Ahmednagar News Saam tv
महाराष्ट्र

Ahmednagar News : मनोज जरांगे पाटलांच्या शांतता रॅलीत चोरट्यांचा धुमाकूळ; १४ जणांची टोळी पोलिसांच्या ताब्यात

Rajesh Sonwane

सुशील थोरात

अहमदनगर : अहमदनगर शहरात मनोज जरांगे पाटील यांची शांतता रॅली सोमवारी झाली. या रॅली दरम्यान गर्दीचा फायदा घेत चोरट्यानी हात साफ केले. चोरीच्या अनेक घटना समोर आल्यानंतर अहमदनगरच्या कोतवाली पोलिसांनी एक टोळीला पकडले. या १४ जणांच्या या टोळीतील आरोपींकडून ६ लाख ५० हजारांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे. 

मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांच्या शांतता रॅली राज्यभरात ठिकठिकाणी काढल्या जात आहेत. दरम्यान पुणे येथे झालेल्या रॅलीत मोठ्या प्रमाणात चोऱ्या झाल्या होत्या. त्या अनुषंगाने नगर (Ahmednagar) शहर पोलिसांनी या रॅलीमध्ये साध्या वेशातील कपड्यांवर पोलीस चोरट्यांवर नजर ठेवून होते. पोलिसांच्या या टाकलेल्या सापळ्यामध्ये चोरटे अलगद सापडले असून ही मोठी टोळी मनोज जरांगे पाटील यांच्या प्रत्येक शांतता रॅलीमध्ये सहभागी होत असे आणि चोरी करून पुन्हा दुसऱ्या शहरात जात असल्याची माहिती पोलिसांना या टोळीकडून मिळाली आहे. 

पोलिसांनी (Police) ताब्यात घेतलेल्या या टोळीतील १४ जण कपाळाला गंध लावून रॅलीमध्य सहभागी होत असत. गर्दीत सोन्याच्या चैन, पाकीट याच्यावर ही टोळी डल्ला मारत होती. या टोळीकडून एक स्विफ्ट चारचाकी वाहन, एक दुचाकी वाहन, ७ मोबाईल फोन आणि रोख रक्कम असा ६ लाख ५० हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आल्याची माहिती कोतवाली पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांनी दिली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Crime News : बेपत्ता १६ वर्षीय शाळकरी मुलाची गळफास घेऊन आत्महत्या, कुटुंबियांचा पोलिस स्टेशनमध्ये ठिय्या, गंभीर आरोप!

Maharashtra News Live Updates: तिरुपती मंदिर लाडू प्रसाद प्रकरणावर सोमवारी सुप्रीम कोर्टात होणार सुनावणी

DRDO Job: परीक्षा नाही, थेट सरकारी नोकरी; डीआरडीओ निघाली भरती, पगार किती? पात्रता काय? जाणून घ्या सविस्तर

Shocking News: विमानात सुरु होते अश्लील चाळे.. जोडप्याला फ्लाईटमधून बाहेर काढलं; न्यायालयानेही ठोठावली ३०० तास...

Nanded News : दूषित पाणी प्यायल्याने अख्ख्या गावाला विषबाधा; तब्बल 300 नागरिक रुग्णालयात दाखल, नांदेडमध्ये खळबळ

SCROLL FOR NEXT