Ahmednagar News Youth dies in leopard attack in Sangamner Saam TV
महाराष्ट्र

Sangamner News: घरात उकडतंय म्हणून तरुण अंगणात झोपला; मध्यरात्री जे घडलं ते पाहून पोलिसही चक्रावले

Leopard Attack News: घरात उकडतंय म्हणून २२ वर्षीय तरुण अंगात झोपला. पण मध्यरात्रीच्या सुमारास त्याच्यावर अचानक बिबट्याने हल्ला चढवला. या घटनेत तो गंभीर जखमी झाला.

Satish Daud

Sangamner Leopard Attacks Young Man

घरात उकडतंय म्हणून २२ वर्षीय तरुण अंगात झोपला. पण मध्यरात्रीच्या सुमारास त्याच्यावर अचानक बिबट्याने हल्ला चढवला. या घटनेत तो गंभीर जखमी झाला. त्याला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल केलं असता, डॉक्टरांनी मृत घोषित केले. ही दुर्देवी घटना संगमनेर तालुक्यातील कुरकुटवाडी परिसरात गुरुवारी रात्रीच्या सुमारास घडली.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

सचिन भानुदास कुरकुटे (वय २२ वर्ष) असं मृत तरुणाचं नाव आहे. सचिनच्या मृत्युने परिसरातून हळहळ व्यक्त आहे. मात्र, त्याच्या मृत्यूबाबत मिळालेल्या माहितीवरुन वनाधिकारी व पोलिसांनी (Police) व्यक्त केलेल्या मतामुळे, शवविच्छेदनानंतरच मृत्यूचे कारण स्पष्ट होणार आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आळंदी येथे रुग्णवाहिका चालक असलेले भानुदास कुरकुटे त्यांची पत्नी संगीता व मुले सचिन व हरिश यांच्यासह कुरकुटवाडी (Sangamner News) येथे राहतात. गुरुवारी रात्री त्यांची पत्नी घरात तर मुले नेहमीप्रमाणे घराच्या पडवीत झोपली होती.

रात्री साडेबारा वाजेच्या सुमारास सचिनचा भाऊ हरीश याला जाग आली. त्याने सचिनवर बिबट्या हल्ला करत असल्याचं बघितलं. आरडाओरड केल्यानंतर बिबट्याने पळ काढला, असं हरीशने सांगितलं. दरम्यान, रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या सचिनला ग्रामस्थांनी उपचारासाठी आळेफाटा येथील खासगी रुग्णालयात दाखल केले.

पण डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. नातेवाईकांनी सचिनचा मृतदेह आळे येथील ग्रामीण रुग्णालयात आणला. ही बाब वनविभाग व घारगाव पोलिसांना शुक्रवारी सकाळी समजली. पोलिस निरीक्षक संतोष खेडकर, उपनिरीक्षक उमेश पतंगे यांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेऊन पहाणी केली. या घटनेचा अधिकचा तपास पोलीस करीत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Wednesday Horoscope : पैशाच्या समस्या सुटतील, 5 राशींच्या व्यक्तींना भावनांवर नियंत्रण ठेवण्याची गरज; वाचा बुधवारचे राशीभविष्य

Manoj Jarange Patil: ...तर सरकारचा माज उतरवलाच पाहिजे; मनोज जरांगे पाटील कडाडले

Uddhav Thackeray: राजीनाम्यानं चालणार नाही, तर सरकार बदला; जंतर मंतरवरून उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल

कार अपघातात एकाच कुटुंबातील तिघांचा जागीच मृत्यू; दुचाकीस्वाराला वाचवताना अनर्थ घडला!

राहुल-प्रियंका गांधींना 3 तासांनी पोलिसांनी सोडलं; सुटकेनंतरचा पहिला व्हिडिओ

SCROLL FOR NEXT