Manoj Jarange Patil and Chhagan Bhujbal Saam Digital
महाराष्ट्र

Manoj Jarange Patil: छगन भुजबळ अपशकुनी, ज्या पक्षात जातात त्याचे वाटोळे होते; मनोज जरांगे खवळले

Manoj Jarange Patil and Chhagan Bhujbal: जरांगे पाटील आज छगन भुजबळ यांच्या बालेकिल्ल्यात असणार आहेत. नाशिकमध्ये मनोज जरांगे पाटील यांच्या शांतता रॅलीचा समारोप होणार आहे. आज नाशिकमध्ये ते मराठा समाजाची ताकद दाखवणार आहेत.

Priya More

सचिन बनसोडे, शिर्डी

मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ (Chhagan Bhujabal) यांच्यामध्ये आरोप-प्रत्यारोप सुरूच आहे. अशामध्ये जरांगे पाटील यांनी पुन्हा छगन भुजबळांवर निशाणा साधला. 'छगन भुजबळ अपशकुनी आहेत. ते ज्या पक्षात जातात त्या पक्षाचे वाटोळे होते.', अशी टीका जरांगे पाटील यांनी केली.

जरांगे पाटील आज छगन भुजबळ यांच्या बालेकिल्ल्यात असणार आहेत. नाशिकमध्ये मनोज जरांगे पाटील यांच्या शांतता रॅलीचा समारोप होणार आहे. आज नाशिकमध्ये ते मराठा समाजाची ताकद दाखवणार आहेत. या शांतता रॅलीला जाण्यापूर्वी मनोज जरांगे पाटील यांनी शिर्डीतील साईबाबा यांच्या समाधीचे दर्शन घेतले. त्यानंतर ते नाशिकच्या दिशेने रवाना झाले. समाजाचे प्रश्न सोडवण्याची साईबाबांनी सरकारला सद्बुद्धी द्यावी, असे मत त्यांनी व्यक्त केले.

मनोज जरांगे पाटील यांनी छगन भुजबळांवर जोरदार निशाणा साधला. 'आम्ही भुजबळांकडे ढुंकूनही बघणार नाही. ते रस्त्यावर खुर्ची टाकून जरी बसले तरी त्यांच्याकडे कुणीही लक्ष देणार नाही. ते ज्या पक्षात जातात त्या पक्षाचे वाटोळे होते. भुजबळ अपशकुनी आहेत. छगन भुजबळ यांना फक्त भांडण लावण्याचे काम जमते. भुजबळांच्या सांगण्यावरून ते अंतरवालीजवळ आंदोलनाला बसले. अंतरवालीत मिरवणूक काढली. त्यांचा दंगल करण्याचा डाव होता.', असा आरोप जरांगे पाटील यांनी केला.

'माझ्या जुन्या गावात दगडफेक केली. तिथल्या पीएसआयने त्यांच्यावर दरोड्याचे गुन्हे दाखल करायला पाहिजे होते. पीएसआय मुद्दाम घटनास्थळी गेले नाही. उलट आमच्याच लोकांवर केस केल्या. पोलिसांवर दबाव होता. पण दिवस बदलतात. त्यावेळी पीएसआयकडे बघू.', असा इशारा जरांगे पाटील यांनी दिला. तसंच, 'आमचा विषय राज्याशी संबंधित आहे. केंद्राचा आणि आमचा काही संबंध नाही.' असे मत त्यांनी मराठा आरक्षणाविषयी व्यक्त केले.

मराठा आरक्षणावरून जरांगे पाटील यांनी विखे-पाटील यांच्यावर देखील टीका केली. 'मराठा आरक्षणावर विखे पाटलांची भूमिका दुटप्पी आहे. मराठा आंदोलकांवरील केसेस मागे घेऊ असे म्हटले होते. ११ महिने झाले. शरद पवारांनी वाटोळे केले म्हणून तुमच्याकडे मागतोय. तुम्ही त्यांच्यापेक्षा खालच्या विचाराचे निघालात. महाविकास आघाडी आणि महायुती दोन्हीही आमच्या बाजूने नाही. यांना फक्त समाजाचे वाटोळे करायचे आहे. जे आमदार मराठ्यांच्या विरोधात बोलताय. मराठे यावेळी त्यांचा कार्यक्रम लावणारे हे विखे पाटलांनाही कळेल.', असे मत त्यांनी व्यक्त केले.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Exit Poll: नागपूर दक्षिणमध्ये देवेंद्र फडणवीस होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Polls : कल्याण ग्रामीणमध्ये मनसेचं इंजिन धावणार का? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Poll: तुमसरमध्ये राजू कारेमोरे होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

महाराष्ट्राचा महानिकाल, निवडणूक निकालाचं हेडक्वार्टर SAAM TV

Maharashtra Election Result : महाराष्ट्र कुणाचा? मतमोजणी कधीपासून आणि कुठे पाहाल?

SCROLL FOR NEXT