Ram Shinde Saam TV
महाराष्ट्र

Ram Shinde Death Threat: आमदार राम शिंदेंना घरात घुसून मारण्याची धमकी; पुण्यातील तरुणाला उत्तरप्रदेशमधून अटक

धक्कादायक बाब म्हणजे आरोपी सराईत गुन्हेगार असल्याची माहिती समोर आली आहे.

Gangappa Pujari

सुशिल थोरात, प्रतिनिधी...

Ahmednagar News: गेल्या महिन्यात ३० मे रोजी विधान परिषदेचे आमदार राम शिंदे यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. या धमकी प्रकरणात आता महत्वाची माहिती समोर आली असून धमकी देणाऱ्याला मध्य प्रदेशातून अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे. आरोपी सागर सुभाष गवासणे (वय ३४) हा मूळचा जामखेड तालुक्यातील आहे. सध्या तो पुण्यात वाकड परिसरात राहतो.

याबाबत अधिक माहिती अशी की, महिनाभरापूर्वी अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंती निमित्त फेसबुक लाईव्ह करत भाजप आमदार राम शिंदे यांना घरात घुसून जीवे मारण्याची धमकी मिळाली होती. या धमकीनंतर राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली होती. या धमकीनंतर जामखेड पोलीस ठाण्यात 504,505(2),506(2)) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता.

आता या धमकी देणाऱ्यास मध्यप्रदेशच्या उज्जैन परिसरातून अटक करण्यात आली आहे. आरोपी मुळचा जामखेडचा असून गुन्हा केल्यानंतर तो मध्य प्रदेशात पळून गेला होता. तेथून पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे.

धक्कादायक बाब म्हणजे आरोपी गवासणे सराईत गुन्हेगार आहे. त्याच्याविरूद्ध नगरसह बीड आणि धाराशिव जिल्ह्यातही गंभीर स्वरूपाचे १० गुन्हे दाखल आहेत. खुनाचा प्रयत्न आणि अवैधरित्या शस्त्र बाळगल्याचे गुन्हेही त्याच्याविरूद्ध आहेत. त्यामुळे पोलिस याचा सखोल तपास करत आहेत. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

देशात मोठी राजकीय घडामोड! सहा राज्यांचे राज्यपाल बदलले; कोणाची कोणत्या राज्यात झाली नियुक्ती?

ज्ञानेश कुमारांविरोधात राहुल गांधींचं 'शिवतांडव'; सुप्रीम कोर्टात याचिकेसाठी इंडिया आघाडीचा मोर्चा

शेतकरी कर्जमुक्ती योजनेची तिसरी यादी जाहीर; ३ लाख ५१ हजार शेतकरी पात्र, कोणत्या जिल्ह्यातील किती शेतकऱ्यांना मिळणार लाभ?

Tuesday horoscope: या ४ राशींच्या लोकांसाठी मंगळवारचा दिवस महत्त्वाचा; नोकरी आणि पैशांच्या बाबतीत काय घडणार?

सरकारचे 200 अधिकारी आमच्या संपर्कात; राहुल गांधींच्या दाव्यानं राजकीय वर्तुळात खळबळ

SCROLL FOR NEXT