Radhakrishna Vikhe Patil Saam tv
महाराष्ट्र

Radhakrishna Vikhe Patil: सिमा वादात काही लोक राजकीय पोळी भाजताय; राधाकृष्ण विखे पाटील

सिमा वादात काही लोक राजकीय पोळी भाजताय; राधाकृष्ण विखे पाटील

साम टिव्ही ब्युरो

सचिन बनसोडे

शिर्डी (अहमदनगर) : आम्हाला दिल्लीच्या पायपुसण्या म्हणण्याआगोदर अडीच वर्ष तुम्ही कोणाचे पाय पुसत होता हे अख्ख्या महाराष्ट्राला माहित आहे. तसेच सिमा वादावरून (Sanjay Raut) संजय राऊत यांनी केलेल्या टिकेवर प्रतिक्रिया देत सिमा वादाच्या प्रश्नात काही लोक आपली राजकीय पोळी भाजत असल्याचा टोल महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांनी (Radhakrishna Vikhe Patil) संजय राऊतांना लगावला आहे. (Letest Marathi News)

राज्याचे महसूल तथा पशुसंवर्धन मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी लोणी (Ahmednagar) गावचे ग्रामदैवत म्हसोबा महाराज यात्रेनिमित्त मंदिरात सपत्‍नीक अभिषेक पूजा केली. यावेळी त्‍यांनी माध्‍यमांशी संवाद साधला. विखे पाटील म्‍हणाले, की या वादात महाराष्ट्राचे नुकसान होणार नाही. यासाठी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री पावले उचलत आहेत. देशाच्या गृहमंत्र्यांकडे याबाबत वस्तूस्थिती मांडली आहे. मात्र अडीच वर्षे सत्तेत असताना केंद्राने हस्तक्षेप करावा ही मागणी महाविकास आघाडीनेच केली होती.

शरद पवारांकडून ती भाषा अपेक्षीत नाही

कर्नाटकात जाण्याची भाषा (Sharad Pawar) शरद पवारांसारख्या ज्येष्ठ नेत्याने करणे अपेक्षित नाही. मागील अडीच वर्ष रिमोट कंट्रोल हातात असताना तुम्ही सिमा प्रश्नासाठी काय केलं? प्रकरण न्यायप्रविष्ठ असताना ज्येष्ठ नेत्यांनी बोलताना भान ठेवले पाहिजे असेही राधाकृष्ण विखे पाटील यांनी स्‍पष्‍ट केले.

बेछूट आरोप करण्याचा पटोलेंचा स्वभाव

लसीकरणानंतरही जनावरांना लम्‍पीची लागण आणि मृत्यू का होत आहेत? असा प्रश्न उपस्थित करत सरकारच्या उपाययोजना तकलादू असल्याची टीका नाना पटोले यांनी केली. त्यांच्या या टीकेला पशुसंवर्धन मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी प्रतिउत्तर देत लम्‍पी नियंत्रणासाठी सरकारने केलेल्या कामांची लिस्ट पाहिजे असेल तर द्यायला तयार आहे. मात्र प्रसिद्धीत राहाण्यासाठी बेछूट आरोप करण्याचा नानांचा स्वभाव असल्याचा टोला विखे पाटलांनी लागवला आहे.

७६५ कोटींची दंडात्मक कारवाई ही राजकीय सूडबुद्धीने केल्याचा आरोप माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केला होता. थोरतांच्या या टीकेचा महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी समाचार घेतलाय. काही नेते पत्रकबाजी करून आम्ही जनतेचे कैवारी असल्याचे सांगू पाहताय. उलट नेत्यांनी अशा कारवाईचं समर्थन केले पाहिजे. उपोषणाचा इशारा देणाऱ्या आणि पत्रकबाजी करणाऱ्या नेत्यांनी आमचा बेकायदेशीर वाळू उपशाला पाठिंबा आहे हे तरी जाहीर करावं. कोण आंदोलन करतं किंवा आरोप करतं याला सरकार भीक घालणार नाही. बेकायदेशीर उपशाविरोधात ही कारवाई राज्यभर सुरु राहील असे विखे पाटील म्हणालेत.

एकनाथ शिंदे यांनी देवेंद्र फडणवीसांचा उल्लेख मुख्यमंत्री म्हणून केल्याने विरोधकांकडून शिंदे यांना ट्रोल केले जातेय. सत्तेपूर पायउतार होण्याचे शल्य महाविकास आघाडीच्या नेत्यांना फार बोचतय. राज्यातील सरकार आता एक विचाराने सुरू आहे. मुख्यमंत्र्यांनी केलेल्या वक्तव्याचं स्वागत केले पाहिजे तो त्यांचा मोठेपणा असल्याचे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी म्हंटले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Baramati : बारामतीच्या शेवटच्या सभेत शरद पवारांचा बोलबाला; काका-पुतण्याच्या लढाईत बारामतीकर कुणासोबत? पाहा स्पेशल रिपोर्ट

Amravati : भाजप आमदाराच्या बहिणीवर जीवघेणा हल्ला; राजकीय वर्तुळात खळबळ

Nashik: नाशिकमध्ये पुन्हा एकदा राडा; भाजप आणि शरद पवार गटात तुंबळ हाणामारी| Video

Maharashtra News Live Updates: मुंबईतून रोकड जप्त होण्याचं सत्र सुरूच, एक्स्प्रेसमधून ४२ लाखांची रोकड जप्त

Jharkhand Election: झारखंड विधानसभा प्रचार सभांच्या तोफा थंडावल्या; मुख्यमंत्र्यांची प्रतिष्ठपणाला

SCROLL FOR NEXT