Satara Crime  Saam Tv
महाराष्ट्र

Shocking News: AI च्या मदतीने बनवले महिला डॉक्टरांचे अश्लील व्हिडीओ, डॉक्टरविरोधात गुन्हा; साताऱ्यात खळबळ

Satara Crime: साताऱ्यात भयंकर घटना घडली. महिला डॉक्टरांचे एआयच्या मदतीने अश्लील व्हिडीओ तयार करण्यात आले. या घटनेमुळे खळबळ उडाली आहे. कराड पोलिस ठाण्यात याप्रकरणी संबंधित डॉक्टरविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

Priya More

ओंकार कदम, सातारा

एआय तंत्रज्ञानाचा वापर करून कोण काय करेल याचा नेम राहिला नाही. एकीकडे चांगल्या गोष्टींसाठी एआयचा वापर केला जातो तर दुसरीकडे एआयचा वापर करून अश्लील फोटो आणि व्हिडीओ तयार केले जातात. या एआय तंत्रज्ञानाला बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रिटी बळी पडले. तसंच या तंत्रज्ञानाचा वापर करून अनेकांची फसवणूक देखील केली जात आहे. साताऱ्यामध्ये एआय तंत्रज्ञानाचा वापर करून महिला डॉक्टरांचे अश्लील व्हिडीओ तयार केले गेले. या घटनेमुळे खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, साताऱ्यातील कराड शहरातील महिला डॉक्टरसह दोन डॉक्टर आणि एका तरुण-तरुणीचा एआय तंत्रज्ञानाचा वापर करून अश्लील व्हिडीओ बनवण्यात आले. हे व्हिडीओ परराज्यातून बनवून घेण्यात आल्याचा संशय व्यक्त होत आहे. हे व्हिडीओ समोर येताच या डॉक्टरांनी पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन कराड शहर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

या प्रकरणाचा सूत्रधार स्वतःला डॉक्टर म्हणून घेणाराच एक संशयित असल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी कराड शहर पोलिस ठाण्यात संबंधित डॉक्टरविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास सुरू आहे. संबंधित डॉक्टरकडे चौकशी सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. ही घटना समोर येताच साताऱ्यामध्ये खळबळ उडाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tamarind Pickle Recipe : आंबट गोड चिंचेचे लोणचे, पाहताच क्षणी तोंडाला पाणी सुटेल

Post Office Scheme: पोस्टाच्या या योजनेतून दर महिन्याला मिळतील २०,००० रुपये; किती गुंतवणूक करायची? वाचा कॅल्क्युलेशन

Maharashtra Live News Update: राज ठाकरेंच्या भेटीला संजय राऊत, मनपा निवडणुकीवर होणार चर्चा

Famous Singer : मुलगा झाला हो! मराठमोळी गायिका झाली आई, पाहा PHOTOS

Happy Hormones कसे वाढवायचे? खाण्यात या ४ पदार्थांचा करा समावेश

SCROLL FOR NEXT