Shirdi Santoshi Dhokne news SaamTv
महाराष्ट्र

Shirdi News : पोटच्या लेकीला साखळदंडाने का बांधते? शिर्डीतील 'त्या' आईची काळीज पिळवटून टाकणारी आपबिती

Shirdi Santoshi Dhokne Story : राहण्यासाठी घर नसल्याने संतोषी आपल्या मुलांसह बस स्थानक परिसरात मिळेल तिथे वास्तव्य करत आहे.

Prashant Patil

अहमदनगर : शिर्डी बस स्थानकावर एक महिला आपल्या लहान मुलीला साखळदंडाने बांधून भंगार गोळा करण्यासाठी जात असल्याचा व्हिडीओ काही दिवसांपूर्वी समोर आला होता. काही लोकांनी हटकल्यानंतर ही महिला आपल्या मुलांना घेऊन तिथून निघून गेली होती. मात्र या प्रकरणातील महिला समोर आली असून उच्च शिक्षित असलेल्या या महिलेला आपल्या चिमुकल्या मुलीला साखळदंडाने बांधून ठेवण्याची वेळ का आली? हे ऐकून सर्वांनाच धक्का बसलाय.

या महिलेचं नाव संतोषी ढोकणे असून ही महिला मुळची राहुरी तालुक्यातील उंबरे येथील आहे. लग्नानंतर संतोषी हिने जिद्द आणि मेहनतीनं MSW चे शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर तिने नगर आणि पुण्यात विविध संस्थांमध्ये नोकरी केली. पुण्यातील प्रोजेक्ट बंद झाल्यानंतर संस्था बंद झाली आणि संतोषी हिला बेरोजगारीचा सामना करावा लागला. आई वडिलांचे निधन झाले आणि जवळील पैसे संपल्याने नवऱ्यानेही संतोषीला एकटं सोडून दुसरे लग्न केले. अशा परिस्थितीत उदरनिर्वाहासाठी संतोषी दिड वर्षांपूर्वी आपल्या चिमुकल्या मुलांसह शिर्डीत आली आणि साई मंदिर परिसरात इमिटेशन ज्वेलरी विकण्याचे काम करू लागली.

राहण्यासाठी घर नसल्याने संतोषी आपल्या मुलांसह बस स्थानक परिसरात मिळेल तिथे वास्तव्य करत आहे. काही दिवसांपूर्वी पालिकेने अतिक्रमण मोहीम सुरू केल्यानंतर मंदिर परिसरातील रस्त्यावर छोटे मोठे व्यवसाय करणाऱ्या लोकांवर कारवाई केली. त्यामुळे मुलांच्या संगोपनासाठी संतोषीवर भंगार गोळा करण्याची वेळ आली आहे. मुलगी लहान असली तरी तिच्या सुरक्षेसाठी काळजावर दगड ठेऊन साखळदंडाने बांधून भंगार गोळा करण्यासाठी जावे लागते अशी व्यथा तिने मांडली आहे.

पोटच्या मुलीला साखळदंडाने बांधणारी संतोषी ही निर्दयी माता वाटत असली तरी दुसरीकडे तिची व्यथा काळीज पिळवटून टाकणारी आहे. त्यामुळे संतोषीसारख्या निराधार महिलांच्या पुनर्वसनासाठी शासनासह सामाजिक संस्थांनी देखील पुढाकार घेणे गरजेचं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

MHADA Lottery 2025: खुशखबर! म्हाडाची तब्बल ५२८५ घरांसाठी लॉटरी, आजपासून अर्जप्रक्रिया सुरु, कुठे कराल अर्ज?

Maharashtra Live News Update : आज मराठा समाजाची पुण्यात महत्त्वाची बैठक

Monday Horoscope : भगवान गणेशाची उपासना फलदायी ठरेल, अचानक धनलाभ होईल; ५ राशींच्या लोकाचं नशीब फळफळणार

Success Story: वडील वीट भट्टीवर कामाला; लेक २२ व्या वर्षी IPS झाला; सफीन हसन यांचा प्रेरणादायी प्रवास

Monday Horoscope Update : संकष्टी चतुर्थीची उपासना ४ राशींसाठी ठरणार लाभदायक, वाचा आजचे राशी

SCROLL FOR NEXT