Crime News Saam tv
महाराष्ट्र

Beed Crime News: बीड जिल्ह्यात पुन्हा दहशत! परळीमध्ये हवेत गोळीबार, तिघांवर गुन्हा दाखल

Air Firing Incident: सोशल मीडियावर फोटो; दोन परवानाधारक, तर एक विनापरवानाधारक. तरीही हवेत गोळीबार करतानाचे फोटो अन् व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल. तिघांवर गुन्हा दाखल.

Bhagyashree Kamble

विनोद जिरे, साम प्रतिनिधी

बीडमधील माजी सरपंच संतोष देशमुख या प्रकरणाचे पडसाद देशभरात उमटले आहेत. २८ डिसेंबरला सर्वपक्षीय नेत्यांनी मोर्चा काढत आरोपीला अटक करण्यात यावी अशी मागणी केली. अशातच बीडमधून आणखीन एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. बीडच्या परळी तालुक्यात हवेत गोळीबार केल्याचा फोटो आणि व्हिडिओ सोशल मिडीयात व्हायरल होत आहे. या प्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बीडच्या परळी तालुक्यात हवेत गोळीबार करण्याचा प्रकार घडलाय. याचे व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियात व्हायरल झाला होता. या प्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोन दिवसांपूर्वी एकावर गुन्हा नोंद करून त्याला अटक करण्यात आल्यानंतर, परळी ग्रामीण पोलिसांनी आणखी तीन जणांवर गुन्हा नोंदवला आहे. हवेत गोळीबार आणि बंदुकीचे फोटो सोशल मीडियात अपलोड केल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आलाय.

माणिक हरिश्चंद्र याच्याकडे परनवानाधारक बंदुक आहे. त्यानं बंदुकीसह फोटो काढून तो सोशल मीडियात अपलोड केला होता. फोटो अपलोड करून दहशत निर्माण करण्याचा त्याचा प्रयत्न होता. तसेच परवान्यातील नियमांचे उल्लंघन केले. या प्रकरणी पोलीस कर्मचारी विष्णू घुगे यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तर, जयप्रकाश उर्फ बाळू रामधन सोनवणे यानं १४ सप्टेंबर २०२३ रोजी पांगरी कॅम्प येथे परवानाधारक १२ बंदुकीतून हवेत गोळीबार केला होता. या प्रकरणी परळी ग्रामीण पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर कुणाल श्रीकांत याने बंदुकीचे फोटो सोशल मीडियात अपलोड केले. बंदुक परवाना नसतानाही त्यानं बंदुकीचे फोटो अपलोड केले होते. या प्रकरणी त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: जळगावात पुन्हा भीषण अपघात टँकरच्या धडकेत आयटीआय विद्यार्थ्याचा मृत्यू; दोन जखमी

Sugar price hike: एका महिन्यात साखर तब्बल २९ टक्क्यांनी महागली, आता केंद्र सरकारने घेतला मोठा निर्णय; काय आहे नवा नियम?

Taj Mahal: ताजमहालच्या तळाशी 42 विहिरी का आहेत? काय आहे त्यांचं रहस्य?

Bollywood Actor : हृतिक रोशनशी व्हायची तुलना, प्रियंकासोबत केलंय काम! ओळखूही येत नाहीये 'हा' प्रसिद्ध अभिनेता, VIDEO तुफान व्हायरल

Idli- Dosa For Diabetes: डायबिटीजचे रूग्ण इडली, डोसा खाऊ शकतात का? जाणून घ्या ब्लड शुगर कंट्रोलमध्ये राहण्यासाठी काय खावे?

SCROLL FOR NEXT