Maharashtra Live News Update Saam tv
महाराष्ट्र

Maharashtra Live News Update: वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरण, आरोपींविरोधात दोषारोपपत्र दाखल

Marathi Breaking Live Marathi Headlines Updates : आज सोमवार, दिनांक १४ जून २०२५, शिवसेना कोणाची? सुप्रीम कोर्टात आज सुनावणी, राज्यात हॉटेल मालकांचा संप, राजकीय घडामोडी, मुंबई-पुण्यासह राज्यातील महत्त्वाचे अपडेट्स वाचा एका क्लिकवर...

Namdeo Kumbhar

वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरण, आरोपींविरोधात दोषारोपपत्र दाखल

हुंड्यासाठी मानसिक, शारीरिक छळ करून वैष्णवी हगवणे यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणात पती, सासरा, सासू, दीर, नणंदेसह एकूण अकरा आरोपींविरोधात पुणे न्यायालयात आरोपपत्र दाखल. दोषारोपपत्र एकूण १६७० पानांचे असून त्यात सर्व आरोपींविरोधात ठोस पुरावे संकलित करण्यात आल्याचा दावा बावधन पोलिसांनी केला.

सासरी होणाऱ्या शारीरिक व मानसिक छळाला कंटाळून वैष्णवी शशांक हगवणे (वय २४, रा. मुक्ताई गार्डनजवळ, भुकूम, मुळशी) यांनी १६ मेला राहत्या घरात गळफास घेत आत्महत्या केली. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी अलिशा बागल यांच्या न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले आहे.

करमाळा भाजपा शहराध्यक्ष जगदीश अग्रवाल यांच्यावर खुनी हल्ला

आरोपी लाकडी दांडक्याने मारहाण करतानाचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे.

करमाळा शहरातील धक्कादायक घटना.

मागील दोन तीन दिवसांपूर्वी झालेल्या किरकोळ भांडणाच्या कारणावरून मारहाण झाल्याची माहिती आहे.

दीपक काटे वर 307 चा गुन्हा दाखल करा, सचिन खरात यांची मागणी

चंद्रकांतदादा पाटील यांच्यावर शाई फेकनाऱ्या कार्यकर्त्यावर 307 गुन्हा दाखल केला होता त्याचप्रमाणे दीपक काटे वर 307 चा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष सचिन खरात यांनी केलीय.

मुंबईच्या पश्चिम उपनगरात अर्धा तासापासून जोरदार पाऊस

या जोरदार पावसामुळे अंधेरी सबवे पाण्याखाली गेला आहे.

सबवे हा सखल भाग असल्यामुळे अंधेरी सबवे खालील दोन ते तीन फूट पाणी भरल्यामुळे अंधेरी सबवे वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे.

अंधेरी पोलीस आणि वाहतूक पोलिसांच्या माध्यमातून अंधेरी सबवे बाहेर बॅरिकेट लावून बंद करण्यात आला आहे.

अंधेरी सबवे बंद झाल्यामुळे अंधेरी पूर्व आणि पश्चिम परिसरात वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे.

मनमाडला संतप्त शेतकऱ्यांनी कृषी अधिकाऱ्यांना घातला घेराव

कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या नाशिक जिल्ह्यात खतांचा टंचाई जाणवत आहे. खते असताना विक्रेत्यांकडून कृत्रिम टंचाई निर्माण करून अवाजवी दरात खतांची विक्री केली जात असल्याचा आरोप होत असून, खतांची लिंकिंग केले जात असल्याने शेतकऱ्यांना टंचाईमुळे खरिपाच्या पिकांना गरज असतांना खते देता येत नसल्याने पिकांची वाढ खुंटली आहे.त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये तीव्र संताप आहे.

माथेरानमध्ये इ रिक्षावर झाड कोसळून अपघात

० चालत्या रिक्षावर कोसळले झाड

० सुदैवाने मोठी दुर्घटना टळली

० तिघे जण जखमी

पुण्यातल्या हवेली तालुक्यातल्या श्रीराम नगरमध्ये कोयता गँगचा दहशत माजवण्याचा प्रयत्न

घटनेचा १० जुलै गुरुवारचा व्हिडीओ आला समोर

रात्रीच्या सुमारास काही जणांनी कोयत्यासारख्या धारदार शस्त्रांनी अचानक पानटपरीवर हल्ला करत, टपरीमधील साहित्याची प्रमाणात तोडफोड करत दहशत माजवण्याचा केला प्रयत्न

या घटनेमुळे नागरिकांत भीतीचे वातावरण

मनसे अध्यक्ष राज ठाकरे इगतपुरीत दाखल

- ढोल ताशाच्या गजरात राज ठाकरे यांचं कॅमल व्हॅली रिसॉर्ट मध्ये स्वागत

- राज ठाकरे यांच्या उपस्थितीत आज पासून कॅमल व्हॅली रिसॉर्टमध्ये तीन दिवसांचं शिबिर

माजी उपसरपंचाचा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण

परळी मतदारसंघात तुतारीचे काम केले म्हणून वाल्मीक कराड यांनी माझी सुपारी दिली.. दोन वेळा मारहाण केली..वाचलो आता माझा जीव घेऊ शकतात म्हणत बीडच्या लिंबगाव येथील माजी उपसरपंच यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू केले आहे.

पक्षाचं नाव दुसऱ्याला देणं हा निवडणूक आयोगाचा अधिकार नाही - उद्धव ठाकरे

चिन्हाचा निकाल ऑगस्टमध्ये देणार असतील तर, समाधानकारक बाब असल्याचं शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे म्हणाले आहेत. तसेच पक्षाचं नाव दुसऱ्याला देणं हा निवडणूक आयोगाचा अधिकार नाही, असंही ठाकरे म्हणाले. विधान भवन परिसरात प्रसारमाध्यमांशी बोलताना ठाकरेंनी हे वक्तव्य केलं.

किल्ल्याचं सर्वधन करणं सरकारसह आपल्या सर्वांचं कर्तव्य - उद्धव ठाकरे

युनेस्कोने छत्रपती शिवाजी महाराजांच्या १२ गड-किल्ल्यांना जागतिक वारसा स्थळ म्हणून मान्यता दिली आहे. यामुळे मराठी माणसाचा स्वाभिमान उंचावला आहे. यावर उद्धव ठाकरेंनी प्रतिक्रिया दिली. किल्ल्याचं सर्वधन करणं सरकारसह आपल्या सर्वांचं कर्तव्य आहे, असं ठाकरे म्हणाले.

कर्जबाजारीपणातून तरुणाची आत्महत्या; पेट्रोल ओतून घेतला जीव

अंबरनाथ तालुक्यातील नेवाळी फाट्याजवळ एक धक्कादायक घटना घडली आहे. कर्जबाजारी झालेल्या करण परब या २८ वर्षीय तरुणाने स्वतःच्या दुचाकीमधून पेट्रोल काढून अंगावर ओतले आणि जिवंत जळून घेतले. या प्रकारात त्याचा जागीच मृत्यू झाला असून मृतदेह पूर्णतः कोळसा झाला होता.

सोलापूर जिल्ह्यात पावसाची जोरदार बॅटिंग

सोलापूर जिल्ह्यात पावसाची जोरदार बॅटिंग

तब्बल एक महिन्यांच्या विश्रांतीनंतर सोलापूर जिल्ह्यात पावसाच्या सरी पुन्हा कोसळू लागल्या

मागच्या महिन्याभरापासून सोलापूर जिल्ह्यामध्ये पावसाने पाठ फिरवल्याने बळीराजा होता हवालदिल

मात्र आज सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट तालुका आणि दक्षिण सोलापूर तालुक्यात पावसाने केलेल्या जोरदार बॅटिंग मुळे बळीराजा सुखावला

मागचा पूर्ण महिना कोरडा गेल्याने शेतकरी राजाला सतावत होती चिंता,

मात्र अचानक आलेल्या पावसामुळे सोलापूरकरांना मिळाला दिलासा.

टेम्पो चालकाच्या कमरेचा चावा घेणारा गुन्हेगार अटकेत

दिवसभर काम करून घरी परतणाऱ्या टेम्पो चालकावर शिट्टी वाजवल्याचा जाब विचारल्याने प्राणघातक हल्ला झाला. उल्हासनगर कॅम्प 2 मधील अमरसिंग लबाना हे सोमवारी रात्री मोटरसायकलवरून घरी जात होते. त्यांच्यामागून साहिल गायसमुद्रे नावाचा युवक अ‍ॅक्टिवावरून शिट्टी वाजवत चालला होता. जाब विचारल्यावर साहिलने अश्लील शिवीगाळ करत वाद घातला. दोघांनी एकमेकांच्या गाड्यांच्या चाव्या काढल्यावर साहिलने अमरसिंग यांना मारहाण करत त्यांच्या डाव्या बरगडीस चावा घेतला आणि डोळ्यावर दगडाने मारले.अमरसिंग गंभीर जखमी झाले असून, कर्तव्यावर असलेल्या पोलिसांनी तत्काळ साहिलला ताब्यात घेतले. त्याच्यावर विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात गंभीर मारहाणीचा गुन्हा दाखल असून तपास सुरू आहे.

अंबरनाथमधील बारचालकांचा एकदिवसीय बंद; सरकारच्या करवाढीविरोधात आंदोलन

सरकारने दारूवरील एक्साईज ड्युटी व लायसन्स शुल्कात मोठी वाढ केल्याच्या निषेधार्थ अंबरनाथमधील बारचालकांनी आज एकदिवसीय बंद पुकारला आहे. शहरातील ४० पेक्षा जास्त बार व रेस्टॉरंट आज पूर्णपणे बंद ठेवण्यात आले आहेत.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे इगतपुरीत दाखल

- मनसे अध्यक्ष राज ठाकरे इगतपुरीत दाखल

- ढोल ताशाच्या गजरात राज ठाकरे यांचं कॅमल व्हॅली रिसॉर्टमध्ये स्वागत

- राज ठाकरे यांच्या उपस्थितीत आजपासून कॅमल व्हॅली रिसॉर्टमध्ये तीन दिवसांचं शिबिर

प्रवीण गायकवाड यांच्यावरील हल्ल्याचा परभणीत निषेध

संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्यावर काल सोलापूर येथे झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ परभणीतील पुरोगामी संघटनेने निषेध व्यक्त केला आहे शहरातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यापासून सर्व पुरोगामी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी एकत्र येऊन जिल्हाधिकारी कार्यालया पर्यंत मार्च काढत या घटनेचा निषेध केला आहे शिवाय तात्काळ या आरोपींना अटक करण्याची मागणी या सर्व पदाधिकाऱ्यांनी केली आहे.

मेहकर येथे संभाजी ब्रिगेडसह विविध संघटनांनी केला रस्ता रोको..

संभाजी ब्रिगेड चे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा निषेध म्हणून आज मेहकर येथे संभाजी ब्रिगेड सह विविध संघटनांनी एकत्र येत रस्ता रोको आंदोलन करण्यात आले तर जोरदार घोषणाबाजी करत या घटनेचा निषेध केलाय .. शिवाय राज्यपाल यांच्याकडे निवेदन दिले असून आरोपींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आलीय.

Pune: पुणे जिल्ह्यात गोवंशाची तस्करी उधळली, गोरक्षकांमुळे वाचले ३२ म्हशींचे प्राण

पुणे -

पुणे जिल्ह्यात गोवंशाची तस्करी उधळली

गोरक्षकांच्या यशस्वी कार्यवाहीमुळे वाचले ३२ म्हशींचे प्राण

पुण्यातील शिक्रापूर मध्ये गोरक्षकांनी उधळली तस्करी

बार्शी वरून कल्याणच्या दिशेने घेऊन निघालेल्या ट्रक मध्ये होत्या ३२ म्हशी

Pune: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात सुरू असलेल्या विद्यार्थ्यांचे आंदोलन 2 दिवसांसाठी स्थगित

पुणे -

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात सुरू असलेल्या विद्यार्थ्यांचे आंदोलन दोन दिवसासाठी स्थगित

विद्यापीठ प्रतिनिधींशी चर्चा झाल्यानंतर विद्यार्थ्यांनी दोन दिवसासाठी आंदोलन स्थगित केलं

कॅरी ऑन च्या मागणीसाठी विद्यार्थी आज सकाळपासून करत होते आंदोलन

Kolhapur : कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालयात रिव्हॉल्व्हर घेऊन जाणाऱ्याला पोलिसांनी केली अटक

कोल्हापूर -

कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालयात रिव्हॉल्व्हर घेऊन जाणाऱ्याला पोलिसांनी केली अटक

एका गुन्ह्यात साक्ष देण्यासाठी आला होता हा व्यक्ती

कमरेला रिव्हॉल्व्हर लावून कोर्टात घुसलेल्या व्यक्तीला घेतलं पोलिसांनी ताब्यात

रिव्हॉल्व्हर जप्त करून संबंधित व्यक्तीची पोलिसांनी सुरू केली चौकशी

Ratnagiri: रत्नागिरीत जोरदार पावसाला सुरुवात, आज यलो अलर्टचा इशारा

रत्नागिरी -

रत्नागिरीत पावसाला जोरदार सुरुवात

रत्नागिरी जिल्ह्याला आज यलो अलर्टचा इशारा

गेल्या आठवडाभरापासून पावसाचा ओसरला होता जोर

अधुनमधून तुरळ कोसळत होत्या

रत्नागिरीत सकाळपासून ऊन होत मात्र दुपारनंतर पावसानं जोरदार हजेरी लावली

पावसाअभावी शेतीची कामं रखडली होती या दमदार पावसानं आता शेतीच्या कामाला वेग येणार आहे

Ratnagiri: रत्नागिरीत हॉटेल बार असोसिएशनच्या वतीने बंदची हाक, परमिट रूट आणि बार धारकांचा कडकडीत बंद

रत्नागिरी जिल्ह्यातील हॉटेल बार असोसिएशनच्या वतीने बंदची हाक

परमिट रूट आणि बार धारकांचा कडकडीत बंद

सरकारने अन्यायकारक कर वाढीच्या विरोधात आंदोलन

मद्यपींना या बंदचा फटका

सरकारने परवाना शुल्क 15 टक्के वाढविले आहे तर उत्पादन शुल्क 60 टक्के ने वाढविले

सरकारच्या विरोधात सकाळी 11 वाजेपासून संध्याकाळी 5 वाजेपर्यंत परमिट रूम बंद

कोकणातील सर्व हॉटेल्स बार बंदच सहभागी

Yavatmal: बच्चू कडूंच्या रॅलीमुळे नागपूर-तुळजापूर राष्ट्रीय महामार्ग ठप्प, वाहनांच्या लांबच लांब रांगा

यवतमाळ -

बच्चू कडूंच्या रॅलीमुळे नागपूर-तुळजापूर राष्ट्रीय महामार्ग ठप्प, बच्चू कडूंची सातबारा कोर पदयात्रेचा होतोय समारोप

नागपूर- तुळजापूर राष्ट्रीय महामार्गांवर दोन्ही बाजूने वाहनांच्या लांबलचक रांगा, शेतकरी पदयात्रा मुळे वाहतूक ठप्प

यवतमाळ कडून नांदेड कडे आणि नांदेड वरून यवतमाळ कडे येणारी वाहतूक दोन्ही लेनवर ठप्प झाल्याने वाहन चालक त्रस्त

आज महागाव तालुक्यातील आंबोडा येथे बच्चू कडू यांच्या सातबारा कोरा पद यात्रेचा होताहेत समारोप

Solapur:  संभाजी ब्रिगेडचे प्रवीण गायकवाड हल्ला प्रकरणी आरोपींवरती प्रतिबंधक कारवाई केली जाणार

सोलापूर-

संभाजी ब्रिगेडचे प्रवीण गायकवाड हल्ला प्रकरणी आरोपींवरती प्रतिबंधक कारवाई केली जाणार

प्रवीण गायकवाड यांच्यावर काल शिवप्रतिष्ठांच्या कार्यकर्त्यांनी केली होती शाई फेक

आरोपी विरोधात दाखल गुन्हा जामीन पात्र असल्याने कोणालाही अटक नाही

मात्र आरोपीने पुन्हा एकदा असे कृत्य करू नये म्हणून प्रतिबंधात्मक कारवाई केली जाईल

Pune News: मागणी मान्य होईपर्यंत उठणार नाही, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात विद्यार्थी आंदोलनावर ठाम

पुणे -

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात विद्यार्थी अजूनही आंदोलनावर ठाम

मागणी मान्य होईपर्यंत आम्ही उठणार नाही विद्यार्थी आग्रही

जी आर द्या तरच आंदोलन थांबवू

प्रशासकीय अधिकारी भेटून गेल्यानंतर देखील विद्यार्थी आंदोलनावर ठाम

दोन दिवसाची मुदत द्या अस अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आलं होतं

मात्र विद्यार्थी उपोषणावर ठाम

Jalna News: शाळेच्या वर्ग खोलीतच मुख्याध्यापक मद्यधुंद अवस्थेत, व्हिडीओ होतोय व्हायरल 

जालना -

शाळेच्या वर्ग खोलीतच मुख्याध्यापक मद्यधुंद अवस्थेतअसल्याचा धक्कादायक प्रकार समोर

भोकरदन तालुक्यातल्या टाकळी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील प्रकार

मद्यधुंद अवस्थेत झोपा घेत असतानाचा मुख्याध्यापकाचा व्हिडिओ व्हायरल, वैद्यकीय चाचणी केल्यानंतर नशेमध्ये असल्याचा स्पष्ट

Pune News: संकष्टी चतुर्थीनिमित्त रांजणगाव श्री महागणपती मंदिरात भाविकांची मोठी गर्दी

संकष्टी चतुर्थी निमित्त रांजणगाव श्री महागणपती मंदिरात भाविकांची मोठी गर्दी

रांजणगाव – संकष्टी चतुर्थीच्या निमित्ताने श्री महागणपती मंदिरात पहाटेपासूनच दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी झाली.

मंदिरात अभिषेक, सामूहिक अथर्वशीर्ष पठण, महापूजा, भजन तसेच प्रसादाची व्यवस्था करण्यात आली होती.

पोलिस निरीक्षक महादेव वाघमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता असे देवस्थान ट्रस्ट अध्यक्ष स्वाती पाचुंदकर यांनी सांगितले

Navi Mumbai: नवी मुंबईमध्ये पावसाला सुरुवात

खारघर बेलापूर वाशी नेरूळ या भागात पावसाचे हजेरी

क्षणभर विश्रांतीनंतर नवी मुंबई शहरात मुसळधार पाऊस

बच्चू कडूंनी करपे कुटुंबियांची घेतली भेट

पहिली शेतकरी आत्महत्या यवतमाळच्या महागांव तालुक्यातील चिलगव्हाण इथे झाली होती.अशात बच्चू कडूंनी चिलगव्हाण येथील करपे कुटूंबियांची भेट घेतली.दरम्यान यावेळी कडू यांनी साहेबराव करपे यांच्या प्रतिमेचं पुजन केलं.तदनंतर माजी मंत्री कडू हे अंबोडा येथील गजानन महाराज मंदीच्या दिशेने रवाना झाले असून या ठिकाणी सातबारा कोरा पदयात्रेचा समारोप होणार आहे.

संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्या वर झालेल्या हल्ल्याचा नांदेडमध्ये निषेध

संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्यावर सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट येथे शाही फेकण्यात आली. गायकवाड यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा आता राज्यभरात तीव्र निषेध सुरू आहे. नांदेड मध्ये देखील मराठा संघटना आक्रमक झाल्या आहेत. मराठा समाज संघटनेचे पदाधिकारी,कार्यकर्ते एकत्र येत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर या हल्ल्याचा निषेध करण्यात आला. हल्ला करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी यावेळी संभाजी ब्रिगेडच्या वतीने करण्यात आली आहे.

नवी मुंबई शहरातील रेस्टॉरंट आणि बारचा कडकडीत बंद

नवी मुंबई शहरातील रेस्टॉरंट अँड बार असोसिएशन ने आज कडकडीत बंद ठेवला आहे. राज्य सरकारच्या उत्पादन शुल्क वाढ धोरणा विरोधात हा बंद ठेवण्यात आला आहे.

तसेच नवी मुंबई शहरातील 700 पेक्षा अधिक बार असल्यामुळे ते आज बंद राहणार आहे

तसेच हॉटेल व्यवसायकांनी एकत्र येत मुख आंदोलन नवी मुंबईत करण्यात आलं

राज्य सरकारने मद्य विक्रेत्यांवर अन्यायकारकपणे करवाढ लादली आहे. यामध्ये मूल्यवर्धित कर 5 टक्क्यांवरून 10 टक्के, वार्षिक परवाना शुल्क मध्ये १५ टक्के आणि उत्पादन शुल्कात तब्बल ६० टक्के वाढ करण्यात आली आहे.

संभाजी ब्रिगेड नेते प्रवीण गायकवाड यांचा पोलिस संरक्षण घेण्यास नकार

अकलूज पोलिसांनी पोलिस सुरक्षा आणि पायलट वाहन देण्याबाबत सांगितले असता , आपण सामान्य कार्यकर्ता आहे. मला याची गरज नाही. शासकीय अधिकाऱ्यांनी आपला अशा गोष्टीत वेळ वाया घालवू नये. सरकारने मला मारायचे ठरवले असेल तर कसेही मारतील तुम्ही कसे वाचवणार अक्कलकोट मध्ये रचलेला कट पोलिसांना माहिती होता. तिथे संरक्षणाची गरज होती. योजना बनवताना पोलिस स्टेशन मध्ये चर्चा झाली. गुन्हेगारांना त्यांनी दूध पाजले.

Sion-Panvel: सायन - पनवेल हायवेवर ट्रक पलटी

वाशी येथे डिवाडरवर आदळून ट्रक पलटी

मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या मार्गीकेवर ट्रक पडल्याने वाहतूकीला अडथळा

पेपरच्या रद्दीने भरलेला ट्रक पलटी

राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटातर्फे महावितरण कार्यालयाल्यावर मोर्चा

गेले काही दिवसांपासून नाशिकच्या येवला शहर व ग्रामीण भागामध्ये विजेचा लपंडाव सुरू असून अनेक ठिकाणी तारा या लोंबलेल्या अवस्थेमध्ये आहे,

महावितरण कार्यालयात फोन करून देखील कर्मचारी दखल घेत नसल्यामुळे सुरळीत वीज पुरवठा व्हावा याकरता राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट येवला शहर व तालुका यांच्या वतीने उपविभागीय अभियंता महावितरण कार्यालयावर युवा नेते शाहू शिंदे यांच्या नेतृत्वामध्ये मोर्चा काढण्यात येऊन अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.

युनेस्को मानांकित १२ किल्ल्यांची ‘शिवतिर्थ’ यात्रा सुरू करावी, मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे मागणी

छत्रपती श्री शिवाजी महाराजांच्या १२ किल्ल्यांना युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांमध्ये समावेश झाल्यानंतर आता, या १२ किल्ल्यांची ज्योतिर्लिंग यात्रे प्रमाणे ‘शिवतिर्थ यात्रा’ राज्य मार्ग परिवहन महामंडळाद्वारे सुरू करण्यात यावी, आणि या यात्रेचा शुभारंभ शिवनेरी किल्ल्यावरून सांस्कृतिक आणि परिवहन मंत्र्यांच्या हस्ते व्हावा अशी मागणी सह्याद्री गिरिभ्रमण संस्थेने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.

धनुष्यबाण चिन्हावरची आजची सुनावणी संपली, पुढची तारीख ऑगस्टमध्ये

धनुष्यबाण चिन्हावरची आजची सुनावणी संपली आहे. आता पुढच्या महिन्यात यावर सुनावणी होणार आहे.

Vegetable Rate: भाज्यांचे दर कोसळले ३० ते ४० टक्के टक्के

मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये भाज्यांच्या गाड्यांची आवक 700 पेक्षा जास्त झाल्या असल्यामुळे भाज्यांचे दर कोसळलेले आहेत त्यामुळे 30 ते 40% भाज्यांची दर कोसळल्यामुळे व्यापाऱ्यांच्या शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे त्यामुळे शेतकऱ्यांवर आणि व्यापाऱ्यांवर भाजीपाला फेकण्याची वेळ येत आहे

शक्तिपीठ महामार्गाच्या समर्थनासाठी गडहिंग्लज शहरात निघाला मोर्चा

आमदार शिवाजीराव पाटील यांच्या नेतृत्वाखाली निघाला मोर्चा

मोर्चामध्ये माजी सैनिक, शेतकरी आणि भाजप कार्यकर्त्यांचा सहभाग

गडहिंग्लज तहसील कार्यालयावर निघालाय शक्तीपीठ महामार्ग समर्थनाचा मोर्चा

Andheri: अंधेरी पूर्वेतील चकाला जंक्शन जवळ मोठी वाहतूक कोंडी

चकाला जंक्शनवर बेस्ट बस बंद पडल्याने मोठी वाहतूक कोंडी

सकाळची कामावर जाण्याची वेळ मात्र वाहतूक कोंडी अडकले चाकरमानी

सकाळी वरदळीच्या वेळी कर्मचारी आणि पोलिसांना नाहक त्रास सहन करावा लागतो

वाहतूक पोलिसांकडून वाहतूक कोंडी सोडवण्याचा काम सुरू

Raigad: रायगडमध्ये एसटी बसला भीषण अपघात, ३ प्रवासी जखमी

० ST बस ला रायगडच्या माणगावमध्ये भीषण अपघात

० सुदैवाने मोठी दुर्घटना टळली

० माणगाव येथून जामखेडला निघालेली ST बस निजामपूर नजीक कलंडली

० 22 प्रवासी करत होते प्रवास पैकी 3 जण किरकोळ जखमी

० जखमींवर माणगाव उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू

Nashik: नाशिक मुंबई महामार्ग धुक्यात हरवला

- नाशिक मुंबई महामार्गावर इगतपुरी, कसारा परिसरात धुक्याची दाट चादर

- दात धोक्यामुळे दृश्य मानता कमी झाल्याने महामार्गावरील वाहतूक संथ गतीने

- अधून मधून पावसाच्या देखील सरी बरसत असल्याने इगतपुरी कसारा परिसरात अल्हाददायक वातावरणाचा अनुभव

Rashtravadi: राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्यावतीने पालिकेसमोर गाजर व रताळी आंदोलन

मांजरी बु. सह पुणे महानगरपालिकेत नव्याने समाविष्ट झालेल्या ३२ गावांतील मिळकत धारकांना करावर २% सावकारी व्याज दंड लावून ४०% मिळकत कर सवलतीचे व विकासाचे गाजर दाखवणाऱ्या महाराष्ट्र शासन व पुणे महानगरपालिका प्रशासनाच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने "गाजर व रताळी आंदोलन"

Bacchu Kadu: शिंदेंनी पक्ष घेऊन जायला नको होतं- बच्चू कडू

शिवसेना पक्षाचे नाव आणि धनुष्यबाणावर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होत आहे उद्धव ठाकरेंनी नाव चिन्ह आणि झेंडा वापरण्याची परवानगी मागितली आहे दरम्यान प्रहारचे बच्चू कडू यांनी एकनाथ शिंदेनी बंडखोरी केली इतपर्यंत ठिक होतं.मात्र त्यांनी पक्ष आणि चिन्ह घेऊन जायला नको होतं अशी प्रतिक्रिया बच्चू कडू यांनी पदयात्रेदरम्यान साम टिव्हीशी बोलतांना दिली.

जयंत पाटलांनी राजीनामा दिलेला नाही- सुप्रिया सुळे

जयंत पाटील यांनी राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिले असल्याचे सांगितले जात होते. मात्र, त्यांनी राजीनामा दिलेला नाही, असं सुप्रिया सुळेंनी सांगितले आहे.

Satara: साताऱ्यात  मुसळधार पावसात जिल्हाधिकारी प्रकल्पग्रस्तांच्या भेटीला...

हातात काठी, रेनकोट, वरून कोसळणारा मुसळधार पाऊस अगदी जवळचे सुद्धा दिसत नाही असे दाट धुके अशा वातावरणात चिखल तुडवत जिल्हाधिकारी संतोष पाटील पोहोचले चाळकेवाडीच्या पुढे असलेल्या कोयना व्याघ्र प्रकल्प बाधित वेळे गावात. ज्या गावात ग्रामसेवक तलाठी जात नाही अशा गावात अचानक जिल्हाधिकारी आल्यामुळे सर्वजण अवाक झाले. यावेळी जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी प्रत्येक घरात जाऊन तेथील ग्रामस्थांशी संवाद साधून तेथील समस्या जाणून घेतल्या.

Supriya Sule: सुप्रिया सुळे यांचा पुणे दौरा

पुण्यातील सिंहगड रोडवर सुरू असलेल्या उड्डाणपूलाच्या कामाची सुप्रिया सुळे करणार पाहणी

गेल्या अनेक दिवसांपासून या उड्डाणपूलाचे काम सुरूच

अधिकाऱ्यांसमवेत सुप्रिया सुळे करणार कामाची पाहणी

मुंबई गोवा महामार्गाबरोबरच प्रमुख शहरांना जोडणाऱ्या रस्त्यांची खड्ड्यांमुळे चाळण

पर्यटन जिल्हा असलेल्या सिंधुदुर्गात सध्या रस्त्यावरील खड्ड्यांचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. मुंबई गोवा महामार्गाबरोबरच आता प्रमुख शहरांना जोडणाऱ्या रस्त्यांची खड्ड्यांमुळे चाळण झाली आहे. पर्यटकांसाठी महत्त्वाचा असणाऱ्या कुडाळ-मालवण रस्त्याची खड्ड्यांमुळे दयनीय अवस्था झाली आहे. या रस्त्यावर ठीकणीकाणी मोठमोठे खड्डे पडले असून काही ठीकणी पाण्याची डबकी तयार झाली आहेत. या मार्गावरून हजारो पर्यटक मालवणला पर्यटनासाठी येत असतात. मात्र या मार्गावरील खड्डे पर्यटकांसाठी डोकेदुखी ठरत आहेत. या डबकी व खड्ड्यातूनच वाहनचालकांना मार्ग काढत पुढे जाव लागत आहे. सध्या सिंधुदुर्गात पावसाच प्रमाण कमि असल्यामुळे हे खड्डे बुजविण्याची मागणी मागणी होत आहे.

सकल मराठा समाजाची आज पुण्यात बैठक

सकल मराठा समाजाची आज पुण्यात बैठक

प्रविण गायकवाड यांच्यावर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ या बैठकीचे आयोजन

हल्ल्याच्या विरोधात निषेध व्यक्त करण्यासाठी आज मराठा समाजाचे बांधव एकवटणार

पुण्यातील शिवाजीनगर येथे दुपारी ११.३० वाजता बैठक

बच्चू कडूंच्या पद यात्रेचा आज समारोप

शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्याची मागणी घेऊन प्रहारचे बच्चू कडू यांनी पदयात्रा सुरू केली ही पदयात्रा यवतमाळच्या गुंज येथून आंबोड्यासाठी रवाना झाली असून महागाव तालुक्यातील गजानन महाराज मंदिरात बच्चू कडूंच्या शेतकरी सातबारा कोरा पद यात्रेचा समारोप होणार आहे रात्रीपासूनच कडून चे समर्थक आंबोळ्या दाखल झाले आहे

रत्नागिरी जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुकीचे वारे

जिल्ह्यातील 847 ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाच्या आरक्षणाची आज सोडत

पाच वर्षासाठी वेगवेगळ्या प्रवर्गासाठी आरक्षण सोडत

जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील तहसिलदार कार्यालयात निघणार सोडत

राजकीय दृष्य़ा ग्रामपंचायत निवडणुकांना सुद्धा महत्व, 2023 सालापासून ग्रामपंचातींच्या निवडणुका नाहीत

चिपळूण तालुक्यातील सर्वाधिक म्हणजे 130 ग्रामपंचायती,संगमेश्वर तालुकयातील 127 ग्रामपंचायती, खेड तालुक्यातील 114, दापोली तालुक्यातील 106, राजापूर तालुक्यातील 101, रत्नागिरी तालुक्यातील 94, गुहागर तालुक्यातील 66,लांजा तालुक्यातील 60 तर मंडणगड तालुक्यातील 49 ग्रामपंचायतींसाठी सरपंच पदासाठी आरक्षण सोडत आज

अमरावती जिल्ह्यात 95 टक्के पेरण्या पूर्ण 

अमरावती जिल्ह्यात सहा लाख 45 हजार हेक्टरवर पेरणी आटोपली आहे.याची टक्केवारी 95 टक्के असून केवळ पाचच टक्के पेरण्या अमरावतीत करणे बाकी आहे,मात्र अमरावतीच्या काही भागात नांदगाव खंडेश्वर तालुक्यामध्ये पिकांना पाहिजे त्या प्रमाणात मध्ये पाऊस झाला नसल्याने पावसाअभावी धोका सुद्धा निर्माण झाला आहे,यावर्षी सर्वाधिक सोयाबीन पिकाची लागवड शेतकऱ्यांनी केलेली दिसून येत आहे,कापसाची दोन लाख 29 हजार हेक्टर मध्ये लागवड करण्यात आली,तसेच सोयाबीनची देखील दोन लाख 39 हजार हेक्टर वर लागवड करण्यात आली,विशेष म्हणजे मेळघाटातील धारणी तालुक्यात 280 हेक्टरवर उसाची लागवड शेतकऱ्यांनी केली आहे, अमरावती जिल्ह्यातील उर्वरित पाच टक्के पेरण्या मंगळवार पर्यंत पूर्ण होईल अशी अपेक्षा कृषी विभागाला आहे,आता पेरण्या पूर्ण झाल्याने दमदार असा पाऊस पडावा अशी अपेक्षा लागून राहिली आहे.

रस्त्याच्या मागणीसाठी भंडाऱ्याच्या करडी मार्गावर ग्रामस्थांचं रास्तारोको

भंडाऱ्याच्या भिलेवाडा ते करडी या राज्य मार्गावर वाळूची वाहतूक करणारे मोठ्या प्रमाणात ओव्हरलोड टीप्पर धावतात. त्यामुळं या राज्यमार्गावर ठीकठिकाणी मोठमोठे भगदाड पडलेत तर, काही ठिकाणची गिट्टी उघडली आहे. या मार्गावरून प्रवास करताना अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. त्यामुळं हा जीवघेणा प्रवास थांबावा यासाठी भिलवाडा ते करडी राज्य मार्गावर शेकडो ग्रामस्थांनी प्रशासनाला जाग यावी यासाठी रास्ता रोको आंदोलन केलं. तब्बल तीन तास पर्यंत हा महामार्ग वाहतुकीसाठी बंद पडला होता. अधिकाऱ्यांनी याची दखल घेत ग्रामस्थांना लेखी आश्वासन देत पुढील चार दिवसात हा मार्गाची डागडुजी केल्या जाईल, असं आश्वासन दिल्यानंतर रास्तारोको आंदोलन मागं घेण्यात आलं.

पुण्याच्या गुडलक कॅफेचा परवाना तात्पुरता निलंबित

अन्न व औषध प्रशासनाकडून प्रसिद्ध गुडलक कॅफेला दणका

बन मस्क्यामध्ये काचेचा तुकडा आढळून आल्यानंतर एफडीए ने केला कॅफेचा परवाना तात्पुरता निलंबित

तपासणी दरम्यान काही अस्वच्छ परिस्थिती आढळून आल्याने तसेच आवश्यक अनुपालन होईपर्यंत आणि पुढील आदेश येईपर्यंत परवाना निलंबित केल्याची माहिती

काही दिवसांपूर्वी एका व्यक्तीला गुडलक कॅफे मध्ये प्रसिद्ध असलेल्या बन मस्का मध्ये काचेचा तुकडा आढळून आला होता

या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता

या घटनेनंतर एफडीए ने व्हायरल व्हिडिओ ची दखल घेत तक्रार नोंदवली होती

तपासणीत आढळलेल्या त्रुटी दूर होईपर्यंत गुडलक कॅफेचा परवाना निलंबित राहणार

विदर्भाचं काश्मीर असलेल्या चिखलदऱ्यात रविवारी पर्यटकांच्या गर्दीने मोडला आतापर्यंतचा रेकॉर्ड

विदर्भाच काश्मीर असलेल्या चिखलदऱ्यात रविवारी पर्यटकांच्या गर्दीने मोडला आतापर्यंतचा रेकॉर्ड...

तब्बल 5 हजार वाहनांमधून काल 35 हजार पेक्षा अधिक पर्यटक आले चिखलदऱ्यामध्ये...

वाहनांची गर्दी झाल्याने लांबच लांब रांगा चिखलदऱ्यामध्ये काल लागलेल्या होत्या.

मागील आठवड्यात संततधार पाऊस झाल्याने चिखलदऱ्याच सौंदर्य आणखी बहरल आहे..

त्यामुळे शनिवार आणि रविवारच्या सुट्ट्यांचा आनंद घेण्यासाठी पर्यटक चिखलदऱ्यामध्ये दाखल झाले होते.

छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वारूढ पुतळा बसवण्याची किनवटकरांची मागणी

नांदेडच्या किनवट शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये महाराजांचा अश्वारूढ पुतळा बसवण्याची मागणी शिवप्रेमी नागरिकांमधून होत आहे. किनवट शहरात एक मे 1963 रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा बसवण्यात आला होता. मात्र त्या ठिकाणी नव्याने मोठा पुतळा बसवण्याची मागणी नागरिकांनी केली होती. नव्याने आणलेला महाराजांचा अश्वारूढ पुतळा हा बसवण्यात आला नसून.तो अग्निशामक दलाच्या कार्यालयात मागील दीड वर्षापासून बंदिस्त आहे. त्यामुळे शिवप्रेमी नागरिकांमधून संताप व्यक्त केला जात आहे. लवकरात लवकर छत्रपती शिवाजी महाराजांचा बंदिस्त असलेला अश्वारूढ पुतळा नियोजित जागेवर बसवावा अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा किनवटकरांनी दिला आहे.

Maharashtra Live News Update : भंडाऱ्यात अज्ञात वाहनाच्या धडकेत महसूल कर्मचाऱ्याचा मृत्यू

साकोलीकडं जाणाऱ्या महसूल कर्माचाऱ्याच्या दुचाकीला भरधाव वेगात आलेल्या अज्ञात वाहनानं जबर धडक दिली. यात दुचाकीवरील विलास चचाने (४०) यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. ही घटना भंडारा बायपास महामार्गावरील अझिमाबाद इथं रात्री घडली. मृत विलास चचाने हे साकोली इथं उपविभागीय कार्यालयात अव्वल कारकून या पदावर कार्यरत होते. मृतक चचाने हे त्यांच्या मामाचा अंत्यसंस्कार आटोपून साकोलीकडं परत जात असताना हा अपघात घडला. कारधा पोलिसांनी अज्ञात वाहन चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

विरोधकांच्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर सरकार देत आहे, प्रश्न सभागृहात मांडले त्याचे उत्तर मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांनी शासनातर्फे समाधान केला आहे, आणि याही आठवड्यामध्ये जे काही प्रश्न मांडले त्याचाही आम्ही चांगल्या पद्धतीने उत्तर देऊ, या महाराष्ट्राच्या सभागृह काम करणारा विरोधकांनी विधायक काम करावं आम्ही त्याच्या स्वागत करून त्यांनी मांडलेल्या प्रश्नाचं उत्तर देऊ
चंद्रशेखर बावनकुळे, महसूल मंत्री, महाराष्ट्र

प्रविण गायकवाड यांच्यावरील भ्याड हल्ला निंदनीय, विचारांची लढाई विचारांनी लढावी..कोल्हे

अक्कलकोट मध्ये सामाजिक कार्यकर्ते प्रविण गायकवाड यांच्यावर झालेला भ्याड हल्ला निंदनीय असल्याचा प्रतिक्रिया खासदार अमोल कोल्हेंनी दिलीय. या प्रकरणी भाजप युवा मोर्चाच्या पदाधिकाऱ्याचे नाव समोर येत असून, भाजपाने यावर स्पष्टीकरण द्यावे विचारांची लढाई ही विचारांनी लढली पाहिजे, प्रविण गायकवाड यांच्यावरचा भ्याड हल्ला ही वैचारिक दिवाळखोरी असल्याचा प्रतिक्रिया खासदार अमोल कोल्हेंनी दिली. मुख्यमंत्री फडणवीस यांनी यामध्ये स्पष्ट भूमिका घेऊन कठोर कारवाई करावी अशी मागणीही कोल्हेंनी केलीय

नागपूरात पावसाचा बॅकलॉग दूर, मात्र धरणांचा बॅकलॉग कायम

- तीन दिवसाच्या संततधार पावसाने पावसाचा बॅकलॉग दूर केला... पण धरणांच्या साठ्याचा बॅकलॉग मात्र अजूनही कायम

- नागपूर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या कामठी खैरी धरणाचा जलसाठा 87.97 टक्क्यावर तर तोतला डोहच्या जलसाठा 61% इतका आहे...

- नागपुरात 24 तासात 200 मिलिमीटर पावसाची नोंद झाली असली तरी धरणांमध्ये पाणीसाठा वाढला नाही...

- नागपूर जिल्ह्याला पाणीपुरवठा करणाऱ्या खैरी, खिंडसी, तोतलाडोह या धरणांमध्ये सध्या 50% च्या वर जलसाठा जमा आहे

- तर नांद जलाशयात फक्त 31 टक्के पाणीसाठा

- पुढील काही दिवस पावसाची उघडीप असणार असल्याने धरणासाठी वाढसाठी प्रतीक्षा करावी लागणार आहे.

वलंग येथील रस्त्याच्या दुरावस्थेमुळे ग्रामस्थ त्रस्त

म्हाप्रळ पंढरपुर राष्ट्रीय मार्गाच्या रुंदीकरणाचे काम सुरु असून प्रगती पथावर आहे. मात्र वलंग गावच्या हद्दीत या रस्त्याची पार दुरावस्था झाली आहे. रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले असून यामुळे येथील ग्रामस्थ आणि या रस्तावरून प्रवास करणारे पंचक्रोशीतील ग्रामस्थ त्रस्त झाले आहेत. वलंग गावच्या हद्दीतील या खराब रस्त्यामुळे वाहनांच्या दुरुस्तीची काम निघत आहेत त्याच बरोबर अपघातदेखील आहेत. बांधकाम ठेकेदार, शासकिय अधिकारी आणि लोक प्रतिनिधी देखील याकडे दुर्लक्ष करीत असल्याची खंत वलंग येथील ग्रामस्थ व्यक्त करीत आहेत.

स्टेरिंग लॉक झाले अन् चहाटपरीत शिरला ट्रॅक्टर

भंडारा जिल्ह्यातील तुमसर तालुक्यातील राष्ट्रीय महामार्गावरील स्टेशनटोली शिवारात एका ट्रॅक्टरचे स्टेरिंग अचानक लॉक झाले. त्यात अनियंत्रित ट्रॅक्टर थेट रस्त्याशेजारील चहाच्या टपरीत शिरल्याची धक्कादायक घटना घडली. या अपघातात टपरीत बसलेला एक तरुण आणि ट्रॅक्टर चालक गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर स्थानिक रुग्णालयात उपचार सुरू आहेत. गंभीर जखमी युवकाचे नाव लक्ष्मण हलमारे रा. खापा व ट्रॅक्टर चालक श्रावण भिवगडे रा. तुडका असे आहे.माहितीनुसार, स्टेशनटोली परिसरातून ट्रॅक्टर भरधाव वेगात जात असताना अचानक स्टेरिंग लॉक झाल्याने चालकाचा वाहनावरील ताबा सुटला

Maharashtra Live News Update : आज मराठा समाजाची पुण्यात महत्त्वाची बैठक

संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्यावर भ्याड हल्ला झाल्यानंतर आज मराठा समाजाने पुण्यात महत्त्वाची बैठक बोलावली आहे. संभाजी ब्रिगेड, मराठा सेवा संघ , मराठा क्रांती मोर्चाचे कार्यकर्ते पदाधिकारी बैठकीला उपस्थित राहणार आहेत. प्रवीण गायकवाड यांच्यावर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ पुढील रणनीती ठरवण्यात येणार आहे सकाळी ११.३० वाजता बैठक होणार आहे.

Maharashtra Live News Update : - नाशिकच्या इगतपुरीमध्ये आजपासून मनसेचं राज्यस्तरीय शिबिर

- नाशिकच्या इगतपुरीमध्ये आजपासून मनसेचं राज्यस्तरीय शिबिर

- आजपासून इगतपुरीच्या कॅमल रिसॉर्टमध्ये मनसेच्या प्रमुख नेते, पदाधिकाऱ्यांचं ३ दिवसीय शिबीर

- शिबिरासाठी कपड्यांची बॅग घेऊनच या, राज ठाकरेंचं नेते, पदाधिकाऱ्यांना फर्मान

- मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या उपस्थितीत होणार ३ दिवसीय शिबीर

- आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीवर शिबिरात होणार मंथन

- उद्धव ठाकरेंसोबत राजकीय युतीसंदर्भात राज ठाकरे जाणून घेणार नेते, पदाधिकाऱ्यांच्या भावना

- मराठीच्या मुद्द्यावर राज आणि उद्धव एकत्र आले असले, तरी राजकीय दृष्ट्या अधिकृत घोषणा नसल्यानं संभ्रम कायम

- राज ठाकरे शिबिरात नेते, पदाधिकाऱ्यांना काय राज मंत्र देतात, याकडे सर्वांचं लक्ष

Pune : पुणे-नाशिक औद्याोगिक महामार्गाबाबत अहवाल

सेमी हायस्पीड रेल्वेला समांतर मार्गाचा प्रकल्प अव्यवहार्य

पुणे-नाशिक औद्याोगिक महामार्गाबाबत अहवाल

दळणवळण व्यवस्था सक्षम करण्यासाठी एमएसआरडीसीने ४,२१७ किमीचे रस्त्यांचे जाळे विणण्याचा निर्णय घेतला आहे

पुणे-नाशिक औद्याोगिक महामार्ग हा त्यातील एक महत्त्वाचा प्रकल्प आहे

पुणे-नाशिक अंतर पाच तासांवरून दोन ते अडीच तासांवर आणण्यासाठी हा प्रकल्प एमएसआरडीसीने हाती घेतला आहे.

रेल्वेला समांतर महामार्ग नेणे अशक्य असल्याचे एमएसआरडीसीच्या अहवालात नमूद

पंतप्रधान पिक विमा योजनेची अंतिम मुदत 31 जुलैपर्यंत

पंतप्रधान पिक विमा योजनेत सीएससी केंद्रावर विमा अर्ज भरण्यासाठी प्रति शेतकरी 40रुपये शुल्क

शेतकऱ्याने विमा हप्त्या व्यतिरिक्त इतर शुल्क देऊ नये कृषी विभागाने शेतकऱ्यांना केले आवाहन

विमा योजनेत जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी सहभागी व्हावे कृषी विभागाचे शेतकऱ्यांना आवहान

Pune News : हडपसर भागात पिण्याच्या पाण्यामध्ये ड्रेनेजचे पा

पुण्यातील हडपसर भागात असणाऱ्या तुळजाभवानी वसाहत गाडीतळ येथे पिण्याच्या पाण्यामध्ये ड्रेनेजचे पाणी मिक्स झालं आहे. नागरिकांनी वेळोवेळी तक्रार करूनही महानगरपालिका लक्ष देत नसल्याचा आरोप नागरिकांनी केलाय.हे पाणी अधिकाऱ्यांना पाजणार असा इशारा शिवसेना पदाधिकाऱ्यांनी दिला आहे. ड्रेनेजचे पाणी पिण्याच्या पाण्यात मिक्स झाल्याने अनेक साथीचे रोग होण्याची शक्यता निर्माण झाली आहे पालीकेने लवकरात लवकर काम करावा अशी मागणी होत आहे.

Shiv sena : भारतीय सैन्यासाठी शिवसेना शिंदे गटाकडुन जम्मू-कश्मीर मध्ये 9 ऑगस्ट रोजी सिंदूर महारक्तदान शिबिर

जम्मू-कश्मीर मध्ये भारतीय सैन्यासाठी येत्या 9 ऑगस्ट रोजी सिंदूर महारक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले आहे.डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांच्या माध्यमातून शिवसेना शिंदे गटाच्यावतीने हा महारक्तदान पार पडणार असून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उद्योग मंत्री उदय सामंत यांच्यासह प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत सिंदूर महारक्तदान उपक्रमाचे उदघाटन होणार असल्याची माहिती शिवसेना शिंदे गटाचे नेते डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांनी दिली आहे.

जम्मू-काश्मीरच्या उधमपूर आणि आर्मी कमांड हॉस्पिटल येथे हा उपक्रम संपन्न होणार आहे.यासाठी येत्या पाच ऑगस्ट रोजी सांगलीतून धर्मवीर एक्सप्रेस या विशेष रेल्वेने जिल्ह्यातील एक हजार युवक जाणार आहेत.

Dharashiv : कत्तलीसाठी घेऊन जाणाऱ्या 19 गायींची सुटका, तिघांविरुद्ध भुम पोलीसात गुन्हा दाखल

धाराशिव जिल्ह्यातील भुम शहरातील धाराशिव रस्त्यावर निर्दयीपणे गायींची वाहतुक करणाऱ्या दोन वाहने गोरक्षकांनी अडवले असुन यातील 19 गायींची सुटका केली आहे.ही कारवाई भुम मधील हॉटेल श्रावणी जवळ करण्यात आली या प्रकरणी तिघांविरुद्ध भुम पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.गोरक्षकांनी पाठलाग करुन टेम्पो पकडला यामध्ये 19 गायी निर्दयीपणे कोंबुन कत्तलीसाठी नेत असताना मिळुन आल्या या प्रकरणी विराज आनंद सोले यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अलिम रसुल सय्यद,सैफ सल्लोद्धीन कुरेशी,रामदास शिवाजी दराडे यांच्या विरोधात भुम पोलीसात गुन्हा दाखल केला असुन 19 गायींना हांडोंग्री येथील गोशाळेत सुरक्षितपणे सोडण्यात आले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune News: पुणे विद्यापीठात विद्यार्थ्यांचं आक्रमक आंदोलन; ग्रेस मार्क आणि परीक्षा पॅटर्नवरून गोंधळ

Fact Check: 500 रुपयाच्या नोटा बंद होणार? एटीएममध्ये नोटा न टाकण्याचे बँकांना आदेश? काय आहे व्हायरल मेसेजमागचं सत्य?

Ravindra Jadeja : एकटा नडला, इंग्लंडला घाम फोडला; भारताचा पराभव झाला, पण रवींद्र जडेजा लक्षात राहीला

IND vs ENG 3rd Test: लय भारी! शानदार रवींद्र जडेजा; बनवला ७२ वर्षांत एकाही भारतीयाला न जमलेला विक्रम

Maharashtra Politics: शिंदे की ठाकरे, धनुष्यबाण कुणाचा? पालिका निवडणुकीत कुणाचं टेन्शन वाढणार?

SCROLL FOR NEXT