Devendra Fadnavis-Sushma Andhare Saam TV
महाराष्ट्र

Sushma Andhare News: देवेंद्र फडणवीसांमुळेच मराठा- ओबीसी वाद, सुषमा अंधारेंचे टीकास्त्र; नेमकं काय म्हणाल्या?

Sushma Andhare On Maratha Reservation: राज्यसरकारने आदेश काढून पार्लमेंटला पाठवला तर पार्लमेंट नक्की यामध्ये पारलमेंट यामध्ये निर्णय घेऊ शकते," असे म्हणत मराठा आरक्षणावरुन सुषमा अंधारे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे.

Gangappa Pujari

सुशिल थोरात, अहमदनगर|ता. १७ फेब्रुवारी २०२४

Sushma Andhare News:

"मराठा समाजाची धास्ती म्हणण्यापेक्षा सरकारने मराठा समुदायाच्या भावनांशी खेळू नये. सरकार रोज टोलवाटोलवी करत आहे. राज्य सरकारने मान्य केले पाहिजे की आरक्षण देणे हे राज्य सरकारच्या हातात नाही. मात्र जर राज्यसरकारने आदेश काढून पार्लमेंटला पाठवला तर पार्लमेंट नक्की यामध्ये पारलमेंट यामध्ये निर्णय घेऊ शकते," असे म्हणत मराठा आरक्षणावरुन सुषमा अंधारे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे.

काय म्हणाल्या सुषमा अंधारे?

"आज वर आणि खाली देखील संख्याबळ भाजपाकडे आहे त्यामुळे भाजपची इछाशक्ती असेल तर मराठा आरक्षणाचा कायदा होऊ शकतो, मात्र देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांना आरक्षण प्रश्न सोडवायचा नाही. सरकारला मराठा ओबीसी वाद लावून द्यायचा आहे माझं स्पष्ट मत आहे की फडणवीस मराठा ओबीसी वाद हे ठरवून लावत आहे त्यांना ओबीसीचे देखील काहीही देणेघेणे नाहीत," असे सुषमा अंधारे म्हणाल्या.

"ओबीसींची काळजी फडणवीस यांना असती तर त्यांनी ओबीसी आरक्षणावर गंडातर येऊ दिल नसतं. अशोक चव्हाण यांना राज्यसभेची उमेदवारी न देता पंकजा मुंडे यांना उमेदवारी दिली असती. जे फडणवीस गोपीनाथ मुंडे यांची बॅग सांभाळायाचे आज तेच फडणवीस पंकजा मुंडे यांचं राजकारण सपवू पाहत आहेत," असा गंभीर आरोपही सुषमा अंधारे यांनी केला.

रामदास कदम यांच्यावर टीकास्त्र...

"रामदास कदम यांच्यावर फार बोलून त्यांना महत्व देण्याची गरज वाटत नाही,इतरांना ईडी लावायची की नाही ते सोडून द्या पण रामदास कदमांनी बोलताना डोळ्याला झेंडू बाम नक्की लाववा असं प्रत्युत्तर शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे यांनी रामदास कदम यांना दिले आहे. 'उद्धव ठाकरे यांना ईडी लावली पाहिजे म्हणजे भ्रष्टाचारी कोण हे सर्व महाराष्ट्रातील जनतेला कळले पाहिजे असं रामदास कदम यांनी म्हटले होते," त्यावर अंधारेंनीही टोला लगावला आहे.

.('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

SCROLL FOR NEXT