Maharashtra News Live Update Saam Tv
महाराष्ट्र

Maharashtra News Live Update: पंढरपूर कॉरिडॉरसाठी शेतकऱ्यांना विश्वासात घेणार; जबरदस्ती नाही : एकनाथ शिंदे

Marathi Breaking Live Headlines Updates : सोनम वांगचुक यांचं जंतर मंतरवर उपोषण अपडेट, राज्यात आजही पावसाचा अंदाज, आषाढी वारीचे अपडेट, राज्यातील राजकीय घडामोडी, राज्यासह देश विदेशातील महत्त्वाचे अपडेट्स वाचा एका क्लिकवर...

Priya More

पंढरपूर कॉरिडॉरसाठी शेतकऱ्यांना विश्वासात घेणार; जबरदस्ती नाही : एकनाथ शिंदे

आषाढी एकादशीच्या पावन सोहळ्यानिमित्त पंढरपुरात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विकास, वारकरी सेवा आणि लोकभावनेचा समतोल साधणारी भूमिका मांडत पंढरपूर कॉरिडॉर, शक्तिपीठ महामार्ग, वारकरी सुविधा तसेच राज्यातील विविध राजकीय मुद्द्यांवर सविस्तर भूमिका स्पष्ट केली.

पंढरपूर कॉरिडॉरबाबत बोलताना शिंदे म्हणाले की, शेतकऱ्यांनी आम्हाला विश्वासात घेऊनच प्रकल्प राबवावा, अशी मागणी केली असून त्यासाठी बैठकीची वेळही मागितली आहे. "महायुतीचे सरकार हे सर्वसामान्यांचे सरकार आहे. कोणत्याही विकास प्रकल्पासाठी जोरजबरदस्ती केली जाणार नाही. संबंधितांना विश्वासात घेतल्याशिवाय कोणतेही काम होणार नाही," अशी स्पष्ट ग्वाही त्यांनी दिली.

Eknath Shinde : रमेश म्हात्रे प्रकरणावर शिंदे काय म्हणाले?

नगरसेवक रमेश म्हात्रे यांच्या कथित मारहाण प्रकरणावर प्रतिक्रिया देताना शिंदे म्हणाले की, अशा प्रकारच्या मारहाणीचे आम्ही कधीही समर्थन केलेले नाही. खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनीही याबाबत भूमिका स्पष्ट केली आहे. आता सर्वांनी न्यायालयीन प्रक्रियेचा आदर करावा.

पुण्यातून एकाला अटक

जळगाव भाजप नेते तथा मंत्री गिरीश महाजन यांचे एका तरुणीबरोबरचे आक्षेपार्ह फोटो काही दिवसांपूर्वी समाज माध्यमावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले होते. या प्रकरणी जळगाव शहरातील सायबर पोलीस ठाण्याच्या पथकाने संशयित फेसबुक खातेधारकाला पुणे जिल्ह्यातू अटक केली आहे. संबंधिताचा मोबाइलही जप्त करण्यात आला आहे. त्यामुळे मंत्री महाजन यांची बदनामी केल्याच्या प्रकरणात दाखल गुन्ह्याच्या तपासाला आता आणखी गती मिळणार आहे.

Maharashtra News Live Update: पुणे महापालिकेची फूड टेस्टिंग मशीन झाली गायब? आरोग्य विभागाचा गलथान कारभार?

राज्यात एका बाजूला अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी भेसळ विरोधी कारवाईचा धडका लावलाय मात्र असं असतानाच पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागातील एक धक्कादायक प्रकार समोर आलाय. जवळपास 12 लाख रुपये खर्च करून खरेदी करण्यात आलेली फूड टेस्टिंग मशीन गायब झाल्याचा धक्कादायक प्रकार पुण्यातून समोर आलाय.

ओबीसींच्या प्रश्नांसाठी लक्ष्मण हाके काढणार ओबीसी जनता पार्टी.....

ओबीसींच्या प्रश्नांना न्याय देण्यासाठी प्राध्यापक लक्ष्मण हाके लवकरच ओबीसी जनता पार्टी काढणार आहेत. बारामती मधील पत्रकार परिषदेत लक्ष्मण हाके यांनी यासंदर्भातील घोषणा केली आहे. ओबीसी जनता पार्टी असेल जी महाराष्ट्रात पुढे येईल ओबीसींच्या प्रश्नांवर काम करील असं लक्ष्मण हाके यांनी म्हटल आहे.

जालन्यातील अंबड येथे 7 ते 8 दुकानांना अचानक लागली भीषण आग

जालन्यातील अंबड शहरात अचानक 7 ते 8 दुकानांना अचानक भीषण आग लागल्याची घटना घडली आहे.या आगीत फर्निचर दुकान, दूध डेअरीसह इतर पाच ते सात दुकानांचे लाखों रुपयांचे साहित्य जळून खाक झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. आगीचं कारण अद्याप अस्पष्ट असून सध्या अग्निशामक दलाकडून आग विझवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

शिरुर तालुक्यात आठ जणांकडून तरुणावर गोळीबार पाण्यात उडी मारल्याने बचाव

शिरुर तालुक्यातील करडे गावात भररात्री झालेल्या गोळीबाराच्या घटनेने खळबळ उडाली आहे भैरवनाथ मंदिर परिसरात आठ जणांच्या टोळक्याने एका तरुणावर दोन फेऱ्या गोळीबार केल्याची माहिती समोर आली आहे मात्र प्रसंगावधान राखत संबंधित तरुणाने पाण्यात उडी मारल्याने त्याचा जीव वाचला

हिंगोलीत 102 व 108 शासकीय रुग्णवाहिका न मिळाल्याने गरोदर मातेला दीड तास ताटकळत थांबावे लागले

हिंगोली जिल्ह्यात पुन्हा एकदा आरोग्यवस्थेच्या कुचकामी कारभार पुढे आला आहे, हिंगोलीच्या औंढा नागनाथ तालुक्यातील काशी तांडा येथील इंदूर राठोड या गर्भवती महिलेला प्रसूतीच्या तीव्र वेदना होत असल्याने कुटुंबीयांनी 102 या शासकीय रुग्णवाहिकेला फोन केला मात्र रुग्णवाहिका पोहचायला दीड तास लागेल असं सांगण्यात आलं होतं त्या नंतर 108 या शासकीय रुग्णवाहिकेला देखील गर्भवती महिलेच्या नातेवाईकांनी फोन केला मात्र ती देखील पोहोचू शकली नाही दरम्यान

गर्भवती महिलेला तीव्र वेदना होत असल्याने कुटुंबीयांनी तात्काळ खाजगी वाहनातून रुग्णालय गाठण्याचा प्रयत्न केला मात्र रुग्णालयात येतानाच खाजगी वाहनांमध्ये या गर्भवती महिलेची प्रसूती झाली आहे.. दरम्यान हिंगोली जिल्ह्यांमध्ये गर्भवती महिलांना अनेकदा शासकीय रुग्णवाहिका मिळत नसल्याचे गंभीर प्रकार पुढे येत असून ग्रामीण भागातील गर्भवती महिलांना रुग्णवाहिका वेळेवर का मिळत नाही असा सवाल देखील उपस्थित होतोय दरम्यान आरोग्य विभागाने याकडे गांभीर्याने लक्ष घेऊन कारवाई करावी अशी मागणी केली जात आहे..

दहा-बारा दिवसांच्या प्रतीक्षेनंतर येवल्यात पावसाची हजेरी

नाशिकच्या येवला शहरासह परिसरात गेल्या दहा ते बारा दिवसांपासून दडी मारून बसलेल्या पावसाने अखेर आज हजेरी लावली. पावसाच्या आगमनामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे. मात्र, पिकांसाठी अद्याप मोठ्या पावसाची गरज असल्याने बळीराजा दमदार पावसाच्या प्रतीक्षेत आहे.

- भंडाऱ्याचा तुमसर शहरात मुसळधार पावसाचा हाहाकार

भंडारा जिल्ह्यात गेल्या २४ तासांत झालेल्या मुसळधार पावसामुळे तुमसर शहराची दैना उडाली आहे. दिवसभराच्या विश्रांतीनंतर अचानक सुसाट सुटलेल्या पावसाने शहराला झोडपून काढले. या पावसामुळे शहरातील मुख्य रस्त्यांसह अनेक वस्त्या जलमय झाल्या असून, रस्त्यांना अक्षरशः तलावाचे स्वरूप आले आहे.शहरातील निकृष्ट दर्जाचे नालेसफाईचे काम आणि नियोजनशून्य कारभारामुळे अनेक भागांतील नाल्या तुडुंब भरून वाहू लागल्या. नाल्यांचे घाण पाणी थेट नागरिकांच्या घरात आणि दुकानांत शिरल्याने लोकांचे मोठे नुकसान झाले आहे. यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्नही ऐरणीवर आला असून, प्रशासनाच्या ढिसाळ नियोजनाचे वाभाडे निघाले आहेत.सध्याच्या या बिकट परिस्थितीमुळे तुमसरवासीयांचा राग अनावर झाला आहे. दरवर्षी पावसाळ्यात हीच परिस्थिती का उद्भवते? असा संतप्त सवाल नागरिक उपस्थित करत आहेत. या समस्येला जबाबदार धरत स्थानिक नागरिकांनी नगराध्यक्ष सागर गभणे आणि प्रभागाच्या नगरसेवकांविरुद्ध तीव्र संताप व्यक्त केला आहे. लोकप्रतिनिधी केवळ आश्वासने देतात, मात्र प्रत्यक्ष कामात कसलीही तत्परता दाखवत नसल्याचा आरोप संतप्त नागरिकांनी केला आहे.

नीट पुनर्परीक्षेनंतर पुण्यातील विद्यार्थ्याची गुणपत्रिकेत मोठी घसरण, पालकांचा आरोप

संबंधित विद्यार्थ्याचे पालक जाणार उच्च न्यायालयात

पुण्यातील पहिल्यांदा झालेल्या नीट परीक्षेत देशात आठवा क्रमांक मिळविल्याचा दावा त्यांच्या कुटुंबियांनी केला होता

मात्र, पुनर्परीक्षेचा निकाल जाहीर झाल्यानंतर त्याची रँक १० लाखांहून अधिक मागे गेल्याचा आरोप पालकांनी केला आहे

निकालातील या मोठ्या तफावतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत संबंधित पालकाने न्यायालयीन लढाईचा निर्णय घेतला आहे

या प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करणार असल्याची माहिती

नीट पुनर्परीक्षेची प्रक्रिया आणि निकालाच्या पारदर्शकतेबाबतही त्यांनी गंभीर आक्षेप नोंदवले आहेत

दमदार पाऊस नसल्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली

: राज्यात पुन्हा पावसाचे पुनरागमन झाले असून धुळे जिल्ह्यात जुलै महिना निम्म्याहून अधिक संपला तरी देखील अद्यापही समाधानकारक पाऊस झालेला नाही, त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता आता आणखीनच वाढली आहे,

पावसाच्या भरोशावर शेतकऱ्यांनी पेरणी तर केली परंतु त्यानंतर पावसाने दडी मारल्यामुळे चिंतन पावसावर आलेली पिके सुकू लागल्याने शेतकऱ्यांसमोर आता पीक वाचविण्याच मोठ आव्हान उभे राहिले आहे,

भक्ष्याच्या शोधात बिबट्या पडला विहीरीत...

भक्ष्याच्या शोधात बिबट्या पडला विहीरीत...

वन विभागाकडून रेस्क्यू ऑपरेशन...

विहीरीत पडलेला बिबट्या जेरबंद...

अहिल्यानगरच्या श्रीरामपूर तालुक्यातील मुठेवाडगांव येथील घटना...

भर पावसात स्थानिक नागरिकांसह वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी दोरीच्या साह्याने बिबट्याला काढले बाहेर....

बिबट्याची वन विभागाच्या रोप वाटीकेत रवानगी...

रमेश म्हात्रे यांना 14 दिवसाची न्यायालयीन कोठडी 

कल्याण सत्र न्यायालयाने तीन तारखेपर्यंत सुनावली न्यायालयीन कोठडी

पंढरपूरमध्ये अवघ्या पंधरा मिनिटांमध्ये पाच कोटींचा निधी मंजूर 

पंढरपूर मध्ये आषाढी यात्रेच्या निमित्ताने येणाऱ्या वारकऱ्यांना अधिकच्या सोयी सुविधा देण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज अवघ्या पंधरा मिनिटांमध्ये पाच कोटींचा निधी नगरपरिषदेला उपलब्ध करून दिला आहे. या संदर्भात नगर विकास विभागाने शासन अध्यादेश जारी केला आहे.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज आषाढी यात्रेच्या निमित्ताने प्रशासनाने केलेल्या सुविधांची पाहणी करण्यासाठी पंढरपुरात आले होते.

केतन अग्रवालच्या वडिलांनी रवींद्र चव्हाण यांची घेतली भेट 

केतन अग्रवालच्या वडिलांनी रवींद्र चव्हाण यांची भेट घेतली आहे

या भेटीत त्यांनी केतन अग्रवाल केस फास्ट ट्रक कोर्टात चालवण्याची केली मागणी

ऑन राष्ट्रवादी नाराजी

अशी कुठलीही नाराजी नाही, सर्वांना आम्ही निधी दिली जातेय, सुनेत्रा पवारांशी चर्चा झाली त्याप्रमाणे त्यांना निधी दिला जातोय

विरोधी पक्षाना बोलण्यासाठी योग्य वेळ दिला जातोय,

बीड शहरात बील मागितल्याने हॉटेल चालकाला जीवे मारण्याचा प्रयत्न 

AC हॉटेलमधले जेवणाचे बिल मागितल्याने शहरातील गुंड प्रवृत्तीचे काही तरूण बीड-सोलापूर रोडवरील '७/१२ हॉटेल' समोर मालक दिनेश कानतोडे यांना जीवे मारण्याच्या उद्देशाने तलवार आणि लाकडी दांडे घेऊन आले होते. हॉटेलच्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये मुख्य आरोपी ओमकार लकडे हा तलवार व लाकडी दांडा घेतलेला आणि त्याचे इतर तीन साथीदार दिसून आले. बीड ग्रामीण पोलीस ठाण्यात चार आरोपींविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला असुन आरोपी अद्याप अटक नाहीत.

मुंबई उच्च न्यायालयाच्या आवाहनानंतर आयएमएकडून २० जुलैचा राज्यस्तरीय बंद मागे

डोंबिवलीतील केडीएमसीच्या शास्त्रीनगर रुग्णालयात डॉक्टर व कर्मचाऱ्यांवर झालेल्या मारहाण प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर इंडियन मेडिकल असोसिएशन (IMA) आणि राज्यातील सर्व वैद्यकीय संघटनांनी २० जुलै रोजी पुकारलेला राज्यव्यापी सेवा बंद तात्पुरता स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबई उच्च न्यायालयाने केलेल्या आवाहनाचा आदर राखत हा निर्णय घेण्यात आल्याचे आयएमए महाराष्ट्र राज्य शाखेने स्पष्ट केले आहे.

संदीप नाईक प्रतिष्ठानच्या माध्यमातून नवी मुंबई शहरामध्ये 1000 झाडांचे वृक्षारोपण 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसाचे निमित्ताने संदीप नाईक प्रतिष्ठान च्या माध्यमातून नवी मुंबई शहरामध्ये वाशी सानपाडा नेरूळ बेलापूर तुर्भे घनसोली कोपरखणे या परिसरामध्ये माजी आमदार संदीप नाईक यांच्या नेतृत्वाखाली 1000 वृक्षारोपण शहरांमध्ये करण्यात आलेला आहे.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा चंद्रभागेत नौकविहार

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा चंद्रभागेत नौकविहार

लाईफ जॅकेट शिवाय शासनाच्या रेस्क्यू बोटीत एकनाथ शिंदे उतरले चंद्रभागेच्या पत्रात...

एकनाथ शिंदे यांच्या सोबत आमदार तानाजी सावंत आणि आमदार समाधान आवताडे ही शिंदे यांच्या सोबत चंद्रभागेच्या बोटीत..

शास्त्रीनगर मारहाण प्रकरणातील पाचवी महिला आरोपी अटकेत 

डोंबिवलीच्या शास्त्रीनगर रुग्णालयातील डॉक्टर-नर्स मारहाण प्रकरणात मोठी घडामोड समोर आली आहे. उच्च न्यायालयाने नगरसेवक रमेश म्हात्रे आणि इतर तीन आरोपींचा जामीन रद्द केल्यानंतर पोलिसांनी या प्रकरणातील पाचवी आरोपी साधना कारंडे हिला अटक केली आहे. मारहाणीच्या घटनेतील सीसीटीव्ही फुटेजमध्ये साधना कारंडे दिसत असल्याचा दावा पोलिसांनी केला असून तिच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सोनाई ग्रुपचे संचालक प्रवीण माने यांनी घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पुण्यात भेट

सोनाई डेअरीवर अन्न व औषध प्रशासनाने केलेल्या कारवाईच्या पार्श्वभूमीवर भेट घेतल्याची चर्चा

एफडीए आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या आदेशानंतर सोनई डेअरीवर छापा टाकण्यात आला आहे

या भेटीदरम्यान प्रवीण माने यांच्यासोबत दौंडचे आमदार राहुल कुल, माजी आमदार संग्राम थोपटे उपस्थित

खंडाळ्याच्या घाटात ऑईल घेऊन चाललेल्या टँकरला लागली गळती

रस्त्यावर ऑईल सांडल्यामुळे वाहतूक विस्कळीत

क्रेनच्या सहाय्याने टँकर रस्त्यावरून बाजूला करायचे काम सुरू

घाटातील वाहतूक धीम्या गतीने सुरू

नीट पेपरच्या निकालांच्या गुणांमध्ये घोटाळा जयंत पाटलांचा बीडच्या सोहम गवतेला फोन

जयंत पाटलाकडून फोनवरून विचारपूस

असा प्रकार किती विद्यार्थ्यांसोबत घडला आहे सोहम गवतेला विचारणा

हा प्रकार किती विद्यार्थ्यांसोबत घडला आहे सर्व विद्यार्थ्यांनी यासंदर्भात आवाज उठवूया आम्ही तुमच्यासोबत आहोत लोकसभेतही सुप्रियाताई सुळे बोलतील तुम्हीही याचा फॉलोअप घ्या

दर्शन रांगेतील भाविकांना एकनाथ शिंदे यांच्या हस्ते पाण्याच्या बॉटलचे वाटप

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज पंढरपुरात येऊन दर्शन रांगेतील व्यवस्थेची पाहणी केली यावेळी त्यांच्या हस्ते भाविकांना पिण्याच्या पाण्याच्या बॉटलचे वाटप करण्यात आले

माझी आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांच्या वतीने एक लाख पाणी बॉटल चे वाटप करण्यात येणार आहे या पाणी बॉटलचे वितरण आज एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे पंढरपूर मध्ये दाखल

आषाढी यात्रा नियोजनाच्या तयारीची पाहणी करणार आहेत

दर्शन बारी चंद्रभागा वाळवंट विठ्ठल मंदिर 65 एकर पालखीतळ आदी ठिकाणी जाऊन तेथील सुविधांची पाहणी करणार आहेत.

त्यानंतर अधिकाऱ्यांसमवेत बैठकी घेणार आहेत.

वर्धा- दहशत माजवणारी वाघीण जेरबंद

- गिरड व्याघ्र प्रकल्पातील 'गिरडच्या राणी' वाघीणीच्या दोन वर्षांच्या मादी बछडीला वनविभागाने जेरबंद केले.

- पिंपळगाव, उंदिरगाव, साखरा, जोगिंगुफा परिसरात वाघीणीने दहशत निर्माण केली होती.

- वाघीणीच्या हल्ल्यात अनेक जनावरे ठार, तर काही जखमी झाल्याची नोंद.

- वाढती दहशत लक्षात घेऊन वाघीणीला पकडण्याची तातडीने परवानगी.

- उपवनसंरक्षक हरविर सिंग व सहाय्यक वनसंरक्षक हरीष सरोदे यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई.

नागपुरात उद्या शांतता मार्च, सोनम वांगचुक यांच्या समर्थनार्थ सिजेपी देशभरात रस्त्यावर उतरणार

- व्हेरायटी चौक ते आरबीआय चौक असा मार्चचा मार्गने आंदोलनाचे आयोजन करण्यात आले आहे..

- *जंतर-मंतर ते संसद मोर्चात सहभागी होऊ न शकणाऱ्यांनी आपल्या शहरात आंदोलन करन्याचे कॉकरोच पार्टीचे संस्थापक अभिजित दिपकेचे आवाहन...

- सोशल मीडियावर व्हिडिओ संदेशाद्वारे नागरिकांना शांततेच्या मार्गाने आंदोलन करण्याचे आवाहन केले

- हिंसक किंवा कायदा हातात घेणाऱ्यांना सोनम वांगचुक यांचे समर्थक म्हणता येणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.

स्मार्ट टॉयलेट बनले ड्रग्ज तस्करांचा अड्डा, मकोकाच्या आरोपीसह तिघे जेरबंद

- नागपूर महापालिकेच्या स्मार्ट टॉयलेटचा ड्रग्ज साठ्यासाठी वापर उघड.

- गुन्हेशाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाने नंदनवन झोपडपट्टी परिसरातील केडीके कॉलेज मार्गावरील स्मार्ट टॉयलेटमध्ये छापा टाकून कारवाई करण्यात आली.

- मकोकाचा आरोपी नीलेश डोरसेसह सूरज उईके आणि अब्दुल शफिक अटक.

- दोन अल्पवयीन मुलांना पोलिसांनी ताब्यात घेतले.स्मार्ट टॉयलेटच्या वरच्या खोलीतून तब्बल 24 किलो गांजा जप्त.

हायकोर्टाचा दणका अन् पोलिसांचा अॅक्शन मोडवर, शास्त्रीनगर मारहाण प्रकरणातील पाचवी महिला आरोपी अटकेत

डोंबिवलीच्या शास्त्रीनगर रुग्णालयातील डॉक्टर नर्स मारहाण प्रकरणात मोठी घडामोड समोर आली आहे. उच्च न्यायालयाने नगरसेवक रमेश म्हात्रे आणि इतर तीन आरोपींचा जामीन रद्द केल्यानंतर पोलिसांनी या प्रकरणातील पाचवी आरोपी साधना कारंडे हिला अटक केली आहे.

पुणे- उद्या डॉक्टरांच्या संपाला तात्पुरती स्थगिती

इंडियन मेडिकल असोसिएशन आणि इतर सर्व वैद्यकीय संघटना यांचा निर्णय

मुंबई उच्च न्यायालयाने केलेल्या आवाहनाला मान देऊन, रुग्णांच्या हिताला बाधा येऊ नये म्हणून आय एम ए चा निर्णय

डोंबिवली मध्ये झालेल्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या राज्यव्यापी संप होणार होता

स्मार्ट टॉयलेट बनले ड्रग्ज तस्करांचा अड्डा, मकोकाच्या आरोपीसह तिघे जेरबंद

- स्मार्ट टॉयलेट बनले ड्रग्ज तस्करांचा अड्डा, मकोकाच्या आरोपीसह तिघे जेरबंद. स्मार्ट टॉयलेटचा गांजा लपवण्यासाठी वापर

- नागपूर महापालिकेच्या स्मार्ट टॉयलेटचा ड्रग्ज साठ्यासाठी वापर उघड.

- गुन्हेशाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाने नंदनवन झोपडपट्टी परिसरातील केडीके कॉलेज मार्गावरील स्मार्ट टॉयलेटमध्ये छापा टाकून कारवाई करण्यात आली.

शहाद्यात शिंदे गटाच्या मेळाव्यात शेकडो नागरिकांचा शिवसेना पक्षप्रवेश

शिवसेना शिंदे गट शहादा शहर आणि तालुक्याच्या वतीने भव्य पक्षप्रवेश आणि पदाधिकारी नियुक्ती मेळावा पार पडला. या मेळाव्यात रायखेड, मलगाव, सुलवाडे, वैजाली यांसह विविध ग्रामीण भागांतील शेकडो नागरिकांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला.यावेळी मार्गदर्शन करताना आमदार चंद्रकांत रघुवंशी म्हणाले की, कार्यकर्त्यांची संख्या कमी असली तरी त्यांची पक्षनिष्ठा महत्त्वाची आहे.

आदिवासी भागातील शिक्षणाचा बट्ट्याबोळ

आदिवासी भागातील शिक्षणाचा धक्कादायक बट्ट्याबोळ...!

शिकवायला शिक्षक नाही, जेवण निकृष्ट ते ही वेळेवर मिळत नाही.

आदिवासी भागातील जिल्हा परिषदेच्या निवासी शाळेतील सर्वच्या सर्व 342 विद्यार्थ्यांनी शाळा सोडली.

मेळघाट विकासासाठी प्रशासन सामाजिक संस्थांचा समन्वय आवश्यक

मेळघाटातील कुपोषण, बालमृत्यू आणि मातामृत्यू निर्मूलन हे शासनाचे प्रमुख उद्दिष्ट असून, त्यासाठी प्रशासन आणि सामाजिक संस्थांनी समन्वयाने काम करण्याची गरज असल्याचे आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक उईके यांनी म्हटले आहे.

चिखलदरा येथील आढावा बैठकीत त्यांनी कुपोषणाची कारणे स्पष्ट करत अंगणवाडी सेविका, आशा कार्यकर्त्या आणि सामाजिक संस्थांनी मिशन मोडमध्ये जनजागृती करण्याचे आवाहन केले.

सोनम वांगचुक यांच्या समर्थनार्थ CJP देशभरात रस्त्यावर उतरणार

- सोनम वांगचुक यांच्या समर्थनार्थ आता सर्वत्र सिजेपी देशभरात रस्त्यावर उतरणार... नागपुरात उद्या (सोमवारी) शांतता मार्च.

- व्हेरायटी चौक ते आरबीआय चौक असा मार्चचा मार्गने आंदोलनाचे आयोजन करण्यात आले आहे

- *जंतर-मंतर ते संसद मोर्चात सहभागी होऊ न शकणाऱ्यांनी आपल्या शहरात आंदोलन करन्याचे कॉकरोच पार्टीचे संस्थापक अभिजित दिपकेचे आवाहन.

यवतमाळ जिल्ह्यात बोगस सोयाबीन कंपन्यांवर पोलिसात गुन्हा दाखल

यवतमाळ जिल्ह्यात बोगस सोयाबीन कंपन्यांवर पोलिसात गुन्हा दाखल

यवतमाळ ग्रामीण-२, दारव्हा, आर्णी, दिग्रस आणि बाभुळगाव पोलिस ठाण्यांत गुन्हे दाखल

पुनर्वसित इर्शालवाडीत शासनाने बांधून दिलेल्या घरांना दोन वर्षात गळती

पुनर्वसित इर्शालवाडीत शासनाने बांधून दिलेल्या घरांना दोन वर्षात गळती

दुरुस्तीसाठी आदिवासींना शासनाचे दार ठोठावण्याची पाळी

धार्मिक स्थळ असलेल्या कासारटाका येथे पर्यटकांची गर्दी

धार्मिकता आणि पर्यंटन यांचा दुहेरी संगम असलेले सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पर्यटन स्थळ म्हणजे कासारटाका.. मालवण तालुक्यात असलेले हे स्थळ नेहमीच भाविकांना आणि पर्यटकांना आकर्षित करतं.

नवसाला पावणारे देवस्थान म्हणुन प्रसिद्ध असलेल्या कासार टाका येथे लाखोच्या संख्येने पर्यटक येत असतात. विशेषतः गोवा आणि कर्नाटक येथील पर्यटकांची संख्या जास्त असते.

Pandharpur: पंढरपुरात मोठा अवैध दारू साठा जप्त

पंढरपूर -

पंढरपुरात मोठा अवैध दारू साठा जप्त

ऐन आषाढी वारीच्या तोंडावर पंढरपुरात 1 लाख 42 हजार रुपये किंमतीचा अवैध दारूसाठा जप्त करण्यात आला आहे.

पोलिसांनी शहरात तीन विविध ठिकाणी केलेल्या कारवाईत अवैध दारूसाठ्यासह एक कार , मोटारसायकल आदी मुद्दे माल जप्त केला आहे.

Nandurbar: शहादा शहरात भुरट्या चोरांचा हैदोस, सायकल घेऊन चोर पसार

नंदुरबार -

शहादा शहरात भुरट्या चोरांचा हैदोस.

मोटारसायकल चोरण्याचा प्रयत्न फसल्याने अखेर

सायकल घेऊन चोर पसार

चोरीची संपूर्ण घटना सीसीटीव्हीत चोर कैद

शहादा पोलीस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावरील पेट्रोल पंपावर चोरीची घटना

Buldhana: बोगस बियाणे पेरले, फक्त 20% उगवले

बुलढाणा -

बोगस बियाणे पेरले, फक्त 20% उगवले

संतप्त शेतकऱ्याने सात एकर सोयाबीन पिकावर फिरवलं रोटावेटर.

सहा महिन्यापासून तालुका कृषी अधिकारी पद रिक्त असल्याने कुणाकडे..? संतप्त शेतकऱ्याचा सवाल.

Pune: निरीक्षणगृहात नेण्यापूर्वी तीन अल्पवयीन मुलांचे पलायन, दोघे ताब्यात

पुणे -

निरीक्षणगृहात नेण्यापूर्वी तीन अल्पवयीन मुलांचे पलायन, दोघे ताब्यात

कोरेगाव पार्क परिसरात निरीक्षणगृहात दाखल करण्यासाठी नेण्यात येत असलेल्या तीन १७ वर्षीय विधिसंघर्षित बालकांनी कर्मचाऱ्यांशी झटापट करून पलायन केले.

पोलिसांनी तातडीने शोधमोहीम राबवून दोघांना ताब्यात घेतले आहे ..तिसऱ्या बालकाचा शोध सुरू आहे.

याप्रकरणी कोरेगाव पार्क पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास सुरू आहे.

Pune: लोणावळा-कर्जत दुरुस्तीमुळे २५ जुलैपर्यंत अनेक एक्सप्रेस गाड्या रद्द

पुणे -

लोणावळा-कर्जत दुरुस्तीमुळे २५ जुलैपर्यंत अनेक एक्सप्रेस गाड्या रद्द

लोणावळा-कर्जत रेल्वेमार्गावरील तिसऱ्या लाइनच्या दुरुस्तीचे काम सुरू असल्याने मध्य रेल्वेने २५ जुलैपर्यंत अनेक एक्सप्रेस गाड्या रद्द, वळविण्याचा आणि शॉर्ट टर्मिनेट करण्याचा निर्णय घेतला आहे. सीएसएमटी-चेन्नई, सीएसएमटी-हैदराबाद, दौंड-इंदूर, हडपसर-जोधपूरसह अनेक गाड्यांवर परिणाम झाला आहे प्रवाशांनी प्रवासापूर्वी रेल्वेचे वेळापत्रक तपासण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Pune: कर्तव्य बजावताना मद्यपान करणाऱ्यांवर कारवाई, पुणे विभागातील १० कर्मचारी निलंबित

पुणे -

कर्तव्य बजावताना मद्यपान करणाऱ्या आणि बेजबाबदारपणे वागणाऱ्या कर्मचाऱ्यांविरुद्ध पुणे एसटी प्रशासनाकडून कारवाईचा बडगा

मागील आठ महिन्यांत पुणे विभागातील १० कर्मचारी निलंबित

त्यातील चार कर्मचाऱ्यांना बडतर्फ का करू नये, अशी नोटीस बजावली आहे

त्यामुळे एसटी कर्मचारी वर्गात खळबळ उडाली असून, बेजबाबदार आणि बेशिस्त कर्मचाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत

Pune: एमबीए प्रवेश नोंदणीसाठी आजचा शेवटचा दिवस

पुणे -

एमबीए प्रवेश नोंदणीसाठी आजचा शेवटचा दिवस

आतापर्यंत ६५ हजार विद्यार्थ्यांनी केली नोंदणी

एमबीए आणि एमएमएस अभ्यासक्रमाच्या प्रवेश नोंदणीसाठी आजचा दिवसापर्यंत ची मुदतवाढ

संकेतस्थळावर अर्जाची ऑनलाईन नोंदणी आणि आवश्यक कागदपत्रे अपलोड करण्यासाठी रविवारी सायंकाळी पाच वाजेपर्यंत मुदत

प्रवेशाच्या अर्जाची पडताळणी आणि अर्जाची निश्चिती सोमवारपर्यंत करता येणार.

प्रवेशाची अंतिम गुणवत्ता यादी २७ जुलैला संकेतस्थळावर प्रदर्शित होणार

Washim: वीजपुरवठा वारंवार खंडित होत असल्याच्या निषेधार्थ महावितरणच्या कार्यालयात झोपा आंदोलन

वीजपुरवठा वारंवार खंडित होत असल्याच्या निषेधार्थ महावितरणच्या कार्यालयात झोपा आंदोलन

वाशिमच्या मानोरा तालुक्यातील कारखेडा, वरोली, रामतीर्थ, सेवादासनगर, तळप बुद्रूक आणि विठोली या गावांमध्ये गावातील वीजपुरवठा आणि शेतीपंपाचा वीजपुरवठा वारंवार खंडित होत आहे.

याच्या निषेधार्थ नागरिकांनी काल रात्री मानोरा येथील महावितरणच्या उपविभागीय कार्यालयात 'झोपा आंदोलन' केले.

सायंकाळी ७ ते रात्री ११ वाजेदरम्यान होत असलेल्या अघोषित भारनियमनामुळे शेतीपंप बंद राहत असून त्याचवेळी गावातील घरगुती वीजपुरवठाही खंडित होत असल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला.

pune: पुणे जिल्ह्यातील 10  हजार डॉक्टरांचा उद्या संप, सकाळी ६ पासून हॉस्पिटल बंद

पुणे -

पुणे जिल्ह्यातील दहा हजार डॉक्टरांचा उद्या संप, सकाळी ६ पासून हॉस्पिटल बंद

२० जुलैला सकाळी सहा ते 21 जुलैला सकाळी सहा पर्यंत खाजगी हॉस्पिटल बंद असणार

वैद्यकीय सेवा विस्कळीत होणार, आपत्कालीन सेवा सुरू राहणार असल्याची माहिती

महापालिका रुग्णालयात डॉक्टर, परिचारिका आणि आरोग्य कर्मचाऱ्यावर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ राज्यभरात डॉक्टरांचा संप

Pune: मुंबईतील माझगाव डॉकमधील कर्मचाऱ्यांकडून वारकऱ्यांना ड्रायफूट वाटप

मुंबईतील माझगाव डॉक मधील कर्मचाऱ्यांकडून वारकऱ्यांना ड्रायफूट वाटप

श्री संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीन बरडचा मुक्काम सोडून पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान केलं,

या प्रवासादरम्यान रक्षा मंत्रालयाच्या माजगाव डॉकमधील शिपबिल्डर कर्मचाऱ्यांनी वारकऱ्यांना ड्रायफूट्स वाटप केलंय.

वारकऱ्यांची एनर्जी टिकून राहावी यासाठी या कर्मचाऱ्यांनी 100 किलो ड्रायफूट वारकऱ्यांना वाटला. हे सर्व कर्मचारी मुंबईवरून वारीमध्ये सहभागी झाले होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

फिफा वर्ल्डकप 2026चा 'ग्रँड फिनाले', स्पेनसमोर मेस्सीच्या अर्जेंटिनाचं तगडं आव्हान

सोनम वांगचुक यांचा रुग्णालयातून संदेश, 20 जुलैला भारताचं दुसरं स्वातंत्र्य आंदोलन, मोदी सरकारचं टेंशन वाढलं

वारकऱ्यांसाठी मोठी खुशखबर! पंढरपूरमध्ये यंदा वारीत ‘एअर ॲम्बुलन्स’, एकनाथ शिंदेंचा मोठा निर्णय

नीट पेपरफुटीनंतर निकालात घोळ, विद्यार्थी, पालकांचा संताप, NTAवर गंभीर आरोप

महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा भूकंप! बड्या नेत्यानं केली नव्या पक्षाची घोषणा; थेट बारामतीतून फुंकले रणशिंग

SCROLL FOR NEXT