Maharashtra Live News Update Saam tv
महाराष्ट्र

Maharashtra Live News Update: नाशिक भाजप शहराध्यक्ष सुनील केदार यांनी दिला तडका फडकी राजीनामा

Marathi Breaking Live Marathi Headlines Updates : आज बुधवार, दिनांक ४ फेब्रुवारी २०२६, जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी प्रचार, आजच्या ताज्या बातम्या, राज्यातील महत्त्वाचे अपडेट्स वाचा एका क्लिकवर...

Namdeo Kumbhar

Nanded: नांदेडमध्ये स्वर्गीय अजित पवार यांच्या अस्थीकलशाचे विसर्जन

विमान अपघातात मृत्यू पावलेल्या उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजित पवार यांच्या अस्थी कलशाचे नांदेड मध्ये विसर्जन करण्यात आले. काळेश्वर येथील गोदावरी नदीत मंगळवारी रात्री उशिरा अस्थीचे विसर्जन करण्यात आले.दरम्यान जिल्ह्यातील अनेक तालुक्यात दर्शनासाठी अस्थी कलश यात्रा काढण्यात आली होती. यावेळी आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या सह राष्ट्रवादी पक्षाचे स्थानिक नेते उपस्थित होते.

बुलढाण्यात धक्कादायक घटना!  ५ वर्षीय चिमुरडीवर अत्याचार

बुलढाणा तालुक्यातील हतेडी शिवारात सुरू असलेल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या बांधकामस्थळी एक धक्कादायक घटना समोर आली आहे... येथे काम करणाऱ्या परप्रांतीय मजुराने पाच वर्षीय अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याची गंभीर घटना उघडकीस आली आहे.

घटनेनंतर आरोपी मुलीला घेऊन मलकापूर रेल्वे स्थानकात गेल्याची माहिती मिळताच बुलढाणा ग्रामीण पोलिसांनी तातडीची कारवाई करत आरोपीला अटक केली असून पीडित मुलीला सुखरूप ताब्यात घेतले आहे...मुलीवर सुरुवातीला स्थानिक रुग्णालयात उपचार करण्यात आले, त्यानंतर पुढील उपचारासाठी तिला अकोला शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात हलवण्यात आले असून उपचार सुरू आहेत.

या प्रकरणी आरोपीविरोधात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या घटनेमुळे परिसरात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

Gokul: 'गोकुळ’च्या निवडणुकीचे बिगुल पुढील आठवड्यात

जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीचा निकाल जाहीर होताच, कोल्हापूर जिल्ह्यातील सहकार क्षेत्रातील सर्वात मोठ्या आणि प्रतिष्ठेच्या गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीचे बिगुल पुढील आठवड्यात वाजण्याची शक्यता आहे. प्रशासनाकडून त्याची प्राथमिक तयारी सुरू झाली असून, दहा फेब्रुवारीनंतर कधीही निवडणूक प्रक्रियेचा पहिला टप्पा सुरू होऊ शकतो.

लोकसभा, विधानसभा आणि महापालिकेच्या निवडणुकांनंतर आता जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची निवडणूक अंतिम टप्प्यात आहे. ७ फेब्रुवारी रोजी मतदान तर ९ फेब्रुवारीला मतमोजणी होणार आहे. या निवडणुका पूर्ण झाल्यानंतर प्रशासन स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमधून काही प्रमाणात मोकळे होणार असून, त्यानंतर जिल्ह्यातील सहकार क्षेत्राचे लक्ष ‘गोकुळ’च्या निवडणुकीकडे वळणार आहे.

पुढील आठवड्यात विभागीय उपनिबंधक (दुग्ध) कार्यालया कडून ‘गोकुळ’ला मतदार यादी मागणीचे पत्र दिले जाण्याची शक्यता आहे. यानंतर ‘गोकुळ’कडून सभासदांची यादी प्रशासनाकडे सादर केली जाईल. ही यादी अद्ययावत करून, संस्थांच्या ठरावासंदर्भातील प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे. मतदार यादी अंतिम झाल्या नंतरच ‘गोकुळ’च्या निवडणुकीची अधिकृत घोषणा होणार असून, तेथून पुढे खऱ्या अर्थाने ‘गोकुळ’च्या निवडणुकीची लगीनघाई सुरू होणार आहे. सहकार क्षेत्रातील सत्तासमीकरणांवर प्रभाव टाकणारी ही निवडणूक असल्याने, आगामी काळात ‘गोकुळ’च्या राजकारणाकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून राहणार आहे.

Nashik: नाशिक भाजप शहराध्यक्ष सुनील केदार यांनी दिला तडका फडकी राजीनामा

नाशिक भाजप शहराध्यक्ष सुनील केदार यांनी दिला तडका फडकी राजीनामा

महापौर आणि उपमहापौर नाव निश्चितीवर सुनील केदार नाराज असल्याची माहिती

प्रदेश पातळीवरून आलेले महापौर आणि उपमहापौर नाव ऐनवेळी बदलण्यात आल्याने सुनील केदार यांनी राजीनामा दिल्याची प्राथमिक माहिती

महापौर पदासाठी हिमगौरी आडके तर उपमहापौर पदासाठी मच्छिंद्र सानप यांची झाली आहे निवड

महापौर ,उपमहापौर नाव निश्चित केल्यानंतर नाशिक भाजपात असलेली अंतर्गत नाराजी समोर

तसेच काही दिवसांपूर्वी सुनील केदार यांनी शिवसेनेला सत्तेत सोबत घेण्यासाठी देखील दिला होता प्रस्ताव

याच प्रस्तावनानंतर आम्हाला सत्तेत कुणाची गरज नाही असे वक्तव्य मंत्री गिरीश महाजन यांनी केले होते

याच सगळ्या घडामोडीनंतर सुनील केदार यांनी प्रदेश कामिटीला पाठवला आपला पदाचा राजीनामा

नवीन व्यवस्था होईपर्यंत कामकाज करण्याची देखील सुनील केदारे दिली माहिती

Sawantwadi: कास गावात दहशत माजवणारा बिबट्या अखेर जेरबंद

सावंतवाडी तालुक्यातील कास गावात गेल्या अनेक दिवसांपासून दहशत निर्माण करणाऱ्या बिबट्याला जेरबंद करण्यात वन विभागाला यश आले आहे. या बिबट्यामुळे संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण पसरले होते. ​गेल्या काही दिवसांपासून हा बिबट्या गावात आणि लगतच्या शेतशिवारात सातत्याने दिसून येत होता. बिबट्याच्या वावरामुळे ग्रामस्थांमध्ये, विशेषतः रात्रीच्या वेळी घराबाहेर पडताना मोठी दहशत निर्माण झाली होती. शेतकऱ्यांच्या पाळीव प्राण्यांवरही या बीबट्याने हल्ले केले होते. अखेर या बिबट्याला वनविभागाने जेरबंद केले आहे. बिबट्या पकडला गेल्याचे समजताच त्याला पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. बिबट्या जेरबंद झाल्यामुळे कास गावातील नागरिकांवरील मोठे संकट टळले आहे.

Mahashivratri: महाशिवरात्रीला त्र्यंबकेश्वराचं व्हीआयपी दर्शन राहणार बंद

बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर मंदिरात महाशिवरात्री उत्सवाच्या पार्श्वभूमीवर भाविकांची होणारी प्रचंड गर्दी लक्षात घेता १४ फेब्रुवारी ते १६ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत सर्व प्रकारचे व्हीआयपी आणि प्रोटोकॉल दर्शन पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहे. ट्रस्टच्या अध्यक्षा तथा जिल्हा न्यायाधीश श्रीमती पी. व्ही. घुले आणि सचिव राहुल सुभाषचंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हा निर्णय घेण्यात आला. महाशिवरात्रीच्या काळात भाविकांची गर्दी कैक पटीने वाढते. या गर्दीमुळे प्रशासनावर येणारा ताण आणि निर्माण होणाऱ्या अडचणी विचारात घेऊन सर्वसामान्य भाविकांना सुलभरीत्या दर्शन मिळावे, या उद्देशाने हा निर्णय घेण्यात आला आहे.

Yavatmal: यवतमाळमध्ये ४३९ कोटी थकीत वीजबिलाच्या वसुलीसाठी महावितरणचा अल्टीमेटम

४३९ कोटी थकीत वीजबिलाच्या वसुलीसाठी महावितरणचा अल्टीमेटम

२४ तासासाठी थकबाकीदार शासकीय कार्यालयांचा वीज पुरवठा होणार खंडित

वारंवार सूचना, स्मरणपत्रे, पत्यक्ष पाठपुरावा, नोंदणीकृत मोबाईलवर संदेश देऊ नये ग्राहकांनी केला दुर्लक्ष

वीजबिल भरण्यास प्रतिसाद न देणाऱ्या परिमंडळातील १६ हजार ९८१ शासकीय कार्यालयांचा वीज पुरवठा येत्या १२ तारीखेला तब्बल २४ तासासाठी खंडित करण्यात येणार आहे.

२४ तास वीज पुरवठा खंडित करण्याची कारवाई

कोट्यावधीची थकबाकी असल्याने परिमंडळातील

शासकीय व सार्वजनिक सेवा देणाऱ्या कार्यालयांविरूध्द महावितरणने कठोर भुमिका घेतली असून वीजबिल भरण्याकडे दुर्लक्ष करणाऱ्या शासकीय कार्यालयांचे येत्या १२ तारखेला तब्बल २४ तासासाठी वीज पुरवठा खंडित केला जाणार आहे.

यवतमाळ जिल्ह्यातील ३ हजार ५३१ कार्यालयाकडे ५५ कोटी २० लाख रूपयाचे वीजबिले थकीत आहे.

Pune: राज्यात गारठा कमी, उकाडा जाणवायला सुरुवात

राज्यात गारठा कमी झाला असतानाच, उकाड्यात वाढ झाली आहे.राज्यात अंशतः ढगाळ हवामानासह किमान तापमानातील चढ-उतार, तसेच उकाडा कायम राहण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

अरबी समुद्रात लक्षद्वीप आणि केरळच्या किनाऱ्यालगत समुद्र सपाटीपासून ९०० मीटर उंचीवर चक्राकार वाऱ्यांची स्थिती असून, दक्षिण केरळपासून दक्षिण कर्नाटक पर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे.

Mumbai-Pune Expressway: मुंबई पुणे एक्सप्रेसवर अपघात, टँकरमधील वायुगळती थांबवण्याचे काम सुरु

मुंबई पुणे एक्स्प्रेस वेवर आडोशी बोगद्याजवळ मंगळवारी संध्याकाळी गॅस टँकर पलटी होऊन अपघात झाला. 12 तास उलटून गेल्यानंतर देखील या गॅसची गळती थांबवण्या कामी प्रशासनाला यश आलेले नाही. अग्नीशमन दल, बचाव आणि मदत पथक, NDRF च्या टिम घटना स्थळी दाखल झाल्या आहेत पण केमिकल एक्सपर्ट टिम आली नसल्याने गॅस गळती थांबवण्याच्या कामी विलंब होत आहे. सुरक्षितता पाळून मुंबई पुणे एक्स्प्रेस वे वरील वाहतुक सुरु करण्यात आली आहे.

Eknath Shinde: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज धाराशिव जिल्ह्याच्या दौऱ्यावर

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज धाराशिव जिल्ह्याच्या दौऱ्यावर

जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूक साठी एकनाथ शिंदे घेणार जाहीर सभा

धाराशिव मधील लोहारा तालुक्यातील जेवळी येथे होणार सभा

दुपारी बारा वाजता सभेला होणार सुरुवात

एकनाथ शिंदे यांच्यासह,पालकमंत्री प्रताप सरनाईक इतर शिवसेना नेते असणार सभेसाठी उपस्थित राहणार

Nagpur: महानगरपालिका निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांना निवडणूक खर्चाचा हिशोब सादर करणे अनिवार्य

महानगरपालिका निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांनी निवडणूक खर्चाचा हिशोब सादर करणे अनिवार्य.

निकाल जाहीर झाल्यानंतर ३० दिवसांच्या आत खर्चाची देयके, पावत्या,व्हाऊचर्स सादर करणे आवश्यक.

मात्र अनेक उमेदवारांनी अद्याप खर्चाचा हिशोब सादर केलेला नाही.

वेळेत खर्च न सादर केल्यास पाच वर्षे निवडणूक अपात्रता लागू होऊ शकते.

त्यामुळे खर्च न सादर केलेल्या उमेदवारांनी १६ फेब्रुवारीपूर्वी झोननिहाय खर्च सनियंत्रण पथकाकडे हिशोब सादर करावा, असे महानगरपालिकेच्या नोडल अधिकाऱ्यांनी कळविले आहे.

धक्कादायक; सोलापूर धुळे राष्ट्रीय महामार्गावरती चालत्या कार ने घेतला पेट प्रवासी थोडक्यात बचावले

बीडच्या मांजरसुंबा घाटात राष्ट्रीय महामार्ग वरती धावत्या वाहनाला भीषण आग लागली असून या कार ने मोठा पेट घेतला असून जाळाचे लोट पाहायला मिळत आहेत. बीड च्या लगत असलेल्या मांजरसुंबा धुळे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरती प्रवाशाच्या कारला आग लागली असून गाडीने मोठा पेट घेतला आहे गाडी जळून खाक झाली असून अद्याप पर्यंत कारण अस्पष्ट असून प्रवासी थोडक्यात बचावले असून ते सुखरूप आहेत मात्र कारचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. कारला नेमकी आकाशामुळे लागली त्याचबरोबर आगीचे कारण अद्याप पर्यंत समोर आले नसून याप्रकरणी स्थानिक पोलीस ग्रामीण ने घटनास्थळी धाव घेतली असून घटनेची चौकशी केली आहे.

खासदार निंबाळकरांच्या वक्तव्याचं सरनाईकांकडून कौतुक; उद्धव ठाकरे,संजय राऊत यांची कोंडी

ईव्हीएमला दोष देत बसू नका,घोटाळा असता तर मी खासदार झालो असतो का या ओमराजे निंबाळकर यांच्या वक्तव्याच पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी कौतुक केलं.सोबतच उद्धव ठाकरे आणि ईव्हीएमला दोष देणाऱ्या संजय राऊत यांना याबद्दल सांगा अस म्हणत प्रताप सरनाईक यांनी ईव्हीएम च्या मुद्द्यावरून ठाकरे राऊतांवर निशाणा साधला. भाजप आणि शिवसेनेने ईव्हीएममध्ये काहीतरी लफडं केलं हा वारंवार तुम्ही दोष देता निवडून आले की ईव्हीएम चांगलं पराभव झाला की ईव्हीएम मध्ये घोटाळा अशी भूमिका आम्ही घेतली नाही असे सरनाईक म्हणाले. ढोकी इथ जिल्हा परिषद निवडणूक प्रचारासाठी आल्यानंतर सरनाईक बोलत होते. ठाकरेंच्या पक्षाच्या खासदारांनी ईव्हीएम बद्दल जाहीर वक्तव्य करत घोटाळा गडबड होत नसल्याचं सांगितल्याने उद्धव ठाकरे, संजय राऊत कोंडीत सापडले.यावेळी जिल्हा परिषद निवडणुकीनंतर पुन्हा ऑपरेशन टायगर सुरू होणार असल्यासही सरनाईक म्हणाले.

Maharashtra Live News Update: धाराशिवमध्ये अध्यक्षपदावरून भाजप - शिवसेनेत जुंपली

धाराशिव जिल्हा परिषदेचा अध्यक्ष हा शिवसेनेचाच होणार असा दावा माजी मंत्री आमदार तानाजी सावंत यांनी केलाय.धाराशिव मध्ये जिल्हा परिषद निवडणूकीची रणधुमाळी सुरू असुन भाजपा पाठोपाठ आता शिवसेना देखील अध्यक्ष पदासाठी आग्रही आहे. आम्ही फक्त अपेक्षा करत नाही तर कृतीतून दाखवतो त्यामुळे जिल्हा परिषदेचा अध्यक्ष हा शिवसेनेचाच असेल धनुष्यबाणाचाच असेल असा दावा तानाजी सावंत यांनी वाशी तालुक्यातील पारा येथील शिवसेना उमेदवारांच्या प्रचार सभेतुन केला आहे.त्यामुळे अध्यक्ष पदावरून भाजप शिवसेनेत जुंपली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

NCP : अजितदादांच्या विश्वासू जिल्हाध्यक्षांचं अल्पशा आजाराने निधन, राष्ट्रवादीवर शोककळा

EPFO खातेधारकांना झटका! PFवरील व्याजदर कमी करण्याची शक्यता; पुढच्या महिन्यात होणार निर्णय

Cancer warning signs: 99% लोकं चुकतात! ही लक्षणं दिसून आली तर समजा शरीरात कॅन्सरच्या गाठीची होतेय सुरुवात

ZP Election: जिल्हा परिषद निवडणुकीत भाजपला मोठा धक्का, बड्या नेत्याचा तडकाफडकी राजीनाम

Ajit Pawar : विमान कोसळण्याआधी अजित पवारांचा शेवटचा फोन कॉल, १० मिनिटापूर्वी दादा नेमकं काय म्हणाले....

SCROLL FOR NEXT