Radhakrishna Vikhe Patil Balasaheb Thorat  Saam tv
महाराष्ट्र

Radhakrishna Vikhe Patil : संगमनेरला चांगल्या बॅट्समनची गरज; विखे पाटलांचा बाळासाहेब थोरातांवर निशाणा

Shirdi Ahmednagar News : विद्यमान महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि माजी महसूलंत्री बाळासाहेब थोरात यांच्यातील राजकीय संघर्ष महाराष्ट्राला परिचित आहे.

Rajesh Sonwane

सचिन बनसोडे 

शिर्डी (अहमदनगर) : संगमनेर तालुक्याला चांगल्या बॅट्समनची गरज असून कोणताही बॉल आला तरी तो मारता आला पाहिजे. फिल्डींग कशी लावायची ते माझ्यावर सोपवा; असे वक्तव्य करत राधाकृष्ण विखे पाटील यांनी थोरातांना त्यांच्याच होम पिचवर डिवचले आहे. तर विखे पाटलांनी (Radhakrishna Vikhe Patil) संगमनेरला फिल्डिंग लावण्यापेक्षा शिर्डी मतदारसंघात स्वतःची विकेट सांभाळावी असा पलटवार (Congress) काँग्रेसकडून करण्यात आलाय. (Tajya Batmya)

विद्यमान महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि माजी महसूलंत्री बाळासाहेब थोरात यांच्यातील राजकीय संघर्ष महाराष्ट्राला परिचित आहे. बाळासाहेब थोरात यांच्या संगमनेर (Sangamner) विधानसभा मतदा संघातील घारगाव येथे क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेचे पारितोषिक वितरण महसूलंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते संपन्न झाले. क्रिकेट स्पर्धेचा धागा पकडत विखे पाटलांनी बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांना त्यांच्याच होम पिचवर डिवकले आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

विखे आणि थोरात हे दोन्ही नेते एकमेकांवर टिका करण्याची एकही संधी सोडत नाहीत. आता थेट एकमेकांच्या मतदारसंघात फिल्डिंग लावण्याची वक्तव्य होऊ लागल्याने आगामी काळात विखे - थोरात यांच्यातील राजकीय सामना आणखी रंगणार. विखे पाटलांच्या वक्तव्यानंतर काँग्रेसने देखील पलटवार केला आहे. विखे पाटलांचे वक्तव्य हस्यास्पद असून त्यांनी आधी शिर्डी मतदारसंघात स्वतःची विकेट सांभाळावी. बाळासाहेब थोरात यांनी शिर्डी मतदार संघात आगोदरच फिल्डिंग लावली असून आमचा बॅट्समन देखील तयार आहे; असा पलटवार काँग्रेसकडून करण्यात आला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gold Silver Rate Today: अर्थसंकल्पाआधीच गुडन्यूज! सोनं ₹१३००० तर चांदी २७००० रुपयांनी घसरली

Maharashtra Politics: भाजपचा हा सर्वात मोठा डाव, सुनेत्रा पवारांच्या शपथविधीनंतर बच्चू कडूंचं खळबळजनक विधान

Pakistan Blast : पाकिस्तान हादरले! १४ शहरात ४८ ब्लास्ट, १२० जणांचा मृत्यू, शेकडो गंभीर जखमी

Sangli Crime : पोटच्या मुलासमोरच वडिलांची दगडाने ठेचून हत्या; सांगलीत भररस्त्यात हत्याकांड

Budget 2026 Live Updates: अर्थसंकल्प सादर होण्याआधीच शेअर मार्केट धडाम! सेनसेक्स, निफ्टीमध्ये घसरण

SCROLL FOR NEXT