Devendra Fadnavis  Saam Tv
महाराष्ट्र

AI Jobs: आर्टिफिशियल इंटेलिजन्समुळे २५ कोटी लोकांना मिळणार रोजगार: देवेंद्र फडणवीस

Devendra Fadnavis : नागपूरमध्ये आयोजित करण्यात आलेल्या आर्थिक साक्षरता कार्यक्रमात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आर्टिफिशियल इंटेलिजन्समुळे रोजगार निर्माण होणार असल्याचं सांगितलं. त्याचबरोबर त्यांनी नोकरी जाण्याविषयी देखील भाष्य केलं.

Bharat Jadhav

Devendra Fadnavis In Nagpur:

येणाऱ्या काळात आर्टिफिशियल इंटेलिजन्स मोठे बदल करणार आहे. यामुळे २३ कोटी लोकांचा रोजगार जाणार आहेत. त्याचबरोबर २५ कोटी जणांना नवीन रोजगाराच्या संधी मिळणार असल्याचा दावा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलाय. नागपूर येथील आर्थिक साक्षरता कार्यक्रमात ते बोलत होते. रोजगाराच्या नवीन संधी निर्माण होत असलल्याचं सांगताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांना टोलाही मारला. (Latest News)

आज आपल जीवन अल्गोरिदम भवती फिरत आहे. जेव्हा कॉम्प्यूटर आले, तेव्हा लालू प्रसाद यांनी टीका करत शेती कॉम्प्यूटर करणारा का असा सवाल केला होता. मी समृध्दी महामार्ग तयार करत असताना माझ्यावर टीका केली जात होती. रोडची आवश्यकता आहे का, असे प्रश्न विचाराचे. पण आज माझ्याकडे समुद्धी पूर्ण व्हायच्या आधी माझ्याकडे ५० हजार कोटींची ऑफर समृध्दीसाठी आहे. नव्या तंत्रज्ञानाला घाबरून घरी बसता येणार नाही. याचा उपयोग करून प्रगती करावी लागेल. देशातील सर्वाधिक महाराष्ट्र स्टार्ट अप सर्वाधिक महाराष्ट्रात तयार होत आहे. स्टार्टअप मेट्रो सिटीमध्ये नाही, तर २,३ टायर सिटीमध्येही स्टार्टअप सुरू होत असल्याचं उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.

 ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

आर्थिक साक्षरता हवी

आर्थिक साक्षरता नसेल तर चुकीची गुंतवणूक झाल्याने फसवणूक होऊ शकते. खासगी क्षेत्रात पेन्शनची कन्सेप्ट नाही, त्यामुळे त्याचे नियोजन करताना स्मार्ट नियोजन आजच करावे लागेल. निवृत्तीनंतर आवश्यक पैसा कसा येईल याचे नियोजन करावे लागेल. निवृत्तीनंतर सरकारच्या भरोश्यावर राहता येणार नसल्याचं फडणवीस म्हणाले.

देशाची अर्थव्यवस्था

देश वेगाने विकसित होत असून अर्थव्यवस्थेत भरारी घेत आहे. चीननंतर भारत स्टार्ट अपमध्ये दुसरा नंबर आहे. २०२० ते ३५ पर्यंत आपण उचांकावर आहे तर २०५० नंतर आपल्या देशावर अवलंबून असणाऱ्यांची संख्या वाढणार आहे. त्यामुळे २० ते ३५ हे १५ वर्ष देशासाठी अत्यंत महत्वाचे आहे. याकाळात विकसित भारत तयार होईल, असा मार्ग निवडावा लागेल. अर्थव्यवस्थेचा विस्तार देशातील १०० पूंजीपती करू शकतात. पण तो सर्वांगीण विकास करू शकत नाही.

व्यक्तीच्या विकासातून GDPला विकास करणे. हा मोदीचा फार्म्युला आहे. ११ कोटी शौचालय ५ कोटी लोकांना घर मिळाल्याने त्यासंबंधी क्षेत्र विकसित होते त्यातून रोजगार निर्मिती होते. पंतप्रधान मोदींनी २५ कोटी लोकांना गरिबीतून बाहेर आणले. तंत्रज्ञानाचा वापर करून हा विकास शक्य झाला असल्याचं फडणवीस म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: काका चुकांवर पांघरुण घालायचे, दादांना शरद पवारांची आठवण का आली

आय लव्ह मोहम्मद आणि आय लव्ह महादेव; देशभरात रंगलेला बॅनर वाद आणि त्यामागची खरी कारणे

Maharashtra Politics : शिंदे गटाच्या नेत्याच्या मुलाला मारण्यासाठी ४ कोटींची सुपारी; पोलिसांत गुन्हा दाखल, राजकीय वर्तुळात खळबळ

Ladki Bahin Yojana: सरकारी लाडकीला दणका, 15 कोटी वसूल करणार

Belly Fat: पोटाची चरबी वाढलीये? फॉलो करा 'या' सोप्या टिप्स, पोटाचा घेर होईल कमी

SCROLL FOR NEXT