Ahmednagar News Saam tv
महाराष्ट्र

Ahmednagar News: ग्रामीण रुग्णालयाचा हलगर्जीपणा समोर; महिलेची रूग्णवाहीकेतच प्रसूती, नातेवाईक संतप्त

Ahmednagar News : ग्रामीण रुग्णालयाचा हलगर्जीपणा समोर; महिलेची रूग्णवाहीकेतच प्रसूती, नातेवाईक संतप्त

Rajesh Sonwane

सचिन बनसोडे 

राहाता (अहमदनगर) : अहमदनगर जिल्ह्यातील आणखी एका ग्रामीण रुग्णालयाचा हलगर्जीपणा समोर आलाय. डिलेवरीसाठी आलेल्या महिलेला दाखल करून न घेता दुसरीकडे नेण्याचा सल्ला देण्यात आला. यानंतर या महिलेला (Hospital) रूग्णालयात घेऊन जाताना तिची रस्त्यात रूग्णवाहीकेतच प्रसुती झाली. (Ahmednagar) अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगाव तालुक्यात ग्रामीण रुग्णालयातील डॉक्टरच्या हलगर्जीपणामूळे एका महिलेला जीव गमवावा लागल्याची घटना ताजी असतानाच आता पुणतांबा येथे हा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. (Breaking Marathi News)

राहाता तालुक्यातील पुणतांबा येथील रूपाली जोगदंड या महिलेला प्रसुतीकळा सुरू झाल्या. यानंतर घरच्यांनी पुंता ग्रामीण रुग्णालयात धाव घेतली. मात्र तीथे कोणीही डाॅक्टर हजर नव्हते. उपस्थित असलेल्या ब्रदरने थेट बाळाने पोटात शी केलीय, ठोके कमी झालेय अशी कारणं सांगत महिलेला तालुक्याच्या रूग्णालयात नेण्यास सांगितले. रूग्णालयाबाहेर ऊभी असलेली रुग्णवाहिकाही दिली गेली नाही. त्यामुळे महिलेचा पती वाल्मिक जोगदंड याने १०८ नंबरला फोन करून गाडी बोलावली. 

तासाभरानंतर आली रुग्णवाहिका 

एक तासानंतर गाडी पुणतांबा गावातून रूपाली जोगदंड या प्रसुती कळेने ओरडत असलेल्या गर्भवती महिलेला घेऊन निघाली. मात्र रूग्णालयात गाडी पोहचण्यासाधीच तीची रूग्णवाहीकेतच प्रसुती झाली. एव्हढंच नाही तर गाडीतील चालक किंवा डाॅक्टरने कोणतीही मदत न करता गाडी तशीच सुरू ठेवली. तोवर तान्ह बाळ बापाच्या हातात होतं. राहाता ग्रामीण रुग्णालयात पोहचल्यानंतर डाॅक्टरांनी या महिलेला आणि तीच्या बाळाला जिवदान दिलं. मात्र हा सगळा प्रकार अतीशय गंभीर असून जर महिला आणि तीच्या बाळाच्या जिवाला धोका निर्माण झाला असता, तर जबाबदार कोण? त्याचप्रमाणे ग्रामीण रुग्णालयाची अम्ब्युलन्स दारात उभी असताना तात्काळ का उपलब्ध करून करून देण्यात आली नाही? असे प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai T20 League: टी-२० लीगमध्ये मराठा संघाची 'रॉयल' कामगिरी; सलग दुसऱ्यांदा जेपेतपदावर कब्जा

अनुसूचित जातीत उपवर्गीकरण करायला हरकत नाही; रामदास आठवलेंनी सांगितलं कारण, VIDEO

IND vs AFG: शुबमन गिलसमोर अफगाण गोलंदाजी फेल; टीम इंडियाचा पहिल्या वनडेत शानदार विजय

Yavatmal Crime: खासगी रुग्णालयात धारदार शस्त्राने हल्ला करत नर्सची हत्या; यवतमाळ हादरलं

वीज मीटर ४८ तासांत बदलणार; 'महावितरण'कडून ग्राहकांना अल्टिमेटम? काय आहे मेसेजमागचं सत्य?

SCROLL FOR NEXT