Sexual abuse of a minor girl  Saam Tv
महाराष्ट्र

धक्कादायक! अल्पवयीन मुलीचं अपहरण करुन अत्याचार, तीन आरोपींना ठोकल्या बेड्या

अहमदनगर येथे माणुसकीला काळीमा फासणारी धक्कादायक घटना घडली आहे.

साम टिव्ही ब्युरो

अहमदनगर : येथे माणुसकीला काळीमा फासणारी धक्कादायक घटना घडली आहे. तीन नराधमांनी एका अल्पवयीन मुलीचं अपहरण करुन (minor girl abduction) तिच्यावर अत्याचार केला. या घटनेमुळं संपूर्ण परिसरात खळबळ माजली असून पोलिसांनी याप्रकरणी तीन आरोपींना (three culprit arrested) बेड्या ठोकल्या आहेत. प्रियंका अशोक खडके (२४), सोमनाथ दत्तू धुळे (१९) व श्रावण संजय गायकवाड (१८) अशी अटक केलेल्या आरोपींची नावं आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, नगर तालुक्यात अल्पवयीन मुलीला पळवून नेऊन अत्याचार केल्याप्रकरणी पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. या आरोपींना न्यायालयासमोर हजर केले असता चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.नगर तालुक्यातील एका गावातून या आरोपींनी अल्पवयीनचे अपहरण केले होते.

या प्रकरणी नगर तालुका पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर नगर ग्रामीणचे पोलीस उपअधीक्षक अजित पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेंद्र सानप यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक युवराज चव्हाण यांच्या पथकाने या गंभीर घटनेची दखल घेत आरोपींच्या मुसक्या आवळल्या. त्यानंतर पोलिसांनी पीडितेची सूखरुप सुटका केली.

Edited By - Naresh Shende

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pav Bhaji Recipe : मुंबई स्टाईल पावभाजी घरच्या घरी कशी बनवायची? सीक्रेट रेसिपी आताच लिहून घ्या

Maharashtra News Live Update: मुंबई-आग्रा महामार्गावरील चांदवड घाटात वाहतूक कोंडी

शरद पवारांची राष्ट्रवादी सत्तेत सामील होणार? मी तुम्हाला इतिहासात नेते म्हणत सुप्रिया सुळेंचा मोठा खुलासा

लाडक्या बायकोसाठी चांदीच्या जोडव्याचे 5 सुंदर डिझाईन्स

Nashik News: भावली धबधबा मारहाण प्रकरण, पर्यटकांना मारहाण करतानाचा नवा VIDEO समोर

SCROLL FOR NEXT