Sakshi Sunil Jadhav
आज संकष्टी चतुर्थी आहे. विशेष गणेश उपासना आपल्याला फायद्याची ठरेल.
कामाबरोबर मनोरंजनात्मक गोष्टींमध्ये सुद्धा सहभाग घ्याल. कलाक्षेत्रामध्ये असणाऱ्या लोकांना प्रयत्न तर करावे लागतील.
आज संकष्टी चतुर्थी गणेश उपासना करावी. त्याचे द्विगुणीत फल आपल्याला मिळेल. उत्तम संवादाने प्रगती साधाल .
कोणाचे सहकार्य मिळेल आज अशी अपेक्षा नको. शारीरिक आणि भावनिक आंदोलने होतील.
अनेक रिंगाळत असलेली कोर्टाच्या कामामध्ये यश मिळेल. व्यवसायामध्ये भरीव गोष्टी कराल. इतरांवर वचक ठेवाल.
पोटाशी निगडित आजार होऊ शकतात. काळजी घ्यावी. आजोळी संबंध सुधारतील. नोकरीमध्ये मात्र गती आणि प्रगती दोन्हीही आहे.
प्रेमाच्या लोकांबरोबर आनंद लुटाल . गुलाबी स्वप्न आज साकार होतील. मनातल्या गोष्टी पूर्ण झाल्यामुळे आनंदाला उधाण येईल.
थोडे तुझे थोडे माझे असे करत दिवस घालवावा लागेल. इतरांचे सल्ले आज विचारात घ्या.
आपला सकारात्मक ओरा आज राहील. जवळच्या लोकांकडून आपली प्रशंसा होईल.
हिशोबी असणारी आपली रास कष्टिक असणारी आपली रास पैशासाठी आज प्राण ओतून काम करावे लागेल.
बुद्धीला पटतील असाच गोष्टी आज करण्याचा मानस राहील. इतरांवर आपला सकारात्मक प्रभाव राहील.
दवाखाने मागे लागतील. एखाद्या आजाराचं लगेचच निदान लागेल असे वाटत नाही. मानसिक अस्वस्थता आज वाटेल.