Ahmednagar News Saam tv
महाराष्ट्र

Ahmednagar News: धडकी भरवणारी घटना; रेल्वे रुळावर अडकली उसाने भरलेली ट्रक

धडकी भरवणारी घटना; रेल्वे रुळावर अडकली उसाने भरलेली ट्रक

साम टिव्ही ब्युरो

सुशिल थोरात

अहमदनगर : अहमदनगर शहराजवळील नगर– दौंड महामार्गावर (Ahmednagar) अहमदनगर– आष्टी हा रेल्वे मार्ग आहे. येथे उड्डाणपूल नसल्याने रेल्वे (Railway) क्रॉसिंग या महामार्गावरूनच होत असते. या रेल्वे क्रॉसिंग फाटकाजवळ एक उसाने भरलेला ट्रक बंद पडला. ट्रक रुळावर बंद पडल्याने मोठी धावपळ उडाली. (Tajya Batmya)

बंद पडलेल्या ट्रकमुळे रस्त्याच्या दोन्ही बाजूंना वाहनांच्या रांगाही लागल्या होत्या. यावेळी पोलिसांनी त्या ठिकाणी धाव घेत वाहतूक सुरळीत करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र ट्रक रेल्वे रुळाच्या मधोमध असल्याने वाहतूक सुरळीत होत नव्हती. त्यामुळे पोलिसांनी क्रेन चालकाला बोलवून ट्रक काढण्याबाबत सांगितले. मात्र क्रेन चालक आणि ट्रक चालक यांच्यामध्ये क्रेनच्या भाड्यामुळे वादावादी झाल्याने ट्रक चालकाने त्या ठिकाणीच ट्रक सोडून पळ काढला. त्यामुळे हा ट्रक रेल्वे रुळाच्या मधोमधच उभा होता.

एक तासानंतर काढला ट्रक

दोन्हीकडून मोठमोठ्या वाहनांच्या रांगाही लागल्या होत्या. सुमारे एक तास हा प्रकार सुरू असल्यामुळे अनेक वाहन धारकांना वाहतूक कोंडीचा त्रास सहन करावा लागला. अखेर कोतवाली पोलिसांनी क्रेन चालकास विनंती करून ट्रक रुळाबाहेर काढण्याची विनंती केली आणि वाहतूक सुरळीत केली. मात्र ही ट्रक बंद पडण्याआधीच एक रेल्वे आष्टीकडे मार्गस्थ झाली होती. त्यामुळे मोठा अपघात टळला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मध्यरात्री अपघाताचा थरार! भरधाव कारने आधी संरक्षण भिंत तोडली, पुलावरून थेट खड्ड्यात पडली, तिघांचा मृत्यू

Veen Doghatli Hi Tutena : अखेर तो क्षण आला; समर-स्वानंदी समोरासमोर, पाहा VIDEO

Maharashtra Live News Update: मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांचा मुंबई दौरा

Ganesh Chaturthi 2025: चतुर्थीला कधी आहे गणेश स्थापनेचा मुहूर्त? जाणून घ्या स्थापनेची योग्य विधी

Whatsapp New Feature: तुम्हाला मिळालेली माहिती खरी की खोटी? Whatsapp देणार खात्री, जाणून घ्या नवं फिचर

SCROLL FOR NEXT