कोल्हापुरातील सायबर चौक परिसरातील सिग्नलवर भीषण अपघात
सायबर चौक परिसरातील सिग्नलवर शिवाजी विद्यापीठाकडून येणाऱ्या ट्रकचे नियंत्रण सुटल्याने ट्रक झाला तीन वाहनांवर पलटी
ट्रकच्या या विचित्र अपघातात चार वाहनांचे मोठं नुकसान तर तीन जण जखमी
बीडच्या स्ट्रॉंग रूम बाहेर पोलीस बांधवांसह कार्यकर्त्यांचा खडा पहारा.
सीसीटीव्ही कॅमेऱ्याची ही स्ट्रॉंग रूमच्या ईव्हीएम मशीनवर नजर.
शेकोटी लावून कार्यकर्त्यांचा खडा पहारा
नागपूर पोलिसांची कारवाई असल्याची माहिती
पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतल्याचीही माहिती
एमडी मादक पावडर तयार करण्याचा कारखाना असल्याची माहिती
नागपूर पोलिसांनी वर्धा जिल्ह्यात येऊन केलीय कारवाई
पेठवडगाव मध्ये स्ट्रॉंग रूमच्या समोर लावलेले सीसीटीव्ही कॅमेरे पोलिसांनी काढले
उमेदवारांनी स्वखर्चाने कॅमेरे लावले होते. मात्र पोलिसांनी हे सीसीटीव्ही कॅमेरे काढून टाकलेत. त्यामुळे उमेदवार आणि कार्यकर्ते आक्रमक झालेत. आता स्ट्राँग रूम समोर तणावाची स्थिती निर्माण झालीय.
जळगावच्या धरणगाव येथे स्ट्रॉंग रूम येथे ईव्हीएम सुरक्षेसाठी कडा पहारा देण्यासाठी महाविकास आघाडीच्या उमेदवार एकत्र आल्याचे पाहायला मिळालं.
नगरपरिषद निवडणुकीच्या रिंगणात असलेल्या महाविकास आघाडीच्या उमेदवार देखील स्ट्रॉंग रूम ईव्हीएमच्या सुरक्षेसाठी पुढाकार घेतला आहे.
मोहोळ नगर परिषद निवडणूक पार पडल्यानंतर स्ट्रॉंग रूम बाहेर शिवसेना उबाठा गटाच्या कार्यकर्त्यांचा 24 तास पहारा
सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ नगर परिषदेत नगराध्यक्ष पदासाठी पार पडत आहे बहुरंगी लढत
मोहोळ नगर परिषद मत पेटी असणाऱ्या स्ट्रॉंग रूम बाहेर पोलिसांचा सुरूय काढेकोट बंदोबस्त
शिवसेना उबाठा गटाच्या कार्यकर्त्यांनी स्ट्रॉंगरूम बाहेर मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांना पहारा देता यावा यासाठी मागितली होती परवानगी
मात्र आचारसंहिता सुरु असल्याने प्रशासनाने मोठ्या संख्येने स्ट्रॉंग रूम बाहेर थांबाण्याचा परवानगीला दिला आहे नकार
दिवसभरात साधारण 50 कार्यकर्ते देतायत मोहोळ नगर परिषद स्ट्रॉंग रूम बाहेर पहारा
अलिबागचे आमदार महेंद्र दळवी यांचा व्हिडिओ व्हायरल केल्यानंतर आंबादास दानवे यांच्या विरोधात रायगडमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. दानवे यांचा रायगडमध्ये निषेध केला जात आहे. आंबादास दानवे यांनी माफी मागितली नाहीतर निषेध चालू राहिल असा इशारा रायगडचे शिवसेना जिल्हा प्रमुख राजा केणी यांनी दिला आहे. दानवे यांच्या विरोधात अलिबाग पोलिस अधिक्षक कार्यालयात निवदन देऊन तक्रार दाखल केली जाणार आहे तर दानवे यांनी आमदार महेंद्र दळवी यांच चॅलेंज स्विकाराव अस आव्हान जिल्हा प्रमुख राजा केणी यांनी दानवे यांना दिल आहे.
मुंबई विद्यापीठाच्या विधी पाचव्या सत्राच्या परीक्षेत झालेल्या बारकोड गोंधळावर युवासेनाने तातडीने दखल घेतली. युवासेना सिनेट सदस्य प्रदीप सावंत व माजी सिनेट सदस्य राजन कोळंबेकर यांनी प्र-कुलगुरू डॉ. अजय भामरे यांची भेट घेऊन विद्यार्थ्यांच्या तक्रारी मांडल्या. उशीरा प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांची प्रवेशपत्रे तयार करण्यात तीन दिवस लागतात, त्यामुळे बारकोड उशिरा तयार झाल्याचे कुलगुरूंनी स्पष्ट केले. मात्र ही प्रक्रिया दहावी-बारावी प्रमाणे एका दिवसावर आणता येऊ शकते, असा मुद्दा प्रतिनिधींनी पुढे केला. त्यानंतर कुलगुरूंनी कुलसचिवांना तातडीने बोलावून उपाययोजना करण्याचे निर्देश देत लवकरच तोडगा निकाली काढण्याचे आश्वासन दिले.
मुलुंड येथील डम्पिंग ग्राउंडच्या जागेवर गोल्फ क्लब बनविण्याचा निर्णय मनपाने घेतलाय. त्याबाबत लवकरच कामाला सुरुवात होईल, असे आश्वासन पालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी दिले आहे. त्याला संजय दिना पाटील यांनी विरोध दर्शवत त्या ठिकाणी रुग्णालय, शाळा, कॉलेज बांधण्याची मागणी केलीये.
० अलिबाग, रोहा, मुरुड, माणगावमध्ये आंबदास दानवे यांचा शिवसैनिकांकडून निषेध
० दानवे यांच्या पुतळ्याच दहन, फोटोला जोडे मारत जोरदार घोषणाबाजी करीत आंबादास दानवे यांचा रायगडमध्ये निषेध
भारतीय संविधानाची अमृतमहोत्सवी वाटचाल या विषयावर मुख्यमंत्री यांनी विधानसभेत केलेल्या भाषणाचा पुस्तक प्रकाशन सोहळा राज्यपाल यांचे शासकीय निवासस्थान असलेल्या लोक भवन येथे पार पडत आहे...
या कार्यक्रमाला मंत्री नितेश राणे आणि त्यांचे बंधू निलेश राणे देखील उपस्थित आहे..
यावेळी राणे बंधूनी हस्तांदोलन करत हितगूज केल्याचं पाहायला मिळाल
इंडिगो एअर लाईन्सच्या गोंधळात मावळातील गुलाब उत्पादक शेतकऱ्यांना 2 कोटींचा तर देशातील शेतकऱ्यांना दहा कोटींचा फटका बसलाय. रोज देशांतर्गत चाळीस लाख गुलाब फुलांची वाहतूक होते, त्यातील पंचवीस टक्के म्हणजे दहा लाख गुलाबांची वाहतूक ही विमानाने होते. मात्र इंडिगोच्या गोंधळानं ही फुल विविध विमानतळांवर पडून आहेत. आज एक गुलाबाला वीस रुपयांचा दर आहे, हे पाहता रोज दोन कोटी म्हणजे गेल्या पाच दिवसांत दहा कोटींचा फटका फुल उत्पादक शेतकऱ्यांना बसलाय.
तानसा धरणातून भांडुप जलशुद्धीकरण केंद्राला जाणारी २७५० मिमी व्यासाची ७५ वर्षे जुनी जलवाहिनी यशस्वीरीत्या बदलली.
अत्यंत जटिल आणि जोखमीचे काम २८ तासांच्या अखंड मेहनतीनंतर पूर्ण
हे काम ८ डिसेंबर सकाळी १० वाजता सुरू होऊन ९ डिसेंबर दुपारी २ वाजता संपन्न
कामादरम्यान सहकार्य केल्याबद्दल १७ प्रशासकीय विभागातील नागरिकांचे आभार.
जलवाहिनी बदलल्याने १७ वॉर्डांचा पाणीपुरवठा टप्प्याटप्प्याने सुरळीत सुरू
जुन्या, जीर्ण ब्रिटिशकालीन जलवाहिन्यांच्या आधुनिकीकरण मोहिमेत महापालिकेचा महत्त्वाचा टप्पा गाठला.
सुरक्षित, स्वच्छ आणि अखंडित पाणीपुरवठ्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेची कटिबद्धता अधोरेखित.
बाबा आढाव यांच्या पार्थिवावर वैकुंठात अंत्यविधी
उपमुख्यमंत्री, पुण्याचे पालकमंत्री अजित पवार उपस्थित
शासकीय इतमामात पार पडणार अंत्यविधी
ठाकरेंच्या शिवसेनेची उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत शिवसेना भवान इथे बैठक पार पडली
उद्धव ठाकरेंनी राज्यभरातील विधानसभा आणि जिल्हा संपर्कप्रमुखांबरोबर बैठक घेतली
आगामी निवडणुका आणि संघटनात्मक बांधणीच्या पार्श्वभूमीवर बैठक पार पडली
निवडणुकीत पैशाच्या आमिषाला बळवून बळी पडू नका पैसा क्षणीक आहे
आपल्या सरकारच्या काळात घेतलेला शेतकरी कर्जमाफीचा मुद्दा तसेच कोविड काळात केलेले काम लोकांपर्यंत पोहोचवा
संघटनात्मक बांधणी करा लोकांच्या सुखदुःखात सहभागी व्हा
गद्दार लोकांना भाजप कढीपत्त्यासारखे दूर करणार
महाराष्ट्राला भाजपने कर्जाच्या खाईत घातले भाजप पैशाचं राजकारण करतय
उद्धव ठाकरेंच्या जिल्हा संपर्कप्रमुख आणि विधानसभा संपर्कप्रमुखांना सूचना
मुंबई पोलिसांकडून अंमली पदार्थविरोधी मोहिमेला मोठे यश;
ड्रग्स नेटवर्कविरोधात कारवाईचा वेग कायम.
अंमली पदार्थ विरोधी कक्ष, मुंबई यांनी आज 1815 किलो गांजा आणि 27,880 कोडीन मिश्रित बॉटल्स असा एकूण 5 कोटी रुपये किमतीचा जप्त मुद्देमाल पनवेल तळोजा येथे नाश केला.
हे पदार्थ गुन्हे शाखा–अंमली पदार्थ विरोधी कक्षांतर्गत दाखल 5 गुन्ह्यांमधून जप्त करण्यात आले होते.
यापूर्वी मे 2025 व ऑक्टोबर 2025 मध्येही मुंबई पोलिसांनी 692 किलो अंमली पदार्थ आणि 12,341 कोडीन बॉटल्स असा 130.86 कोटी रूपयांचा मुद्देमाल नष्ट केला होता.
काल झालेल्या कारवाईसह 2025 मधील ही तिसरी मोठी कार्यवाही असून, तीनही कारवायांमध्ये एकूण 2507 किलोग्रॅम अंमली पदार्थ आणि 40,221 कोडीन मिश्रित बॉटल्स असा 136 कोटी रुपयांचा मुद्देमाल नष्ट करण्यात आला आहे.
- संगमनेर तालुक्यातील घारगाव शिवारात 4 डिसेंबर रोजी मुळा नदीच्या पुलाखाली एका तीन महिन्याच्या चिमुकल्याचा मृतदेह आढळून आल्याची घटना घडली होती.. आई वडिलांनीच त्याचा खून करून, विल्हेवाट लावण्यासाठी मृतदेह नदीच्या पुलाखाली फेकून दिल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले आहे..
शास्त्रीय संगीताच्या प्रचार आणि प्रसाराच्या अविरत सेवेसाठी राष्ट्रीय स्तरावर आपली ओळख निर्माण केलेल्या कल्याण गायन समाजाच्या देवगंधर्व महोत्सवाला ऐतिहासिक टप्प्यांच्या त्रिवेणी संगमाची सुवर्ण किनार लाभली आहे. येत्या 12 ते 14 डिसेंबर दरम्यान कल्याणातील आचार्य प्रल्हाद केशव अत्रे रंगमंदिरात होणाऱ्या या महोत्सवात संगीत क्षेत्रातील दिग्गज कलाकार सहभागी होणार असल्याची माहिती संस्थेतर्फे आयोजित पत्रकार परिषदेत देण्यात आली. कल्याण गायन समाज आणि केडीएमसीच्या विशेष सहकार्याने हा देवगंधर्व महोत्सव साकार होणार आहे. या पत्रकार परिषदेला केडीएमसीचे आयुक्त अभिनव गोयल, शताब्दी समितीचे ॲड. शैलेंद्र जल्लावार, गायन समाज संस्थेचे राम जोशी, प्रशांत दांडेकर, महेश जोशी आदी मान्यवर उपस्थित होते.
हिंगोलीच्या वसमत शहरात बिल्डर कडून नवीन लेआउट टाकताना नैसर्गिक नाला बुजून टाकल्याने नागरिकांच्या घरासमोर नाल्यातील घाण पाणी जमा झाल्याने आरोग्याचा प्रश्न गंभीर झाला आहे या विरोधात वसमत शहरातील शांतीनगर गुरुकृपा नगर महालक्ष्मी नगर भागातील रहिवाशांनी वसमत पालिकेच्या विरोधात आंदोलन करत नाल्यामध्ये जलसमाधी घेण्याचा इशारा दिला आहे, वसमत नगर परिषदेचे मुख्याधिकारी नागरिकांच्या मूलभूत सोयी सुविधांकडे लक्ष देत नसल्याचा गंभीर आरोप देखील या आंदोलन करणाऱ्या रहिवाशी नागरिकांनी केला आहे.
पुणे -
पुण्यातील कर्वे रोडवर पीएमपी बसची रिक्षाला धडक
अपघातात रिक्षाचा चेंदामेंदा, चालकासह प्रवासी गंभीर जखमी
बस चालकाला स्थानिकांकडून चोप
कर्वे रोडवरील नळ स्टॉप जवळ घटना
नाशिक -
- आमच्या नाशिककरांचे रक्त घ्या पण तपोवनातील प्रस्तावित वृक्षतोड करू नका
- तपोवनात प्रहार संघटनेकडून रक्तदान शिबिर घेत अनोखे आंदोलन
- आगामी सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी नाशिकच्या तपोवनात साधुग्राम उभारण्यासाठी मनपा प्रशासनाकडून वृक्ष तोड करण्यात येणार आहे
- या संदर्भात गेल्या २२ दिवसांपासून पर्यावरण प्रेमींसह नाशिककर आक्रमक झालेले आहे
पुणे -
डॉ. बाबा आढाव यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात होणार अंत्यसंस्कार
ज्येष्ठ समाजसेवक डॉ. बाबा आढाव यांचे दुःखद निधन
त्यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्याचे राज्य शासनाकडून निर्देश
जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्या मान्यतेनुसार पोलीस विभागाला आवश्यक कार्यवाही तातडीने करण्याचे आदेश
नाशिक -
- तपोवनातील झाडं वाचवण्यासाठी काँग्रेसच आंदोलन
- प्रशासनाच्या वृक्षतोडीविरोधात काँग्रेसची घोषणाबाजी
- कुठल्याही परिस्थितीत तपोवनातील एक झाड काय, झाडाची फांदी देखील तोडू देणार नाही, काँग्रेसची भूमिका
- लाठ्या काठ्या घेऊन महिलादेखील काँग्रेसच्या आंदोलनात सहभागी
- तपोवनात केक कापून काँग्रेस कार्यकर्त्यांनी काँग्रेस नेत्या सोनिया गांधींच्या वाढदिवस साजरा केला
नागपूर -
मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थी सहाय्यक संघटनेचा नागपूर अधिवेशनावर पोहचला टेकडी रोडवरील मोर्चा पॉईंटवर
11 महिने प्रशिक्षण देऊन सरकारने वाऱ्यावर सोडल्याचा आरोप
चॉकलेट बांधलेले दुपट्टा आणि टोपी हातात घेऊन घोषणाबाजी
"चॉकलेट नको रोजगार दया"
मुख्यमंत्री युवा प्रशिक्षणार्थीकडून टेकडी मोर्चा पॉइंटवर जोरदार घोषणाबाजी सुरू
बालाजी चाकूरकर आणि तुकाराम बाबा यांचा नेतृत्वाखाली मोर्चा
नाशिक -
- मंत्री माणिकराव कोकाटे बदनामी प्रकरणी रोहित पवारांना कोर्टाची १६ डिसेंबरपर्यंत बाजू मांडण्याची मुदत
- स्वतः हजर राहण्याच्या आदेशानंतरही रोहित पवारांनी वकिलांमार्फत मांडली भूमिका
- कोकाटे यांचा ‘रम्मी खेळत’ असल्याचा व्हिडिओ कोणी काढला? पवारांना व्हिडिओ कोणी दिला?—या मुद्द्यावर अधिक तपासाची मागणी
- दोन्ही बाजूंच्या वकिलांनी आज नाशिक कोर्टात मांडली आपापली बाजू
- वेळ मागितल्याने कोर्टाकडून रोहित पवारांना अतिरिक्त मुदत मंजूर
पुणे -
पुण्यातील रमेश डाईंग दुकानाला लागलेली आग आटोक्यात
अग्निशमन दलाला आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश
अग्निशमन दलाकडून कुलिंग ऑपरेशन सुरू
१० अग्निशमन दलाच्या गाड्या आणि जवानांनी मिळवलं आगीवर नियंत्रण
सुदैवाने घटनेत कुठली ही जीवितहानी नाही
सिंधुदुर्ग जिल्ह्यात पर्यटनाचा हंगाम सुरू असून पर्यटक सागरी सफरींची मजा लुटत आहेत. या पर्यटकांना डॉल्फिनचे दर्शन पर्वणीच ठरत आहे. सध्या वेंगुर्ला, निवती या समुद्र पट्ट्यात सकाळी आणि संध्याकाळी डॉल्फिनचे दर्शन होत असून पर्यटक बोटीत बसून या डॉल्फिन दर्शनाची मजा लुटताना दिसून येत आहेत.
संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाला आज एक वर्ष पूर्ण होत आहेत. संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख व देशमुख कुटुंब यांच्या भेटीसाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील मसाजोगमध्ये दाखल झाले.
राज्यात ओबीसी विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह आणि अभ्यासिका उभारण्यात येत आहे. पण सध्या ही वसतिगृह भाड्याच्या इमारतीत आहे. त्याऐवजी सरकारने जमीन विकत घेऊन विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह बांधावी अशी मागणी काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवर यांनी केली.
पुण्यातील रमेश डाईंग दुकानाला भीषण आग लागल्याची घटना समोर आली आहे. अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळी दाखल झाले आहे.
पुणे जिल्ह्यातील पूर्व हवेली तालुक्यातील अष्टापूर परिसरात आज पहाटे एक धक्कादायक घटना घडली आहे.
पन्नास वर्षीय महिलेवर बिबट्याने थेट हल्ला केला. सुदैवाने महिलेनं प्रसंगावधान राखत आरडा-ओरड करत जीव वाचवला
बाबा आढाव यांच्या निधनामुळे बुधवारी मार्केट बंद राहणार
बुधवार १० डिसेंबर २०२५ रोजी संपूर्ण फळे भाजीपाला विभाग बंद ठेवण्यात येणार आहे.
तसेच शोकसभा वार गुरुवार दि. ११ डिसेंबर २०२५ रोजी सकाळी १०:३० वाजता शारदा गजानन मंदिरासमोर मार्केट यार्ड येथे श्री छत्रपती शिवाजी महाराज कामगार युनियन पुणे व इतर सर्व घटकांच्या वतीने होणार आहे.
संतोष देशमुख यांची 9 डिसेंबर 2024 रोजी अपहरण करून वाल्मीक कराडच्या सांगण्यावरून निर्घृणपणे हत्या करण्यात आली. यानंतरचे केज येथील उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी नेल्यानंतरचे धक्कादायक फोटो समोर आले आहेत. यापूर्वी आरोपींनी मारहाण करताना काढलेले काही फोटो समोर आले होते तसेच पाठमोरे फोटो देखील समोर आले होते. त्यामधून किती क्रुरपणे आणि अमानुषपणे ही हत्या झाली होती हे अख्ख्या महाराष्ट्राने पाहिलं होतं. आणि आता हे नवीन फोटो समोर आले असून यामधून देखील मारेकऱ्यांची क्रुरता समोर आली आहे. या हत्या प्रकरणाला आज एक वर्ष पूर्ण झाले आहे. गावातीलच एका व्यक्तीने आपल्या मोबाईल मध्ये घेतलेले हे फोटो आता समोर आले आहेत.
- आमदार रोहित पवार यांना आज नाशिकच्या न्यायालयात हजर राहण्याचे आदेश
- क्रीडामंत्री माणिकराव कोकाटे यांच्या बदनामी प्रकरणी नाशिक जिल्हा सत्र न्यायालयाने हजर राहण्याचे आज काढले आहे आदेश
- पवार यांनी कोकाटे यांचा मोबाईलवर पत्ते खेळतांनाचा व्हिडीओ केला होता ट्विट
- पोलिसांनी केलेल्या चौकशीत कोकाटे यांच्या आरोपात तथ्य असल्याचा अहवाल आला आहे समोर
- हिवाळी अधिवेशनामुळे रोहित पवार हजर राहणार का ? याकडे लक्ष
अश्व बाजारासाठी देशभरात प्रसिद्ध असल्यास सारंगखेड्याच्या चेतक महोत्सवात कोटींची उलाढाल पाहायला मिळत असून यात्रेत आत्तापर्यंत घोडे विक्रीतून एक कोटींचा टप्पा पार पडला आहे, घोडेबाजारात अश्वप्रेमींनी मोठ्या प्रमाणावर घोडे खरेदी केली असून आतापर्यंत 285 घोडे विक्री झाले असून त्या विक्रीतून तब्बल दीड कोटी रुपयांची उलाढाल झालेली आहे, सारंगखेड्याच्या या चेतक फेस्टिवल मध्ये देशभरातून एकूण तीन हजाराहून अधिक घोडे विक्रीसाठी दाखल झालेले आहेत. चेतक फेस्टिवलच्या या अश्व बाजारात अनेकांना रोजगार मिळत आहे..
सातारा शहरातील शिवतीर्थ येथे इनरव्हील क्लब सातारा यांच्या वतीने महिलांचा नाईट वॉकेथॉन आयोजित करण्यात आला होता. महिलांवर होणारे हल्ले आणि अत्याचार याबाबत महिलांनी एकत्र येऊन जनजागृती करत नाईट वॉकेथॉन पार पडला. याची सुरुवात अप्पर पोलीस अधीक्षक वैशाली कडुकर आणि सीनियर डिव्हिजन लीगल सेक्रेटरी नीना बेडरकर यांच्या हस्ते फ्लाग ऑफ करून सुरुवात करण्यात आली शिवतीर्थ ते राजवाडा आणि राजवाड्याहून पुन्हा शिवतीर्थ असा हा नाईट वॉकेथॉन पार पडला.. यावेळी सर्व महिलांनी एकत्र येऊन अन्यायाविरुद्ध लढा देण्याची शपथ घेतली याला महिलांचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळाला.
कणकवली नगरपंचायत निवडणूक मतदान दोन डिसेंबरला पार पडले. यानंतर या मतपेट्या कणकवली तहसील कार्यालयामधील स्ट्राँगरूम मध्ये सीसीटीव्हीच्या नजर कैदेत ठेवण्यात आल्या आहेत. या स्ट्राँगरूमच्या बाहेर कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. निवडणूक आयोगाकडून आलेल्या परिपत्रकामध्ये उमेदवारांना आपले प्रतिनिधी या ठिकाणी ठेवायचे असेल तर ते ठेवू शकतात असे सांगण्यात आल्यानंतर कणकवली शहर विकास आघाडीच्या नेत्यांकडून स्ट्राँगरूमच्या बाहेर मतमोजणी होईपर्यंत एक व्यक्ती ठेवण्यात आली आहे. त्यामुळे शहर विकास आघाडीकडून ईव्हीएम स्ट्राँगरूमच्या बाहेर दिवस रात्र पहारा असल्याचे दिसून येत आहे.
'साम टीव्ही'च्या बातमीनंतर अखेर वांगणी-बदलापूर महामार्गावरील गोरेगाव ते ढवळेपाडा या रस्त्याच्या कामाला सुरुवात झालीय. सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत या रस्त्याचं डांबरीकरण सुरू आहे. त्यासाठी 2 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आलाय. पावसाळ्यात या रस्त्याची अक्षरशः चाळण झाली होती. त्यामुळे वाहनचालकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत होता. याठिकाणी अपघाताच्या घटनाही घडल्या होत्या. याबाबत 'साम टीव्ही'ने सातत्याने बातम्या दिल्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाने रस्त्याच्या दुरुस्तीला सुरुवात केलीय.
बुलढाणा जिल्ह्याच्या लोणार तालुक्यातील खळेगाव येथील दत्तात्रय वायाळ व मनीषा वायाळ दांपत्याला गावातील पोलीस पाटील असलेले दिलीप वायाळ यांच्यासह इतर नऊ जणांनी घरात येऊन बेदम मारहाण केल्याची तक्रार बीबी पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे, या तक्रारीवरून नऊ जणांविरोधात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.. दोन्ही कुटुंबाचा गेल्या दोन-तीन वर्षापासून शेतीचा वाद असून त्यातूनच ही मारहाण झाल्याची माहिती आहे.. दिलीप वायाळ पोलीस पाटील असल्याने आरोपींवर पोलीस योग्य कारवाई करत नसल्याचा आरोप दत्तात्रय वायाळ यांनी केला आहे...
श्री कसबा गणपती हे पुण्याचे ग्रामदैवत आहे आणि पुणे शहराचे प्रमुख दैवत मानले जाते. सध्या पुण्यासह राज्यात थंडीचा कडाका वाढला आहे. याच निमित्ताने पुण्यातील कसबा गणपतीला सुद्धा आता लोकरीचा पोशाख परिधान करण्यात आला आहे. ग्रामदैवत श्री कसबा गणपती मंदिर देवस्थानाच्या वतीने शिशिर ऋतू मधील संकष्टी चतुर्थी आणि सध्या पुण्यात पसरलेली थंडी या निमित्ताने मंदिरात श्री जयती गजानन स्वयंभू मूर्तीस लोकरीचा पोशाख परिधान करण्यात आला होता. पुण्यातील सारसबाग येथे असलेल्या तळ्यातील गणपतीला सुद्धा थंडीच्या काळात आकर्षक स्वेटर परिधान केले जाते. नुकत्याच पार पडलेल्या चतुर्थीच्या निमित्ताने कसबा गणपतीला हा पोशाख परिधान केल्यानंतर भाविकांनी बाप्पाचे हे रूप पाहण्यासाठी मोठी गर्दी केली होती...
राज्यात कडाक्याची थंडी जाणवायला लागलीये. सकाळी आणि रात्रीला हुडहुडी भरणारी थंडी जाणवत आहेये. किमान तापमानाचा पारा 10.6 अंश सेल्सिअसपर्यंत घसरलाये..
दरम्यान, अकोला शहरासह जिल्ह्यात आजपासून पुढील 4 दिवस पारा आणखी घसरणार आहेये, असा अंदाज हवामान खात्याकडून व्यक्त करण्यात आलाय. विदर्भातही थंडीची लाट कायम असून अमरावती, नागपूर, गोंदिया, भंडाऱ्यात 10 अंशाच्या खाली गेलाये..
दरम्यान, आज आणि काल अकोल्याचा तापमानाचा पारा 10.6 अंश सेल्सिअसपर्यंत घसरलाये.. यंदाच्या हंगामातील हे सर्वांत नीचांकी तापमान मानलं जातय. तापमानामध्ये घट झाल्यामुळे अकोलेकरांना चांगलीच हुडहुडी देखील भरलीय..
नांदेड शहरातील एका तेल व्यापाऱ्याची 30 लाख रुपये असलेली बॅग चोरट्यानी कार मधून पळवली. जुना मोंढा येथील तेल व्यापारी विनायक पारसेवार काल रात्री आपले दुकान बंद करून जात होते. आपल्या कारमध्ये ते बसले पण कार पंक्चर असल्याचे त्यांना समजले. पारसेवार कारमधून उतरताच तिथे अगोदरच संधी पाहत उभ्या असलेल्या चोरट्याने कारमधून पैश्यांची बॅग काढली. त्याचा साथीदार दुचाकी घेऊन तयारच होता. काही कळण्यापूर्वी बॅग घेऊन दोघे पसार झाले. पारसेवार यांनी त्यांना पकडण्याचा प्रयत्न केला पण चोरटे धूम स्टाईल पसार झाले. या घटनेने व्यापाऱ्यांमध्ये दहशतीचे वातावरण पसरले आहे.
सहकार क्षेत्रात नावलौकिक असलेला, विकासरत्न विलासराव देशमुख मांजरा शेतकरी सहकारी साखर कारखान्याचा चालू गळीत हंगाम जोमाने सुरू झाला आहे, दरम्यान चालू हंगामासाठी मांजरा साखर कारखान्याने 2हजार 750 रुपये प्रति मॅट्रिक्टनाप्रमाणे बिलाची रक्कम ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यास सुरुवात केली आहे. तर यंदाच्या हंगामासाठी किमान 3 हजार 150 रुपये प्रति मॅट्रिक टन ऊस दर जाहीर करण्यात आला आहे
शासकीय कर्मचाऱ्यांच्या वैद्यकीय बिलांच्या फाइल्सपोटी गोळा केलेल्या पैशांचा हिशेब लिहिलेली नोंदवही येथील जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रशांत वाडीकर यांच्या कार्यालयात सापडली. उद्धवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी ही नोंदवही शोधून काढल्याने आरोग्य विभागात खळबळ उडाली. सुमारे १२ लाखांहून अधिक रक्कम गोळा केल्याचे या नोंदवहीवरून स्पष्ट झाले आहे. यावेळी कार्यकर्त्यांनी आक्रमक भूमिका घेतली. डॉ. वाडीकर यांनी गुन्हा दाखल करण्याचा शब्द दिल्यानंतरच सर्वजण त्यांच्या कार्यालयातून उठले. शासकीय कर्मचाऱ्यांच्या वैद्यकीय बिलांच्या फाइल्स लवकर निर्गत होत नसल्याच्या तक्रारी होत्या. याआधीच्या जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुप्रिया देशमुख यांनी चुकीचे आजार प्रमाणपत्र दिल्याचे प्रकरण उघडकीस आले होते. याबाबत उद्धवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी प्रलंबित फाइल्स का राहिल्या, असा सवाल करत जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रशांत वाडीकर यांना फाइल्स दाखवण्यास सांगितले. वाडीकर ज्या ठिकाणी बसतात त्यांच्याच वरच्या मजल्यावरील या फाइल्स पाहत असतानाच ही नोंदवही सापडली. वहीत 'मॅडम' आणि 'सरांना' किती रुपये दिले याचा हिशेबच लिहून ठेवल्याचे समोर आले. यामध्ये प्रत्येक पानाचा हिशेब केला असून, त्या पानावर शेवटी कोणाला किती पैसे दिले याची नोंद आहे.
२० डिसेंबरला महत्त्वाचा निर्णय शरद पवारांचे प्रदेशाध्यक्ष पुण्यात येऊन घेणार अजित पवारांच्या आघाडीबाबत निर्णय
शहरांमध्ये पक्षांतर्गत दोन गट पडले असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
या पार्श्वभूमीवर प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे हे पुणे दौऱ्यावर येणार असून या सगळ्या गोष्टींचा सोक्षमोक्ष लावणार असल्याचं सांगितल्या जात आहे.
दरम्यान शरद पवारांच्या सूचनेनंतर आता शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष पुणे दौऱ्यावर येणार असून १९ आणि २० दोन दिवस प्रदेशाध्यक्ष पुण्यामध्ये ठाण मांडून असणार आहे . या दौऱ्या दरम्यान ते पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरातील स्थानिक पदाधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन परिस्थितीचा आढावा घेतील तसेच पक्षातील स्थानिक नेत्यांचं मत देखील जाणून घेणार आहेत.
सांगलीच्या पलूस तालुक्यातल्या आमणापूर येथील कृष्णाकाठावर सध्या छोटा आर्ली पक्षांची शाळा भरली आहे.कोंडार परिसरातील कृष्णा नदीच्या काठावर छोटा आर्ली पक्षांचा मुक्काम पाहायला मिळत आहे.तलाव,नदीकाठी आढळणारा करड्या रंगाचा छोटा आर्ली हा पक्षी प्रॅंटिकोल वर्गातील ग्लेरिओलिडे कुळातील पक्षी आहे.
हे पक्षी प्रामुख्याने भारतासह,नेपाळ, पूर्व पाकिस्तान आणि श्रीलंका या प्रदेशात आढळतात.त्यांचा निवास नद्या आणि दलदलीचे प्रदेश या ठिकाणी असतो, चिमणीएवढ्या आकाराचे पाकोळीसारखे टोकदार पंख आणि बाणाच्या आकाराची शेपटी असा या पक्षांची ओळख आहे.सध्या हा छोटा आर्ली कृष्णाकाठावर स्थिरावला असून तब्बल 53 छोटा आर्ली पक्षांची नोंद झाली आहे.
छत्रपती संभाजीनगरात लग्नसमारंभाच्या कार्यक्रमात एका चोरट्याने पैसे आणि मोबाईल असलेली पर्स लंपास केल्याची घटना समोर आली आहे. सुतगिरणी चौक परिसरातील जानकी बँक्वेट हॉलमध्ये सुरू असलेल्या लग्नसोहळ्यात एका चोरट्याने अत्यंत शिताफीने ही चोरी केली असून, हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. या प्रकरणी हर्ष रविंद्र भावसार यांनी तक्रार दिली असून त्यांच्या आईची पर्स अज्ञात चोरट्याने हॉलमध्ये प्रवेश करून चोरून नेली. या पर्समध्ये दोन मोबाईल फोन आणि रोख रक्कम असा एकूण १७ हजारांचा मुद्देमाल होता. घटनेनंतर जवाहर नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांनी चोरट्याचा शोध सुरू केला आहे.
पत्नी पतीला नेहमी अपमानास्पद वागणूक देत असल्याने रागाच्या भरात पतीने पत्नीचा कुऱ्हाडीने खून केल्याची घटना जळगाव जामोद तालुक्यातील उटी बुद्रुक येथे मध्यरात्री घडली... याप्रकरणी आरोपी पवन गजानन धुंडाळे वय 28 वर्ष याच्याविरुद्ध जळगाव जामोद पोलीसात गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे....
विदर्भात शेतकरी आत्महत्यांचे सत्र थांबण्याचे नाव घेत नाही. राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव तालुक्यातील चिंचोली गावात राजेश रामकृष्ण इंगळे या 55 वर्षीय शेतकऱ्याने कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या केली.
एकीकडे अधिवेशनात शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर चर्चा होणार, तर दुसरीकडे शेतकरी रोज हतबल होत जीव देत आहेत. पीकनुकसान, कर्जबाजारीपणा, अपुरी मदत आणि सरकारी दुर्लक्ष यामुळे शेतकरी अक्षरशः उद्ध्वस्त झाला आहे...या घटनेनंतर परिसरात हळहळ व्यक्त होत असून सरकारने तातडीने कुटुंबाला आर्थिक मदत द्यावी, तसेच कर्जमाफी आणि कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात अशी जोरदार मागणी केली जात आहे...
किनगाव जट्टू ते भुमराळा या रस्त्यावर खड्डेच खड्डे पडले असून नेहमी अपघात होतात, खड्ड्यात रस्ता, की रस्त्यात खड्डे हे कळायलाच मार्ग नाही.. रस्त्यावर अपघाताचे प्रमाण वाढले असून असंख्य नागरिकांना अपंगत्व आले आहे , तसेच विदर्भ मराठवाडा ला जोडणारा हा मुख्य मार्ग असल्याने या रस्ताची दयनीय अवस्था झाली आहे, निधी अभावी ठेकेदाराने काम करण्यास मनाई केली आहे.. दीड वर्षांपासून रस्त्याचे काम रखडले आहे आज भाजपाच्या वतीने रस्त्यावरील खड्ड्याचे पूजन करण्यात आले व गणपती आरती घेण्यात आली असे अनोखे आंदोलन करून शास्नाचे लक्ष वेधण्यात आले.. जर आठ दिवसात कामाला सूरवात झाली नाही तर जिल्हा कचेरीवर उग्र आंदोलन करू असा इशारा भाजपचे नेते देवानंद सानप यांनी दिला आहे..
नाशिकच्या ग्रामीण भागात तापमानाचा पारा घसरला असून मालेगाव चे तापमान अकरा अंशावर असतांना पारा आणखी खाली घसरला असून तो ९ अंशावर आल्याने नागरीकांना चांगलीच हुडहुडी भरल्याने पुन्हा एकदा शेकोट्या पेटवत थंडी पासून बचावाचा प्रयत्न करत असल्याच पहावयास मिळत आहे.
हवामान खात्याने थंडीची लाट येणार असल्याचा अंदाज वर्तविला होता. यंदाच्या हंगामातील यवतमाळ जिल्ह्याचा सर्वाधिक कमी तापमानाची नोंद करण्यात आली असून पारा 8.8 अंशावर स्थिरावला. तर दुसरीकडे दिवसाचे तापमान वाढत असल्याचेही विरोधाभासी चित्र निर्माण झाली आहे 29 अंशावरून तापमान 30 वर पोहोचले आहे.1.2 अंश इतकी वाढ दिवसाच्या तापमानात झाली आहे.
विदर्भासह मराठवाड्यात गारठा कायम, पश्चिम महाराष्ट्रात सुद्धा किमान तापमानात घट
मराठवाड्यात पारा १० अंशाच्या जवळ
उत्तरेकडून गोठविणारी थंडी महाराष्ट्रावर धडकत असल्याने अनेक जिल्ह्यात किमान तापमानात घट
राज्यातील कुठल्या जिल्ह्यात किती तापमान (किमान तापमान)
अहिल्यानगर: ९.५
नाशिक: १०.३
यवतमाळ: ८.८
जळगाव: ९.४
मालेगाव: ९.०
गोंदिया: ९.०
पुणे: ११.३
नागपूर: ९.६
अमरावती: ९.६
महाबळेश्वर: १४.३
सातारा: १३.६
सांगली: १५.३
सोलापूर: १५.४
छत्रपती संभाजीनगर: १०.०
परभणी: १०.६
नांदेड: ९.६
बीड: १०.५
अकोला: १०.६
महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे (एमपीएससी) २१ डिसेंबर रोजी नियोजित असलेली ‘महाराष्ट्र गट ‘ब’ (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा’ पुढे
आता ही परीक्षा ४ जानेवारी २०२६ रोजी घेण्यात येणार
राज्यातील नगरपालिका आणि नगरपंचायतींसाठी मतदानाची मतमोजणी २१ डिसेंबरला होणार आहे
याच दिवशी महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे ‘महाराष्ट्र गट ‘ब’ (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा’ही आयोजित करण्यात आली होती
पुण्यातील कोरेगाव पार्क येथे महापालिकेचे काम सुरू असताना दुर्दैवी घटना
राहुल अनिल गोसावी (वय ३८) असे मृत्युमुखी पडलेल्या कर्मचाऱ्याचे नाव
सोमवारी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास घडली
राहुल हा महापालिकेच्या कोरेगाव पार्कमधील कचरा डेपोतील वाहन विभागात चालक म्हणून कार्यरत होता. काल दुपारी एकच्या वाजता दुसऱ्या चालकाने जेसीबी सुरू केला. त्यावेळी राहुल गोसावी तेथे उभा होता. जेसीबीचे लोखंडी फाळके अचानक खाली येऊन गोसावी यांच्या डोक्यात पडले. त्यात गंभीर जखमी झाल्याने गोसावी यांचा मृत्यू झाला.
छत्रपती संभाजीनगरमध्ये अटक केलेली महिला तोतया आयएएस अधिकारी आणि अन्य एजंटांनी मिळून अनेकांना देशाचे सर्वोच्च, नामांकित पुरस्कार मिळवून देण्याचे आमिष दाखवण्याचे दाखवून फसवणूक केल्याचं तपासात समोर आलंय. यात शहरातील एका स्वयंघोषित सामाजिक कार्यकर्त्याने राज्यपालांपासून ते कॅबिनेट मंत्री, आयएएस अधिकारी, पोलिस अधिकाऱ्यांकडून मिळालेले सन्मानपत्र, शिफारसपत्र तयार केले. या रॅकेटच्या संपर्कात आलेल्या अनेकांचा देशातील नामांकित पुरस्कारासाठी ५० ते ६० सन्मानपत्र, शिफारसपत्रांच्या फाईलसह प्रस्ताव तयार होता. पोलिसांनी यातील रमेश नामक व्यक्तीला चौकशीसाठी नोटीस दिल्याचे पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले. सामाजिक कार्यकर्ता सांगणाऱ्या रमेश यांच्या नावे तब्बल ३० सन्मानपत्र, तर देशाच्या सर्वोच्च पुरस्कारासाठी १४ राज्यांतील विधानसभेचे उच्चपदस्थ अधिकारी, कॅबिनेट मंत्री, नामांकित कीर्तनकार, राजघराण्यातील व्यक्ती, आमदार, आयएएस, पोलिस अधिकारी, नामांकित रुग्णालयाचे अध्यक्षांचे सन्मानपत्र, शिफारसपत्राची फाईल समोर आली आहे. हे सर्व पत्र त्यांनी अर्जासोबत जोडले होते
गोदावरी नदीपात्रातून अवैध वाळू उपसा करणाऱ्या वाळू माफियांविरोधात महसूल विभाग आणि पोलिसांनी धडक मोहीम हाती घेतली आहे.नांदेडच्या मुदखेड तालुक्यातील खुजडा गावाच्या परिसरात गोदावरी नदी पात्रातून अवैध वाळू उपसा होत असल्याची माहिती महसूल विभागाला मिळाली होती.मुदखेड महसूल विभाग आणि मुदखेड पोलिसांनी माहितीच्या आधारावर गोदावरी नदी पात्रातून होत असलेल्या अवैध वाळू उपसा करणाऱ्यांवर धाड टाकली.अवैध वाळू उपसा करणाऱ्या चार बोटी जिलेटिनच्या साह्याने स्फोट घडून नष्ट केल्या.
उत्तरेकडील शीत लहरींचे पुन्हा महाराष्ट्रात आगमन झाल्याने राज्यात थंडीची तीव्र लाट येण्याची चिन्हे आहेत. धुळे येथील कृषी महाविद्यालयात पारा ५.४ अंशांवर आल्याने हंगामातील नीचांकी तापमान नोंदले गेले आहे. आज (ता. ९) विदर्भासह राज्यात तुरळक ठिकाणी थंडीच्या लाटेची शक्यता आहे. तर उद्यापासून (ता. १०) मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात थंडीच्या तीव्र लाटेचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.
- भाजपचे आमदार कृष्णा खोपडे यांनी आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे यांची निलंबनाची केली मागणी...
- विधानसभा अधिवेशनात लावणार लक्षवेधी सूचना...
- अज्ञात व्यक्तीकडून आज विधानभवन परिसरात असतांना भाजप आमदार कृष्णा खोपडे यांना धमकीचे फो
- दहा ते पंधरा फोन सातत्याने केले, तुम्ही तुकाराम मुंडेच्या विरोधात तक्रार करू नका अश्या धमक्यांना दिल्या आहे,
- या सगळ्या संदर्भात पोलिसात तक्रार करणार असल्याच भाजप आमदर कृष्णां खोपडे यांनी साम tv सोबत बोलतांना सांगितलं..
शिरूर तालुक्यातील शिक्रापूर येथे जितेंद्र गायकवाड यांच्या घरासमोर ओट्यावर बसलेल्या पाळीव कुत्र्यावर बिबट्याने मध्यरात्री हल्ला चढवला.अचानक दबा धरून बसलेल्या बिबट्याने कुत्र्यावर झडप घालत त्याला उचलून नेलं.हा संपूर्ण थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात स्पष्टपणे कैद झाला असून,घटनेनंतर परिसरात बिबट्याच्या वाढत्या हालचालींमुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.