Ahmednagar News Saam tv
महाराष्ट्र

मुस्लिम मुलीशी लग्न करणाऱ्या हिंदू तरूणाचे अपहरण; आठ दिवसांपासून बेपत्ता

साम टिव्ही ब्युरो

मोबीन खान

अहमदनगर : अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर तालुक्यात धक्कादायक घटना घडली आहे. मुस्लिम तरूणीशी विवाह करणाऱ्या तरूणाचे अपहरण करण्यात आले असून त्याचा घातपात केल्याचा संशय आहे. पोलिसांनी पाच आरोपींना ताब्यात घेतले आहे. मात्र तरूणाचा अजून काहीही ठावठिकाणा लागलेला नाही. (Ahmednagar Crime News)

अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर तालुका लव्ह जिहादच्या घटना चर्चेत आलेला असताना आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. श्रीरामपूर तालुक्यातील भोकर येथे राहणारा दिपक बर्डे या आदिवासी भिल्ल समाजाच्या तरूणाचे मुस्लिम मुलीशी प्रेम जुळलेले होते. या संबंधाला मुलीच्या घरच्यांचा मात्र तीव्र विरोध होता. दोघेही सज्ञान असल्याने घरच्यांच्या अपरोक्ष दोघांनी दोन महिन्यांपूर्वी लग्नगाठ बांधली आणी आयुष्यभर सोबत राहण्याच्या आणाभाकाही घेतल्या.

त्‍याने पुणे गाठले पण..

मुलीच्या घरच्यांनी दिपकला मारहाण आणी दमदाटी करत मुलीला परत घरी नेले होते. आपली पत्नी पुण्यात तिच्या मामाच्या घरी असल्याचे कळल्यानंतर 30 ऑगस्टला दिपकने घरच्यांना आपल्या मित्रांसोबत नोकरी शोधायला पुण्याला चाललो असल्याचे सांगत पुणे गाठले. पत्नीला भेटण्याच्या आतच दिपकला मुलीच्या मामाने गाठले आणि त्याला मारहाण करत त्याचे अपहरण केले असल्याचे दिपकच्या सोबत असलेला मित्र सांगतोय.

वडीलांनी पोलिसात केला गुन्‍हा दाखल

मुलीच्या मामाने भोकर गावात राहणा-या मुलीच्या पालकांच्या ताब्यात दिपकला दिले आणी त्याचा घातपात केल्याचा गुन्हा दिपकच्या वडीलांनी श्रीरामपूर तालूका पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे. पोलीसांनी मजनू बबन शेख, इमरान अब्बास शेख, समीर अहमद शेख, अजित बबन शेख यांना ताब्यात घेतले आहे. मात्र आमचा मुलगा कुठे आहे? त्याचा शोध पोलीस कधी घेणार असा सवाल दिपकच्या वडीलांनी उपस्थित केला.

घातपात केल्‍याचा आरोप

माझ्या मुलाला या लोकांची खुप भिती वाटत होती. मात्र मी रात्री जावून परत येईल असं सांगून घरातून बाहेर पडलेला माझा मुलगा अजून परतला नाही. या लोकांना काय तलवारी काढण्याचा परवाना दिला गेलाय का? आमचा एकुलता एक मुलगा होता तो कुठं गेलाय त्याचं काय झालंय या विचाराने त्याची आई कासाविस झाली आहे. हिंदूची मुलगी जर तुम्ही नेली तर तुमच्या धर्माला योग्य आणी हिंदू मुलाने मुस्लीम मुलीशी लग्न केलं तर ते गैर कसं? चुक काय एकट्या आमच्या मुलाने केली होती का? मुलगीही त्यात सामील होती. जर आरोपी पकडले गेले तर आमचा मुलगा का सापडत नाही? त्याचा या लोकांनी घातपात केला असल्याचा आरोप नातेवाईकांनी केला. आठ दिवस ऊलटून गेले आहे मात्र दिपकचा कोणताही ठावठिकाणा लागत नसल्याने आता कुटूंबीयांचा संयम सुटत चाललाय. जर लवकर त्याचा तपास लावला नाही आणी दोषीवर कारवाई केली गेली नाही तर तीव्र आंदोलन होण्याची शक्यता आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IND vs BAN: पहिल्याच डावात केलेल्या या 3 चुका टीम इंडियाला महागात पडू शकतात

IND vs BAN, 1st Test: टीम इंडियाचा डाव आटोपला! जडेजाचं शतक थोडक्यात हुकलं, बांगलादेशचा युवा गोलंदाज चमकला

Jalna Accident : जालन्यात एसटी बस आणि ट्रक अपघातात आतापर्यंत ६ जणांचा मृत्यू, धडकी भरवणारे PHOTO पाहा

Chandrakant Patil News : खडसेंमुळेच राजकारणाचा स्तर खाली घसरलाय; आमदार चंद्रकांत पाटील यांचा आरोप

Metro Ticket Booking: मेट्रोच्या तिकीटासाठी रांगेत उभं राहायची गरज नाही; काही मिनिटात ऑनलाइन तिकीट काढा

SCROLL FOR NEXT