Ahmednagar Political News SaamTV
महाराष्ट्र

Ahmednagar Politics : नगरमध्ये राजकारण तापलं, राधाकृष्ण विखे पाटलांकडून बाळासाहेब थोरातांना राजकीय संन्यास घेण्याचे खुलं आव्हान

Ahmednagar Political News : नगरमध्ये राजकारण तापलं आहे. भ्रष्टाचाराच्या माध्यमातून राधाकृष्ण विखे पाटील यांनी बाळासाहेब थोरातांना राजकीय संन्यास घेण्याचे आव्हान दिलं आहे.

Vishal Gangurde

सचिन बनसोडे, साम टीव्ही प्रतिनिधी

अहमदनगर : विधानसभा निवडणूक जाहीर होण्याआधीच नगरमधील राजकारण तापलं आहे. नगरमध्ये मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि काँग्रेसचे वरिष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांच्यात आरोप-प्रत्यारोप सुरु झाले आहेत. बाळासाहेब थोरात यांनी तलाठी भरती प्रकियेत भ्रष्टाचार झाल्याचा आरोप राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर केला आहे. यानंतर विखे पाटील यांनी थोरतांना प्रत्युत्तर दिलं आहे. 'आरोप सिद्ध करू शकले नाही तर राजकीय संन्यास घेण्यास तयार आहेत का, असं खुलं आव्हान राधाकृष्ण विखे पाटील यांनी बाळासाहेब थोरातांना दिलं आहे.

बाळासाहेब थोरात यांनी तलाठी भरती प्रकियेवरून मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याविरोधात गंभीर आरोप केला आहे. 'तलाठी भरती प्रकियेत भ्रष्टाचार झाला, असा आरोप बाळासाहेब थोरात यांनी माझ्यावर आरोप केला आहे. माझं त्यांना आव्हान आहे की, त्यांनी साईमंदिरात यावे आणि समाधीवर हात ठेवून सांगावे की विखे पाटील यांनी यात भ्रष्ट्राचार केला आहे. मी काल सांगितल की, राजकारण सोडून देईल. तुम्ही माझ्यावरील भ्रष्टाचार सिद्ध करू शकला नाही, तर तुमची राजकारणातून संन्यास घेण्याची तयारी आहे का? माझ त्यांना हे आव्हान कायम आहे, असं आव्हान राधाकृष्ण विखे पाटील यांनी बाळासाहेब थोरात यांना दिलं आहे.

शरद पवार आणि मुख्यमंत्री शिंदे भेटीवर भाष्य करताना विखे पाटील म्हणाले की, 'शरद पवार मुख्यमंत्र्यांना का भेटले? काय चर्चा झाली, याची मला कल्पना नाही. आगामी विधानसभेत महाविकास आघाडीला सत्ता येणार नसल्याची खात्री आहे. महायुतीचं सरकार पुन्हा एकदा राज्यात येणार आहे. महायुतीचे सरकार येणार असल्याने जवळीक साधण्याचा शरद पवार यांचा हेतू असला पाहिजे'.

शिर्डी एमआयडीसीवरही विखे पाटील यांनी भाष्य केलं. 'शिर्डी एमआयडीसीसाठी ५०० एकर जागा मिळाल्याने औद्योगिक विकासाला चालना मिळाली आहे. रोजगार निर्मीती होते, उद्योग येतायत. परिसरातील तरूणांमध्ये नवी आशा आपण निर्माण करतोय. मला त्याचे वेगळ समाधान व्यक्तिश: आहे,असे विखे पाटील पुढे म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

बाबोss...पेन्शनचे ११०० रुपये काढायला बँकेत गेल्या, अकाउंटमध्ये ७४० कोटी; ४४० व्होल्टचा झटकाच बसला, रात्रभर झोप न लागल्यानं तब्येत बिघडली

Palghar Tourism : पाऊस, हिरवेगार जंगल , धबधबा अन् ट्रेक; वन डे ट्रिपसाठी बेस्ट आहे पालघरजवळील 'हे' लोकेशन

Maharashtra News Live Update:घोडबंदर रोडवरील काँक्रिटीकरणामुळे मुंबई-अहमदाबाद महामार्गावर 25 किमीपर्यंत वाहतूक कोंडी

Skin Care: फक्त 20 मिनिटांत मिळवा सॉफ्ट आणि ग्लोईंग स्किन; घरी तयार केलेला हा फेसपॅक नक्की वापरून पाहा

मोशी कचरा डेपो इमारत दुर्घटनेत मृतांची संख्या वाढली; सरकारकडून पीडितांना 40 लाखांची मदत

SCROLL FOR NEXT