ रात्री १० वाजून ३ मिनिट
3.दरवाजा क्रमांक 5 - वेळ रात्री ११ वाजून ११ मिनिट
4.दरवाजा क्रमांक 4 - वेळ पहाटे ४ वाजून ३६ मिनिट
लष्कर आणि कोंढवा परिसरात घरफोड्या करणाऱ्या सराईत गुन्हेगार टोळीतील तिघांना अटक केली. सीसीटीव्ही चित्रीकरण, तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे पोलिसांनी ही कारवाई केली. हे आरोपी यापूर्वीही अनेक घरफोड्यांच्या गुन्ह्यांत सहभागी असल्याचे तपासात समोर आले आहे.
आर्यन अजय माने ऊर्फ मॉन्टी (वय २१, रा. हरपळे वस्ती, फुरसुंगी), विशाल मारुती आचार्य (वय २५, रा. रामटेकडी) आणि ओमकार सुरेश गोसावी (वय २२, रा. फुरसुंगी) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. आर्यन माने आणि ओमकार गोसावी हे सराईत गुन्हेगार असून, त्यांच्या विरोधात हडपसर, वानवडी आणि लोणीकंद पोलिस ठाण्यांत घरफोडीचे गुन्हे दाखल आहेत.ईस्ट स्ट्रीटजवळील एका बॅंकेत १५ जुलै २०२५ रोजी एकजण कपाट उघडून कागदपत्रांची नासधूस करत होता. तिजोरी उचलून ठेवण्यात आली होती.
महापालिकेच्या भामा आसखेड पाणी पुरवठा योजनेतंर्गत नवीन टाक्या बांधण्यात आल्या आहेत.त्यातून पाणी पुरवठा करण्यात येणार आहे. त्यामुळे भामा आसखेड धरणावर अवलंबून असलेल्या विमाननगर, लोहगाव, हरणतळे, धानोरी, कलवड यासह अन्य भागातील पाणी पुरवठ्याचे वेळापत्रक बदलले आहे. हे सुधारित वेळापत्रक ३१ जुलै २०२५ पासून लागू होणार आहे.त्यामध्ये पहाटे, सकाळी, दुपारी व रात्री या काळात भिन्न भागात पाणी पुरवठा केला जाईल. बदललेल्या वेळापत्रकामुळे नागरिकांना त्रास होऊ शकतो, त्यांनी सहकार्य करावे, असे आवाहन बंडगार्डन पाणी पुरवठा विभागाने केले आहे.
आयटी पार्क हिंजवडी, माण आणि मारुंजी च्या विकास कामात जर कोणी आडवा येत असेल तर त्यांच्या विरोधात सरळ 353 दाखल करा...... कुणाचाही विचार करू नका....... मी जरी मला आळवा आलो तर माझ्यावर पण 353 दाखल करा....... त्याशिवाय हिंजवडी भागातील रस्ता आणि वाहतूक कोंडी चे प्रश्न सुटणार नाही.....!
अशा अतिशय कडक सूचना उप मुख्यमंत्री अजित पवार यांनी पिंपरी चिंचवड चे पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे आणि पीएमआरडीए चे आयुक्त डॉक्टर योगेश म्हसे यांना दिल्या आहेत.
हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार आज पालघर जिल्ह्याला रेड अलर्ट. मागील दोन दिवस पालघर जिल्ह्यात संतधार कायम असली तरी जिल्ह्यातील काही भागात रात्रीपासून पावसाची रिपरिप तर काही भागात पावसाची विश्रांती. जिल्ह्यात सर्वत्र ढगाळ वातावरण असून मुसळधार पावसाची शक्यता कायम .
उप मुख्यमंत्री अजित पवार यांनी आज भला पहाटे आयटी पार्क हिंजवडी परिसराचा आढावा घेतला आहे. आयटी पार्क हिंजवडी, माण आणि मारुंजी परिसरातील अनधिकृत बांधकाम आणि ओढ्या नाल्यावरील अतिक्रमणाचा आढावा घेण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार आज दुसऱ्यांदा भल्या पहाटे पिंपरी चिंचवड शहर दौऱ्यावर आहेत. आपल्या दौऱ्यादरम्यान आयटी पार्क हिंजवडी, माण आणि मारुंजी परिसरातील रस्त्यांचे रखडलेले प्रश्न, वाहतूक कोंडी आणि जल कोंडी सोडविण्याच्या सूचना अजित पवार यांनी पी एम आर डी ए प्रशासन, एमआयडीसी प्रशासन, आणि इतर संबंधित यंत्रणांना दिल्या होत्या. त्याच्याच आढवा घेण्यासाठी अजित पवार भल्या पहाटे हिंजवडी परिसरात दाखल झाले आहेत.
येरवडा क्षेत्रीय कार्यालयातील लिफ्ट गेल्या आठ दिवसांपासून पूर्णपणे बंद होती. काल दुपारी प्रशासनाने घाईघाईत लिफ्ट दुरुस्तीसाठी तंत्रज्ञ बोलावले. मात्र लिफ्टची दुरुस्ती सुरू असतानाच दोन कर्मचारी लिफ्टमध्ये अडकले.
१० ते १५ मिनिटानी त्यांची सुटका करण्यात आली.सुदैवाने जीवितहानी टळली. तीन मजली असलेल्या या इमारतीत दररोज हजारो नागरिक विविध कामांसाठी ये-जा करतात. या इमारतीत तळजल्यावर अन्नधान्य पुरवठा विभाग, समाज विकास विभाग, जन्म- मृत्यू नोंदणी, आधार केंद्र,तर पहिल्या मजल्यावर पोलीस उपायुक्त कार्यालय, निवडणूक कार्यालय आहे. मात्र काल वडगावशेरी चे आमदार आढावा घेणार होते त्याआगोदर घाई गडबडीत लिफ्ट दुरुस्ती करण्याच्या नादात दोन कर्मचारी अडकले.
शहरात हातभट्टी दारू तयार करणाऱ्या तसेच, देशी-विदेशी दारूची अवैध विक्री करणाऱ्यांच्या विरोधात पोलिसांनी मोठी मोहीम राबवली.
या कारवाईत १६ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
परिमंडळ चारचे पोलिस उपायुक्त यांनी मार्गदर्शनाखाली ही विशेष मोहीम राबवण्यात आली.
विविध पोलिस ठाण्यांच्या कार्यक्षेत्रात हातभट्टीच्या अड्ड्यांवर छापे टाकण्यात आले. देशी व विदेशी दारूची अवैध विक्री करणाऱ्यांवर कारवाई करण्यात आली.
त्यात हातभट्टी दारू, रसायन असा मुद्देमाल नष्ट करण्यात आला.
या कारवाईत २९ पोलिस अधिकारी आणि ९५ पोलिस अंमलदारांनी सहभाग घेतला.
पुणे विमानतळावर १० कोटी ५ लाखच्या 'हायड्रोपोनिक वीड'सह प्रवासी अटकेत,एअर पुणे कस्टम्सच्या अधिकाऱ्यांची मोठी कारवाई
बँकॉकहून आलेल्या एका भारतीय प्रवाशाला १० कोटी ५ लाख रुपये किमतीच्या 'हायड्रोपोनिक वीड' (मारिजुआना) सह अटक केली आहे.
संशयास्पद हालचालींमुळे या प्रवाशाला ताब्यात घेण्यात आले होते,त्याच्याकडून सुमारे १०.४७ किलो अंमली पदार्थ जप्त करण्यात आला आहे.
एअर पुणे कस्टम्सच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, अभिनय अमरनाथ यादव असे अटक करण्यात आलेल्या प्रवाशाचे नाव आहे.
तो इंडिगो फ्लाइट क्रमांक 6E-1096 ने २४ जुलै २०२५ रोजी बँकॉकहून पुण्यात दाखल झाला होता.
पुण्याला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला धरणक्षेत्रात २४.८४ टीएमसी पाणीसाठा म्हणजे ८५.२० टक्के पाणीसाठा उपलब्ध
गेल्या यावर्षी याचवेळी धरणात २२.२५ टीएमसी पाणीसाठा म्हणजे ७६.३२ टक्के पाणीसाठा उपलब्ध होता
गेल्यावर्षी याचवेळी पेक्षा अडीच टीएमसी पाणीसाठा जास्त
खडकवासला धरणक्षेत्रात खडकवासला, पानशेत,वरसगाव,टेमघर हे धरण येतात.
वरसगाव धरणातून मध्यरात्रीपासून पाण्याचा विसर्ग सुरू
यावर्षी सुरुवातीच्या काळात चांगला पाऊस झाल्याने धरणक्षेत्रता पाणीसाठा वाढला
खडकवासला १.१३ टीएमसी
पानशेत ९.२३ टीएमसी
वरसगाव ११.५२ टीएमसी
टेमघर २.९५ टीएमसी
कोल्हापूर जिल्ह्यातील धरण क्षेत्रात मुसळधार पाऊस
मुसळधार पावसामुळे राधानगरी धरण 100% भरले
राधानगरी धरणाचे दोन स्वयंचलित दरवाजे उघडले
राधानगरी धरणाचा तीन आणि सहा क्रमांकाचा दरवाजा उघडला
नदीकाठच्या गावांना सतर्क राहण्याचे जिल्हा प्रशासनाचे आदेश
मावळच्या पवनानगर रोडवरील कडधे गावाजवळ मालवाहू ट्रकला अपघात झाला असून कोणतीही जीवितहानी नाही. मात्र वाहन चालकाचे या अपघातात दोन्ही पाय मोडले आहे. दरम्यान कामशेत वरून पवना नगरला मालवाहू ट्रक जात असताना रात्रीच्या अंधारात मालवाहू ट्रकने निलगिरीच्या झाडाला जोरदार धडक दिल्याचे मोठा अपघात झाला. मात्र वन्यजीव रक्षक मावळ आणि ग्रामस्थांच्या प्रयत्नानंतर वाहन चालकाला सुखरूप बाहेर काढण्यात आले आहे. मात्र या अपघातात त्याचे दोन्ही पाय मोडल्याची माहिती पोलिसांनी दिलेली आहे. पुढील उपचारासाठी त्याला सोमाटणे फाटा येथील पवना हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलेले आहे. अधिक तपास लोणावळा ग्रामीण पोलीस करीत आहे..
मराठी तरुणी मारहाण प्रकरण
मानपाडा पोलीस एक्शन मोडवर
पोलिसांशी अरेरावी केल्याप्रकरणी गोकुळ झा विरोधात गुन्हा दाखल
मराठी तरुणीला मारहाण प्रकरणात आरोपी गोकुळच्या याला 14 दिवसांचे न्यायालयीन कोठडी
न्यायालयीन कोठडी मिळाल्यानंतर मानपाडा पोलिसांनी दुसऱ्या दाखल गुन्ह्यात पुन्हा घेतला गोकुळ याचा ताबा
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.