Maharashtra Live News Update Saam tv
महाराष्ट्र

Maharashtra Live News Update: शिरूर शहरातील शेकडो अतिक्रमणावर नगरपरिषदेचा बुलडोजर

Marathi Breaking Live Marathi Headlines Updates : आज शनिवार, दिनांक २३ ऑगस्ट २०२५, मुंबई, ठाण्यात पावसाचा जोर ओसरला, नाशिक पुण्यासह उर्वरित राज्यात मुसळधार पावसाचा इशारा, महाराष्ट्रातील राजकीय घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स वाचा एका क्लिकवर...

Namdeo Kumbhar

अहिल्यानगर-पुणे हायवेवर रांजणगाव गणपती येथे थार आणि टेम्पो यांची धडक

अहिल्यानगर-पुणे राष्ट्रीय महामार्गावरील हॉटेल अमर इन परिसरात आज सकाळी झालेल्या अपघातामुळे मोठी खळबळ उडाली. कुरिअर वाहतूक करणारा छोटा टेम्पो विरुद्ध दिशेने येत असताना, पुण्याकडे जात असलेली थार गाडी याच्याशी जोरदार धडक झाली.

या अपघातात दोन्ही वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही. घटनेची माहिती मिळताच रांजणगाव पोलीस ठाण्यात वाहनधारकांनी तक्रार नोंदवण्यासाठी हजेरी लावली आहे.

वाहनांच्या चुकीच्या दिशेने धावणाऱ्या वाहनांमुळे महामार्गावरील अपघाताचे प्रमाण वाढत असल्याचे स्थानिक नागरिकांकडून सांगण्यात येत असून, वाहतूक नियमांचे काटेकोर पालन व्हावे अशी मागणी होत आहे.

शिरूर शहरातील शेकडो अतिक्रमणावर नगरपरिषदेचा बुलडोजर

शिरूर शहरातील शेकडो अतिक्रमणावर आज नगरपरिषदेने बुलडोजर फिरवत कारवाई केली. टपऱ्या, बंद टपऱ्या, हातगाड्या, दुकानदारांची बाहेर काढलेली शेड, बोर्ड, तसेच वाहतुकीस अडथळा निर्माण करणारी अतिक्रमणे हटवून रस्ते मोकळे करण्यात आले. ही कारवाई यापुढेही सातत्याने सुरू राहील, अशी माहिती नगरपरिषदेचे मुख्याधिकारी प्रीतम पाटील यांनी दिली.गेल्या महिन्यापासून प्रलंबित असलेली ही कारवाई अनेक दुकानदारांना पूर्वसूचना व नोटिसा देऊनच करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. नागरिकांचे म्हणणे ऐकून, पाहणी करून व अतिक्रमणधारकांना पूर्वीच ती काढून टाकण्याची विनंती करूनही कारवाई न झाल्याने अखेर आज बुलडोजर फिरविण्यात आला. यापुढे शहरात अतिक्रमण होऊ नये, यासाठी नगरपरिषद सज्ज राहणार असल्याचेही पाटील यांनी स्पष्ट केले.

शनि अमावस्या निमित्ताने शनिमांडळ देवस्थानला भाविकांची गर्दी

साडेसाती मुक्तीपीठ म्हणून राज्यभरात प्रसिद्ध असलेल्या नंदुरबार जिल्ह्यातील शनिमांडळ येथील शनी अमावस्या निमित्ताने शनी मंदिरात भाविकांची प्रचंड गर्दी. शनि अमावस्या निमित्ताने शनीमाडळ गावात मोठी यात्रा भरत असते आज पहाटेपासूनच शनि देवाचे दर्शन घेण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती महाराष्ट्र मध्य प्रदेश यासह गुजरात राज्यातून मोठ्या संख्येने भाविक हे शनिमांडळ देवस्थानला येत असतात त्यासोबतच साडेसाती दूर व्हावी यासाठी अनेक राजकीय नेते देखील शनि देवाकडे प्रार्थना करत असतात आज शनि अमावस्या असल्यामुळे शनी मंदिरात भाविकांचे प्रचंड गर्दी पाहायला मिळत आहे.. यावेळी नंदुरबारचे आमदार माजी मंत्री डॉक्टर विजयकुमार गावित यांनी सहपरिवार शनि देवाचा दर्शन घेत पूजा अर्चना केली आहे..

मुंबईचा जोगेश्वरी परिसरात इमारतीच्या तळमजल्याला आग

मुंबईचा जोगेश्वरी परिसरात इमारतीच्या तळमजल्याला आग

जोगेश्वरीतील लालानी हेरिटेज पार्क इमारतीच्या तळमजल्यावर महापालिकेच्या माध्यमातून पार्किंग सुरू

पे अँड पार्किंग मध्येच आग लागल्यामुळे रहिवाशांचा उडाला गोंधळ

त्याच ठिकाणी काही वाहनांची देखील इलेक्ट्रिक चार्जिंग सुरू असताना लागली आग

मुंबई अग्निशमन दल घटनास्थळी दाखल

आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश

सध्या पुल्लिंग ऑपरेशनचे काम सुरू

आग नेमकी कशामुळे लागली हे मात्र अद्याप समजले नाही

इंदापूरमध्ये अतिक्रमण काढताना राडा

इंदापूर मध्ये अतिक्रमण काढताना राडा...

इंदापूर तालुक्यातील बाभूळगाव येथिल गायरानावरती अतिक्रमण काढण्यादरम्यान पोलीस आणि पारधी समाजात झाली चकमक... पोलिसांनी केला लाठीचार्ज... पारधी समाजाच्या महिला व लहान मुलांवरती पोलिसांनी केला अमानुषपणे लाठीचार्ज...

सोशल मीडिया वरती व्हिडिओ होतोय वायरल...

इंदापूर पोलीस ठाण्यात पारधी समाजाच्या पाच जणांवर गुन्हा दाखल...

लाठी चार्ज करण्याचा आदेश पोलिसांना कोणी दिला अशी नागरिकांमध्ये होतेय चर्चा...

पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांचा शहरात पाहणी दौरा

पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांचा शहरात पाहणी दौरा

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पोलीस आयुक्त अमितेश कुमार शहरातल्या मुख्य गणेश मंडळांची करणार पाहणी

पुण्यातील मानाचा पहिला कसबा गणपती पासून अमितेश कुमार करणार मंडळांची पाहणी

मंडळाने भेट देत मंडप, शहरातील वाहतूक आणि शहरातील पोलीस बंदोबस्ताची अमितेश कुमार घेणार आढावा

पोलीस आयुक्त सोबत सर्व पोलीस अधिकाऱ्यांनी कर्मचारी पाहणी साठी दाखल

मुंबई गोवा महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी

० मुंबई गोवा महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी सुरु

० माणगाव शहराच्या दोन्ही बाजूला वाहनांच्या लांबच लांब रांगा

० गणेशोत्सवासाठी कोकणात निघालेले चाकरमानी अडकले वाहतूक कोंडीत

० चाकरमान्यांच्या कोकणच्या वाटेवर वाहतूक कोंडीचे विघ्न

० माणगावमधील अरुंद रस्त्यांमुळे वाहतूक कोंडीची समस्या

तळवाडे-भामेर ग्रामस्थांचे आमरण उपोषण तिसऱ्या दिवशीही सुरू

तळवाडे-भामेर ग्रामस्थांचे आमरण उपोषण तिसऱ्या दिवशीही सुरू

उपोषणकर्त्यांची तब्येत खालावली, डॉक्टरांनी तपासणी केली

तब्येत खराब असतानाही आंदोलनावर ठाम निर्धार

हरणबारी ते तळवाडे-भामेर कालव्याचे काम ४५ वर्षांपासून अपूर्ण

सिंचन व पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न कायम

कालव्याच्या कामात गैरव्यवहार झाल्याचा ग्रामस्थांचा आरोप

प्रशासनाकडून दुर्लक्ष झाल्याचा आरोप

मागणी मान्य होईपर्यंत उपोषण सुरूच ठेवणार

मालाडमध्ये महापालिका शाळेच्या खाजगीकरणविरोधात काँग्रेस आक्रमक

महापालिका शाळेच्या खाजगीकरण विरोधात काँग्रेस आक्रमक

मालाड मालवणीतील महापालिका पब्लिक स्कूलचे प्रशासनाने घातला खाजगीकरणाचा डाव

काँग्रेस खासदार वर्षा गायकवाड आमदार असलम शेख यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन

पोलिसांनी आंदोलकांना अडवले

पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांना भेटून निवेदन देण्यासाठी काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक

बार्शी तालुक्यात जोरदार पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकाला फटका

- बार्शी तालुक्यात जोरदार पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकाला फटका

- बार्शीचे माजी आमदार राजेंद्र राऊत यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन केली पाहणी

- बार्शी तालुक्यात झालेल्या पावसामुळे नदी, नाले तुडुंब वाहिल्याने शेतकऱ्यांच्या शेतात पाणीच पाणी

- माजी आमदार राजेंद्र राऊत यांनी तहसीलदार, तालुका कृषी अधिकाऱ्यांसह शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पिकाची पाहणी करत पंचनाम्याची मागणी केली

- उत्तर बार्शीच्या भागातील कोरेगाव, चुंब, खडकोणी, बानसळे, आगळगाव या ठिकाणी करण्यात आली पाहणी

- बार्शी तालुक्यातील झालेल्या नुकसानीसाठी मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्रीना भेटून परिस्थिती सांगणार

आशिष शेलारांची भेट अमित ठाकरेंनी सांगितलं कारण

अमित ठाकरेंनी आज आशिष शेलारांची भेट घेतली. या भेटीत खासगी शाळेतील परिक्षा पुढे ढकलण्याची मागणी केली.

Lonar: लोणार तालुक्यात अतिवृष्टी मुळे शेताला तलावाचे स्वरूप..

लोणार तालुक्यातील बीबी महसूल मंडळाती वझर आघाव, भुमराळा, सावरगाव कासारी, शिवरात ढगफुटी सदृश्य पावसाने पीकांचे अतोनात नुकसान झाले आहे. परिसरातील सर्व शेताना तलावाचे स्वरुप् आले असून शेतातील पिके पूर्ण नष्ट झाले आहे... परंतू शासनाने नदी नाल्या काठचे पंचनामे करण्याचे आदेश दिल्यामुळे सखल भागातील व सततच्या पावसामुळे नुकसान झालेले शेतकरी वंचित राहणार आहेत. त्यामुळे शासनाने नदी नाले ही अट रद्द करुन सरसकट पंचनामे करण्याचे आदेश देण्याची मागणी शेतकरी रघुनाथ आघाव यांनी केली आहे...

मृत्यू दाखल्यासाठी शुल्क रद्द करा,   अंबरनाथ नगरपरिषदेकडे माजी उपनगराध्यक्ष राजेंद्र वाळेकर यांची मागणी

अंबरनाथ नगरपरिषदेने मृत्यू दाखल्याचे शुल्क रद्द करण्याची मागणी अंबरनाथ चे माजी उपनगराध्यक्ष राजेंद्र वाळेकर यांनी केली आहे. एखाद्या कुटुंबात मृत्यू झाल्यानंतर नागरिक मानसिक व आर्थिक संकटात सापडतात, त्यात मृत्यू दाखल्यासाठी आकारले जाणारे शुल्क हा अतिरिक्त बोजा ठरतो. त्यामुळे नागरिकांना दिलासा मिळावा यासाठी मृत्यू दाखला निशुल्क देण्यात यावा, असे निवेदन वाळेकर यांनी नगरपरिषद प्रशासनाला दिले. अनेक महानगरपालिका व नगरपरिषदांनी अशा प्रकारचा निर्णय घेतलेला असून अंबरनाथ नगरपरिषदेकडूनही हा निर्णय होणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. नगरपरिषद प्रशासनाने या मागणीवर सकारात्मक विचार करून तातडीने निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा वाळेकर यांनी व्यक्त केली.

झाडाच्या फांद्या कापताना सोलापूर महापालिका कर्मचाऱ्याचा झाडावरून पडून मृत्यू

तुळजापूर वेस परिसरातील हुतात्मा स्तंभ जवळील फांद्या कपात असताना तोल जाऊन खाली पडल्यामुळे झाला मृत्यू

प्रभुराज कलशेट्टी असं मृत पावलेल्या महापालिका कर्मचाऱ्यांचे नाव आहे.

प्रभुराज कलशेट्टी हे झाडावरून खाली पडल्यानंतर डोक्याला लागला होता जबर मार,त्यामुळे तात्काळ त्यांना खाजगी रुग्णालयात करण्यात आले होते दाखल

मात्र अतिरक्तस्त्राव झाल्याने उपचारादरम्यान या मनपा कर्मचाऱ्याचा झाला मृत्यू

कुटुंबाचा आधार असणारा कर्ता पुरुष गेल्याने प्रभुराज कलशेट्टी यांच्या मुलाला अनुकंपाद्वारे नोकरी मिळावी अशी मागणी नातेवाईक करत आहेत.

Maharashtra Live News Update: अमित ठकरेंनी घेतली आशिष शेलार यांची भेट, नेमकं 'राज'कारण काय?

ठाकरेसेनेसोबत मनसेच्या युतीची जोरदार चर्चा सुरु आहे..दुसरीकडे राज ठाकारेंपाठोपाठ अमित ठाकरे आज मंत्री आशिष शेलारांची भेट घेतली  आहे. भेटीचं कारण गुलदस्त्यात आहे...दोन दिवसांआधी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली होती...त्यामुळे या भेटींची जोरदार राजकीय चर्चा सुरु आहे...

तुटलेल्या विजेच्या तारांमुळे शेतकरी महिलेचा मृत्यू...

बुलढाणा जिल्ह्याच्या संग्रामपूर तालुक्यातील दुर्गादैत्य या शेत शिवारात महिला शेतात काम करत असताना विद्युत पोलवरील तुटलेल्या ताराचा स्पर्श झाल्याने महिलेचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.. सुलोचना उर्फ वनमाला गजानन कारोळे अस मृतक शेतकरी महिलेच नांव आहे.. सदर महिला नेहमी प्रमाणे आपल्या शेतात कामासाठी गेली होती.. या घटनेनंतर ग्रामस्थांनी वीज वितरण कंपनीच्या हलगर्जी व बेजबाबदार कारभारावर तीव्र संताप व्यक्त केला आहे.. महिलेची आर्थिक परिस्थिती हालाखीची असून ती घरातील एकमेव कमावती महिला होती.. त्यामुळे विज वितरण कंपनीने मृतक महिलेच्या कुटुंबियांना भरीव मदत करण्याची मागणी केली जात आहे...

चंद्रभागेच्या पाणी पातळीत मोठी घट; पंढरपूरवरील पुराचे संकट टळले

उजनी आणि वीर धरणातून भीमा नदी पात्रात सोडण्यात आलेला विसर्ग कमी केला आहे. त्यामुळे पंढरपुरात आज चंद्रभागेच्या पाणी पातळीत मोठी घट झाली आहे. सध्या पंढरपुरात चंद्रभागा नदीत 1लाख 28 हजार क्युसेक इतका सुरू आहे.

दरम्यान काल पासून उजनी धरणातून मोठ्या प्रमाणावर विसर्ग कमी केला आहे. आज सकाळ पासून फक्त 30 हजार क्युसेक इतका विसर्ग ठेवण्यात आला आहे.दोन दिवस भीमा नदीला पुर आला होता. पुणे आणि परिसरात पावसाने उसंत घेतल्याने उजनीत येणारी पाण्याची आवक ही कमी झाली आहे. पुराचा धोका टळल्याने नदीकाठच्या नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

मुंबई गोवा महामार्गावर वाहनांच्या संख्येत वाढ

गणेशोत्सावासाठी मोठ्या संख्येत मुंबईकर चाकरमान्यांनी कोकणाकडे कुच केल्याच चित्र मुंबई गोवा महामार्गावर दिसत आहे. आज सकाळपासूनच मुंबई गोवा महामार्गावर वाहनांच्या संख्येत वाढ झाली असून कोकणात जाणारे मार्ग फुल्ल झाले आहे. गणपती उत्सावासाठी लागणारे सामान गाडीवर बांधुन कोकणवासीय कोकणात निघाले आहेत तर त्यांना त्रास होऊ नये यासाठी रायगड पोलिस महामार्गावर उतरले असून वाहतुकीच नियोजन करीत आहेत.

सोलापूर जिल्ह्यात ऑगस्ट महिन्यात अपेक्षा 105 पट जास्त पावसाची नोंद,पावसाचा खरीप हंगामाला फटका

- जिल्ह्यात ऑगस्ट महिन्यात 281 मिलिमीटर पावसाची दमदार हजेरी, सरासरी पावसापेक्षा 105 पट पावसाची नोंद

- मे महिन्यात पडलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांनी चार लाख 37 हजार हेक्टरवर खरीप हंगामाची पेरणी केली होती पूर्ण

- ऑगस्ट महिन्यात पडलेल्या पावसामुळे 41 हजार हेक्टर पिकाचं नुकसान

- भीमा सीना आणि नदी नाले तलाव यांना आलेल्या पुरामुळे शेतकऱ्यांच्या शेतात पाणी शिरले

- जिल्ह्यातील उत्तर सोलापूर, दक्षिण सोलापूर आणि अक्कलकोट तालुक्यात सर्वाधिक नुकसानाची नोंद

- जिल्ह्यातील बाधित शेतकऱ्यांच्या शेतात पंचनामे करण्याचे जिल्हा प्रशासनाचे आदे

सरकारी आत्महत्या प्रकरणात गुन्हा दाखल झालेल्या न्यायाधीशाच्या पोलिसांकडून शोध सुरू

बीडच्या वडवणी मध्ये न्यायालयाच्या इमारतीमध्ये सरकारी वकील विनायक चंदेल यांनी गळफास घेऊन आपले जीवन संपवले आहे या प्रकरणांमध्ये त्यांनी सुसाईड नोट लिहून ठेवली होती ती नोट पोलिसांच्या हाती लागली असून त्यामध्ये त्याच न्यायालयातील न्यायाधीश रफिक शेख आणि दीपिकाच्या ज्याच्यास कंटाळून आत्महत्या केल्याचे शेतीमध्ये म्हटले आहे आणि या प्रकरणात न्यायाधीशासह लिपिका विरोधात वडवणी पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे याचा तपास वरिष्ठ उपविभागीय पोलीस अधिकारी राजगुरू यांच्याकडे न्यायाधीशाच्या शोधासाठी पोलीस तैनात न्यायाधीशाचा पोलिसांकडून शोध सुरू.

मुंबई येथील सराफा व्यापाऱ्यास चाकूचा धाक दाखवून समृद्धी महामार्गावर लुटलं

मुंबई येथील शेषमलजी जैन हे सराफा व्यापारी खामगाव येथे व्यापारासाठी आले होते. काल सायंकाळी ते खामगाव येथून मुंबईकडे जात असताना मेहकर टोल नाक्यानंतर समृद्धी महामार्गावर त्यांच्या वाहन चालकाने कार थांबवून... मला फ्रेश व्हायचं..! असं म्हणत समृद्धी महामार्गावर रस्त्याच्या कडेला कार थांबवली. त्यानंतर लगेचच मागून एका चार चाकी वाहनाने आलेल्या चार दरोडेखोरांनी कारमध्ये बसलेल्या शेषमलजी जैन यांच्या डोळ्यात मिरची पावडर टाकून त्यांच्या कारमधील साडेचार ते पावणे पाच किलो सोने असलेली बॅग व रोकड घेऊन हे दरोडेखोर फरार झाले .

मनोज जरांगे यांनी चलो मुंबईचा नारा दिल्यानंतर ओबीसी समाज बांधवांचे आज बीडमध्ये बैठक

ओबीसी आरक्षण बचाव पार्श्वभूमीवर बीडमध्ये ओबीसींच्या हक्कासाठी ओबीसी नेते लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांच्या प्रमुख उपस्थितीत ओबीसी समाजाची बैठक आज बारा वाजता बीडमध्ये होणार आहे मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी ओबीसी मधून आरक्षण मिळवण्यासाठी चलो मुंबईचा नारा दिला असून याच पार्श्वभूमी वरती आता ओबीसी आरक्षण बचाव कृती समितीने बीडमध्ये महत्त्वाच्या बैठकीचे आयोजन केला असून बीडच्या स्वागत मंगल कार्यालयात ही बैठक होणार आहे या बैठकीकडे सर्वांचे लक्ष लागले असून लक्ष्मण हाके यांनी माळी समाजाबद्दल केलेल्या वक्तव्यानंतर पहिल्यांदाच वाघमारे आणि हाके एकत्रित आहेत

राज्यात पावसाचा जोर ओसरला

पुढील काही दिवस पाऊस कमी राहणार असल्याचा हवामान विभागाचा अंदाज

राज्यातील पावसाची तीव्रता कमी झाली आहे. मात्र,राज्यातील कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात पुढील काही दिवस मध्यम स्वरूपाच्या पावसाचा 'यलो अलर्ट' देण्यात आला आहे.

पुढील काही दिवस पाऊस कमी राहण्याचे संकेत आहेत

राज्यातील रायगड, रत्नागिरी, पुणे, सातारा, रायगड, विदर्भातील बहुतांश जिल्ह्यांत शनिवारी तसेच रविवारी मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याचा अंदाज आहे.

हवामान विभागाने पुढील दोन आठवड्यांचा हवामान अंदाज दिला असून 28 ऑगस्टपर्यंतच्या आठवड्यापर्यंत कोकणातील तुरळक भाग वगळता राज्यात पाऊस कमी राहणार आहे.

28 ऑगस्ट ते 4 सप्टेंबरच्या कालावधीत कोकण तसेच विदर्भात पाऊस अधिक राहणार आहे.इतरत्र पाऊस कमी राहील

त्यामुळे आठवड्यात पाऊस कमीच असल्याचा अंदाज

तुर्भे नाका ते महापे मुख्य रस्त्यावर प्रचंड वाहतूक कोंडी – नागरिक त्रस्त, अपघातांची मालिका सुरू

तुर्भे MIDC येथील तुर्भे नाका ते महापे या मुख्य रस्त्यावर दररोज भयानक वाहतूक कोंडी होत आहे. या समस्येमुळे स्थानिक नागरिक, शालेय विद्यार्थी, महिला, वृद्ध व कामगार वर्ग अत्यंत त्रस्त झाले आहेत.

ठाणे-बेलापूर रोडवरील तुर्भे स्टेशनसमोरील ब्रिजचे काम नवी मुंबई महानगरपालिकेकडून सुरू करण्यात आले होते. मात्र तांत्रिक अडचणी व काही लोकांच्या राजकीय स्वार्थामुळे हे काम रखडले. ब्रिजसाठी करण्यात आलेल्या खोदकामामुळे ठाणे-बेलापूर रोडवरील वाहतूक या रस्त्यावर वळविण्यात आली असून त्यामुळे संपूर्ण वाहतूक तुर्भे MIDC, इंदिरानगर, गणपती पाडा, बोनसरी गाव, चुनाभट्टी, आंबेडकर नगर, गणेश नगर या वसाहतींमधून जात असल्याने नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.

पर्यावरणाचे संवर्धन राखण्यासाठी पर्यावरण प्रेमींकडून वसईत 22 हजार वृक्षारोपण

वसई विरार शहरातील पर्यावरण समतोल राखण्यासाठी वसई पश्चिमेकडील बाभोला नाका परिसरात मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण करण्यात आले. पर्यावरण प्रेमी आणि स्थानिक नागरिकांच्या पुढाकाराने झालेल्या या उपक्रमात तब्बल 22 हजार झाडांची लागवड करण्यात आली.

या उपक्रमात आंबा, करंज, सुरुची, कंदब, वड, पिंपळ यांसारख्या स्थानिक आणि पर्यावरणपूरक झाडांचा समावेश होता. वृक्षारोपणाच्या या कार्यक्रमात वसई विरार शहर महानगरपालिकेचे माजी महापौर राजीव पाटील यांनी सहभाग घेतला होता.

15 वर्षांपासून रखडलेला महामार्गावर गणेशोत्सवाच्या तोंडावर तात्पुरती खड्डेबाजी

मुंबई गोवा महामार्गाचं काम तब्बल 15 वर्षांपासून रखडलेलं असतानाच गणेशोत्सवाच्या तोंडावर केवळ खड्डे बुजवण्याच्या नावाखाली ठेकेदारांकडून तात्पुरती कामं सुरू करण्यात आली आहेत. कुठे डांबर ओतलं जातंय तर कुठे सिमेंटचा आधार घेऊन खड्डयांना झाकलं जात आहे. मात्र या तात्पुरत्या उपायांनी गणेशभक्तांच्या प्रवासात खरंच दिलासा मिळणार का, की पुन्हा काही दिवसांतच रस्ते पूर्ववत खड्डेमय होतील? असा सवाल उपस्थित होत आहे

शरद पवारांनी आयुष्यभर मतांची चोरी करून,घर भरायचे काम केलं - मंत्री जयकुमार गोरे.

शरद पवारांनी आयुष्यभर मतांची चोरी करून,घर भरायचे काम केलं,अशी घणाघाती टीका ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी केली आहे.आयुष्यभर त्यांनी लोकांचा वापर करून घेतला,हे लोकांच्या लक्षात आले आहे,हे फक्त मत चोर आहेत, त्यामुळे त्याचे उत्तर लोकांना मतांची रूपाने,

त्यांना दिले आहे,अशी टीका मंत्री जयकुमार गोरे यांनी केली आहे.शरद पवार आणि जयंत पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन मत चोरी झाल्याचे पुरावे निवडणूक आयोगाला सादर करणार असल्याचे जाहिर केले आहे, यावरून मंत्री गोरे यांनी सांगलीच्या जत मध्ये दहीहंडी सोहळ्या प्रसंगी ही टीका केली आहे.

नाशिकच्या जय भवानी रोड परिसरात परप्रांतीय आणि मराठी वाद

- गाडी शिकणाऱ्या परप्रांतीय व्यक्तीने या भागातील एका गाडीला दिली धडक

- धडक दिल्यानंतर या परप्रांतीय व्यक्तीने अरेरावी केल्याचा आरोप

- मराठी लोगो की औकात क्या? तुम मराठी लोक भंगार हो, अशी मुजोरी केल्याचा आरोप

- यानंतर या मराठी माणसाने स्थानिक मनसे पदाधिकाऱ्यांना दिली घटनेची माहिती

- मनसे पदाधिकाऱ्यांकडून परप्रांतीय व्यक्तीला समज दिली जात असतानाही त्याने केली अरेरावी

- मराठी बोलण्यास नकार देताच मनसे पदाधिकाऱ्यांनी दिला चोप

नाशिक जिल्हा परिषदेची ३ वर्षांपासूनची प्रतीक्षेत पुनर्रचना अखेर जाहीर

- नाशिक जिल्हा परिषदेची अंतिम गट गण रचना जाहीर

- ६४ हरकतींवर झाली सुनावणी, ४२ हरकती फेटाळल्या तर १७ अंशतः आणि ५ पूर्ण मान्य

- झेडपीची सदस्य संख्या एका सदस्याने वाढणार

- यंदा जिल्हा परिषदेच्या ७४ गट आणि १४८ गणासाठी होणार निवडणूक

- चांदवड, मालेगाव आणि सुरगाण्यात वाढला प्रत्येकी १ गट

- तर निफाड आणि ओझरचा प्रत्येकी १ गट झाला कमी

- अंतिम गट आणि गण रचनेनंतर आता आरक्षण सोडत जाहीर होणार

माणिकराव कोकाटे यांची आमदार रोहित पवार यांना मानहानीची नोटीस

- विधान भवनात कोकाटेंचा रमी खेळतानाचा व्हिडिओ प्रकरण

- माणिकराव कोकाटे यांची आमदार रोहित पवार यांना मानहानीची नोटीस

- विधान भवनात कोकाटेंचा रमी खेळतानाचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर राज्यात उडाली होती खळबळ

- रोहित पवार यांनी कोकाटेंचा रमी खेळतानाचा व्हिडिओ आणला होता समोर

- या नोटीसीबाबत रोहित पवार यांनी आपल्या समाजमाध्यमावरून कोकाटेंना लगावला टोला

- कोकाटे साहेब तुमचा काळ आला होता, पण वेळ आली नव्हती

Maharashtra Live News Update: मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज पुण्यात

मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज पुण्याच्या दौऱ्यावर आहेत. पुणे शहर प्रमुख पदाधिकाऱ्यांची घेणार बैठक

महानगरपालिका निवडणूक पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांची पुण्यात आज बैठक

बैठकीला निमंत्रित पदाधिकारीच असणार

सावित्रीबाई फुले स्मारक गंज पेठ येथे बोलावली बैठक.

खडकवासला धरण साखळीत ९५.४३ टक्के पाणीसाठा

शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला धरण साखळीतील सर्व चार धरणांत मिळून २७.८२ टीएमसी म्हणजेच ९५.४३ टक्के पाणीसाठा आहे. मागील वर्षी याच दिवशी २८.२९ टीएमसी म्हणजेच ९७.०६ टक्के साठा होता.

यावर्षीचा साठा मागील वर्षाच्या तुलनेत यंदाचा साठा १ टीएमसीने कमी आहे.पण एकूण पाणीसाठा समाधानकारक आहे.खडकवासला धरणातून आजपर्यंत जवळपास १४ टीएमसी पाणी मुठा नदीत सोडले आहे. गेले काही दिवसात खडकवासला धरण क्षेत्रात पावसाची चांगली हजेरी.

महापालिकेच्या ७५० लेटलतीफ कर्मचाऱ्यांना नोटीस आयुक्तांनी उगारला कारवाईचा बडगा

पुणे महापालिकेचे कामकाज सकाळी पावणेदहा वाजता सुरू होते पण अनेक अधिकारी कर्मचारी हे उशिरा येतात त्यामुळे त्याचा कामकाजाचा परिणाम होत आहे.

अशा अधिकाऱ्यांबाबत महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी कडक भूमिका घेतली.

काल सकाळी पावणेदहा नंतर महापालिकेच्या सर्व प्रवेशद्वार बंद केले उशिरा आलेल्या सुमारे ७५० कर्मचाऱ्यांची नावे लिहून घेतली आणि त्यांना कारणे दाखवा नोटीस बजविण्यात आलेली आहे.

यामध्ये सहा विभाग प्रमुखांचा समावेश आहे.या प्रकारामुळे प्रशासनामध्ये खळबळ उडाली आहे.

मुख्य महापालिका भावना सह क्षेत्रीय कार्यालयांमध्ये कर्मचारी अधिकारी सकाळी उशिरा येतात आणि संध्याकाळी लवकर निघून जातात.

नवल किशोर राम यांनी महापालिकेची सूत्रे हाती घेतल्यानंतर अधिकारी व कर्मचारी वेळेवर हजर झाले नाहीत, तर थेट कारवाई होईल. दोन आठवड्यांपूर्वीही उशिरा येणाऱ्यांना ताकीद देण्यात आली होती, मात्र त्यातूनही काही धडा घेतला गेला नाही. त्यामुळे काल सकाळी धडक मोहिम राबवून उशीरा आलेल्या कर्मचाऱ्यांना थेट प्रवेशद्वारावरच रोखण्यात आले.

सतीश मराठे यांची नाबार्डच्या संचालकपदी नियुक्ती

सहकार क्षेत्रातील ज्येष्ठ तज्ज्ञ आणि सहकार भारतीचे संस्थापक सदस्य सतीश मराठे यांची राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँकेच्या (नाबार्ड) संचालकपदी केंद्र सरकारने नियुक्ती केली आहे.

बँकिंग, सहकार आणि ग्रामीण विकास या क्षेत्रातील त्यांचा प्रदीर्घ अनुभव लक्षात घेऊन केंद्राच्या अर्थ मंत्रालयाने हा निर्णय घेतला आहे.

सतीश मराठे सध्या रिझर्व्ह बँकेचे संचालक म्हणून कार्यरत आहेत.सहकार क्षेत्रातील त्यांचे कार्य आणि अभ्यासपूर्ण भूमिका यामुळे ते ओळखले जातात.

नाबार्डसारख्या महत्त्वपूर्ण वित्तीय संस्थेच्या संचालक मंडळात त्यांच्या समावेशामुळे ग्रामीण अर्थव्यवस्था, कृषीविकास आणि सहकार चळवळीस नवी गती मिळेल,अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

बाणेरमध्ये दोघांकडून साडेतीन किलो गांजा जप्त

बाणेर पोलिसांनी ज्युपिटर हॉस्पिटलसमोरील एका सोसायटीजवळ दोघांना अटक करून त्यांच्या ताब्यातून तीन किलो ४०० ग्रॅम गांजा जप्त केला. अमली पदार्थ विरोधी मोहिमेला गती देत बाणेर पोलिसांनी ही कारवाई केली.

रवी विजय वर्मा (वय १९) आणि कौशेलेंद्र नथुप्रसाद वर्मा (वय २३, दोघे रा. शिव कॉलनी, पिंपळे सौदागर) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.

हे दोघे मूळचे उत्तरप्रदेशातील चित्रकूट जिल्ह्यातील आहेत. हे दोघेजण एका सोसायटीजवळ गांजा विक्रीसाठी आल्याची माहिती मिळाल्यानंतर छापा टाकण्यात आला.

तपासात त्यांच्या ताब्यातून गांजा जप्त करण्यात आला.या प्रकरणी बाणेर पोलिस ठाण्यात एन.डी.पी.एस. कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai Pune Missing Link : मुंबई-पुणे प्रवास आणखी सुसाट! 'मिसिंग लिंक' या दिवशी सुरू होणार, महत्त्वाची अपडेट समोर

Ganesh Chaturthi 2025: तुमच्याही घरी गणपती बसणार आहे? बाप्पाची मूर्ती आणताना 'या' 7 नियमांचं पालन अवश्य करा

भाजप आमदारावर डॉक्टरला मारल्याचा आरोप, क्षुल्लक कारणावरून दादागिरी; परिसरात खळबळ

Nagpur : गावाला जाताना काळाचा घाला, कुलगुरू अन् पत्नीचा जागेवरच मृत्यू, कारचा चक्काचूर

Moisturizer : दिवसा आणि रात्री एकच मॉइश्चरायझर वापरणं योग्य आहे का? जाणून घ्या तज्ज्ञांचे मत

SCROLL FOR NEXT